NDE बद्दलच्या किरकोळ शंका

एम्ब्रेस्ड बाय लाईट, सेव्ह्ड बाय द लाईट, thi rTee मिनीटस इन हेवन अशा प्रकारच्या पुस्तकांचा फडशा पाडून , तसेच तासन तास 'निअर डेथ एक्सपीरीअन्स"(NDE ) सारख्या साईट्वर घालवून अन त्या प्रकारचे व्हिडीओ पाहून माझ्या मनात काही शंका निर्माण झाल्या आहेत. त्या शंकाकंड्शमनार्थ हा धागाप्रपंच. सगळ्या NDE मध्ये बर्याच सामाईक बाबी आढळल्या. किंबहुना एक स्ट्रक्चरच , एक क्रमच आढळला जो पुढे येईलच व तदनुशंगिक काही शंकादेखील खाली येतील.

सर्वात प्रथम म्हणजे NDEer मृत्युच्या विविक्षित क्षणोपरांत अचानक सीलींगपाशी हवेत तरंगू लागतो. तरंगत असताना खाली स्वत:चा अचेतन मृतदेह ती व्यक्ती पहाते. थोडा वेळ लागतो पण शेवटी ते प्रेत आपलेच प्रेत आहे हे या व्यक्तीच्या ध्यानात येते.

शंका १- हवेत तरंगणे इतके सहज का गृहीत धरले जाते? म्हणजे normal आयुष्यात तर आपण सहसा असे अचानक तरंगायला लागत नाही. ("न"वी बाजू म्हणतात तसे आजकाल काहीही घडू शकते म्हणून लिहीले आहे - सहसा Lol मग मृत्युपश्चात NDEer ना मृत्यूचे भान यायला इतका वेळ का लागतो?

शंका २- बरं स्वत:चं शरीर त्रिमितीमध्ये पाहून अनेकाना ही जाणीव होते की आपण स्वत:ला समाजत होतो तितके देखणे नाही. किंवा तितके बारीक नाही, सुडौल नाही यंव न त्यंव. मग परत आल्यानंतर किती NDEers स्वत:चा appearance सुधारण्याचा प्रयत्न करतात? निदान तसे खुले आम सांगतात? शून्य. बहुसंख्य NDEers मानवतावादी व अध्यात्मिक मूल्यांबाबतच बोलतात.

मृत झाल्याची एकदा व्यक्तीची खात्री पटली की लगेच एका काळ्या टनेल अर्थात बोगद्यातून तिचा प्रवास सुरु होतो.काहीजणांनी असे म्हटले आहे की अन्य जीव या बोगद्यातून प्रवास करत असल्याचे त्यांना जाणवले.

शंका ३- मग इतक्या गर्दीत या बोगद्यात धक्काबुक्की होते का? बरे सर्वच जण चुपचाप मार्गाक्रमण का करतात? कोणी शीळ घालत नाही की वेळ जायला गाणे म्हणत नाही. मृत्युपश्चात परलोकात विनोदाचे वावडे असते का?असो.

पुढे थोड्या टिवल्याबावल्या झाल्यानंतर, प्रकाश दिसतो/ लक्षात येतो. आणि मग व्यक्ती एका BRILLIANT फार प्रखर नाही अशा तेजोमय प्रकाशाकडे आकर्षित होते.

यावर शंका ४- मला जर प्रकाश आवडत नसेल जर मला कुंद पावसाळी ढगाळ हवा आवडत असेल तरी मी प्रकाशाकडेच आकर्षित व्हायचे का? कोणीही प्रकाशाव्यातीरीक्त अन्य सुंदर मेलो तेजाबद्दल बोलत नाही.

या प्रकाशाचे वर्णन करताना तर सर्व NDEers च्या जिभेवर साक्षात सरस्वतीच नृत्य करू लागते. तो प्रकाश किती दयाळू, समजूतदार, नॉन-जजमेण्टल आहे ते सांगायचे अहमहमिका सुरु होते .मग हाच प्रकाश या व्यक्तीला तिचाच जीवनपट दाखवतो व NDEer ने अन्य जीवांना दिलेले दु:ख , वेदना, यातना तो उलगडून दाखवतो इतकेच नव्हे तर NDEer त्या दुसर्या व्यक्तीच्या नजरेतून तेच दु:ख स्वत: भोगतात. मग NDEer ना जाणवते की ते किती आत्मकेंद्रॆत, स्वार्थी आयुष्य आजवर जगत आले वगैरे वगैरे. उपरतीच होते म्हणा ना.

शंका ५- जर हा प्रकाश इतका दयाळू आहे तर क्षमा करून why does it not move on?????????

मग पुढे NDEers ना त्यांचे जन्मजन्मान्तरीचे सुहुद, मित्र भेटतात. व हे मित्र त्यांना ज्ञानामृत पाजतात.

शंका ६- जे ज्ञान दिले जाते ते नेहमी अध्यात्मिक किंवा metaphysical प्रान्तातालेच का असते? कोणीही NDEer ने परत आल्यावर या ज्ञानाच्या जोरावर एखादा गणिती सिद्धांत सोडवला आहे किंवा फार splendid नाही तर नको पण एखादा बारीकसा का होईना शोध लावला आहे असेही काही दिसत नाही.

सरतेशेवटी NDEer ना २ पर्याय दिले जातात परलोकातच रहाणे अथवा पृथ्वीवर परत जाणे. नाही जायचे म्हटले तरी त्याना "कार्य अपुरे आहे" या सबबीखाली सक्तीने पाठविले जाते. व परत आल्यावर "विशिष्ठ ध्येयाने झपाटून" ती व्यक्ती जीवन जगते वगैरे.

शंका ७ - इतकं ध्येय आदि सापडल्यावरही हे NDEers पुस्तक वगैरे का लिहितात बरे स्वत:ची स्टोरी म्हणून लिहीले तरी मग त्या पुस्तकाचे उत्पन्न charity ला जायला हवे कारण इतकी उच्च व अजोड अध्यात्मिक उंचीची माणसे स्वत: कशाला उपभोग घेतील? पण ते उत्पन्न charity ला जाते असे एकाही NDEer ने लिहिल्याचे ऐकिवात नाही.

field_vote: 
4.5
Your rating: None Average: 4.5 (2 votes)

प्रतिक्रिया

मस्त धागा.

मी धाग्याचं शीर्षक 'NDA बद्दल काही किरकोळ शंका' असं चुकून वाचलं. आणि मग हवेत तरंगणं वगैरेला वेगळाच अर्थ प्राप्त झाला.

मला वाटतं नीअर डेथ एक्स्पिरिअन्स हे मेट्रिक्समधल्यासारखं काहीतरी असावं. म्हणजे तुम्हाला आत्मज्ञान प्राप्त करायचं असेल, अध्यात्म शिकायचं असेल, किंवा एकंदरीतच या लोकांना ज्याची आस लागली असेल ते सगळं शिकून घ्यायचं असेल तर वर्षानुवर्षांचा अभ्यास करावा लागतो, चिंतन करावं लागतं. पण मेट्रिक्सच्या जगात तसं करण्याची गरज नसते. आता उदाहरणार्थ मेट्रिक्सच्या पहिल्या भागात ट्रिनिटीला हेलिकॉप्टर चालवता येत नसतं. पण काही सेकंदात ते तिला शिकायचं असतं. मग ती झटकन ट्रेनिंग प्रोग्राम डाउनलोडवून घेते, आणि तिला लगेच ते चालवता येतं. तसंच या एनडीइ वाल्यांना होत असावं.

शंका ५- जर हा प्रकाश इतका दयाळू आहे तर क्षमा करून why does it not move on?????????

हा ट्रेनिंग प्रोग्राम कोणातरी पॅसिव्ह अग्रेसिव्ह व्यक्तीने लिहिला असावा.

शंका ७ - इतकं ध्येय आदि सापडल्यावरही हे NDEers पुस्तक वगैरे का लिहितात बरे स्वत:ची स्टोरी म्हणून लिहीले तरी मग त्या पुस्तकाचे उत्पन्न charity ला जायला हवे कारण इतकी उच्च व अजोड अध्यात्मिक उंचीची माणसे स्वत: कशाला उपभोग घेतील?

हा अत्यंत हलकटपणाचा प्रश्न वाटतो, ज्यांना एनडिइ आलेला नाही असेच क्षुद्र लोक विचारू शकतात असा प्रश्न. अहो, त्यांच्या कुडीत प्राण शिल्लक रहावा ही सर्वोच्च शक्तीचीच इच्छा होती ना! मग त्या पुस्तकातून मिळणाऱ्या उत्पन्नातून त्यांना पुढची पुस्तकं लिहिण्यासाठी पुढचा वेळ मोकळा काढता येतो, तर तुमच्या का पोटात दुखतं?

हा ट्रेनिंग प्रोग्राम कोणातरी पॅसिव्ह अग्रेसिव्ह व्यक्तीने लिहिला असावा.

हाहाहा अगदी अगदी.

हा हा हा भारी लिहीलय!

===
Amazing Amy (◣_◢)

जे ज्ञान दिले जाते ते नेहमी अध्यात्मिक किंवा metaphysical प्रान्तातालेच का असते?

खरे आहे! ही मंडळी त्याऐवजी (१) मंडईतील आजचे मटारचे भाव, (२) आजची 'झेलम' किती दिवस लेट आहे, (३) बॉलीवूडमधील कोणाकोणाचे कितीकितीजणांबरोबर लफडे तूर्तास चालू आहे, किंवा (४) फ्रीजमध्ये मागच्या आठवड्यात विसरून गेलेली पडवळाची भाजी आज अचानक पाहुणे उपटल्याकारणाने झालेल्या फ्रीजच्या उत्खननात सापडल्यावर तिच्या पुनरुज्जीवनाकरिता करण्याचे घरगुती उपाय (आणि त्यात कामी येणारे 'आजीबाईंच्या बटव्या'तील घटक), अशा विषयांतील अद्ययावत आणि इत्थंभूत ज्ञानाचे वाटप करत फिरतील, तर किती बहार येईल! शिवाय, अशी माहिती ही केवळ उद्बोधक आणि मनोरंजकच नव्हे, तर क्वचित उपयुक्तही ठरू शकेल.

मात्र, अशा ज्ञानवाटपामुळे अनेकांच्या पोटावर पाय येण्याची शक्यता लक्षात घेता, संबंधित 'व्हेष्टेड इंटरेष्ट्स' (जसे: गूगल, रेल्वेखात्याची माहितीची हॉटलाइन, विभिन्न सिनेनियतकालिके, 'कालनिर्णय', इ.इ.) अशा लोकांकडून नॉन-कॉम्पीट करारांवर आगाऊ स्वाक्षर्‍या करवून अथवा अंगठे उठवून घेत असणे अगदीच असंभव नसावे. किंवा, कोण जाणे, अशा शक्तींशी पुढेमागे 'पाला पडल्या'स आपले (यापुढील) E हे कदाचित (केवळ) ND राहणार नाहीत, या (माझ्या मते तथ्यहीन अत एव अनाठायी) भीतीपोटी ही मंडळी अशा उपक्रमांपासून कदाचित स्वयंस्फूर्तीने दूर राहत असावीत.

===========================================================
मग्रूर, मुजोर आणि आढ्यताखोर भुंकणारा ब्राह्मण पुरुष
(ऐतिहासिक काळात किंवा फेस‌बुकाव‌र न वाव‌र‌लेला, प‌ण उप‌क्र‌माव‌र थोडाफार‌ बाग‌ड‌लेला)

मागच्या आठवड्यातलीच काय, पण ताजी पडवळाची भाजी खा(वी लाग)णे हाच एक NDE आहे.

*********
आलं का आलं आलं?

...म्हणूनच तर ती एकदा फ्रीजमध्ये गेल्यावर (शक्य तोवर कायमस्वरूपी) विस्मरणात जाते ना?

===========================================================
मग्रूर, मुजोर आणि आढ्यताखोर भुंकणारा ब्राह्मण पुरुष
(ऐतिहासिक काळात किंवा फेस‌बुकाव‌र न वाव‌र‌लेला, प‌ण उप‌क्र‌माव‌र थोडाफार‌ बाग‌ड‌लेला)

हाहाहा Smile

ठ्ठो ROFL

आदूबाळ एकच लिहितो पण साला असली मारतो भेंडी आपण पुन्हापुन्हा गरगरा फिरणारे पंखे होतो साला याचे. _/\_

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

मी ११ वीला असताना, ९१-९२ ला, मला पहिल्यांदा एन डी ई झाला (अशीच वाक्यरचना करतात का?). पण तेव्हा मला त्याला एन डी ई म्हणतात हे माहित नव्हते. म्हणजे असे होण्याचा आणि मरणाचा काही संबंध आहे हेच माहित नव्हते. पहिल्या वेळेस मी गोंधळलो होतो, पण नंतर मला मजा यायला लागली म्हणू शकता. जेव्हा २००५ च्या आसपास मी या प्रकाराला हे नाव आणि जगात इतक्या लोकांना असे झाले आहे हे बघून एकदम चिल्ल झालो. पण साला नंतर कै एन डी ई आला नै.

सही: तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाच वाद आपणाशी.

पण साला नंतर कै एन डी ई आला नै.

चांगले आहे ना!

नाहीतर मग, रोज (जवळजवळ) मरे, त्यास कोण (जवळजवळ) रडे?

===========================================================
मग्रूर, मुजोर आणि आढ्यताखोर भुंकणारा ब्राह्मण पुरुष
(ऐतिहासिक काळात किंवा फेस‌बुकाव‌र न वाव‌र‌लेला, प‌ण उप‌क्र‌माव‌र थोडाफार‌ बाग‌ड‌लेला)

एन डी ई मधे माणूस्/आत्मा बाहेर निघतो हे खोटे आहे. काँशसनेस दोन्हीकडे असतो पण प्रसंगाच्या पिक टायमाला विलपावर मुख्य शरीरात नसते, म्हणजे तुम्ही आहात हे माहित असतं पण असं उठू वैगेरे शकत नाही. माझ्या भावांच्या शेजारी पहुडलो असताना मला बहिर्देहतेचा अनुभव आला. मला वाटले तो अर्धा तास असावा. पण मी उठलो तेव्हापर्यंत भावांनी मला हलवले देखिल नाही. एअरवी मी सगळी बडबड करतो, तेव्हा त्यांनी मला ३० मिनिटे दुर्लक्ष केले हे असंभव असावे.

सही: तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाच वाद आपणाशी.

आपला अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद.

तुम्हाला बहुतेक sleep paralysis चा अनुभव आला असावा. मलापण एकदा हा अनुभव आला आहे. तेव्हा भीती वाटली होती. नंतर खूप वर्षांनी जेव्हा आंतरजालावर याची माहिती मिळाली तेव्हा आपल्याला नक्की काय झाले होते ते समजले.
http://en.wikipedia.org/wiki/Sleep_paralysis

हे वाचलं. माझा अनुभव एन डी ई चाच आहे.

लोकांना डेथ म्हणजे काय त्याचं जबर्‍या फॅड आहे म्हणून ते एन डी ई म्हणत असावेत. एन डी ई त प्रत्यक्ष जीव कोणाचाच गेला नसावा. अगदी परतच यायचं नाही वा किमान स्वतःहून परत यायचं नाही असं ठरवलं तरी माणूस नॉर्मल मधे परत येतोच - स्वानुभव.

सही: तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाच वाद आपणाशी.

हे रोचक आहे. मला एकदोनदा स्लीप पअॅरलीसी येऊन गेलाय वाटत :-D. पण आऊट ऑफ बॉडी अनुभव नव्हता त्यात.

===
Amazing Amy (◣_◢)

सारीकाताईंची ही ब्लास्फेमी आम्हांस मंजूर नाही. त्यांना जर खरोखरच असा NDE आला असेल तर एकतर त्यांच्या शंकांचं आपोआप निराकरण होईल. (अशा परिस्थितीत त्यांच्या पुस्तकांचं आणि इतर सर्व उत्पन्न त्यांनी माझ्या नावावर करावं.) आणि तसं नसेल तर त्या अनुभवाशिवाय बोलत आहेत. अनुभवाशिवाय बोलणं पाप आहे असं आपल्या संतांनीही सांगितलं पाहिजे. (मी पण पडवळाची भाजी घेऊनच बोलते आहे. लिहायला माझं काय जातंय, 'न'वी बाजू आणि/किंवा आदूबाळ थोडीच माझा फ्रिज तपासायला येणार आहेत!)

पुढच्या वेळेस सारीकाताईंनी सरळ, शिस्तीत मसालेदार चटपटीत गुजराती ढोकळा खाऊन योग्य तो अनुभव घ्यावा आणि नंतरच लिहावे. ऐसी अक्षरे या व्यासपीठाचे असे, अनुभवाशिवाय बोलून गैरफायदा घेण्याचे, परिणाम वाईट होऊ शकतात.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मला इथे कोणीतरी तै म्हटलंच. कित्ती कित्ती च्वीट च्वीट फील होतंय गडे Smile

'न'वी बाजू आणि/किंवा आदूबाळ थोडीच माझा फ्रिज तपासायला येणार आहेत!

फ्रीज तपासायला येतील हां औट ऑफ बॉडी होउन येतील Wink

हं, हे लक्षात अालं नाही. अाता पडवळ थेट फ्रीजरमध्येच टाकेन.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

औट ऑफ बॉडी (तेच ते तुमचे एनडीई की काय ते म्हणालात ते) होऊनहोऊन जायचे कोठे, तर टेक्सासात, आणि कशासाठी, तर कोणाच्यातरी फ्रीजमधली गेल्या जन्मीची पडवळाची भाजी पाहण्यासाठी!

नो थ्यांक्स! त्यापेक्षा सरळ मेलेले काय वाईट?

---------------------------------------------------------

यावरून 'पुशी क्याट, पुशी क्याट'च्या धर्तीवर एखादी कविता पाडायची जबरदस्त हुक्की येत आहे. पण अशा ऐन मोक्याच्या वेळीच नेमकी आमची काव्यप्रतिभा कोठे टेक्सासात पडवळाची भाजी पाहायला गायब होते, हे तो एक जगन्नियंताच जाणे.

===========================================================
मग्रूर, मुजोर आणि आढ्यताखोर भुंकणारा ब्राह्मण पुरुष
(ऐतिहासिक काळात किंवा फेस‌बुकाव‌र न वाव‌र‌लेला, प‌ण उप‌क्र‌माव‌र थोडाफार‌ बाग‌ड‌लेला)

हाहाहा ROFL

"पडवळ आणि फ्रीज" अशा शीर्षकाची एखादी महाभयंकर कविता आता होउनच जाउ दे. Dirol

किंवा 'फ्रीज़मध्ये ठेवलेले पडवळ' असं नाटक तरी.. Wink

आत्ताच पुन्हा एकदा फ्रीज उघडून पाहिला. तुम्ही आणि/किंवा तुमची प्रतिभा (ही कोण नक्की?) तिथे सापडला नाहीत. अस्वलाची मागणी पूर्ण करूनच टाका.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

डुकाटाआ.

===========================================================
मग्रूर, मुजोर आणि आढ्यताखोर भुंकणारा ब्राह्मण पुरुष
(ऐतिहासिक काळात किंवा फेस‌बुकाव‌र न वाव‌र‌लेला, प‌ण उप‌क्र‌माव‌र थोडाफार‌ बाग‌ड‌लेला)

मला कधी निअर डेथ एक्स्पिरीअन्स आलेला नाही पण मी अनेकांना दिलेला आहे. आमच्या मातोश्री तर आठवड्यातनं तीन-चारदा तरी 'जीव घेतलास मुडद्या' असं ऐकवायच्या. (मुडदा कसा जीव घेईल असं एकदा विचारूनही पाहीलं, पण त्यावर उत्तर मिळायच्या आधी जीवाच्या आकांताने पळायची वेळ आली.)

मुडदा कसा जीव घेईल असं एकदा विचारूनही पाहीलं,

झाँबी की कायसेसे प्रकर्ण Wink

तदुपरि आम्ही एनडीई नसला तरी रक्त आटवण्याचा अण्भव पिताश्रींना दिलेला आहे. "रक्त आटवायला लावतोस!" इ.इ.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

"लेसन्स फ्रॉम द लाइट" पुस्तक वाचते आहे. काही का असेना मला अशी पुस्तके खाली ठेववत नाही. या पुस्तकात "प्रेम आणि अन्य जीवांची सेवा" हीच मूल्ये अधोरेखित केलेली आहेत. पहीली काही प्रकरणे वाचून झाली. मला आवडतात ब्वॉ अशी पुस्तके. मृत्युपश्चात जीवनाचे सकारात्मक व आशादायी चित्रण असते.
.
गरुड पुराणही वाचायचे आहे त्यातही मृत्युपश्चात जीवनविषयक वर्णन आहे. किंबहुना शास्त्रानुसार, व्यक्तीच्या मृत्युनंतर तिच्या जवळच्या नातलगांना हे पुराण किती (१३ का काहीतरी) तरी दिवसात वाचावे लागते - असे ऐकून आहे.

अजुन एक हे सगळे आत्मे जातात आणि मग प्रकाशाच्या मीठीत वगैरे जाऊन रडतात वगैरे, त्यांना देवाने फार प्रेम दिले आहे असे वाटते.
मला तरी वाटतं जेव्हा मी परलोकात जाईन तेव्हा एक सणसणीत मुस्काटात लावेन त्या प्रकाशाच्या आणि जीव तोडून "हाड" म्हणेन. बहुसंख्य लोकांना लाचार कमीत कमी क्लेशदायक, अनसर्टन आयुष्य देणार्‍या देवाच्या मीठीत लहान मुलासारखे जायला मला तरी नाही आवडणार. For a change someone kick crap out of that bl**** so called.God.

मला तरी वाटतं जेव्हा मी परलोकात जाईन तेव्हा एक सणसणीत मुस्काटात लावेन त्या प्रकाशाच्या आणि जीव तोडून "हाड" म्हणेन.

इतक्या दुरचा विचार नको करुस शुचि. जवळपास कोणी प्रकाश नावाचा माणुस असेल तर त्याच्याच सणसणीत मुस्काटात लाव, शक्यतो त्याच्या बायकोसमोर. खुप शांत वाटेल मनाला ( म्हणजे पीस ऑफ माइंड, तो मनोबामधला मन नाही )

ROFL हाहाहा काय गं बिचार्‍या प्रकाशची वाट लावतेयस Sad
करतोय देव आणि भरतोय प्रकाश.

मुद्दा आपल्याला शांत वाटण्याचा आहे. आणि त्याच्या बायकोसमोर मार म्हणले कारण त्याच्या बायकोला पण मस्त वाटेल असे कोणीतरी त्याला मारलेले बघुन ( जरी तिने बोलुन नाही दाखवले तरी ). म्हणजे स्वार्था बरोबर दुसर्‍याला मदत पण.