< वाचनः बदलत्या जागा उर्फ आत बसलेली व्यक्ति >

प्रेरणा
बरेच दिवस हा विषय डोक्यात होता. पण निमित्त ऑफिसातल्या रिकाम्या वेळाचं झालं. लेख तुम्हालाच लखलाभ.

काही लोक संडासात वर्तमानपत्र वगैरे वाचतात हे मला माहिती होतं. पण हा प्रकार खूप प्रचलित असेल असं मला वाटलं नव्हतं. पण मध्यंतरी माझा समज रीतसर उद्ध्वस्त झाला.

एका मित्राच्या घरी गेलो होतो. निसर्गाची हाक आली. संडासात गेलो तर तिथे चक्क पुस्तकांचं छोटं कपाट होतं ! आता हा मित्र हुषार वगैरे आहे. घरचेही भरपूर शिक्षित. वाचनाची आवड वगैरे असलेले. पण संडासातला वेळही तिथे वाचन करण्यात घालवण्याइतकी आवड असेल असं मला अजिबात नव्हतं वाटलं. मग यावर आम्हा मित्रांमध्ये रीतसर चर्चा झाली.
यात अनेक वाद निघाले. अनेक निरर्थक श्रद्धा-अंधश्रद्धांचा खल झाला.
"संडासात मन एकाग्र असतं. "
"संडासात केलेलं वाचन छान लक्षात राहतं. मी शाळेत असताना संस्कृतचं आणि इतिहासातल्या सनावळ्यांचं पाठांतर संडासातच करायचो."
वगैरे वगैरे...

एक ना दोन. यातल्या बर्‍याच गोष्टींमधला निरर्थकपणा स्वयंस्पष्ट होता. वाद घालावा, इतकीही त्या गैरसमजांची लायकी नव्हती. पण मुदलात या विषयावर काही बोलायची अनिच्छा / संकोच / भीती, विषयाबद्दलचे गैरसमज आणि भल्याभल्या शिक्षित घरांमधे चालू ठेवली जाणारी निरर्थक परंपरा - हे सगळं अंगावर आलं खरं. तेव्हापासून काही प्रश्न डोक्यात घोळताहेत.

१. तुम्ही संडासात वाचन करता का?
२. फक्त वर्तमानपत्रच वाचता की इतरही काही. पुस्तकं, मासिकं वगैरे
३. "संडासात केलेलं वाचन छान लक्षात राहतं." याचा अनुभव कोणी घेतला आहे का?
३. पुस्तकं वाचत असाल आणि ती पुस्तकं कोणा दुसर्‍याला द्यायची वेळ आली तर 'हे पुस्तक मी संडासात वाचलं आहे' अशी डिस्क्लेमर देता का?
४. वरच्या उलट सुद्धा. की तुम्ही दुसर्‍याच पुस्तक वाचायला घेतलं आहे तर परत करताना वरील डिस्क्लेमर देऊन परत करता का?
५. किंडल वगैरे आधुनिक उपकरणांवर वाचन करता का फक्त कागदी गोष्टींच वाचन?
६. काही विशिष्ट विषयावरची पुस्तकं लागतात (जसे की रहस्य कथा )की काहीही चालतं?
७. फक्त पाश्चात्य संडासात वाचन करता की भारतीय पण?

=======================================================================================================
'ऐसी' हे तसं आधुनिक संस्थळ आहे याची मला कल्पना आहे. इथे इतक्या मूलभूत प्रश्नांची गरज कदाचित नसेलही. मी म्हटल्याप्रमाणे अनेकांना या विषयावर बोलणं काहीसं किळसवाणंही वाटू शकेल.पण माझ्या मित्राच्या अनुभवानंतर मी या विषयाबद्दलची लोकांची मतं ऐकायला आणि त्यांच्या घरांतल्या प्रथा जाणून घ्यायला उत्सुक आहे. प्रश्नांची ही सैल चौकट केवळ सुरुवात करण्यापुरतीच आहे. त्यात प्रश्नांची भर घातली, अनुभव सांगितले, निराळ्या दिशेनं चर्चा गेली, तरीही ते स्वागतार्हच आहे. (नसून सांगता कुणाला? Wink

field_vote: 
4.5
Your rating: None Average: 4.5 (6 votes)

प्रतिक्रिया

आपल्याला संडासात इतका वेळ बसावंच लागत नाही.... Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

येस.

(फॉक्कन प्रेमी) बट्टमण्ण.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ROFL

पण उत्तरं देणं टेम्प्टिंग आहे!

१. तुम्ही संडासात वाचन करता का?: होय.
२. फक्त वर्तमानपत्रच वाचता की इतरही काही. पुस्तकं, मासिकं वगैरे: मुख्यत्वेकरून मोबाईलवर जे वाचता येईल ते सगळं काही.
३. "संडासात केलेलं वाचन छान लक्षात राहतं." याचा अनुभव कोणी घेतला आहे का? चक.
३. पुस्तकं वाचत असाल आणि ती पुस्तकं कोणा दुसर्‍याला द्यायची वेळ आली तर 'हे पुस्तक मी संडासात वाचलं आहे' अशी डिस्क्लेमर देता का? नाही, पण आयडिया भारी आहे, आता वापरीन. Biggrin
४. वरच्या उलट सुद्धा. की तुम्ही दुसर्‍याच पुस्तक वाचायला घेतलं आहे तर परत करताना वरील डिस्क्लेमर देऊन परत करता का? - हॅ! पुस्तक हे पुस्तक आहे. कुठे का वाचलेलं असेना!
५. किंडल वगैरे आधुनिक उपकरणांवर वाचन करता का फक्त कागदी गोष्टींच वाचन? मोबाईल.
६. काही विशिष्ट विषयावरची पुस्तकं लागतात (जसे की रहस्य कथा )की काहीही चालतं? कायपण चालतं. विशेषतः फ्यानफिक्शन! किंवा मग अग्रलेख.
७. फक्त पाश्चात्य संडासात वाचन करता की भारतीय पण? दोन्ही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

धागा जाम आवडला आहे Smile दे टाळी!

१. तुम्ही संडासात वाचन करता का?: होय.
२. फक्त वर्तमानपत्रच वाचता की इतरही काही. पुस्तकं, मासिकं वगैरे: नाही, स्मार्ट्फोनवर जे वाचतायेईल ते.
३. "संडासात केलेलं वाचन छान लक्षात राहतं." याचा अनुभव कोणी घेतला आहे का? मी कुठेही वाचलं काही तरी माझ्या काही केल्या लक्षात रहात नाही.
३. पुस्तकं वाचत असाल आणि ती पुस्तकं कोणा दुसर्‍याला द्यायची वेळ आली तर 'हे पुस्तक मी संडासात वाचलं आहे' अशी डिस्क्लेमर देता का? नाही पुस्तकं (हार्ड्कॉपी) वाचत नाही.
४. वरच्या उलट सुद्धा. की तुम्ही दुसर्‍याच पुस्तक वाचायला घेतलं आहे तर परत करताना वरील डिस्क्लेमर देऊन परत करता का? नॉट अ‍ॅप्लीकेबल
५. किंडल वगैरे आधुनिक उपकरणांवर वाचन करता का फक्त कागदी गोष्टींच वाचन? मोबाईल.
६. काही विशिष्ट विषयावरची पुस्तकं लागतात (जसे की रहस्य कथा )की काहीही चालतं? शक्यतो विकी चाळायला आवडतं, त्यातल्या त्यात पिक्चरच्या स्टॉर्‍या.
७. फक्त पाश्चात्य संडासात वाचन करता की भारतीय पण? पाश्चात्यच

माझ्या एका मावसभावाने पण असंच एक छोटं पुस्तकाचं कपाट संडासात केलय आणि मला आवडली होती ती आयडिया Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आम्ही संडासात फक्त "ळ" करतो. नंतर (इतर कोणी वाचायच्या आत) फ्लश करून टाकतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

ROFL
ळ चा क करून ळ करतो असे म्हणायचे आहे का? Wink
बाकी काही वाचो न वाचो, आरोग्याच्या परीक्षणासाठी या ळ चे वाचन केले पाहिजे असे डॉक्टर्स म्हणतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तरीच विनोबांनी म्हटले आहे - "प्रभाते 'ळ' दर्शनम् |"

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अवांतर :-
विनोबांच्या "प्रभाते मलदर्शनम् " ह्याच्यावर सडकून टिका करताना अत्र्यांनी एक लेख लिहिला होता.
त्याच्या शेवटी त्यांनी पुढील वाक्य लिहीले होते (वाक्य जशास तसे आठवत नाही, थोडाफार बदल असू शकतो.) :-
"आम्ही प्रभात समयी उत्तमोत्तम अशाचेच स्मरण - दर्शन करुत. वाटल्यास ह्या आचार्याने स्वतः मलदर्शन वा मलसेवन काय वाटेल ते करावे."

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

अगदी अगदी.

असे वाचल्याचे आठवते आहे खरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कोणाला कशातून कशाची प्रेरणा मिळेल सांगताच येत नाही Wink
तरी धागा आवडला Tongue

१. तुम्ही संडासात वाचन करता का? - नाही

३. पुस्तकं वाचत असाल आणि ती पुस्तकं कोणा दुसर्‍याला द्यायची वेळ आली तर 'हे पुस्तक मी संडासात वाचलं आहे' अशी डिस्क्लेमर देता का?

वाचत नाही पण सांगायला काय जाते? आयड्या भारी आहे.

४. वरच्या उलट सुद्धा. की तुम्ही दुसर्‍याच पुस्तक वाचायला घेतलं आहे तर परत करताना वरील डिस्क्लेमर देऊन परत करता का?

वाचत असतो तरी असं करायला वेडा आहे का?

बाकी सारे प्रश्न

गैरलागू

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

एवढा वेळ लागत नाही. जेंव्हा लागतो तेंव्हा वाचनाच्या मनःस्थितीत नसतो. त्यामुळे उत्तरांचा प्रश्न(पन माफ करा) येत नाही. पण एक नातेवाईक वर्तमानपत्र वाचतो, तेंव्हापासून त्यांच्याकडे वर्तमानपत्र वाचन टाळले आहे, इथे जे-जे सकारात्मक(पन परत माफ करा) उत्तर देतील त्यांची नावे लक्षात ठेवली पाहिजेत.

पण थोडा तर्कखेळ करता - भारतीय पद्धतीमधे वाचन मग इतर स्वच्छता करताना पुस्तक योग्य जागी ठेवणे सोयीअभावी कठीण आहे, एरवीच फार वेळ लागत असल्यास पुस्तकामुळे(रोचक पुस्तक) अधिक वेळ लागण्याची शक्यता आहे, एवढा वेळ खाल्ल्यामुळे(माफ करा) घरातले इतर वाचक वैतागणे शक्य आहे, पाश्चात्य पद्धतीमधे गुढगे आणि पायांना फार त्रास होत नसल्याने व पुस्तकात अधिक रंगल्यास नक्की काय करत होतो हे विसरून जाणे शक्य आहे काय? आणि विसरल्यास उठल्या-उठल्या 'अरेच्चा' असे उद्गार येणे शक्य आहे काय?

पुरवणी प्रश्न - वाचणारे, वेळेप्रमाणे काय वाचायचे हे पण ठरवतात काय? म्हणजे सकाळी ललित, दुपारी(लागल्यास) मर्डर मिस्ट्री, रात्री कविता वगैरे?

अवांतर - 'प्रेरणा' पहाता आणि 'संस्थळ' पहाता तुम्ही 'एकांतकाकस्पर्श उर्फ शौचालयात तुम्ही काकस्पर्श करता का?' असा धागा काढायला हवा होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'एकांतकाकस्पर्श उर्फ शौचालयात तुम्ही काकस्पर्श करता का?'

आयो..काय काय अर्थ निघू शकतात राव याचे. धन्य _/\_

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बादवे त्यावरून एक ईणोदः

संडासाला "एकांतवास" का म्हणतात?
कारण तिथे एकांत आणि वास दोन्ही असतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

जुना आहे यद्यपि ओल्ड फेव्हरीट आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

संडासाला "एकांतवास" का म्हणतात?

अंहं, तिथे बाई नवर्‍याला 'ए कांत वास मारु नको' म्हणते म्हणून.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अनलेस कपल्स एक्टेंड दि सहजीवन 'देअर', द्याटिज़ ROFL

तदुपरि पंतछाप यमकाचे पोटेन्शिअल यात आहे हे निर्विवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

प्रतिसाद आवडला.
अश्या मौलिक विषयावर तुम्हिही भरपूर विचार करता हे पाहून आनंद झाला. या विषयावर अजून चर्चा, प्रयोग, संशोधन होण्याची गरज आहे. जेणेकरून लौकिकार्थाने मो़कळा असलेल्या वेळाचा जास्तित जास्त सदुपयोग होऊ शकेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

ई ई ई ROFL
खतरनाक जमलय विडंबन _/\_

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वा! हा लेख आम्ही "तिथेच" वाचतोय ....
योगायोग म्हणावं की ... ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त जमलय विडंबन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काही प्रतिसादांना 'माहितीपूर्ण' अशी श्रेणी दिली आहे. अनेक ऐसीकरांच्या bowel movements बाबत फार उत्सुकता होती. त्या शंका दूर झाल्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लोक पण कशाकशाला उत्तरे देतील... 'माहितीपूर्ण'च नाहीतर काय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहो प्रतिगामी! अश्या टॅबू असलेल्या विषयाला वाचा फोडली तर तुम्ही प्रश्नांना हिणवू नका. सकारात्मक चर्चेचं स्वागत आहेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

चर्चेला रंजक विषय घेतला आहे . Smile आम्ही संडासात वाचन करत नाही . माझा मुलगा शाळेत असताना , त्याच्या बाबांनी प्रयोग म्हणून ,संडासाच्या दाराला पाढे लिहिलेला कागद चिकटवून ठेवला होता .त्यामुळे त्याला फायदा झाला असेलच , तो इंजिनिअर झाला आहे . गणितात फारसा रस नसताना रोज ते पाढे पाहून नऊच्या पाढ्यात प्रत्येक आकड्याची बेरीज नऊ होते हा माइंड ब्लोइंग शोध लागल्याने मला माझेच खूप कौतुक वाटले होते . ;;) कुणी संडासात वाचलेलं पुस्तक वाचायची मला इच्छा होणार नाही .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही घ्या उत्तरं ...

तुम्ही संडासात वाचन करता का?

- होय

फक्त वर्तमानपत्रच वाचता की इतरही काही. पुस्तकं, मासिकं वगैरे

- मोबाईल वर वाचता येण्याजोगं सर्व काही वाचतो

"संडासात केलेलं वाचन छान लक्षात राहतं." याचा अनुभव कोणी घेतला आहे का?

- वाचन करतो अभ्यास नाही. मुख्यत्वेकरुन राजकारण, खेळ ई. संदर्भातल्या बातम्या वाचतो त्यामुळे लक्षातवगैरे ठेवण्याच्या लायक काहीच नसतं ...

पुस्तकं वाचत असाल आणि ती पुस्तकं कोणा दुसर्‍याला द्यायची वेळ आली तर 'हे पुस्तक मी संडासात वाचलं आहे' अशी डिस्क्लेमर देता का?

- पुस्तकं वाचत नसल्यामुळे प्रश्न गैरलागू पण "एक फोन करायचाय जरा तुझा मोबाईल दे" असं म्हणणार्‍या काही लोकांना हा मोबाईल मी संडासात नेला होता असं सांगून बघीन

वरच्या उलट सुद्धा. की तुम्ही दुसर्‍याच पुस्तक वाचायला घेतलं आहे तर परत करताना वरील डिस्क्लेमर देऊन परत करता का?

- गैरलागू ...

किंडल वगैरे आधुनिक उपकरणांवर वाचन करता का फक्त कागदी गोष्टींच वाचन?

- मोबाईल फक्त ...

काही विशिष्ट विषयावरची पुस्तकं लागतात (जसे की रहस्य कथा )की काहीही चालतं?

- संडासात करायचं काम सुलभ होण्यासाठी वाचन करत नसल्यामुळे काहीही चालतं .. नो स्पेसिफिक रिक्वायर्मेंट ...

फक्त पाश्चात्य संडासात वाचन करता की भारतीय पण?

- दोन्हीकडे वाचन करतो ...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाबा बर्वे
" समर्थाचिया सेवका वक्र पाहे
असा सर्व भूमंडळी कोण आहे ? "

नाही ती आमची गहन विचार करण्याची जागा आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

ई ई ई बरेचजण मोबाइल घेऊन जातात वाट्टं Sad
यीक्स सलाम नमस्ते आणि देल्ली बेली आठवला... आणि ऐसीवरच्याच एका प्रतिसादातून (बहुतेक अदितीचा) कळलेला चित्रपट, त्यात एक सीन आहे म्हणे ज्यात सार्वजनीक, एकत्र, गप्पा मारत 'हे' करणारी आणि खाणेमात्र कोपर्यात जाऊन, लपून, एकांतात करणारी लोकं दाखवली आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा तो चित्रपट. मलाही जंतूच्या या प्रतिसादातून ते समजलं होतं.

अनुप ढेरे यांना या कल्पक धाग्याबद्दल समस्त ऐसीकरांच्या वतीने हा स्टँड देऊन, त्यांचा सत्कार करण्यात येत आहे -

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हो हो तो 'माझीच गुलाबी' पाहीलेला आधी. तेव्हा त्याला शामृग समजलेले. श्टुरी वाचल्यावर कळलं एमू आहे.
यूट्यूबवर आहे चित्रपट. पाहते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मंडळ आभारी आहे...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

आमचे एक काका संस्कृतचे गाढे अभ्यासक. सगळी पुस्तकं संडासात वाचायला न्यायचे. जावईबापू धार्मिक पुस्तकं वाचतात हे लग्नाच्या बोलणीच्या वेळी सासरच्या मंडळींना आवडले होते, पण लग्न झाल्यावर एकदा भगवद्गीता आत नेताना पाहून सासूबाई थक्क झाल्या. "ते पुस्तक तरी नको" असं खूप सांगून पाहिले, पण व्यर्थ. "एकांतात एकाग्रता" वगैरे काकांनी बरेच समजावून सांगितले. बाहेर आल्यावर सगळ्यांना नुकतेच वाचलेल्या अध्यायाबद्दल प्रवचनपर सांगत बसायचे, त्याला मात्र सासूबाईंनी साफ विरोध केला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

निदान 'भरल्या पोटी तत्त्वज्ञान' सांगितल्याचा आळ तरी येऊ नये Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

__/\__
हा हा हा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

स्वानंद किरकिरेनं त्याच्या मुलाखतीत सांगितलेली मजेदार गोष्ट म्हणजे त्याला गाणी एकतर प्रवासात - चालत्या वाहनात सुचतात, नाहीतर संडासात तरी! शंतनू मोईत्रासोबत एक आल्बम करत असताना स्वानंद सतत टॉयलेटात शिरून बसायचा, म्हणून मोईत्रा भ्यायला होता. याला डायबेटिस वगैरे निघतोय का काय, म्हणून. मग किरकिरेसाहेबांनी लाजत खुलासा केल्यावर त्याला उलगडा झाला. Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

_/\_

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मेघना आणि रोचना यांच्या प्रतिसादांवरून दिसतय की की मला भंपक वाटणार्‍या विधानांमध्ये तथ्य आहे तर!. धन्यवाद दोघींना

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

काही नवीन विचार/कल्पना सुचणे, अडलेले गणित सुटणे, हे दरवेळेस नै पण काहीवेळेस तिकडे होते हे अनुभवलेले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

धागाकर्ते आणि प्रतिसादकर्ते यांना शिसानविवि.

१. तुम्ही संडासात वाचन करता का?
होय.

२. फक्त वर्तमानपत्रच वाचता की इतरही काही. पुस्तकं, मासिकं वगैरे
लॅपटॉप सुद्धा नेलेला आहे. गीतारहस्य, तुकारामगाथा, तुंबाडचे खोत, क्राईम अँड पनिशमेंट या सर्व पुस्तकांनी "ती जागा" पाहिली आहे.

३. "संडासात केलेलं वाचन छान लक्षात राहतं." याचा अनुभव कोणी घेतला आहे का?
होय.

३. पुस्तकं वाचत असाल आणि ती पुस्तकं कोणा दुसर्‍याला द्यायची वेळ आली तर 'हे पुस्तक मी संडासात वाचलं आहे' अशी डिस्क्लेमर देता का?
चांगला उपाय आहे Smile

४. वरच्या उलट सुद्धा. की तुम्ही दुसर्‍याच पुस्तक वाचायला घेतलं आहे तर परत करताना वरील डिस्क्लेमर देऊन परत करता का?
शी: ! त्यात परत करण्यासारखं काय्ये ? Wink

५. किंडल वगैरे आधुनिक उपकरणांवर वाचन करता का फक्त कागदी गोष्टींच वाचन?
स्मार्टफोन, लॅपटॉप, वर्तमानपत्र, पुस्तक.. काहीही.

६. काही विशिष्ट विषयावरची पुस्तकं लागतात (जसे की रहस्य कथा )की काहीही चालतं?
काहीही.

७. फक्त पाश्चात्य संडासात वाचन करता की भारतीय पण?
एकेकाळी भारतीय व्यवस्थेमधे (फेकून देता येईल तो) पेपर वाचायला न्यायचो. भारतीय पद्धतीमधे काहीही नेणं शक्य नाही. सर्व ओलं असतं तिकडे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

या विषयावरती मला काही प्रश्न आहेत -

(१) आपण आत असताना अन्य कोणी दार वाजवलं तर आपल्याला राग येतो का?
.
.......(१-अ) राग येत असल्यास,
.
.............(१-अ -I) त्या रागाच्या भरात वचपा म्हणून तुम्ही उशीरा बाहेर निघता का?
.
.............(१-अ -II) की घाईघाईने बाहेर पडता?
.
.............(१-अ -III) की स्थितप्रज्ञता दाखवून आपला कार्यभाग साधल्यावरच काय ते बाहेर निघता?
.
.......(१-अ) राग येत नसल्यास,
.
.............(१-अ -I) चरणांचा फोटो पाठवावा ही विनंती.
.
(२) अन्य कोणी जर "ती जागा" अडवून बसला असेल अन तुम्हाला जायचे असेल तर मुद्दाम बफर ठेवता का? उदा - अविश्वसनिय व्यक्ती जसे सासू/नणंद आत असेल तर जास्त बफर ठेऊन, अर्थात ताबडतोब दार बडवून, तिच्या "मुद्दाम उशीरा बाहेर निघण्याच्या" कटावर मात करणे वगैरे Wink तितका धोरणीपण तुम्ही दाखवता का?
.
(३) समसमा संयोग होऊन एकाच वेळेला तुम्हाला व अन्य कोणाला जायचे झाल्यास, तुम्ही त्यागवृत्ती चे प्रदर्शन करुन पायावर धोंडा मारुन घेता का?
........ (३-अ) हा त्याग करणे न करणे व्यक्तीच्या नात्यापरत्वे बदलते का? उदा - सासरच्या लोकांसाठी त्याग न करणे, माहेरील लोकांसाठी करणे आदि.

- सध्या इतकेच प्रश्न.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाहाहा नबा का हो "भडकाऊ" श्रेणी दिलीत? ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उगाच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे वाचून की आपल्यासारखी अजून कांही मंडळी आहेत!

तुम्ही संडासात वाचन करता का?

होय. ईमर्जन्सी असेल तर मात्र नाही :bigsmile:

फक्त वर्तमानपत्रच वाचता की इतरही काही. पुस्तकं, मासिकं वगैरे

टॅब, मोबाईल, पुस्तक..

"संडासात केलेलं वाचन छान लक्षात राहतं." याचा अनुभव कोणी घेतला आहे का?

आँ..आठवून पाहतो! :-B

पुस्तकं वाचत असाल आणि ती पुस्तकं कोणा दुसर्‍याला द्यायची वेळ आली तर 'हे पुस्तक मी संडासात वाचलं आहे' अशी डिस्क्लेमर देता का?

कल्पना फार छान! वाचायला म्हणून नेऊन पुस्तक ढापणार्‍यांवर प्रयोग करण्यात येईल! Biggrin

वरच्या उलट सुद्धा. की तुम्ही दुसर्‍याच पुस्तक वाचायला घेतलं आहे तर परत करताना वरील डिस्क्लेमर देऊन परत करता का?

छ्या!

किंडल वगैरे आधुनिक उपकरणांवर वाचन करता का फक्त कागदी गोष्टींच वाचन?

पूर्वी पुस्तकच. आता टॅब देखील.

काही विशिष्ट विषयावरची पुस्तकं लागतात (जसे की रहस्य कथा )की काहीही चालतं?

पुस्तकांच्या बाबतीत मी 'डावं-उजवं' करीत नाही. निदान 'तिथे' तर नाहीच!

फक्त पाश्चात्य संडासात वाचन करता की भारतीय पण?

फक्त पाश्चात्य. भारतीय मध्ये वाचायला वर्तमानपत्र/ पुस्तक नेण्यावरुन लहानपणी लई बोलणी खाल्लीत!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कबीरा खडा बाजार में, मांगे सबकी खैर|
ना काँहू से दोस्ती, ना काँहू से बैर||

संडासात केलेले वाचन लक्षात राहाणे, मनन होणे, सुविचार स्फुटणे वगैरे ही भारतीयांसाठी अ‍ॅक्वायर्ड स्किले किंवा सवयी असाव्यात. त्या त्यांच्या गुणसूत्रात अजून शिरलेल्या नसाव्यात. कारण कोणतीही क्रिया आरामात करता येण्यासारखी साधने बनवणे हा यूज़र्फ्रेन्ड्ली विचार आपल्याला सुचला नव्हता. अर्थात त्यालाही कारण तेच.
आता कमोडावरून संस्कृतिमोडाकडे : पण याला दुसरी बाजूही आहे. पूर्वापार, मनन चिंतन वगैरे करण्यासाठी आपले पूर्वज सुंदर शांत अशा उपवनात जात. तिथे झुळझुळणार्‍या ओढ्याकाठी, पक्ष्यांच्या किलबिलाटात, 'मन्दसमीरे, यमुनातीरे' सारख्या वातावरणात ते तासन् तास- छे चुकले- प्रहरप्रहर बसत. तिथे त्यांना उपनिषदे वगैरे तत्वज्ञान सुचे. तिथेच त्यांचे सामुदायिक पाठांतर होई. 'इह संसारे खलु दुस्तारे' अशी सारातिसारमय सूक्ते त्यांना स्फुरत. आणखीही काही क्रिया त्यांना होत. पण ते आनुषंगिक असे. सध्याच्या भाषेत साइड-ईफेक्ट.
तर सार सांगायचे म्हणजे, चिंतन-मननासाठी खुर्चीची सवय लागणे हे मेकॉलेने आपल्याकडे पसरवलेले खूळ आहे. (ही टूम नाही हे लक्ष्यात घ्या.) ह्यामुळेच आपण भारतीय, 'खुर्चीचा लोभ' नामक भयानक रोगाला बळी पडत चाललो आहोत. आपण आपले संचित असलेले 'उपविश', 'उपविष्ट' हे शब्द आणि उपविष्ठकोनासादि आसने विसरून गेल्याचे हे फळ आहे.
पण लक्ष्यात कोण घेतो?
-एक इंटरनेट हिंदू

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा हा हा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

आता कमोडावरून संस्कृतिमोडाकडे : ....चिंतन-मननासाठी खुर्चीची सवय लागणे हे मेकॉलेने आपल्याकडे पसरवलेले खूळ आहे.

कमोडिनी काय जाणे तो...? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होय, तो परिमळ भोगणे प्राप्त असते. (आता इथे 'भोगा'च्या व्युत्पत्तीची उठाठेव कोणी करू नये म्हणजे झाले.) आपले आपणास भोगावे लागते ते असे. जयासारिखे पूर्वसुकृत केले, तयासारिखे भोगणे प्राप्त झाले. जे खाल्ले, तेच परमळले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

’भोगले जे दु:ख त्याला सुख म्हणावे लागले’चे अन्वयार्थ मनात येऊन एकदम दचकले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

'क्रेडिट व्हॉट गोज़ आउट' या प्राथमिक नियमानुसार ते सुखच असते.
आमच्यायेथे शिवसागर, सुखसागर या नावाची उपाहारगृहे असतात. त्या पाट्या वाचताना हमखास सुखसारक चूर्णाची आठवण येते. आणि काही 'चूरण भगत' मंडळींचीही.
पिकूचीही आठवण आली. मला तर असे वाटून राहिले आहे की हा धागाच 'पिकू'चा प्रेरणास्रोत असावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला तर असे वाटून राहिले आहे की हा धागाच 'पिकू'चा प्रेरणास्रोत असावा.

नाय ओ.. हा धागा जुनाय, मामींनी वर काल्डा. आणि प्रेरणा स्त्रोत दिलाय की धाग्याच्या सुरुवातीला...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

म्हणजे हा धागा वाचल्यामुळेच निर्मात्याला 'पिकू' काढण्याची कल्पना सुचली असावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'संग्रहणी'य धागा Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी चुकून 'हगर्णीय' वाचले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

dyslexenteric? Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL
सगळेच जण 'पिकू' बघून नव्यानं चार्ज होऊन आलेत की काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

...आणि इथे डिसचार्ज होताहेत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नव्यानं चार्ज होऊन आलेत की काय?

डिस्चार्जवरची संभाव्य कोटी 'अति झालं नि हसू आलं' होऊ नये, म्हणून आवरली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संभाव्य

धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

...शोचनीय योगायोग!

(पहिल्या अक्षरास अधिकची मात्रा लागू पडावी).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

याला कुणीतरी बिक्विनॉल द्या...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

उद्बोचक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

laxativo-enteric abuse

खूपच अवांतर : श्रामो ही आद्याक्षरे प्रथम वाचनात आली तेव्हा 'अक्षरांचा श्रमो केला' आठवले होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लोलोल!!
गुल्जारांनी लहाणपणीच्या आठवणी उगाळताना, कुठेशी असं सांगितलं आहे की त्या लाहोरी-पंजाबात, मुलं मुलं संडासाला गेली (चांदण्यात ? गुल्जारच म्हणा ते) गेली की झाल्यावर उतारांवर कुल्ले घासत घसरत यायची..
उगाच चांदणं, चंद्र घासून घासून गुळगुळीत झालेल्या प्रतिमा गुलजारी काव्यात वेगळेपणा मिरवत येत नाहीत!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

गुल्जारांनी लहाणपणीच्या आठवणी उगाळताना, कुठेशी असं सांगितलं आहे की त्या लाहोरी-पंजाबात, मुलं मुलं संडासाला गेली (चांदण्यात ? गुल्जारच म्हणा ते) गेली की झाल्यावर उतारांवर कुल्ले घासत घसरत यायची..

आज कल पाँव जमीं पर नहीं पडते मेरे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा हा हा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

त्या पाकिस्तानच्या रम्य आठवणी...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कमलेश्वर की अशाच कुणातरी हिंदी लेखकाच्या कथेचे नाव "कितने पाकिस्तान" वाचून मला कथा नक्की कशाबद्दल आहे असा प्रश्न पडला होता. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ROFL ROFL ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

म्हंटले आहे वाचाल तर वाचाल. आता जर होत नसेल आणि तास भर बसावे लागत असेल तर डोक्यात निरर्थक विचारांचे काहूर उठेल. त्या पेक्षा काही तरी वाचाल तर मन वाचण्यात मग्न राहील. शिवाय काही साहित्य लपवून वाचायचे असते. त्या साठी संडास उपयुक्त जागा. तसा मी २ मिनिटांपेक्षा जास्त बसत नाही म्हणून वाचत ही नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0