सुसंस्‍कृत माणसांचा मूर्खपणा

गोष्ट १ली

काल दुपारची ३ ची वेळ

बाहेर अंगणात गलका ऐकु आला म्हणुन बाहेर आलो तर १५-२० जणांचा एक घोळका आमच्या बंगल्याच्या आवरात शिरून आमच्याच बागेतल्या अशोकाच्या शेड्यांकडे नजर लावुन गहन चर्चा करण्यात मग्न झाला होता.

मी त्यांना हटकले तेव्हा त्यातल्या एकाने मला सांगितले की एक कावळा उडता उडता पतंगाच्या मांजाला अडकुन अशोकाच्या झाडाला लटकला होतात. मी त्यांना परवानगीशिवाय आत आले म्हणुन झाडले आणि घरात आलो. पण थोड्या वेळाने गलका परत वाढला म्हणुन परत बाहेर आलो. घोळक्यात कामधाम सोडुन सुमारे १०० जण गोळा झाले. पूर्ण वाढलेल्या अशोकाच्या शेंड्यावरऊन कावळ्याला कसे सोडवायचे याची मसलत माझ्या घराच्या अंगणात रंगली होती.

कावळा फारच नशीबवान... त्यांच्या जिवावरचा प्रसंग एका पक्षीप्रेमीने पाहिला म्हणुन ... कारण काही मिनीटातच अग्निशमनदलाची गाडी घंटा वाजवत दारात हजर.

अग्निशमनदलाच्या जवानांनी (बहुधा मनातल्या मनात कपाळावर हात मारत) गर्दी पाहुन भराभर हालचाली केल्या. प्रथम काही जण आमच्या गच्चीवरुन ३ मोठे बांबू एकत्र बांधुन शेड्यापर्यंत पोचता येत का अजमावु लागले. तरी पण कावळ्यापर्यंत पोचता येईना तेव्हा शेजारच्या घराच्या गच्चीवरून काही पक्षीमित्र आणि अग्निशमन दलाचे जवान प्रयत्न करू लागले.

एव्हाना आजुबाजुच्या इमारतीमधुन हे ’नाट्य’ बघायला आणखी १००+ जण गोळा झाले होते.

कावळ्याचे नशीब खरेच बलवत्तर...


सलग २ तासांच्या प्रयत्नानंतर कावळ्याची सुटका झाली तेव्हा जमावाने शिट्ट्या आणि टाळ्या वाजवल्या.

मला मात्र दोन प्रश्न सतावत होते - ही भूतदया माणसे अडचणीत असताना कुठे जाते. आणि जमलेल्या घोळक्यातले किती पक्षीप्रेमी शाकहारी असतील?
-----------------------------------------------
गोष्ट दुसरी

सन १९८८-८९.

आय आय टी मुंबईचा परिसर

माझे काम संपले तोपर्यंत रात्रीच्या जेवणाची वेळ झाली होती. मी हॉस्टेल कडे जाताना मुलांचा एक घोळका हातात कसले तरी फलक घेऊन रस्त्यावरून विरूद्ध दिशेने निघाला होता.

मी दुर्लक्षकरून तडक मेसमध्ये जेवायला गेलो. तेव्हा काही जणांनी मेसमध्ये एका निषेधसभेचे पोस्टर लावले होते.

मी चोकशी केली. तेव्हा कळले की,

एका वन्यजीवप्रेमीने हॉस्टेल क्र. ८ च्या आवारात एका छोट्या अजगराला पकडले आणि दुसर्‍या दिवशी बोरीवलीच्या उद्यानात सोडुन द्यायचा विचार करून एका पोत्यात बांधुन ठेवले. पण अजगर भुकेला राहिला तर काय म्हणुन त्याने सरळ मेस मधल्या मार्जारकुळातल्या एका मार्जार शिशुला पकडुन अजगराच्या तोंडी दिले आणि त्याच्या पोटापाण्याची व्यवस्था केली.

कॅम्पस मधल्या भूतदयावादी वन्यजीवप्रेमीना ही "अनैतिक" हकीकत समजली तेव्हा ते संतापले. त्यांनी मोर्चा काढुन निषेध सभा बोलवली होती...

मी तेव्हा पण कपाळाला हात मारून घेतला होता...

field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (4 votes)

प्रतिक्रिया

सगळ्या फॅशन्स. नाटकं. कावळा वाचवायचा घरी जाऊन चिकन, मटन, बीफ, फिश, इ इ .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मग काय आयताच हाती लागलाय म्हणून कावळा खायला हवा होता का? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

कावळा झाडावर अडकला होता तशी एखादी कोंबडी पाय अडकून वगैरे एखाद्या खबदाडीत अडकली आहे असा विचार करुन पहा.
पब्लिकनं तिला सोडवलं असतं का ?
सोडवलं असतच तर तिने अधिक काळ जिवंत रहावं म्हणून सोडवलं असतं का ? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

कोंबडीला तसेच सोडले असते तर तो सुसंकृत माणसाचा मूर्खपणा ठरला नसता काय? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

कोंबडी कोणाची होती, यावर अवलंबून आहे.

दुसर्‍याची कोंबडी, केवळ झाडात अडकलेली आयती सापडलीय म्हणून गट्टम करणारांचे बाबतीत 'सुसंस्कृत' हा शब्द लागू झाला नसताही कदाचित.

उलटपक्षी, स्वतःची कोंबडी, केवळ झाडात अडकलेली आयती सापडलीय म्हणून (एरवी तसा काही इरादा नसताना) गट्टम करणारांचा तो शहाणपणा ठरला असता किंवा कसे, याबद्दल साशंक आहे.

--------------------------------------------------------------------------------------------------------------

अर्थात, कोणी सांगावे. हल्ली काहीही होऊ शकते म्हणा. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लोक कावळे, कबूतरे खातात हे मला माहित आहे.

कबूतर शिजवून खाताना मीच पाहिले आहे. कावळा त्याच कारणाकरता स्वच्छ करताना पाहिला. प्रत्यक्ष खाताना नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

@कावळा - 'रन' सिनेमातली "कव्वा बिर्यानी" आठवली Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रोचक अनुभव!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्हणजे पुण्यातल्या काही लोकांना मोदींच्या पंप्रपदाचं काही पडलेलं नाहीये तर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पुणेकरांची कृती सुद्धा मार्मिक हो म्हणजे कावळ्याला वाचवलं, डोमकावळ्याबद्दलची अनास्था लक्षात घेण्यासारखी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काही लोकांना कावळ्याच्या विषयातही मोदी आणल्यावाचून राहवत नाही तर Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

कुणाला कशाचं तर कुणाला मोदीचं Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तो कावळा कदाचित अंबानी अडाणी म्हणत असेल, म्हणून लोक गोळा झाले. Wink Wink Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला प्रश्न पड्लाय, डाव्या हाताने कावळा मारण्याची एवढी चंगली संधी आली असताना कोणीच कशी ती घेतली नाही?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही भूतदया माणसे अडचणीत असताना कुठे जाते

-> कुठेच नाही! एखाद्या कावळ्याला अडचणीच्या प्रसंगातून वाचवणे सोपे आहे. तसंच एखाद्या माणसाला अडचणीच्या प्रसंगातून सोडवणेसुद्धा. आणि लोकं बरेचदा करतात ते.
पण बघा, कावळा वाचवताना एफ.आय.आर., पोलीस, पंचनामा, साक्ष, हॉस्पिटल असल्या गोष्टी मधे आल्या असत्या तर लोकांनी कावळ्यालाही वाचवताना विचार केला असता, नाही का?

जमलेल्या घोळक्यातले किती पक्षीप्रेमी शाकहारी असतील?

काय कल्पना नाय. पण त्याचं ह्या भूतदयेशी correlation लावता येणं थोडं अवघड आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काही लोकांच्या मते ह्या धाग्याचे शिर्षक आजच्या निकालानंतर अधिक मार्मिक ठरावे Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

निकाल अगदि उलट लागला असता तरी काही लोकांना हेच वाटलं असतं.
Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

हा हा हा, अगदी अगदी Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

नक्की कोणत्या अर्थाने लिहीलाय हा प्रतिसाद? प्रो, अँटी दोघेही हे ऐकमेकांना म्हणू शकतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

थोडक्यात काय, तर हरलेले लोक हे नेहमी निवडणुकीच्या दिवशी म्हणू शकतात.
२००४,२००९ ला हेच म्हणणारे आज विजयी अविर्भावात आहेत,
तर त्यावेळचे विजेते आज तेच रुदन करत असणार.

"मी" ह्यांच्या विधानाचा रोख ह्यावेळी मार खाल्लेल्यांकडे असावा असा अंदाज आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आणि जमलेल्या घोळक्यातले किती पक्षीप्रेमी शाकहारी असतील?

--- पूर्वीचं पुणं आता राह्यलं नाही Smile

घोळक्यात कामधाम सोडुन सुमारे १०० जण गोळा झाले

--- क्षमस्व, चुकलो! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--- क्षमस्व, चुकलो! (डोळा मारत)

पुण्याच्या आजच्या वाढीव लोकसंख्येच्या तुलनेत, घोळक्यात कामधाम सोडून (सुमारे) १०० जण गोळा झाले, हा खूप मोठा बदल नाही काय? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तसेही १०० हा अंदाज एका पुणेकराचाच, आता तुम्ही सांगा खरचं १०० असते तर त्यांनी १०० लोकांचा फोटो नसता काढला?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आता तुम्ही सांगा खरचं १०० असते तर त्यांनी १०० लोकांचा फोटो नसता काढला?

अग्निशमनदलाचा रथ १०० लोक गोळा करू शकत नाही असं वाटतं का? बाय द वे: गर्दीचा फोटो काढयची इच्छा होती पण माझी अशोकाची झाडे आड येत होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जर हे ना-नाट्य तुमच्या अंगणाइअवजी इतरत्र घडत असते तर
अ. तुम्ही एक बघे असता
ब. तुम्हीही कावळ्याला सोडवु पाहिले असते
क. तुम्ही लोकांना आपणहून हाकलले असते / कावळ्याला वाचवण्यापासून परावृत्त केले असते
ड. दुर्लक्ष केले असते

माझ्यामते 'ड' पर्याय निवडला असता.
वरील उद्वेग हा, ही घटना तुम्हाला व्यत्ययकारक ठरली, म्हणून असल्यासारखा वाटतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आपल्या "मालकीच्या" अंगणात काही लोक तात्पुरते आल्याचा त्रास सुसंस्कृत माणसालाच होतो; त्यात मूर्खपणा काहीही नाही. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही भूतदया माणसे अडचणीत असताना कुठे जाते.

त्यात काय आहे? त्या झाडावर त्या कावळ्याच्या ऐवजी तुम्ही जरी पतंगाच्या मांजाने लटकला असतात, तरीसुद्धा पब्लिकने अग्निशामक दलाला बोलावले असतेच की. फार कशाला, पोलिसांनासुद्धा (झालेच तर रुग्णवाहिकेलाही) बोलावले असते.

घोळकाही मोठा झाला असता कदाचित. 'झाडाला लटकलेला माणूस' असले सनसनाटी दृश्य रोजरोज थोडेच पाहावयास मिळते?

एका वन्यजीवप्रेमीने हॉस्टेल क्र. ८ च्या आवारात एका छोट्या अजगराला पकडले आणि दुसर्‍या दिवशी बोरीवलीच्या उद्यानात सोडुन द्यायचा विचार करून एका पोत्यात बांधुन ठेवले. पण अजगर भुकेला राहिला तर काय म्हणुन त्याने सरळ मेस मधल्या मार्जारकुळातल्या एका मार्जार शिशुला पकडुन अजगराच्या तोंडी दिले आणि त्याच्या पोटापाण्याची व्यवस्था केली.

शिवाजी नेहमी मार्जारकुळात जन्मावा. अजगर भुकेला राहिला तर काय, म्हणून सदर सद्गृहस्थांनी स्वतःचे शिशूस अजगराचे तोंडी दिले असते काय?

स्वतःच्या पोराचे सोडा. समजा, अजगर भुकेला राहू नये, म्हणून सदर सद्गृहस्थांनी रस्त्यावरील एखाद्या र्‍याण्डम भिकार्‍यास पकडून अजगराचे तोंडी दिले असते, तर आपली प्रतिक्रिया काय झाली असती?

मेसमधूनच पकडायचे होते, तर त्यापेक्षा मेसमधून चिकन विकत आणून अजगराला घालता आले नसते काय? पण त्याकरिता दमड्या मोजाव्या लागतात. मांजराचे पोर आयते मिळते. वर आयते अजगरातिथ्याचे पुण्य! इन द मीनव्हाइल, इथे मांजराचे पोर जाते जिवानिशी...

(समजा, अजगर मोकळा फिरत असता, आणि अजगराने स्वतः त्या मार्जारशिशूस मटकावले असते, आणि या सद्गृहस्थांनी त्यात हस्तक्षेप केला नसता, तर गोष्ट वेगळी ठरती. इथे गृहस्थांनी स्वतः हस्तक्षेप करून दुसर्‍या कोणा मांजराचे जिवंत पोर - विच वॉज़ माइंडिंग इट्स ओन बिझनेस, माइंड यू (आणि, जे मांजराचे पोर सदर सद्गृहस्थ स्वतःसुद्धा खात नव्हते, पुन्हा माइंड यू; नाहीतर किमानपक्षी 'स्वतःच्या तोंडचा घास काढून अजगरास दिला' म्हणून तरी क्रेडिट देता आले असते) - उचलून तिसर्‍याच कोणा अजगरास खाऊ घातलेले आहे. असे करण्यापूर्वी निदान 'का रे बाबा, माझ्या या पापाचा वाटेकरी तू होशील का?' असे तरी सदर सद्गृहस्थांनी त्या अजगरास आगाऊ विचारले होते काय?

आगाऊ आचरटपणा साला! यालाच मराठीत 'आयजीच्या जिवावर बायजी उधार' अशी कायशीशी म्हण आहे, नाही काय? लेफ्ट टू देमसेल्व्ज़, त्या अजगराने आणि त्या मांजराने आपापसात काय ते बघून घेतले असते, काय हवी तशी निगोशिएशन्स केली असती, नाहीतर अजगराने बळजबरीने ते पोर हिसकावून घेतले असते; इट वुड ह्याव बीन ऑल बिट्वीन द अजगर अ‍ॅण्ड द मांजर. यांना मधल्यामध्ये ते पोर उचलून परस्पर ते अजगरास देण्याचा अधिकार कोणी दिला? अजगर यांस शिकार मिळवून देण्याचे काही कमिशन देत होता काय?)

---------------------------------------------------------------------------------------------------

(कावळ्याचे पंख / पिसे एवढी मोठी?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी म्हणतो या धाग्याला एवढा टीआरपी मिळतोच कसा ? नक्कीच अमित शहाने पाळलेला कावळा असणार आहे हा !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!