चांदोबाचा दिवा

'
आई ग आई ,
चांदोबाचा दिवा
किती चांगला -
उंच उंच आकाशात
कुणी टांगला ..

आई ग आई ,
चांदण्यांच्या पणत्या
किती चांगल्या -
उंच उंच आकाशात
कुणी लावल्या ..

आई ग आई ,
दे ग शिडी मला
उंच उंच चढून -
चांदोबा-चांदण्या
आणीन मी काढून ..

आई ग आई ,
चांदोबा-चांदण्या
ठेऊन अंगणात -
रात्री छान खेळेन
त्यांच्या प्रकाशात ..
.

3
Your rating: None Average: 3 (2 votes)

Comment viewing options

Select your preferred way to display the comments and click "Save settings" to activate your changes.

मंगळागौरीच्या काही खेळांतील

मंगळागौरीच्या काही खेळांतील ठेक्यांवर अजरा पाठभेद करून म्हटलेय तर बसतेय. (विशेषतः पगडफु बाई पगडफू - का असेच कायसेसे - गाणे आहे ना, तत्सम चाल)
अभिप्रेत चाल आहे का कोणती?

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हम्म

सांगा ना बाबा
चंद्राचा गोळा
उंच आकाशात
कोणी टांगला?

आई ग आई
कोणी तार्‍यांची
उंच आकाशात
केली रोषणाई?

आई ग आई
शिडी मला देई
मग वरून त्यांना
आणतो मी खाली

बरे का बाबा
इथेच ठेवू त्यांना
रोजच दिवाळी
होईल आपली मजा

छान कविता. (स्वगत - मला

छान कविता. (स्वगत - मला बालकविता फार सुचतात. म्हणजे मला जितक्या कविता सुचतात त्या सगळ्या बालकविताच निघतात. पण उगाच तुम्हाला कंपिटिशन नको म्हणून त्या इथे टाकत नाही. (जीभ दाखवत) )

प्रत्येक सत्यास एक संदर्भ असतो, मात्र हे विधान स्वतः नि:संदर्भ सत्य आहे.