पेटंट लोकशाहीचे ………..!

तर झाले असे. “हातवारे फेम” ज्येष्ठ पत्रकार अखिल सगळे यांनी मुलाखत घेतली विराज कोकरे या “तरुण” नेत्याची. नवीन निर्माण करु पाहणारे हे तरुण नेते मराठीचे प्रचंड अभिमानी आहेत हे सांप्रतकालीन मराठी जनमानसाला वेगळे सांगावे अशी स्थिती नाही. मराठीविषयी त्यांना खूप लव्ह आहे. ते नेहमी मराठीला मिस करत असतात. व्हेरी प्राउड करतात ते स्वतःला मराठी म्हणवून घेताना. मराठी“कलाकार न कलाकार” त्यांना ओळखतो. पण नेमकी हीच मुलाखत मात्र प्रसारित होऊ शकली नाही म्हणून जनसेवेचे व्रत घेतलेल्या सामान्य माणसकडून अर्थात आम आदमीकडून ही मुलाखत मिळाली.
अखिल सगळेः आज नवा दिवस. नवा विषय्. नवी चर्चा
(विराज पुटपुटतातः किती जुनं झालंय हे! )
पाहुणे मात्र जुने
(विराजच्या कपाळावरील अठी उमटते)
सॉरी. पाहुणे नवे ज्येष्ठ तरुण नेते विराज कोकरे.
विराज कोकरेः नमस्कार.
माझ्या आई बहिणींनो भावांनो विराज कोकरेचा सर्वांना नमस्कार.
अखिल सगळेः
आज मला मात्र तुमच्या वेगळ्या पैलूंवर लक्ष वळवायचं आहे. तुम्ही एक नेते आहात. पुढारी आहात.नेतृत्व करत आहात.लोकमान्य आहात. लोकांचे नेते आहात. जनसामान्यांचे प्रतिनिधी आहात राजकारणी आहात.पॉलीटीशीयन आहात.तुमच्या पक्षाचे कर्णधार आहात.पार्टीचे कॅप्ट्न आहात. आण्णासाहेबांचे वंशज आहात. पण त्यापेक्षा महत्वाचे म्हणजे तुम्ही तुम्ही आहात. (विराज गोंधळून जातात) म्हणजे कलाकार आहात. साहित्यिक आहात. नेमकं याच पैलूवर लक्ष वळवायचं आहे. तुम्हाला साहित्याची आवड आहे. नेमकी ही आवड कशी निर्माण झाली तुमच्यात ?
विराज कोकरेः याचं एकच कारण आहे-
“आमुच्या मनामनांत दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
आमुच्या उराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसांत नाचते मराठी”
अखिल सगळेः सुरेश भट !
विराज कोकरेः हे कोण ?
अखिल सगळेः अहो तुम्ही ज्या कवितेच्या ओळी म्हणालात त्या त्यांच्या आहेत. म्हणजे तुम्ही हे म्हणताना त्यांची परवानगी घेतली नव्हती तर. १/५ पेक्षा अधिक भाग वापरलात तर खटला उभा राहील तुमच्याविरुध्द. तुमच्या भाषेत त्यासाठी टोल भरावा लागेल. खरं सांगतो तुम्हाला. ‘शहाणे’ असाल तर असं नका करु.
विराज कोकरेः टोल आणि मी ? तुम्ही समजता काय या विराज कोकरेला? मी गाडी नेली नाही. मी टोल भरणार नाही.
अखिल सगळेः- नाही पण तुम्हाला भरावा लागेल टोल. शेवटी साहित्याचा टोल आहे तो.
विराज कोकरेः व्हाट नॉनसेन्स !
अखिल सगळेः तो युवराजांचा शब्द आहे. त्यांच्या कॉपीराइटचा भंग आहे.
विराज कोकरेः काय बोलताय काय तुम्ही सगळे ?
अखिल सगळेः अहो सगळे नाही मी एकटाच सांगतोय तुम्हाला.
विराज कोकरेः (चिडत) अहो सगळे तुमचं आडनाव आहे ना अखिल.
अखिल सगळेः सॉरी विराज साहेब. मी सगळे विसरुन जातो अधूनमधून ;पण माझा प्रश्न नेहमी जनतेचा असतो.
विराज कोकरेः तुम्ही मला कन्फ्युज करु नका.
अखिल सगळेः ते तर क्रिकेटमंत्र्यांचं पेटंट आहे विराजसाहेब. सर्वांना चारी ‘मुंड्या’ चीत करतात ते.
विराज कोकरेः मला काही कळेना
अखिल सगळेः हे तर मालेगावच्या राणाचं आय मीन राजाचं पेटंट आहे साहेब.
विराज कोकरेः बास करा हो. मी सांगतोच ना मराठी माझी आणि मी मराठीचा म्हणून काय ज्ञानोबा तुकोबा माझं गचुट धरतात का ?
(“खरंतर धरायला पाहिजे.” असं सगळे पुटपुटतात. )
काय म्हणालात ?
अखिल सगळेः मी किनई
विराज कोकरेः कस्स बोलता सगळे ? किणी बिणी काही बोलायचं नाही.
अखिल सगळेः
अहो तसं नव्हे विराजसाहेब. मी किनई असं म्हणालो. मी म्हणत होतो तुम्ही म्हणताय ते खरे आहे पण आपल्याकडे “परंपराच” अशी आहे आणि ‘शोक’ करावा तेवढा थोडा. पण तुम्ही परवानगी का घेतली नाहीत भटांची ?
विराज कोकरेः भट गेले ना
अखिल सगळेः अहो म्हणून काय झालं ? प्रकाशक जिवंत असतात ना नेहमीच. त्याना विचारायचं स्वामित्व हक्क कोणाकडे आहेत ते ?
विराज कोकरेः कोण प्रकाशक ? कोण या मुंबईत आहे कोण ?
अखिल सगळेः तसं नाही विराजसाहेब पण …
विराज कोकरेः
पण ? काय पण ? सगळे गप्प बसा. मी तुम्हाला सांगतोय ना. मला तुम्ही परवानगीची गोष्ट सांगता.
(अखिल सगळे दोन्ही हात समांतर वरच्या दिशेने उचलतात पण त्यांचा आवेश संपतो)
अहो या आख्ख्या मुंबईची मालकी आमच्याकडे. मुंबई का डॉन कौन ?
अखिल सगळेः भिकू म्हात्रे
विराज कोकरेः काय ?
अखिल सगळेः सॉरी .अहो आय मीन विराज कोकरे
विराज कोकरेः हं. (घुश्श्यातच) सगळे, चुका करत जाऊ नका उगाचच.
अखिल सगळेः तुमच्यामध्ये मुंबई म्हणजे महाराष्ट्र पासून तुम्ही स्वतः म्हणजे महाराष्ट्र असा तुमचा प्रवास कसा झाला ?
विराज कोकरेः मला प्रश्न समजला नाही.
( सगळे पुटपुटले- “स्वाभाविक आहे मला तरी कुठं समजतो माझा प्रश्न ?”)
अखिल सगळेः अगदी खरंय ९३% लोक म्हणत आहेत की त्यांना प्रश्न समजलेला नाही.
अजूनही ७% लोकांना प्रश्न समजलेला आहे. ही शोकांतिकाच नव्हे काय महाराष्ट्राची ?
( ऑपरेटर सगळेंच्या कानातः अहो एकही एसएमएस आलेला नाही.
अखिल सगळेः म्हणून काय झालं ? कोकरेंना प्रश्न समजला नाही म्हणजे जनतेला समजला नाही)
विराज कोकरेः सगळे हे पोल बंद करा बरं
अखिल सगळेः का ? अहो ते लोकशाहीचं प्रतीक आहे.
विराज कोकरेः पण लोकशाहीचा नि तुमचा काय संबंध ? तुम्ही माझी परवानगी घेतली नाही.
अखिल सगळेः म्हणजे लोकशाहीचं पेटंट कोणी घेतलेले आहे काय ?
विराज कोकरेः होय. मी स्वतः

कोकरेंच्या या विधानाने कॅमेरा गहिवरुन गेला आणि बंद पडला. !
(आतल्या गोटातून )

-श्रीरंजन आवटे
(सदर लेख सुंबरान या मासिकात प्रसिध्द )

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

थॅन्क्स अ लॉट

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खो खो ते खिक्! Smile
मस्त!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

खो खो ते खिक्!

अगदि अगदि.
ढिंग टांग मध्ये एखादे वेळेस भट्टी मस्त जमली की जो लेख बनतो; तसच हे काहिसं वाटलं.
फर्मास.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

थॅन्क्स मन आणि ऋषिकेश

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0