संवाद

एखाद्या पोहता न येणार्या
माणसानं तरंगत राहण्यासाठी
जीवाचा अाटापिटा करत हातपाय
मारावेत तशीच सुरु असते
अापली अाजूबाजूच्या जगाशी
संवाद साधण्याची पोरकी धडपड !

अनेक विसंवादाच्या क्षणांमध्ये
अापल्याला ह्या संवादाच्या
अनेकपदरी जाळ्याचा फोलपणा
जाणवला असतो, पण तरीही
ते विसंवादाचे धागे अलगद, शिताफीनं
दूर करुन अापण ह्या संवादाच्याच जाळ्यात
स्वत:चं गळकं अस्तित्व गोळा करत असतो.

त्या विसंवादाच्या क्षणांपलिकडच्या एकाकी
अरण्यात जाणे कसंही करुन टाळत राहतो,
जीवाचा अाटापिटा करत ... तो ह्या
प्रवासाचा अटळ शेवट हे मनोमनी जाणून.

field_vote: 
3.666665
Your rating: None Average: 3.7 (3 votes)

प्रतिक्रिया

रीडर्स डायजेस्ट मध्ये एक अतिशय सुंदर सुविचार वाचला होता जो की डिट्टो या कवितेशी साधर्म्य सांगणारा होता. मिळाल्यास टाकते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवडली Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान

पहिलं कडवं/भाग इतका प्रभावी आहे की उरलेले दोन निव्वळ स्पष्टीकरणात्मक वाटतात. ती कडवी टाळता आली असती

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!