पडद्या मागची व्यथा

रंगविले मुखवटे अनेक
स्वत:चा चेहरा मात्र
रंगविला न कधी.

तालावर नाचविल्या
मंचावर कठपुतळ्या.
नाचायला मला
मिळालच नाही.

मान नटसम्राटाचा
मिळतो बाहुल्यांना.
दंश पराजयाचा
मलाच का मिळावा.

पडद्या मागची व्यथा
कळेल का कुणाला
रंगमंचावर मिळेल का?
कधी मान सूत्रधाराला.

*राजकारण शोधण्याचा प्रयत्न करू नये Wink

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

कवितेमागची भावना आवडली. पोचली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!