एका मत्स्यगोत्र्याचे मृत्यूबोल

पार्श्वभूमी-
गात्रं थकलेली आहेत, डॉक्टरांनी तळलेलं, भाजलेलं इ.इ. खायला सक्त मनाई केलीये.
कवळीचा आधार घेऊनही काही तोडता येत नाहीये.
आहार केवळ शाकाहारीच हवा, अशी भयानक अवस्था आलेली असताना एका कट्टर मत्सगोत्री मनात उमटलेले हे तरंग.
==================================================

समुद्रातल्या शिंपल्यांनो
भेटी पुन्हा कुठे आता
कालवणा आल्या सदा
माझ्या तिसऱ्याच!

कवचातल्या कोलंब्यांनो,
माफ कराल ना मला?
नग्न करिले मी तुम्हा
क्षुधाशांतीसाठी.

असो सरंगा मांदेली
पापलेट सुरमई
होता तव्यावर चर्रर्र
क्षण सोनियाचा

चाल असो बा वाकडी
नांगी चावतसे जरी
जिव्हे आनंदच देई
चव चिंबोरयांची

रे बांगड्या सोडतो
साथ जन्माची ही आता
रश्श्यात की ओला, सुका-
सखा सोबती तू.

विचारती जर मला
आद्य मुंबईचा कोण
नाव येई आधी ओठी
फक्त बोंबिलाचे.

गे करली सांगशी
का गो हवी मला मुक्ती?
तुझ्या काट्यांतून मोक्षा
गेली वाट माझी!

नाही म्ह्णता तुम्हां मी
मृत्यू घाव घालो वरी
नुरे जिंदगीत काही
चव माझ्या

==================================================


१- शिंपले. ह्यांना मत्स्यभाषेत तिसर्या म्हणतात.
२- एक चविष्ट मासा.
३- छोटेखानी मासा. तळल्यावर त्याच्या शेपट्या अतिशय कुरकुरीत लागतात
४- अतिलोकप्रिय मासा. खायला सोपा आणि चविष्ट.
५- Kingfish. सरंग्याच्या तोडीचाच, किंबहुना थोडा श्रेष्ठच.
६- खेकडे.
७- Mackarel. कोकणात आणि गोव्यातील लोकांचे मुख्य खाद्य.
८- Bombay Duck. (बोंबिल) मुंबईच्या आसपास आढळणारा मासा.
९- अतिचविष्ट परंतु तेवढाच काटेरी मासा.

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

जमलंय. पण अशी पाळी वैर्‍यावरही न येवो!

कालवणा आल्या सदा
माझ्या तिसऱ्याच१!

हे वाचून तर हृदयात कालवाकालव झाली :).

एकंदरीत कविता वाचून कृतज्ञतेपोटी आपली समाधी समुद्रात बांधण्याची प्रेमळ सूचना करणारे बोरकर आठवले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खरंय, अशी वेळ वैर्‍यावरही न येवो!
बाकी(बाब) बोरकरांची आठवण न येता मत्स्यचिंतन करणे अशक्य!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविता आवडली

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारी आहे कविता. दळवी आणि बोरकर न आठवणे अशक्यच! आज हेमंत स्नॅक्स, लुईसवाडी येथे भेट देणे क्रमप्राप्त दिसते...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

हेमंत स्नॅक्स? हे कुठेशी आलं? काय खासियत?

आमची प्रथम पसंती प्रताप सिनेमासमोरील फिशलॅन्डला. तीन पेट्रोल पंपावरचं "मी हाय कोली" अजून ट्राय केलेले नाही.

बोरकर आठवले -
सेवण्या मासळीचा स्वाद दुणा,
इतुक्यात न येई मरणा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फिशलँड पसंती असण्याचाही एक काळ होता. आता ते पार गंडले आहेत. 'मी हाय कोली'मधली बडीशेपेसाठी वापरलेली पितळी होडकी आणि टोपल्यांच्या लँपशेड्स पाहून घ्याव्यात. पण चव - ह्यॅ:!
लुईसवाडीत 'पप्पू दा ढाबा' डाव्या हाताला ठेवून हात शिरले आणि डावीकडची गल्ली घेतली की हेमंत स्नॅक्स नावाची एक मोजून चार बाकडी असलेली खानावळ लागते. आतल्या गाळ्यात स्वैपाकघर (तिथले कुकर, पिठांचे डबे, फ्रीज, भाज्या चिरायला बसलेल्या मावशी, तव्यावर भाजत ठेवलेली सुरमई... असे सगळे बाहेर बसल्या बसल्या बयाजवार दिसते. लख्ख आहे.) आणि बाहेरच्या गाळ्यात चार बाकड्यांवरचा गिर्‍हाइकांचा जेवणसंसार. बाहेर एक लहानसे बेसिन. बास. व्हेज थाळी, सुरमई थाळी, पापलेट थाळी. नशीबवान असलात तर भाकरी, सुकं चिकन. बास.
मी सहसा मंगळवार, गुरुवार, शनिवार पाहून जाते. म्हणजे फार ताटकळावे लागत नाही.
चव?
असो. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

धन्यवाद!
बोरकर आठवतातच पण दळवींची आठवण मी मेंदूला ट्राफिक सिग्नल लावून अडवायला सांगतो. याचं कारण म्हणजे त्यांचं परिणामकारक वर्णन!
मागे एकदा वाईट प्रसंग आला होता- कुठल्यातरी लांबलचक विमानप्रवासात दळवींचं "आत्मचरित्राऐवजी" वाचायची दुर्बुद्धी जाहली. त्यातली काही वर्णनं वाचून जीभ इतकी पाणवली की काय सांगू?
तेव्हापासून समजलं की मासे मिळण्याची -तेही भारतीय पद्धतीचे- शक्यता जवळपास शून्य असताना दळवी वाचणे हे पाप आहे. त्यातलं दादर मासेमार्केटचं वर्णन वगैरे तर ... जाऊ द्या, उगाच विषाची परिक्षा नकोच आता!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भावनेशी १०० % सहमत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आम्ही मत्स्यगोत्री नसलो तरी मत्स्यप्रेमी आहोत. सबब कविता बहुत आवडली!

मत्स्याशन हा भक्तीचा एक प्रकार म्हणून खरे तर समाविष्ट केला जावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

नशीब दुपारचे नी तेही सामिष जेवण झाल्यानंतर कविता वाचतोय Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आम्ही घास फूस खाणारे असल्यामुळे डोळे झाकून कविता वाचली. सर्व मत्स्यगोत्रीयांना श्रद्धांजली वाहिली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय हे पटाईतसाहेब, तुम्ही तर आमचा खेळच खल्लास केलात.
अवांतर - बाकी माश्यांमध्ये स्पेशल ताकद असते, तेव्हा डोळ्यांसोबत नाकही बंद केलेले उत्तम!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अजून केवळ द्रव पदार्थांवरच असल्याने वरील कविता वाचून भडभडून आलं. नशीब, की ही अवस्था टेंपररी आहे. त्यानंतर वचपा काढला जाईल!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवडली!
मत्स्यप्रेमी वगैरे नाय बॉ होऊ शकत आपण. काट्यांच काय करायच कळत नाही आणि तो गंध Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कितीही मत्स्यप्रेमी असले तरी कुणी काटाप्रेमी असते असे वाटत नाही.

तदुपरि गंध इ. विशेष नसलेले मासेही मिळतात-यद्यपि तिथेही निटपिकिंग करायला तसा बराच स्कोप आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

गंधाबद्दल समजू शकतो (ऑल्दो त्याची सवय झाल्यावर जाणवतसुद्धा नाही), पण काट्यांचे बहुधा खत बनवता यावे, असे (ऐकल्यासारखे) वाटते. (चूभूद्याघ्या; तज्ज्ञांनी खुलासा करावा.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ट्राउट फिश फार्म मधे ताजा ताजा मासा अलिकडेच खाल्ला पण अस्वलासारखं पाण्यात थांबून इतकं काही गटकवण्याची शक्ती नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

माश्यापासून सश्यापर्यंत

अस्वल सगळ काही खाऊ शकते.

काटे असणारे मासे रीस्कीच वाटतात खायला.

मासे खाल्ल्यावर घशात खवखवत यावर काय उपाय असतो का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

माश्यापासून सश्यापर्यंत

अस्वल सगळ काही खाऊ शकते.

मध्यंतरी फार्मर्स मार्किटात गेलो होतो, त्यावेळी दिसला म्हणून कुतूहलाने उचलून आणून ठेवलेला ससा फ्रीझरमध्ये बरेच दिवस पडून आहे. त्याचे नेमके काय करायचे असते, कोणी सांगू शकेल काय?

(अतिअवातर: त्याच वेळी त्याच सुपरमार्किटात दिसला म्हणून उचलून आणून ठेवलेला मासादेखील अजून फ्रीझरमध्ये पडून आहे. मात्र, त्याचे काय करायचे असते, ते ठाऊक नसल्यामुळे नव्हे - त्याबद्दल साधारण अंदाज आहे - तर केवळ आळसामुळे / विस्मरणामुळे. बरी आठवण झाली. पुढच्या दोनतीन वीकांतांत त्याचे काहीतरी केले पाहिजे.)

काटे असणारे मासे रीस्कीच वाटतात खायला.

मासे खाल्ल्यावर घशात खवखवत यावर काय उपाय असतो का?

मत्स्यगोत्री नसल्याकारणाने खात्रीने सांगू शकणार नाही, परंतु घशात बारकासारका काटा अडकल्यास (याचा आपल्या घशातल्या खवखवीशी काही संबंध आहे किंवा नाही, ठाऊक नाही, पण) भाताचा गोळा गिळावा, असे कधी काळी मत्स्यगोत्र्यांकडून ऐकले तरी होते ब्वॉ!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कुतूहलाने उचलून आणून ठेवलेला ससा फ्रीझरमध्ये बरेच दिवस पडून आहे.

फ्रिझर बराच मोठा असणार किंवा ससा छोटा असणार.

त्याचे नेमके काय करायचे असते, कोणी सांगू शकेल काय?

भुसा भरून भिंतीवर लावता येईल की.

मासे खाल्ल्यावर घशात खवखवत यावर काय उपाय असतो का?

आळू खाजरा असल्यास त्यात गुळ घालतात, माशांवर हा प्रयोग करता येईल काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गुळ घालतात, माशांवर हा प्रयोग करता येईल काय?

गुळाबाबत माश्यांना (व मुंगळ्यांना) विशेष आकर्षण असते. माशांबाबत मात्र (मत्स्यगोत्री नसल्याने *) निश्चितपणे सांगू शकत नाही.

* अधिक स्पष्टीकरण - आम्ही माशीगोत्री व मुंगळागोत्रीही नाही. निव्वळ निरीक्षणातून प्राप्त झालेले हे ज्ञानकण आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गुळाबाबत माश्यांना (व मुंगळ्यांना) विशेष आकर्षण असते. माशांबाबत मात्र (मत्स्यगोत्री नसल्याने *) निश्चितपणे सांगू शकत नाही.

लहानपणी गुळाच्या भट्टीवरचा गुळ खाल्ला आहे, त्यामुळे मुंगळ्यांबद्दल माहिती अगदी प्रथमहस्ते(हस्तेच ठिक आहे) आहे.

पण गुळ गाळण्याबाबत आपणाला काय वाटते

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फ्रिझर बराच मोठा असणार किंवा ससा छोटा असणार.

किंचित दुरुस्ती: फ्रीझरच्या एका कप्प्यावर पडून आहे. (माय ब्याड.)

भुसा भरून भिंतीवर लावता येईल की.

हम्म्म्म्म्... कल्पना रोचक आहे. (त्याबद्दल आपले आभार.)

मात्र, एक छोटीशी अडचण आहे.

बोले तो, भिंतीवर लावण्याकरिता भुसा भरण्यापूर्वी सशाची साल सोलून, आतील गर फेकून देऊन, मग त्या सालीच्या आतमध्ये भुसा भरावा लागेल, असे वाटते. (चूभूद्याघ्या.)

मात्र, इथे उलटा प्रकार आहे. आमच्या ससेविक्याने, साल फेकून देऊन निव्वळ गर आम्हाला विकलेला आहे. (त्याबद्दल त्याचा निषेध.) त्यामुळे, प्रस्तुत सशाचा खाण्याकरिता उपयोग करण्याव्यतिरिक्त अन्य काही पर्याय नाही.

असो. सुचवणीबद्दल पुनश्च मनःपूर्वक आभार.

आळू खाजरा असल्यास त्यात गुळ घालतात, माशांवर हा प्रयोग करता येईल काय?

हम्म्म्म्म्... आज एकाहून एक नामी कल्पना सुचत आहेत आपणांस! काही खरे नाही आज.

आमची आई चिंचगूळ घालून भेंडीची भाजी करायची, तसे काही करण्याची कल्पना रोचक आहे. किंवा, गोडा मसाला घालूनदेखील काही प्रयोग करता यावेत. किंवा, त्याहीपेक्षा, 'ताकातली भेंडी' असा काही प्रकार असतो, म्हणून ऐकून आहोत४अ, तद्वत काही माशांबरोबर करून पाहता यावे.

असो.

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आंब्याचा मोसमात हाच प्रयोग आंब्यावर१अ करून पाहावा, म्हणतो. चांगली कल्पना दिलीत. (त्याबद्दल पुनरेकवार आपले आभार.)

१अ प्रयोग स'फळ' झाल्यास मग सफरचंद, तांबडाभोपळा, दुधी, पडवळ, भोपळीमिरची, झालेच तर भरताच्या वांग्यावरही१ब करून पाहता येईल.

१ब बोले तो, 'भरत' नावाच्या इसमाच्या मालकीचे वांगे नव्हे, ज्यापासून वांग्याचे भरीत बनवितात, असे वांगे.

खरे तर ससे-आणि-इतरही-बरेच-काही-विक्याने. कारण आमच्या फार्मर्स मार्किटात ससाही मिळतो नि गाजरही मिळते.

अतिअवांतर शंका: समजा आम्ही प्रस्तुत ससा हातात धरला, तर 'ज्याचे हाती ससा, तो पारधी' या न्यायाने, आम्हांस आमची गणना 'पारधी' या क्याटेगरीत करता यावी काय?

केवळ परिचित अशाच पाककृतींशी तुलना करणे अपरिहार्य आहे. कारण, पु.लं.नी म्हटल्याप्रमाणे, इ.इ.

४अ खाण्याचा योग - सुदैवाने किंवा दुर्दैवाने - अद्यपि आलेला नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ससा उचलून डायरेक्ट फ्रीजर में? मेलेला दिसतोय. सश्याचं मांस मस्त लागतं असं ऐकून आहे.

@काटेशंका : हो. काटेरी मासे बहुधा जास्त चविष्ट असतात असा माझा मर्यादित अनुभवांती निष्कर्ष आहे.( पुरावा: करली, पेडवे, तारली, काटेरी, मुडदुशा इ.) त्या मानाने पापलेट तसा मंद मासा आहे.
@ घसा : भात गिळावा हाच सल्ला मलाही माहिती आहे. घसा खवखवायला अळू कारणीभूत असतं ना? काट्यांनी घसा खवखवल्याचं ऐकलं नाहिये मी पण.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ससा उचलून डायरेक्ट फ्रीजर में? मेलेला दिसतोय.

अलबत.

आमच्या फार्मर्स मार्किटात (सर्वच नाही, तरी काही) मासे आणि खेकडे जिवंत पाहिलेले आहेत. ससे मात्र मेलेलेच विकतात.

सश्याचं मांस मस्त लागतं असं ऐकून आहे.

असेच मीदेखील ऐकलेले आहे. म्हणून तर (उत्तमर्धांगाच्या व्हीटोस डावलून - प्रसंगी त्याकरिता इतर सभासदांबरोबर युती करून) आणला.

आता (भविष्यकाळात) काही करायचे बाकी आहे. (काय करायचे, ते बघू.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इथे एक उत्तम पाकृ. आहे, अनेकदा बनविली आहे. सशाची याच पद्धतीने पण भारतीय मसाले, टोमॅटो वगैरे घालून करी करता येते. शिजवलेला ससा (आणि न शिजवलेल्या सशाचे मांस) बरेचसा कोंबडीसारखाच असतो पण त्यात चरबी कमी असल्याने कोरडा होऊ शकतो म्हणून स्निग्धता वाढवायला काहीतरी घालावे लागते, जसे या पाकृ.त बेकन वापरले आहे.
'ब्रेज्ड रॅबिट' खास 'उच्चभ्रू फ्रेंच'(वदतोव्याघात) पाकृ. हवी असल्यास इथे मिळेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुचवणींबद्दल अत्यंत आभारी आहे. दोन्हीं दुव्यांचा अवश्य अभ्यास करेन.

(अतिअवांतर: मागे 'माधवी'ची पाकृ तुम्हीच दिली होतीत, नाही काय? 'माधवी' जरी नाही बनवली, तरी त्यावरून प्रेरणा घेऊन फळांची वाईन बनविण्याचा किमान एक यशस्वी प्रयोग करून झालेला आहे, आणि आणखीही प्रयोग (आमचा आळस-फ्याक्टर लक्षात घेऊनसुद्धा) पाइपलाइनीत आहेत. एका उत्तम वेळकाढू उपद्व्यापाला चालना दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.)

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मुख्यत्वेकरून तीन भाग ब्ल्याकबेरी अन् एक भाग रासबेरी, झालेच तर भरीला अगदी नावापुरती द्राक्षे. (द्राक्षांचा सहभाग नगण्य.)

स्वतःवरही, आणि इतरांवरही. (अ) अद्याप कोणीही दगावलेले नाही, आणि (ब) ज्यांना स्वतःच्या हजेरीत पाजली, त्यांनी निदान तोंडावर तरी त्याबद्दल अनुद्गार काढलेले नाहीत / निदान तोंडावर तरी 'चांगली झाली होती' असेच म्हटलेले आहे. सबब, बरी झाली असावी, असे मानावयास सकृद्दर्शनी तरी प्रत्यवाय दिसत नाही. (मला स्वतःला बरी वाटली, असे आत्मस्तुतीचा प्रमाद पत्करून म्हणू इच्छितो.)

बोले तो, एकदा सेकण्डरीत गेल्यावर आम्ही 'फिल-इट-फर्गेट-इट' आणि 'लेट-नेचर-टेक-इट्स-कोर्स' ही तत्त्वे अवलंबतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यशस्वी प्रयोगांबद्दल अभिनंदन.
दुर्दैवाने मागल्या वर्षी आम्ही केलेले रासबेरी वाईन, ब्लॅकबेरी वाईन आणि मीड हे तीनही प्रयोग असफल झाले. जंतूनाशक म्हणून वापरलेला पदार्थ निकामी झाला असावा असे अनुमान काढून यावर्षी रासबेरी वाईनची भट्टी पुन्हा लावली आहे आणि सध्यातरी बुडबुडे चांगले येताहेत. पुढच्या आठवड्यात पुन्हा मीडचा प्रयोग करणार आहे. यावेळेस एका अनुभवी मैत्रीणीच्या नजरेखाली प्रयोग करणार आहे.
अवांतराबद्द्ल अस्वलरावांना सॉरी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

क्लिष्ट कवितेचा टीआरपी वाढवून दिलेबद्दल अस्वल यांनी मला गझाली मध्ये मासा पार्टी द्यावू अशी नम्र विनंती.
खवखवू नये म्हणून फेनीची व्यवस्था करून ठेवतो.

आमचे इथे सर्व प्रकारचे मासे खाल्ले जातात पापलेट बोंबील सुरमई शार्क व्हेल देवमासा स्टिंग रे इल मासा सील
( वरती स्वल्पविराम द्यायला आळस केला आहे चुकुभूल)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!