दिवास्वप्ने- भटकंतीची

“God gave us memory so that we might have roses in December.” - या वाक्यात एक बदल करावासा वाटतो, “God gave us daydreams so that we might explore richness otherwise evading us.” ..... माझ्या दिवास्वप्नांबद्दल बोलायचं झालं तर,पद्मा गोळे यांची अत्यंत सुंदर कविता लहानपणे शिकले होते तीच इथे चपखल बसते -

"मी एक पक्षीण आकाशवेडी
दुजाचे मला भान नाही मुळी,
.
.
अशी झेप घ्यावी , असे सूर गावे
घुसावे धगामाजी बाणापरी,
ढगांचे अबोली, भुरे केशरी रंग,
माखून घ्यावेत पंखांवरी"

माझ्या स्वप्नात माझे एका जातीवंत भटक्या, जिप्सी व्यक्तीत आमूलाग्र रुपांतर झालेले असेते. सामाजिक, सांस्कृतीक इतकेच काय मानसिक सर्व बंधने झुगारुन (झुगारुन - This word has most most beautiful ring to it) मी विमुक्त पक्षासारखी भटकत असते. कधी अतीव निसर्गरम्य विस्कॉन्सिन उत्तर किनार्‍यावर वॉलाय मासा, ट्राऊट मासा खात असते तर कधी बॅकपॅक घेऊन रेल्वे, बस चा , पायीसुद्धा प्रवास करत दक्षीणेच्या टेक्सासमधील शहरात जाऊन पोचते. रोडीओ शो चा आस्वाद घेते. कधी कॅलिफोर्नियाच्या ग्लॅमरस रस्त्यांवर झगमगाटात पाय फुटेल तिथे भटकते तर कधी नेवाडा वाळवंटातील लास वेगस शहरात कॅसिनोंचा आस्वाद विस्फारलेल्या नेत्रांनी घेते. कुठे व्हरमाँटचा केशरी पानगळ ऋतू मला साद घालतो तर कुठे पेनसिल्वेनिआचा इतिहास.

आमीर अब्द-अल-कादीर यांच्या "द लाइफ ऑफ नोमाड" कवितेत वर्णन केल्याप्रमाणे कूपमंडूक शहरी, पिंजर्‍यातील आयुष्य टाकून देऊन, भव्यतेची गळामीठी घ्यावीशी वाटते, निसर्गाच्या कुशीत जावेसे वाटते.-

O THOU who preferrest the dull life of the town
to wide, free solitude,
dost thou despise nomadic tents
because they are light, not heavy
like houses of stone and lime?
like houses of stone and lime?
If only thou knewest the desert's secret!
But ignorance is the cause of all evil.
If thou couldst but awake in the dawning Sahara
and set forth on this carpet of pearls,
where flowers of all colors shower delight
and perfume on our way.

उंच डोगरमाथ्यावर तारे मोजत रात्र घालवावी हे तर स्वप्नच आहे. सकाळी जाग यावी तीच पक्षांच्या किलबिलाटाने. ऊठावं अन रस्ता पकडावा. जंगली मांजरीबद्दल ऐकलेले आहे की या मांजरीचे पाय जंगलाचा तोच भाग (स्पॉट) परत कधीच स्पर्श करत नाहीत. त्या अगदी त्या प्रकारचे विमुक्त जिवंत वाईल्ड आयुष्य जगण्याचे दिवास्वप्न रंगवते. ही मुक्ततेची, भटकेपणाची साद हा जणू माझ्या स्वत्त्वाचा एक अविभाज्य, दुर्लक्षीत भागच जाणवतो. कदाचित सर्वांनाच ही साद कमी-जास्त प्रमाणात ऐकू येत असेल. त्याशिवाय का पूर्वी कहाण्या ऐकू येत - अमक्याने घरदार टाकून सन्यास स्वीकारला, कोणी गायब झाले.

वॉल्ट व्हिटमन यांची केवळ अजरामर कविता "साँग ऑफ ओपन रोड"-

Afoot and light-hearted I take to the open road,
Healthy, free, the world before me,
The long brown path before me leading wherever I choose.
.
.
All seems beautiful to me,
I can repeat over to men and women You have done such good to me I would do the same to you,
I will recruit for myself and you as I go,
I will scatter myself among men and women as I go,
I will toss a new gladness and roughness among them,
Whoever denies me it shall not trouble me,
Whoever accepts me he or she shall be blessed and shall bless me.

मग दूधाची तहान लागलेली व्यक्ती ज्याप्रमाणे ताकावर-पाण्यावर तहान भागवते तशी मी "आऊटडोअर अँथॉलॉजी" प्रकारची पुस्तके वाचत सुटते, त्या पुस्तकात हरवून, विरुन जाते.काय काय सापडतं अशा पुस्तकात- साहसी प्रवासवर्णने, शिकारी-मासेमारीचे रोमांचक अनुभव, हिमवादळात घ्यावयाची काळजी, तर कुठे भटकंतीत अचानक भेटलेल्या अनवट अनोळखी लोकांची व्यक्तीचित्रणे.
अशी पुस्तके फार आवडतात, अक्षरक्षः वेड लावतात. अशी पुस्तके पायाला भिंगरी लागून न देता, प्रवासाची ओढ काही प्रमाणात शमवतात.

"खिर्श्चॅनिटीमधील सॅक्रिड लिवींग वॉटर" = आपली दिवास्वप्ने!! जगायची उर्जा देणारा, मानसिक बळ वाढवणारा आपल्या हृदयातील गुप्त झरा. Be fearless to indulge in it. Be true to your dreams.

field_vote: 
2.666665
Your rating: None Average: 2.7 (3 votes)

प्रतिक्रिया

ललितलेखन आवडले!. छान!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

छान लिहीलय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान आहे. पण एवढं थोडक्यात का आटोपतं घेतलंत?

कधी कधी डोंगर-दर्‍या - खास करून हिमालयातल्या - बघताना " आपण किती क्षुद्र आहोत असा विचार डोकावतो " असं कुणाकुणाकडून ऐकलंय. पण मला असं कधी वाटलं नाही. याच निसर्गाचा आपण एक भाग आहोत असं वाटून मन भरून येतं. अश्या वेळेला अख्खं जग आपलंच आहे असं वाटायला लागतं.

All seems beautiful to me,
I can repeat over to men and women You have done such good to me I would do the same to you,
I will recruit for myself and you as I go,
I will scatter myself among men and women as I go,
I will toss a new gladness and roughness among them,
Whoever denies me it shall not trouble me,

पायाखाली सहज उलगडत जाणारा रस्ता मी पकडतो.
आणि निर्भर स्वानंदी जग सामोरं येतं .
जिथे वळेन तिथे ती मातकट वाट उलगडत जाते.
जणू साक्षात सुंदरताच मला सापडते.
जगातली सगळी माणसं आपली वाटतात आणि मी त्यांचा.
मी त्यांच्यात मला पेरत जातो,
मी त्यांच्यावर मला उधळत जातो.
एक वेगळाच आनंद आणि निरागसता मिळवत चालतो.
कोणाला मी नकोय, तर हरकत नाही.

बरोबर वाटतय?
Whoever accepts me he or she shall be blessed and shall bless me. ह्याच (हवं तसं) मराठीकरण काही जमत नाहीय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण एवढं थोडक्यात का आटोपतं घेतलंत?

प्रचंड कुंथून एवढं लिहीता येतय Biggrin
त्याचंही कारण आहे पणा ते नंतर केव्हातरी. Smile
_______
तुमची कविता छान जमली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कधी कधी डोंगर-दर्‍या - खास करून हिमालयातल्या - बघताना " आपण किती क्षुद्र आहोत असा विचार डोकावतो " असं कुणाकुणाकडून ऐकलंय

हो मी ही ऐकलंय
मला असा विचार अयेत नाही मात्र मी हिमालयाकडे पाहताना प्रचंड मंत्रमुग्ध होतो. इतके 'मॅग्नेटिक' मी अजून तरी काहीही पाहिलेले नाही!
नुकतेच आल्प्सही पाहिले, आवडले पण आल्प्स खेळकर वाटला, रॉकीचा जो भाग पाहिला होता तो तरी त्रयस्थ वाटला होता; पण हिमालय वेगळेच रसायन आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

तुम्ही दुधाची तहान ताकावर म्हटलंत त्यावरून आठवलं की कधीतरी शाळेत एक कविता होती, त्याचा शेवट असा काहीसा होता -
"maps are really magic wands
for home staying vagabonds
"

ज्यूल्स व्हर्नही तेच म्हणतो. त्याल स्वताला प्रवासाची प्रचंड आवड. पण तरूणाईतल्या एका जहाज सफरीने त्याची स्वप्न भंगली आणि पुढे तर आपण जाणतोच!
आपल्या पुस्तकांतून समुद्रतळापासून पार चंद्रापर्यंत पोचलेल्या व्हर्न साहेबांचीदेखील अशीच स्वप्नं असावीत!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"maps are really magic wands
for home staying vagabonds"

वा!! क्या बात है!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्फुट आवडलं.

तेव्हा मलाच माझा वाटेल फक्त हेवा,
घरदार टाकुनी मी जाईन दूर गावा.

या आरती प्रभूंच्या ओळी आठवल्या.

अवांतर - हा लेख आठवला.
विशेषतः

The study, published in the journal Applied Research in Quality of Life, showed that the largest boost in happiness comes from the simple act of planning a vacation. In the study, the effect of vacation anticipation boosted happiness for eight weeks.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

In the study, the effect of vacation anticipation boosted happiness for eight weeks.

नंदन आर्टिकल आवडले. पण एक गंमत तुमच्या लक्षात आली का - anticipation इज द की!!! सुट्टीपेक्षा, त्या सुट्टीची आतुरतेने वाट पहाण्यात मजा जास्त आहे. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अँटिसिपेशनच सुप्रीम असे जर वाटू लागले तर मात्र गडबड आहे असे मला वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मोअर दॅन डेस्टीनेशन द जर्नी इज मोअर एन्जॉयेबल!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओन्ली इफ वन 'डज' द जर्नी, अ‍ॅज़ अपोस्ड टु सिटिंग ब्याक, ब्रूडिंग ओव्हर/अँटिसिपेटिंग द जर्नॉ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

माझा अनुभव असा की , यात्रेच्या आधी प्लॅनिंग करताना फार मजा येत पण अक्च्युअल यात्रेत्/सहलीत, परत जाऊन ऑफीसात खर्डेघाशी करायचे आठवते व विरस होतो Sad
अर्थात हे सतत भविष्याचा वेध घेणे चूकीचेच आहे Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अक्च्युअल यात्रेत्/सहलीत, परत जाऊन ऑफीसात खर्डेघाशी करायचे आठवते व विरस होतो

आयुष्यात आनंद शोधताना तुमचा अ‍ॅपरोच जरा बरोबर नाही, असं नाही का वाटत तुम्हाला? सुट्टीवर गेल्यावर ऑफिसची आठवण येते, म्हणजे तुम्ही सुट्टी पुरेशी उपभोगत नाही का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बरोबर-चूक असं काळं-पांढरं क्वचितच असतं. आपला मुद्दा कळतोय मला पण सुट्टी आणि ऑफीस अशी दोन कंपार्टमेन्ट्स करता येत नाहीत. अन तसेही वारंवार काही येत नाही आठवण. तेवढ्यापुरती येते अन मग परत विसरायला होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

याबद्दल सहमत आहे. गेल्या वर्षी एका आठ-दहा दिवसांच्या रोडट्रिपचे महिनाभर प्लॅनिंग करत होतो. काही कारणांमुळे तिथे जाता आलं नाही (दुसर्‍या राज्यात भटकून आलो), पण तो आखणीचा काळ मोठा मजेत गेला.

रविवार बोअर गेला तरी शुक्रवार संध्याकाळी वीकेंडच्या आगमनाचा जो उत्साह असतो, साधारण तसंच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी अगदी शुक्रवार सर्वात सुखद असतो
मग शनिवार
पण रवीवारी ऑफिसचे वेध लागल्याने कंटाळा आलेला असतो. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी तर सोमवारची आतुरतेने वाट बघत असतो. "The brain is a wonderful organ. It starts working when you get up in the morning, and doesn't stop until you get to the office." असं रॉबर्ट फ्रॉस्टने म्हटलच आहे ना.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मग दूधाची तहान लागलेली व्यक्ती ज्याप्रमाणे ताकावर-पाण्यावर तहान भागवते तशी मी "आऊटडोअर अँथॉलॉजी" प्रकारची पुस्तके वाचत सुटते, त्या पुस्तकात हरवून, विरुन जाते.काय काय सापडतं अशा पुस्तकात- साहसी प्रवासवर्णने, शिकारी-मासेमारीचे रोमांचक अनुभव, हिमवादळात घ्यावयाची काळजी, तर कुठे भटकंतीत अचानक भेटलेल्या अनवट अनोळखी लोकांची व्यक्तीचित्रणे.

इंग्रजीत ट्रॅव्हल लिटरेचर प्रचंड असेलच. (माझा व साहित्याचा अत्यंत कमी संबंध आहे म्हणून... म्हंटलं). मला फक्त रमेश मंत्रींनी लिहिलेली पुस्तके माहीती आहेत. जोडीला पुलंचे अपुर्वाई व पूर्वरंग. मागे रमताराम यांच्या लिखाणात आंद्रे गिद यांच्या Journals of André Gide चा उल्लेख आला होता. लॉज ऑफ अ‍ॅट्रॅक्शन या चित्रपटात डिव्होर्स लॉयर ची भूमिका करणारा पिअर्स ब्रॉस्नन हा हे पुस्तक वाचताना दाखवलेला आहे. गिद यांना १९४७ चे नोबेल मिळाले होते ... साहित्याचे. मी काही हे पुस्तक वाचलेले नाही. पण हे प्रवास वर्णन आहे असे ऐकून आहे. आमच्या लक्षात आंद्रे गिद राहिला ते त्याने कोस्लर च्या द गॉड दॅट फेल्ड या पुस्तकात लिहिलेल्या लेखाबद्दल. (आमची सरड्याची धाव कुंपणापर्यंत.). मालती आठवलेंनी जॉन म्युर वर "निसर्गमित्र" लिहिलेले आहे त्याबद्दल माझी म्यावशी बोलली होती. व कोकणातल्या मामाश्रींनी रविंद्र पिंगेंच्या कोकणातील प्रवासांबद्दल व प्रवासवर्णनांबद्दल सांगितले होते. यातल्या एकाही लेखकाचे एक ही पुस्तक मी वाचलेले नाही. पण दखलपात्र आहेत. चितमपल्लींची दोन पुस्तके मात्र वाचलीत. आवडली होती. (मी चुकुन ... निसर्गवर्णन व प्रवासवर्णन या दोन शब्दांमधे अद्वैत निर्माण केले की काय ? अद्वैत हा शब्द गल्लत या शब्दाचा समानार्थी आहे असे वाटते. म्हंजे गल्लत करताना प्रमोशन झाले की अद्वैत. प्रथम ३ ग्लास शावेला व नंतर टेकिला चे दोन चार शॉट्स मारले की असे होते.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आऊट्डोअर लाईफ अँथॉलॉजी = कंपायलेशन नामक बरीच पुस्तके पाहीली. अतिशय आवडली. उदाहरणार्थ - हार्वेस्ट मून अ विस्कॉन्सिन आऊट्डोअर अँथॉलॉजी वगैरे. ग्रंथालयात या विषयावर एक भागच आहे. आऊटडोअर लाइफ मासिकामधील निवडक लेख अशा कंपायलेशन्स मध्ये आढळतात. मग ते हौशी अथवा सराईत सर्व प्रकारच्या लेखकांनी लिहीलेले असतात. कंपायलेशन वाचताना वैविध्याचा सुरेख अनुभव मिळतो, काहींची शैली चित्रमय असते तर कोणात पॅशनेट इन्टेन्सिटी असते, काहीजण ड्राय तर काहीजण विनोदी लिहीतात. लेखनाचे सुंदर नमुने वाचावयास मिळतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिल ब्रायसनची पुस्तके कोणी वाचली आहेत का?

"वॉक इन द वूड्स" माझे आवडते पुस्तक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान लिहीले आहे .
तुमच्यातल्या जिप्सीला कधीतरी सत्यात अवतरायची संधी प्राप्तं होवो ही सदिच्छा !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

प्रतिसाद देणार्‍यांचे सर्वांचे धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिमल डे यांचं "महातीर्थके अंतिम यात्री" हे पुस्तक (मुळ बंगाली पुस्तकाचा हिंदी अनुवाद) मिळाल्यास जरूर वाचा. आवडेल. नुकताच त्याचा मराठी अनुवाद आलाय. पण कोणी केलाय ते आठ्वत नाहीय. मी मारुती चितमपल्ली सोडून या प्रकारातील फारसं काही वाछ्लेलं नाही. पण असं लिखाण वाचताना प्रत्यक्षात न करता आलेला प्रवास कल्पनेत करायला नक्कीच मजा येत असेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नक्की Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण असं लिखाण वाचताना प्रत्यक्षात न करता आलेला प्रवास कल्पनेत करायला नक्कीच मजा येत असेल.

या वाक्यावरून कल्पनेच्या तीरावर हे वि.वा.शिरवाडकरांचे पुस्तक आठवले.
पूर्णपणे काल्पनिक देशात लेखक जातो आणि तिथली मुल्यव्यवस्था इतकी वेगळी नी रोचक असते की आपण आपल्यालाच मुल्यांवरील विश्वासावर पुनर्विचार करायला भाग पडतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

वा!! पुस्तक रोचक वाटते आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0