" राजा कोण ??? "

कुठलाही खेळ असू दे, त्याला "राज्य कुणावर?" ह्या प्रश्नानेच सुरुवात होत असते तसाच काहीसा प्रकार सध्या आपल्याकडच्या सगळ्यात मोठ्या खेळातदेखील सध्या चालु आहे .. खेळ आहे - "राज्य कुणाचं? आणि प्रश्न आहे " राजा कोण ??? " .. आता बघा लहानपणी राज्य घेणारा गडी शोधण्यासाठी ज्या वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जात आणि मग एकेकाला बाद करत करत शेवटी तो राज्याचा धनी सापडे त्याच पद्धती वापरून राज्य कुणाचं आणि प्रश्न आहे राजा कोण ह्या दोन्ही गहन प्रश्नांची उकलही शोधता येईल की ...

जरा डोळ्यापुढे आणा ... पॉवरफुल साहेब, उधोजीराजे, नारोबा, अजितदादा,पृथ्वीराजभाऊ, राम्दासबुवा, फडणवीस आणि तावडे, इन्जीन्वाले बाबा असे सर्वजण कोंडाळं करून उभे आहेत आणि १०-२०-३० करताहेत ... आणि एक एक जण सोडवत राज्याचा धनी शोधताहेत !

अहाहा ... १०-२० मध्ये चीटिंगला प्रचंड वाव आहे. हे करताना कुठुन सुरुवात केली तर आपण "सुटू" ते लक्षात घेऊन आपण शेवटपर्यंत सुटणार नाही याची काळजी पॉवरफुल साहेब घेताहेत हे बघून राम्दासबुवा पॉवरफुल साहेबांवर तुम्ही चीटींग केली असा आरोप करताहेत आणि उधोजीराजे त्यांची समजूत काढतायत, इन्जीन्वाले बाबा सगळ्यांना, जरा माझ्यावर राज्य आलं की तुम्हाला माझी औकात दाखवतो वगैरे धमकी देतायत ... असही बघायला मिळेल!

कदाचित बर्‍याच भांडणानंतर आणि विचारानंतर पुन्हा एकदा सर्वजण कोंडाळं करून उभं राहायचं आणि ह्यावेळेला ""आदा मादा ..." करून राजा कोण ते ठरवायच असं ठरेल आणि "इस्ने मारी फूssssस" मधला "स" (उच्चारी "स्स्स") ज्याच्यावर येईल तो सुटला .. असा नियम होईल. ह्यावेळेस कदाचित पॉवरफुल साहेब आपल्याऐवजी आपली कन्यका कोंडाळ्यात उभी करतील आणि मग अजितदादा मला नाही खेळायचं चा सूर लावतील. ह्या वेळेला कोंडाळ्यात नवीनच आलेल्या सत्यग्रही भिडूला खेळायला मिळू नये अशी मागणी होईल अण्णू ह्या मागणीविरोधात पुन्हा उपासाची तयारी करेल, फडणवीस आणि तावडे गोपीनाथ बाबांकडे धाव घेतील आणि पृथ्वीराजभाऊ दिल्लीला जातील ...

समजूत आणि गैरसमजूतीचा खेळ चालू राहील आणि अंतिमतः लोकशाहीचाच विजय होईल ...!!!

प्रेरणा - मूळ लेखन - श्री अस्वल ह्यांचे "तू सुटलास".
मूळ लेख इथे वाचावा - तू सुटलास!

field_vote: 
2.333335
Your rating: None Average: 2.3 (3 votes)

प्रतिक्रिया

Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0