आजका 'अ‍ॅनिमल फार्म'?

-: 'अ‍ॅनिमल फार्म', ऑर्वेलची एक कालातीत अभिजात कलाकृती :-

त्यातील एकेक पात्रही असं अस्सल...

१. 'अ‍ॅनिमल रेबेलिअन' चा मुख्य आधार असलेला बुद्धिमान नि धडाडीचा पण राजकारणी धूर्तपणात कमी पडलेला आणि म्हणून क्रांतीचा शत्रू म्हणून शिक्का बसल्याने बदनाम होऊन परागंदा झालेला स्नोबॉल.

२. त्याच स्नोबॉलचा काल्पनिक बागुलबुवा उभा करून भाबडया प्राण्यांना सतत आपल्या बाजूला उभे राहणास भाग पाडणारा नेपोलियन.

३. आपल्या नेत्याच्या काल्पनिक नेतृत्वगुणांची सतत भलामण करत 'अच्छे दिन' यावेत म्हणून सर्व प्राण्यांना 'आपण दुप्पट तिप्पट काम केले पाहिजे, नाहीतर 'माणसे' आणि / किंवा स्नोबील पुन्हा' परत येतील' अशी भीती सतत घालत, आपल्याला ज्यातली काडीची अक्कल नाही ते काम अंगावर घेऊन त्यांना कामाला जुंपणारा प्रॉपगंडा ऑफिसर ऊर्फ नेपोलिअनचा उजवा हात असलेला स्क्वीलर.

४. विचारांच्या इंद्रियाला पूर्ण बंद करून 'द बॉस इज आलवेज राईट' म्हणत उर फुटेपर्यंत काम करणारा बॉक्सर.

५ ह्यॅ: हे प्राणी काय आपल्या विरोधात उभे राहणार म्हणून गाफील राहणारा मद्यपि जोन्स.

६. अचानक हाती सत्ता येऊनही ती राबवण्याची समज नसलेल्या प्राण्यांना सहज ठकवणारा फ्रेडेरिक.

७. वाचू शकणारा - आणि कदाचित म्हणून - सार्‍या बुद्धिभेदाच्या गदारोळात डोके ठिकाणावर असलेला 'गाढव' बेंजामिन.

८. नेपोलियनच्या पोलादी मुठीला सामूहिक कलकलाटाची साथ देऊन सतत 'व्हय म्हाराजा' म्हणणार्‍या शेळ्या.

९. या सार्‍या गदारोळात आपल्याला मिळालेल्या 'रंगीत रिबिन'च्या कौतुकात मश्गुल राहून 'आसपासच्या प्राणीसमाजाच्या'(!) परिस्थितीबाबत संपूर्ण उदासीन असलेली मॉली;

१०. प्रथम धन्याशी इमानी राहण्याचा प्रयत्न करत वारे फिरले हे ध्यानात आल्यावर लगेच प्राण्यांशी 'सॉलिडॅरिटी' वगैरे दाखवायला आलेला आणि तोंड वाजवण्यापलिकडे काहीही काम न करणारा मोजेस.
---

सारी सारी पात्रे जाणू आपल्या आसपासची. एक शोधाल तर हजार मिळतील. काय, सापडली की नाही?

बरं ते जाऊ दे. हा चित्रपट तर पहा आधी.

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्नोबॉलोत्तर स्थितीचं वर्णन करणारं "Several of them would have protested if they could have found the right arguments" हे उगाच आठवून गेलं Wink

अवांतर - 'ऑरेन्ज इज द न्यू ब्लॅक' ह्या नेटफ्लिक्स-मालिकेचे शीर्षकगीत आठवले:

The animals, the animals
Trapped, trapped, trapped till the cage is full
The cage is full
Stay awake
In the dark, count mistakes
The light was off but now it's on
Searching the ground for a bitter song
The sun is out, the day is new
And everyone is waiting, waiting on you
And you've got time
And you've got time

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आणि नेपोलियनने पाळून मोठी केलेली हिंस्र कुत्र्यांची टोळी विसरलात...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विसरलो नाही, अजून दिसली नाहीत म्हणून गाळली इतकेच. Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

चित्रपट दिसत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

यू ट्यूबवरचीच लिंक आहे. तिथे जाऊन सर्च केले तरी मिळेल. (कदाचित तुमच्या मशीनवरील फ्लॅश प्लेअर अपडेटेड नसावा.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

Smile
मला वाटलं आता याच्याशी ऐसीवरच्या आयडीजबरोबर जोड्या जुळवायला सांगताय की काय? Blum 3
तसं सांगितलेलें नाहीये बघुन झाकलेली मुठ गच्च आवळत हुश्श! केले

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मी ब्वॉ बेंजामिन गाढव.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

हं? मीतर मॉली आहे असं वाटतय Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला तर वाटलं सद्यःस्थितीच्या राजकीय परिस्थितीवरचं भाष्य आहे की काय.. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

To each his own... Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

घरी जाउन पाहतो. काहीतरी गंमतीशीर दुवा दिलेला आहे असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars