बोलके बटाटे

तीन महिने घर बंद ठेवल्यानंतर कुलूप उघडून प्रवेश करताच समोर टेबलावर दोन बटाटे हात उंचावून माझे स्वागत करीत होते. मीही हात उंचावून त्यांना प्रतिसाद दिला. माझे हात खाली आले तरी त्यांचे येईनात म्हटल्यावर बटाट्यांना बाहेर बाल्कनीत नेऊन प्रकाश दाखवला आणि त्यांची रवानगी एका रिकाम्या कुंडीत केली. ओल्या कचर्‍याचे झालेले खत त्यावर पसरले. दोन तीन दिवसातच त्या उंचावलेल्या हातांवर - कोंबांवर-हिरवे ठिपके दिसू लागले. वसंत ऋतूचे आगमन होतच होते आणि बघता बघता महिन्याभरात बटाट्याची २-३ फूट उंच झाडे/रोपे झाली. यंदा पाऊस तसा जास्तच होता. वादळी पाऊसही झाला. तेव्हा वार्‍याने ही झाडे पूर्णच झोपली पण त्यांचा हिरवेपणा गेला नाही. फुलांचे शेंडेही आले आणि मग कोमेजून गेले. तीन महिने नुकतेच झाले आणि बटाट्याच्या झाडांनी माना टाकायला सुरूवात केली. बटाटे लागले असतील का, बघावे का उकरून अशी उत्सुकता अनावर झाली आणि काल शेवटी झाडे उपटली आणि मातीत हात घालून पाहिले. बघता बघता मातीतून २१ बटाटे निघाले -- ०.५ सें. मी ते ११ सें. मी आकाराचे असे सगळे मिळून ! नवीन खेळणे मिळाल्या सारखे थोडावेळ त्यांच्याशी खेळ केले. तेच इथे देत आहे. येन्जॉय.


स्पर्धा का इतर?: 
field_vote: 
4.25
Your rating: None Average: 4.3 (4 votes)

प्रतिक्रिया

हाहाहा. सुंदर. सुरेख मंडलं आहेत एकेक. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओला कचरासुद्धा तीने महिने तिथेच होता काय? Tongue

सर्पिलाकार आणि चेहेऱ्याचे फोटो आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मलाही ती कुंडलिनी Wink आवडली सर्वात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त. आता त्यांचा बटवडा केलेल्या पाकृही वाचायला आवडतील Smile

अवांतर - या झाडाला फुलं आली होती का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१. सर्वात मोठा आहे तो आदिबटाटा काय ?
२. सर्वात मोठ्या ते सर्वात लहान बटाट्यांवरच्या डोळ्यांच्या संख्येत काही सूत्र दिसले का ?
३. पाऊस आहेच म्हणता आणि घरचे बटाटे आयतेच आहेत तर भजी खायला कधी येऊ ? Wink
४. तुमच्याकडे ऐसीकरांना दाखविण्यासारखी एकच ताटली आहे काय ? (संदर्भ) Tongue

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile
१. मातीत सगळ्यात वर होता तो. बाकीच्यांपेक्षा 'वरचढ' नक्कीच आहे.
२. अजून डोळे उघडले नाहियेत बाळ बटाट्यांनी.
३. दम आलू करायचे म्हणत होते....पण भजी करू म्हणता.पाऊस आणि कढई घेऊन या....लगेच करू.
४. माझ्याकडे एकाहून जास्त ताटल्या आहेत, पण एकाच प्रकारच्या. त्यामुळे चालवून घ्या ही विनंती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बटाट्यांचा आकार पाहता फॉन्डन्ट् पोटेटोज़् करावे असे सुचवितो.
अतिशय चविष्ट ! विशेषतः ते गरम असताना खाल्लेत तर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा गोड पदार्थ आहे काय?

कधी-कधी रेस्तरांमधे एक टॅन्जी+स्पायसी+गोड असा सॉस असलेल्या बटाट्याच्या फोडी मिळतात त्यातला सॉस कसा बनवतात हे कोणाला ठाऊक आहे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा गोड पदार्थ आहे काय?
.................गोड नाही पण फार मसालेदारही नाही. लोणी, थाईम्, व्हेज स्टॉक आणि लिंबू यांचा साकल्यस्वाद असलेले खरपूस वासाचे बटाटे.
(या पाककृतीत मूळ बटाटा गोड असला तर ती चव मला तितकिशी आवडत नाही.)

कधी-कधी रेस्तरांमधे एक टॅन्जी+स्पायसी+गोड असा सॉस असलेल्या बटाट्याच्या फोडी मिळतात त्यातला सॉस कसा बनवतात हे कोणाला ठाऊक आहे काय?
................. भारतातल्या की भारताबाहेरच्या रेस्तराँमध्ये ? भारतातली कल्पना नाही.
भारताबाहेर अमेरिकेत तुम्ही वर्णन केलेल्या चवीच्या जवळ जाणारा बार्बेक्यू सॉस मिळतो. काही पाककृती इथे.

अवांतर टीप : टॅन्जी = उच्चारी टॅन्यी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'आमच्या'त 'टॅन्जी' असेच म्हणण्याची पूर्वापार पद्धत आहे. मात्र, आता आपण म्हटल्यावर मेरियम-वेबष्टरातपासले असता, 'टॅन्जी' असा उच्चार नसल्याचे पटले.

मात्र, योग्य उच्चार आपण म्हटल्याप्रमाणे 'टॅन्यी' असा नसून 'टॅङी' असा असावा, अशी शंका येते. (बोले तो, मागे 'वाय' लागताना 'जी' सॉफ्ट न होता हार्डच राहत असावा, आणि मग इंग्रजी संकेताप्रमाणे 'ङ' उच्चारानंतर आल्यानंतर उच्चारी लोप पावत असावा / अनुच्चारित राहत असावा.)

==================================================================================================================

बोले तो, दस्तुरखुद्दांकडे; इन जनरल अमेरिकनांत नव्हे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उच्चार 'टॅङी' असा असावा.
.............सहमत.
'ङी' हा चुकीचा वाचला / कळायला कठीण जाऊ शकतो म्हणून अधिक क्लिष्टता टाळण्यासाठी 'न्यी' टंकला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बार्बेक्यू सॉस थोडा करपट वाटतो, पण भारतात टॅन्यी+इतर चवीचे सॉस असावेत असा अंदाज होता.

आणि उच्चार सुधारणेसाठी अधिक धन्यवाद. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाह! मस्त आलेत चेहरे Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बटाटे कशासाठी वापरले?
अनेक वर्षे बटाट्यांच्या देशात राहूनही मी कधी बटाटे पेरले नव्हते पण या वर्षी अशाच हात उंचावलेल्या बटाट्यांना मार्गी लावण्यासाठी कम्युनिटी गार्डनमधल्या माझ्या वाफ्यात लावले, आत्ताच त्याचे कोंब आणि नवीन पाने जमीनीबाहेर डोकावतायत...आता पाहू तीन-चार महिन्यांनी काय पीक येतेय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बटाटे कशासाठी वापरले?

यातले काही बटाटे मित्र मैत्रीणींना वाटले....इतालियन आणि जर्मन पदार्थात वापरले जातील. काही ठेवलेत त्याचे 'दम आलू' करावेत असा विचार आहे. रेसीपी पहाण्यापासून सुरुवात आहे.
तुम्ही सुचवा एखादा पदार्थ..

...आता पाहू तीन-चार महिन्यांनी काय पीक येतेय.

जमिनी खाली असल्याने झाकली मूठच असते...उत्सुकता फार ताणून धरतात. बटाटा डिटेक्टर कसा असावा असे विचार डोक्यात येत होते.
पण सुखद धक्काच बसेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

...आता पाहू तीन-चार महिन्यांनी काय पीक येतेय.

जमिनी खाली असल्याने झाकली मूठच असते...उत्सुकता फार ताणून धरतात. बटाटा डिटेक्टर कसा असावा असे विचार डोक्यात येत होते.
पण सुखद धक्काच बसेल.

अल्ट्रासाउण्ड सुचवू इच्छितो.

===================================================================================================

किती महिन्यांनंतर करता येतो, विसरलो. खूप वर्षे झाली केल्याला.१अ

१अ तसाही, बटाट्यांच्या जेस्टेशन पीरियडचा स्केलिंग फ्याक्टर लावावा लागेलच म्हणा. म्हणजे, हौ मच ईज़ इट इन पोटेटो मंथ्स, असे. बोले तो, गुणिले तीनचार भागिले नऊ, वगैरे.

पण अल्ट्रासाउण्डचा "असा" वापर इण्डियात इल्लीगल आहे म्हणे. अर्थात, बोलोन्यात काय परिस्थिती आहे, कल्पना नाही.२अ

२अ (अवांतर: पण इटली अल्ट्रा-क्याथलिक कण्ट्री. त्यामुळे, परिस्थिती बहुधा बुरसटलेलीच२ब असावी, अशी शंका येते. (चूभूद्याघ्या.))

२ब (अतिअवांतर: बुरसटण्यावरून आठवले. बटाट्यांचा बालेकिल्ला समजली जाणारी ती दुसरी कंट्रीदेखील अल्ट्रा-क्याथलिकच. (आठवा: 'इट्स अ क्याथलिक कण्ट्री.') तिथेही एकदा बटाट्याचे आख्खे पीकच्या पीक बुरसटून बटाट्यांचा दुष्काळ पडला होता म्हणे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अमेरीकेत आयडाहो प्रसिद्ध आहे ना बटाट्यांसाठी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

क्याथ्लिक ह्या शब्दाचा शब्दकोशीय अर्थ उदारमतवादी (अर्थात "खुल्या दिलाचा" वैग्रे वैग्रे)!

असे असताना "बुरसटलेले क्याथ्लिक" हा वाक्यप्रयोग रोचक वाटला! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

क्याथ्लिक ह्या शब्दाचा शब्दकोशीय अर्थ...

'पीपल्स' 'डेमोक्रॅटिक' रिपब्लिक, वगैरे वगैरे...

(बादवे, 'क्याथलिक' म्हणजे 'खुल्या दिलाचा' की 'वैश्विक'? अर्थात, 'क्याथलिक' बोले तो 'वैश्विक अभिरुची असलेला' आणि म्हणूनच ब्रॉडमाइंडेड असा अर्थ लावता येतोच. मात्र, येथे क्याथलिक हे प्राथमिकतः चर्चचे विशेषण आहे ('जगभराच्या भानगडींत ढवळाढवळ करणारे'???), एवढेच नम्रपणे सूचित करू इच्छितो.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छोट्या नव्या बटाट्यांना जास्त मसाले न लावता फक्त ऑलिव्ह तेल, लसणाची ठेचलेली एखादी पाकळी, मीठ आणि रोजमेरी असे बटाट्यांना लावून २०० से. तापमानावर भट्टीत अर्धा तास भाजले तरी मस्त लागतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रोजमेरी

ला मराठीत काय म्हणतात?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रोजमाझी- किंवा नित्यमम इ.इ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

म्हणजे दुकानदारला म्हणले कि १०० ग्रॅम रोजमाझी किंवा नित्यमम दे तर तो देईल?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्याने हा धागा वाचला असल्यास नक्की देईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अरेरे ग्रँड मस्ती आठवला Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ग्रँड मस्ती

याच्या इङ्ग्रजी शीर्षकातील काही अक्षरे सायलेण्ट असण्याबद्दल लोक म्हणत होते ते आठवलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हे तोच जोक नेमी नेमी नाय रे सांगायचा! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ऊंहू.

इथे अजून एका अक्षराबद्दल म्हंटोय Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

रोजमेरी!
किमान पुण्यात याच नावाने मागून योग्य ती मेरी वाली रोजमेरी मिळाली आहे. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

भारंगीला इंग्रजीत काय म्हणतात?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

आता पाहू तीन-चार महिन्यांनी काय पीक येतेय.

बटाटे पेरले असल्यास बटाटे येण्याची शक्यता जास्त आहे. (पेराल तेच उगवते)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नवे बटाटे- माझा आवडता प्रकार. अगदी साधे परतून मीठ- मिरीबरोबरही अप्रतिम लागतात.
सर्पिल रचना आणि नाव आवडले.
बटाट्याचे रोप लांब वाढू शकते. जास्त बटाटे मिळवण्यासाठी पुढील पद्द्धत वापरतात.-रोप जमिनीवर आडवे वाढू देतात. थोडे वाढल्यावर त्याचे बरेचसे खोड मातीत पुरतात. पुढचा न पुरलेला भाग जसजसा वाढत जाईल तसतसे जास्त जास्त खोड मातीत पुरत जातात. जेवढा भाग मातीत असेल त्याला बटाटे लागतात.
झाड आडवे पुरत जाण्याइतकी जागा नसेल तर असेच उभे वाढवण्याचेही बरेच प्रकार आहेत. कुंडी-काठ्या-चटईपट्ट्या/ गोणपाटचे मोठे पोते किंवा तत्सम वापरून भरपूर बटाट्यांचे पीक काढता येते.
काही माहिती इथे आणि इथे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वरील लिंकेवर असलेल्या माहितीप्रमाणेच बटाट्यांसाठी लाकडाचे घर बनविण्याचा प्रकल्प सध्या हाती घेतला आहे. नंतर सवडीने फोटो डकवीन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बटाटासर्जन आवडले. बटाट्याची चाळ आणि त्यातील बाबूकाका खर्‍यांचे "बट्टकंदवसतिस्थानगृह" इ.इ. आठवले.

तदुपरि स्पायरलही भयङ्कर आवडले. त्याजवरून उलामचे स्पायरल आठवले. त्याच्यावरही आमचा अंमळ जास्तच जीव आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

धन्यवाद...उलाम-स्पायरल मस्त आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'बटाटा बटाटा बटाटा!' फक्त हेच शब्द वेगवेगळ्या भावनांचे प्रदर्शन करत म्हणणारी एक नातेवाईक आठवली Smile

बाकी पहिला सर्पिलाकार आवडला

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

छान

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

बटाट्या बटाट्या तुला डोळे किती...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

@शहराजाद: मी बटाटे लावलेल्या कुंडीत (वरचा उजवीकडचा फोटो) पाने जसजशी उंच झाली तसतशी माती वाढवली होती. 'गीकगार्डनर'च्या वेबसाईट/ब्लॉग वरून असे करण्याचे कळले होते. माहितीकरिता धन्यवाद. डावीकडच्या फोटोतील कुंडीत गेल्या वर्षीच्या बटाट्याच्या मुळातून नवीन झाडे आली आहेत. त्यात माती वाढवण्याला वाव नव्हता. आता तेही काढून पहाणार आहे की त्याला बटाटे लागलेत का.

@रूची: बटाट्याच्या घराचे फोटो आवडतील पहायला.

@अमुकः फॉन्ड्यू छान दिसतय. थाइम फारसे वापरलेले नाही मी. रूची सुचवतायत तसे रोजमेरी घालून बटाटे केले होते.

@नंदनः हो फुले आली होती. ही पहा.

प्रतिसादाबद्द्ल सर्वांना धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0