मतदानाच्या यादीमधुनी गायब राजा राणी -

.
"" मतदानाच्या यादीमधुनी गायब राजा राणी -""

(चाल- भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी)

मतदानाच्या यादीमधुनी गायब राजा राणी
अर्ध्यावरती नाद सोडला मतदानावर पाणी ...

नवरा वदला "मला ग नाही, नावाची ती आशा
माझ्या नावापुढेच आहे 'मयत' खुणेची रेषा "
का भार्येच्या डोळा तेव्हा भरून आले पाणी ..... अर्ध्यावरती .....

भार्या वदली बघत एकएक यादीमधला फोटो
"उद्या पहाते दुसऱ्या आपुल्या प्रभागात मी फोटो "
पण नवऱ्याला नव्हती खात्री दूर बसे जाऊनी .......अर्ध्यावरती....

तिला विचारी नवरा- 'का हे नाव असे खोडावे ?
आयोगाने पुसण्याआधी आम्हास का न पुसावे !'
भार्येला ना उत्तर सुचले, झाली केविलवाणी........अर्ध्यावरती ..

का नवऱ्याने मिटले डोळे 'शाईखूण' दिसताना
का नवऱ्याला त्रास वाटला मतदान ते बघताना
बोटावरती नजर टाकितो अपुल्या उदासवाणी .......अर्ध्यावरती ....

.
http://mee-videsh.blogspot.in/
.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

मस्त. नेहमीच्या विदेशी शैलीतली, सोपी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

खरच छान जमली आहे. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवडली.

'फेसबुकावर फोटो आता कुठुनी टाकू बाई?'
या प्रश्नाला उत्तर सुचले, मुलगा म्हणतो 'आई,
कोपऱ्यावरी दोरुपयाला शाई विकतो वाणी....'

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राजेश, सारिका, अरुण- प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0