VoIP - म्हणजे काय रे भाऊ?

डॉट कॉम बूमच्या काळात, साधारण 1999-2000 च्या सुमाराला, डायलपॅड.कॉम ह्या संकेतस्थळाची ओळख झाली होती. अमेरिकेतल्या कोणत्याही नंबरवर चकटफू फोन करण्याची सोय त्या संकेतस्थळाने करून दिली होती. बर्‍याच मित्रांना तेव्हा फुकटात फोन करून बघितले होते. पण त्यावेळी मला त्या फुकट सोयीपेक्षा त्या तंत्रज्ञानाने भुरळ पाडली होती. त्याच सुमाराला सत्यम कंप्युटर्स ह्या कंपनीने खोज.कॉम आणि समाचार.कॉम ही संकेतस्थळं कोट्यावधी रुपयांना खरेदी केली आणि ते ऐकल्यावर माझी झोपच उडाली. डायलपॅड.कॉम सारखे मुंबईला फोन करण्याची सुविधा उपलब्ध करून देणारे एक संकेतस्थळ चालू करायचे डोक्यात आले. लगेच ‘डायलमुंबई.कॉम’ हे डोमेन नेम सागर मेलवंकी ह्या मित्राच्या साथीने रजिस्टर केले. तुम्ही सोशल नेटवर्क हा सिनेमा पाहिला असेल तर त्यात जसे झुकरबर्ग आणि त्याचा मित्र फेसबुक स्थापन करतात अगदी सेम तसेच आम्ही डायलमुंबई.कॉम हे व्हेंचर चालू केले, मी CTO आणि तो CFO आणि COO.

त्यासाठी मग तांत्रिक संशोधन सुरू झाले. प्रोटो-टायपिंग सुरू झाले. सागर व्हेंचर कॅपिटलिस्ट शोधायच्या मोहिमेवर निघाला. पण पुढे ट्रायच्या (Telecom Regulatory Authority of India) आणि लालफितीच्या नियमांमुळे डिजीटल स्विचिंग खाजगीतत्वावर करण्याची परवानगी नाही असे कळले! हाय रे कर्मा, सगळे ओंफस झाले आणि जग आणखी एका वुड-बी झुकरबर्गसारख्या ‘यंग आंत्रेप्रेनॉर’ला मुकले. आमची ‘डायलमुंबई.कॉम’ कंपनी पुढे कोणीतरी कोट्यावधी रुपयांना विकत घेईल अशी ‘कोटीच्या कोटी’ उड्डाणे मारणार्‍या आमच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला.

पण त्यावेळी केलेल्या तांत्रिक संशोधनामुळे VoIP ह्या तंत्रज्ञानाची ओळख झाली होती. परवा मुलाने, “बाबा, VoIP फोन म्हणजे काय?” हा प्रश्न विचारला आणि ‘कोटीच्या कोटी’ उड्डाणांच्या जखमेवरची खपली निघाली आणि त्यातून भळभळणार्‍या दुःखाच्या भरात त्याला ते समजावून सांगितले. तर चला बघूया हे VoIP म्हणजे काय ते...


सॉकेट कनेक्शन (चित्र: आंतरजालावरून साभार)

VoIP म्हणजे Voice over Internet Protocol.

Internet Protocol म्हणजे काय? हे समजून घेण्यासाठी थोडे मागे जाऊयात. दोन संगणक एकमेकांना जोडून त्यांच्यात माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी ‘सॉकेट’चा शोध लावला गेला. दोन्ही संगणकांवर एक एक सॉकेट ओपन करून त्या संगणकांना जोडणार्‍या केबलमधून माहिती पाठवणे शक्य झाले. पण ही माहिती कशी पाठवतात? तर ती पाठवण्यासाठी एक ‘प्रोटोकॉल’ पाळावा लागतो. तो प्रोटोकॉल म्हणजे नेमके काय? एकदम मजेशीर असते. समजा दोन ओळखीची माणसे भेटली आहेत.

माणूस एक: “नमस्कार!”
माणूस दोन: “नमस्कार!”
माणूस एक: “कसे काय ठीक?”
माणूस दोन: “ठीक, बाकी काय विशेष?”

हे संभाषण हा माणसांमधला शिष्टसंमत प्रोटोकॉल आहे. तसेच दोन संगणक माहिती पाठविताना प्रोटोकॉल पाळतात.

संगणक एक: “पिंग”
संगणक दोन: “पॉंग”
संगणक एक: “माहिती पाठवतो आहे पाठवू का?”
संगणक दोन: “ओके, पाठव”
संगणक एक: “तयार”
संगणक दोन: “ओके”
संगणक एक: “माहिती पाठवली”
संगणक दोन: “मिळाली”
संगणक एक: “माहिती ओके?”
संगणक दोन: “नाही, चेकसम एरर, परत पाठव”
संगणक एक: “ओके, पाठवली”
संगणक दोन: “ओके, मिळाली”
संगणक एक: “माहिती ओके?”
संगणक दोन: “हो!”

असा हा संवाद दोन संगणकांमध्ये सॉकेटमार्फत, ते सॉकेट जोडलेले असेपर्यंत निरंतर चालू असतो. त्या प्रोटोकॉलला ‘TCP’ - Transmission Control Protocol असे म्हणतात. ह्यामध्ये माहिती छोट्या छोट्या ‘डेटा पॅकेट्स’ मध्ये रूपांतरित करून तुकड्या तुकड्याने एका संगणकाकडून दुसर्‍या संगणकाकडे पाठवली जाते. पण संगणक इंटरनेटला कुठूनही जोडलेला असू शकतो म्हणजे जगाच्या पाठीवर कुठूनही. मग जगाच्या एका कोपर्‍यात असलेल्या संगणकापर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी योग्य तो संगणक कसा शोधायचा ह्याचा प्रोटोकॉल म्हणजे Internet Protocol. वेगवेगळ्या इंटरनेट राउटर्स मधून योग्य तो IP Address असलेला संगणक शोधून डेटा पॅकेट्स त्याच्या पर्यंत पोहोचवण्याची तजवीज हा Internet Protocol करतो. अशा प्रकारे दोन संगणक TCP/IP ह्या Protocol मार्फत एकमेकांची संवाद साधत माहितीची देवाण-घेवाण करतात.

पण ह्या TCP मध्ये डेटा पॅकेट व्यवस्थित पोहोचले आहे की नाही ह्याचा पडताळा घेतला जातो आणि जर डेटा पॅकेट व्यवस्थित पोहोचले नसेल तर ते पुन्हा पाठवले जाते. जर आवाजाची डेटा पॅकेट्स पडताळली गेली तर बोलणे 'रियल-टाइम' राहणार नाही आणि सलग ऐकता येणार नाही. त्यामुळे हा TCP प्रोटोकॉल न वापरता ह्याच्या पेक्षा एक सोप्पा आणि लाइटवेट User Datagram Protocol वापरला जातो. हा लाइटवेट अशासाठी की ह्यात 'error checking and correction' होत नाही. त्यामुळे VoIP वरून केलेले संभाषण सलग ऐकता येते, पण कधी कधी नेटवर्क कंजेशन असेलकाहीते तुटक ऐकू येते.

पारंपरिक टेलीफोन सर्विस, ‘सर्किट स्विचिंग’ ह्या तंत्रज्ञानावर आधारित असते. जेव्हा एखादा फोन केला जातो तेव्हा टेलेफोन ऑफिस मधून त्या दोन फोन्समध्ये कनेक्शन जोडून दिले जाते. हे जोडलेले कनेक्शन म्हणजे ‘सर्किट’. जो पर्यंत कॉल चालू असतो तोपर्यंत हे सर्किट जोडलेले असते. कॉल संपला की हे सर्किट ब्रेक होते. ह्या यंत्रणेला Public Switched Telephone Network (PSTN) म्हणतात. ह्या पद्धतीत सर्किट मधून वाहणारा डेटा हा ‘अ‍ॅनॅलॉग’ असतो. अ‍ॅनॅलॉग म्हणजे (ह्या लेखाच्या संदर्भात) सतत वाहणारा इलेक्ट्रिक प्रवाह. फोनमधल्या स्पीकरमध्ये बोलल्यावर कंपने तयार होतात, ती कंपने, जी इलेक्ट्रिक प्रवाहच्या माध्यमातून Public Switched Telephone Network ह्या सर्किटमधून पाठवली जातात, अ‍ॅनॅलॉग असतात.

बेसिक डेटा Internet Protocol च्या साहाय्याने कसा प्रवास करतो हे कळले. Public Switched Telephone Network मधून अ‍ॅनॅलॉग डेटा कसा पाठवला जातो हेही कळले. ह्या दोन्ही प्रकारांचा संगम म्हणजे Voice over Internet Protocol. आवाज (संभाषण), इंटरनेटच्या माध्यमातून प्रवाहित करणारे तंत्रज्ञान म्हणजे VoIP.

पण जर इंटरनेटच्या माध्यम वापरायचे असेल तर डेटा डिजीटल फॉर्म मध्ये पाहिजे, अ‍ॅनॅलॉग असून चालणार नाही. त्यासाठी अ‍ॅनॅलॉग डेटा ‘कोडेक (CODEC)’ वापरून डिजीटाइझ्ड केला जातो. हा डिजीटाइझ्ड केलेला आवाज ‘पॅकेट स्विचिंग’ च्या साहाय्याने Internet Protocol वापरून दुसर्‍या पार्टीपर्यंत पोहोचवला जातो. ही दुसरी पार्टी असू शकते.

    1. टेलिफोन

    2. संगणक

    3. VoIP फोन


अ‍ॅनॅलॉग टु डिजीटल (चित्र: आंतरजालावरून साभार)


डिजीटल टु अ‍ॅनॅलॉग (चित्र: आंतरजालावरून साभार)

VoIP साठी इंटरनेट हे माध्यम असल्यामुळे आणि डिजीटल डेटा संकीर्ण (Compress) करून पाठवता येतो. डेटा संकीर्ण असल्याने त्याच बॅन्डविड्थ मध्ये बर्‍याच कनेक्शनसाठी डेटा संक्रमित केला जाऊ शकतो. हा VoIP चा मुख्य फायदा. PSTN सर्किट मध्ये हे शक्य नसते.

VoIP तीन प्रकाराने वापरता येतो

1. Analog Telephone Adaptor (ATA): ह्यामध्ये टेलिफोन इंस्ट्रुमेंट आणि कनेक्शन पोर्ट ह्याच्यांमध्ये Analog Telephone Adaptor बसवला जातो जो अ‍ॅनॅलॉग डिजीटल कंव्हर्जन करतो. (हे भारतात शक्य नाही)

2. IP Phone: हा फोन दिसतो एकदम नॉर्मल फोन सारखा पण नॉर्मल फोनसारखे RJ-45 कनेक्शन न वापरता RJ-45 इथरनेट कनेक्शन वापरतो. त्यासाठी ह्या फोनला लागते LAN नेटवर्क किंवा WiFi नेटवर्क

3. संगणक ते संगणक: ह्यामध्ये संगणकामध्ये एक सॉफ्टवेयर स्थापित (Install) केले जाते. हे सॉफ़्टवेयर ATA आणि ‘कोडेक (CODEC)’ चे काम करून संगणकाला उपलब्ध असलेल्या नेटवर्कचा वापर करते. स्काइप, वायबर, मॅजिकजॅक अशी अनेक सॉफ्टवेयर्स उपलब्ध आहेत जी वापरून VoIP ची कमाल अनुभवू शकतो.

पण VoIP हे इंटरनेटवर अवलंबून असल्याने त्याचा प्रभावीपणा हा इंटरनेट बॅन्डविड्थवर अवलंबून असतो. ब्रॉडबँड सुविधा जर नसेल तर VoIP वापरून केलेले संभाषण 1940-50 च्या दशकातील सिनेमांच्या डायलॉग डिलिव्हरीसारखे एकदम संथ असू शकेल. तसेच इंटरनेट वापरासाठी लागणारा विद्युतपुरवठा जर व्यवस्थित नसेल तर हे तंत्रज्ञान कुचकामी ठरू शकते. PSTN टेलिफोन सर्विसमध्ये फोनला विद्युतपुरवठा PSTN एक्सेंजकडून होतो, म्हणजे तुमच्या घरचा विद्युतपुरवठा बंद असला तरीही फोन चालू असतो. हे काही कळीचे मुद्दे सध्या VoIPच्या वापरावर मर्यादा आणतात.

थोड्याच काळात ह्यावर उपाय शोधले जाऊन ते तंत्रज्ञान क्रांती घडवून पारंपरिक PSTN टेलिफोन सर्विस मोडीत काढण्याची शक्यता आहे. तेव्हा तुम्ही VoIP वापरून संभाषण करत असाल आणि ते ठीक होत नसेल तर तंत्रज्ञानाला नावे ठेवण्याआधी त्यामागची यातायात समजून घ्या आणि मगच नावे ठेवा.

तर आता VoIP म्हणजे काय ते कळले का रे भाऊ?

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

पुर्वी जो मोडेमचा प्रकार असायचा तो IoVP होता काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™

मोडेम आत्ता नसते? ते तर आत्ताही असतेच.

-(तांत्रिक) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

skype, gtalk, viber हे voip चेच प्रकार असूनही TRAIला कसं चालतं? का आता नियम बदललेत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

मी जे वाचले, त्यानुसार सेवादात्याचा सर्व्हर भारताबाहेर असला तर चालते. सेवादात्याचा सर्व्हर भारतात असला, तर फक्त व्हीओआयपी-टू-व्हीओआयपी कॉलिंग चालते.

ट्रायचा आक्षेप माझ्या समजुतीप्रमाणे व्हीओआयपी-टू-टेलिफोन नेटवर्क क्रॉसओव्हर भारतात होण्याला आहे. (खात्रीलायक माहिती नाही, परंतु याचा सेवादात्यांमधील आर्थिक देवाणघेवाणीच्या व्यवहारांशी आणि/किंवा त्यांच्या नियंत्रणाशी काही संबंध असावा काय, अशी मला दाट शंका आहे.) कॉल भारतात "येण्यापूर्वी" तो टेलिफोन नेटवर्कवर अगोदरच क्रॉस ओव्हर झालेला असेल (आणि भारतबाह्य सेवादात्यांच्या बाबतीत बहुतांशी तसेच होत असणार), तर ट्रायला आक्षेप नाही. उदाहरणार्थ, मी अमेरिकेत व्हॉनेज या कंपनीची (व्हीओआयपी-बेस्ड) टेलिफोनसेवा वापरतो. मी अमेरिकेहून भारतातल्या ल्याण्डलाइन नंबरास फोन करणे हे भारतात कायदेशीर आहे. एवढेच कशाला, माझ्यासारख्या एखाद्याने आपला व्हॉनेज किंवा तत्सम कंपनीचा डिव्हाइस भारतात उदाहरणादाखल आपल्या आईवडिलांच्या घरी आणून बशिवला, आणि त्यांनी तो अमेरिकेतील (किंवा, सेवादाता तशी सोय पुरवत असेल तर जगातील कोठल्याही, अगदी भारतातल्यासुद्धा) ल्याण्डलाइन नंबरास कॉल करण्यासाठी तो वापरला, तर ते बेकायदेशीर नाही. (अर्थात, याकरिता अमेरिकेतील अशा सेवादात्याबरोबर खाते उघडणे - आणि त्याला दर महिन्यास अमेरिकन फंड्ज़मध्ये बिलाचे पैसे भरणे - आवश्यक आहे. भारतस्थित उपभोक्त्यास असे थेट करणे कितपत शक्य आहे, याची कल्पना नाही, परंतु खाते ज्याच्या नावावर आहे - आणि परिणामी, खात्याची बिले भरण्यास जो जबाबदार आहे - तो अमेरिकास्थित असल्यास - आणि भारतातील आपल्या पार्टीकरिता आपले स्वतःचे पैसे खर्च करून आपल्या स्वतःच्या नावावर अशी सुविधा उपलब्ध करावयास तयार असल्यास - हे करता येऊ शकते.)

थोडक्यात, भारतबाह्य सेवादात्याने अशी सेवा पुरविल्यास (आणि भारतस्थित उपभोक्ता ती वापरू शकत असल्यास) ते बेकायदेशीर नाही. मात्र, भारतीय सेवादात्यांनी अशी सेवा भारतात पुरविण्याच्या बाबतीत कायद्याची बंधने आहेत.

(मोठ्ठा डिस्क्लेमर: चूभूद्याघ्या!)

-----------------------------------------------------------------------------------------------------------

काही सेवादाते अशी सुविधा वेगळा आकार न घेता पुरवितात. "एका मासिक फ्लॅट फीमध्ये यूएसए आणि कॅनडासह साठ देशांमध्ये - यात भारतही आला - वाटेल तेवढे कॉल करा", वगैरे वगैरे. अशा सेवादात्यांची मासिक फी फार स्वस्त नसते, पण तरीही रेग्युलर ल्याण्डलाइनवरून प्रतिमिनिटाच्या दराने आंतरराष्ट्रीय कॉल - कितीही स्वस्त झाले तरी - करण्यापेक्षा स्वस्तात पडते. इतर काही कंपन्या अशी सुविधा फक्त यूएसए आणि कॅनडामधील नंबरांना कॉल करण्यापुरती परंतु अत्यंत नगण्य मासिक फी घेऊन पुरवतात, मात्र यूएसए किंवा कॅनडाबाहेरील नंबरांना कॉल करायचा झाल्यास वेगळा आकार लावतात. भारतातील पार्टीला फक्त अमेरिकेत कॉल करणे असेल, तर ही दुसर्‍या प्रकारची सेवा उपयुक्त पडते. (अमेरिकेतील पार्टीला भारतातील ल्याण्डलाइन किंवा मोबाइलवर कॉल करण्यासाठी पहिल्या प्रकारची.)

भारतातून भारतात कॉल करण्याच्या दृष्टीने मात्र हा प्रकार फारसा किफायतशीर ठरत नसावा. कारण, (१) एक तर दुसर्‍या प्रकारची सेवा घेऊन मिनिटानजीक पैसे मोजावे लागतात (तो इंटरनॅशनल कॉल होतो), किंवा पहिल्या प्रकारची सेवा घेऊन तुलनेने मोठा मासिक आकार भरावा लागतो, त्यामानाने भारतातल्या भारतात कॉल करण्याकरिता भारतातली टेलिफोनकंपनी वापरणे बहुधा स्वस्त पडावे, आणि (२) दुसरे म्हणजे, भारतातील अशा उपभोक्त्याला त्याच्या नंबरवर कॉल करणार्‍या व्यक्तीकरिता तो इंटरनॅशनल कॉल ठरतो - किंबहुना, अशा सेवेकरिता मिळणारा नंबरही अमेरिकन असतो - आणि अमेरिकेला कॉल लावत असल्याप्रमाणे आकार पडतो.

बॉटमलाइन इज़, अशी सुविधा जगात कोठेही वापरली, तरी तिचे व्यवहार हे प्रस्तुत फोन अमेरिकेत असल्याप्रमाणे व्हावेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

टंकनश्रम वाचविल्याबद्दल धन्यवाद!

-(आभारी) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या माहितीप्रमाणे पीसी टू पीसी फुकट आहे पण पीसी टू अ फिजिकल फोन हे पेड आहे.

डायलपॅड पीसी टू अ फिजिकल फोन फ्री देत होते म्ह्णून ती साइट बंद झाली आणि तो प्रकार आत्ताही फुकट नाही. स्काइप चे कॉल रेट्स प्रत्येक देशानुसार बदलतात (मी शेवटच्या वेळी जेव्हा वापरले तेव्हा पर मिनिट रेट असा होता ०.०२ डॉलर -> अमेरिका, ०.०९ -> भारत,०.२५ -> दुबई), त्यामागे त्या देशाच्या सरकार ला किंवा जी कोणी तिथली नियंत्रण करणारी यंत्रणा असेल त्यांना किती पैसे करारापोटी द्यावे लागतात हेच कारण असावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

मॅजिकजॅक नावाचे अ‍ॅप वापरून चकटफू फोन आत्ताही करता येतात.

-(फुकट्या) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चांगली ओळख, पण डेटा ट्रान्स्फर साठी ‘TCP’ वापरत नाहीत कारण की त्याने voice ची क्वालिटी affect होते.

त्यासाठी मुख्यत्वे 'UDP' वापरतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पॉइंट टेकन!

मी सुरुवातीला नेटवर्क स्टॅकपासून लिहायला सुरुवात केली होती पण ते फार तांत्रिक आणि कीचकट वाटले म्हणून सोडून दिले आणि त्या लोच्यामधे UDP पण राहून गेले. वेळ मिळाला की लेख अपडेट करतो. तूर्तास ही पोच!

-(माणूस सोकाजी) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

> मी सुरुवातीला नेटवर्क स्टॅकपासून लिहायला सुरुवात केली होती पण ते फार तांत्रिक आणि कीचकट वाटले म्हणून सोडून दिले आणि त्या लोच्यामधे UDP पण राहून गेले.

मान्य. हे किचकट आहेच. 'TCP' ऐवजी 'UDP' का वापरतात ते सांगायला खालील गोष्टी उस्कटून सांगायला लागतीलः

1. round trip time
2. bandwidth delay product
3. TCP packet send window (congestion control)
4. moving averages
5. TCP retransmits
6. Queue management (M/M/1)
7. Active queue management
8. Bufferbloat

हा सगळा गुतडा समजला की कधी कुठला प्रोटोकॉल वापरायचा ते "ईंट्युएटिवली" कळते. पण, मराठीत हे सगळ रुपांतरीत करायच म्हणजे खायच काम नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यात एखादी ओळ मराठीत पेरून बाकी सगळं इंग्रजीत लिहिलं तरी चालेल. फील तोच येतो. फक्त काँसेप्ट सांगायची सिक्वेंस योग्य असायला हवी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

छानच लेख
मराठीत तांत्रिक लेखन अत्यावश्यक आहे.

(मागे मी उपक्रमावर सुरू केलेली ओरॅकल अ‍ॅप्सची माहिती देणारी लेखमाला अर्धवटच राहिल्याची आठवण झाली)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

एकामागे एक खूप छान उपयुक्त लेख.

अवांतर-
आपला तांत्रिक नॉलेज डोमेन काय काय आहे हे सांगाल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

तुम्ही 'पेयशास्त्रा'ला तांत्रिक डोमेन ठरवता की नाही यावर ते अवलंबून आहे. होय की नाही रे सोकाजी? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

'चेकसम एरर' या संज्ञेचं आणखी स्पष्टीकरण देता येईल काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

A checksum or hash sum is a small-size datum computed from an arbitrary block of digital data for the purpose of detecting errors which may have been introduced during its transmission or storage.

एक अल्गोरिदम वापरून डेटा-पॅकेट साठी एक आकडा कॅल्क्युलेट(नंबर [सम]) तयार केला जातो. डेटा-पॅकेट नेटवर्कमधून संक्रमित करताना डेटा-पॅकेटच्या हेडरमध्ये हा नंबर पाठवला जातो. योग्य त्या आयपी अ‍ॅड्रेसच्या संगणकाकडे ते डेटा-पॅकेट पोहोचले की त्या संगणकावर पोहोचलेल्या डेटा-पॅकेटवर तेच अलोरिदम चालवून परत एकदा आकडा (नंबर [सम]) कॅल्क्युलेट केला जातो. तो आकडा हेडरमधल्या आकड्याशी जुळतो का ते तपासले जाते. जर आकडा जुळला (पक्षी: आकडा लागला) तर डेटा-पॅकेट काहीही नुकसान न होता अभंग पोहोचले आहे हे समजते.

- (तांत्रिक) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चेकसम एरर म्हणजे... थोडक्यात वेगळ्या शब्दात सांगायचं तर..
संगणक एक: "मी तुला पाच पानं, चारशे ओळी, दोन हजार शब्द असलेलं पुडकं पाठवलंय. मिळालं का?"
संगणक दोन: "काहितरी लोच्या (चेकसम एरर) झालाय" (मनातल्या मनातः दोन पानं गहाळ झालेली दिसतात, पाईप फुटला की काय?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-------------------------------------------

सोकाजी आणि मराठे यांच्यासाठी प्रश्न -

हा आकडा गंतव्यस्थानाशी व्यवस्थित पोहोचेल असं गृहीतक असतं का तो पोहोचावा यासाठी काही चिरेबंद योजना असते?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

थोडक्यात उत्तर, हो!

सविस्तर माहितीसाठी इथे टिचकी मारा.

- (तांत्रिक) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान. ओळख अगदी सोप्या शब्दांत करून दिलीय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चांगली माहिती, मस्त संकलन.
ह्याबद्दलच्या शंका मी ऐसीवरच विचारल्या होत्या.
त्याबद्दलही अधिकची माहिती देता येइल का ?
(त्या धाग्यावरही काहिंनी दिलीच आहे, पण त्याव्यतिरिक्त अधिक माहिती मिळाली तर बरं होइल)

http://www.aisiakshare.com/node/2734

cisco IP phone

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

खूप चांगली माहिती !
धन्यवाद!

http://tech4marathi.blogspot.in/

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान आहे लेख.VOIP शी संबंधित महिती अगदी साध्या सोप्या शब्दांत समजावुन सांगितली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मराठीत तांत्रिक लेखनास सुरुवात झाली ही चांगली गोष्ट आहे.तुम्हा सर्वांनाच धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0