ही transition अशी नकळतच कशी झाली ?

-----------------------------------------------१----------------------------------------------------

निवांत दुपारी काहीही न करता नुसतं बसलेलं असताना दिसलेलं एखादं पुस्तक आठवणींचा कप्पा उघडतं आणि आठवते अशीच एक दुपार, आईने ऑफिसला जाताना सांगून ठेवलेला अभ्यास करणारी मुलगी, बाहेर मुल-मुली खेळत असले तरी तिला त्यात फारसा रस नाही … तिला पटकन अभ्यास संपवून आईला फोन करायचाय. मग आई तिला लपवलेल्या नव्या पुस्तकाची जागा सांगणार आहे… किती राग येत असे तेव्हा आईच्या अशा अटींचा !!मनाला पाहिजे तितका वेळ पुस्तकं वाचायला देत नाही म्हणून !!
आत्ता समोर असतात आईकडे माझ्यासाठी फ्लिपकार्ट वर मागवलेली पुस्तके !!

-----------------------------------------------२----------------------------------------------------

एका दिवशी पलंगावरून उठताना माळ्यावरच्या अडगळीत ठेवलेली बाबांची office bag डोकावते. कधी हिला रिटायर केलं बाबांनी … आठवत नाही पण लहानपणी हि VIP ची चपटी bag उघडायची खूप क्रेझ असायची. तिच्या flap मध्ये असलेले वेगवेगळे कप्पे , बाबांच्या कागदपत्रांचा पसारा पाहून माझ्याप्रमाणेच दप्तरात पसारा करणारे बाबा माझ्याएव्हडेच आणि माझ्यासारखेच आहेत असं फीलिंग येत असे. अजून एक गंमत म्हणजे त्यातल्याच एखाद्या कप्प्यातून बाबांची कार्डस काढून घेणे. गुळगुळीत कागदावर छापलेली ती कार्डस काहीही केल्या हाताने फाटली जात नसत. बाबांच्या नावाखालील लांबलचक डीग्र्यांची माळ वाचून 'आपले बाबा किती शिकलेले, किती हुशार !!' असा अभिमान वाटत असे. त्याचवेळी आपल्याला अजून किती दिवस अभ्यास करावा लागणार असे एक छुपे टेन्शनही !!
आता आहे शिक्षण पर्यायाने अभ्यास संपण्याचे टेन्शन !!

-----------------------------------------------३----------------------------------------------------

पुण्यात रिक्षाने फिरताना पास होतो पौड रोड, आठवतात जॉब करतानाचे दिवस ; हट्टाने independent राहायचे म्हणून घेतातलेला छोटासा flat, रोज ऑफिस मधून येताना घेतलेली ताजी भाजी, छोटासा एकटीपुरता स्वयंपाक, frequently चतुश्रुंगी मंदिरात जाणं, सकाळची जिम , सगळं नियमितपणे लावून घेतलेलं रुटीन !! किती सवयीचं आणि रोजचं !! समोरच्या भेळवाल्याशी झालेली दोस्ती … आताही तो तिथेच आहे, मी गेले तर ओळखेल का ?
नेहमीच्या जागा, नेहमीचे रस्ते पण सारं काही परकं का बरं ?

-----------------------------------------------४----------------------------------------------------

मध्येच कानावर पडतं इंग्रजाळलेलं हिंदी मिश्रित मराठी , मग दिसतो दुचाकीवरून जाणारा मुलामुलींचा ग्रुप , जेवायला कोणत्या ठिकाणी जायचं किंवा येत्या वीकेंडला कुठे फिरायला जायचं अशी काही तत्सम चर्चा चालू आहे; त्यांच्यासाठी सध्या त्याहून मोठे वा महत्वाचे प्रश्न नाहीत. 'नही यार', 'अरे वो ','you don't say' असं काही बाही ऐकू येता येता विरळ पण होवून जातं. हे असं निरभ्रपणे फिरणं, एकमेकांना रोज भेटणं, किती साऱ्या गोष्टी गृहीतच धरल्या असतात. अजून चार वर्षांनी कोण कुठे कोण कुठे असेल आणि वर्षातून एकदा जरी भेटायचं ठरवलं तरी सगळ्यांना एका दिवशी एकत्र भेटता येणारच नाही हे माहिती असेल का ह्या मुलांना ?? काल काल पर्यंत तर मी ह्यांच्यातलीच एक होते आणि अचानक प्रौढ चष्म्यातून कशी काय बघू लागले ?? आणि कधी ?? ही transition अशी नकळतच कशी झाली ??

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (4 votes)

प्रतिक्रिया

मस्त. यावर अजून लिहायचं आहे. परत काहीवेळाने येईन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

पुण्यात रिक्षाने फिरताना पास होतो पौड रोड

लहानपणी पुण्यात नारायण पेठ ते पुणे स्टेशन (किंवा उलट्या दिशेने) रिक्षाने कित्येकदा फिरलो असेन. वाटेत एकदाही पौड रोड पास झाल्याचे आठवत नाही.

ही अशी वाक्ये स्थलकालनिरपेक्ष सत्ये असल्याच्या थाटात लोक कसे लिहू शकतात, ते समजत नाही. की हल्लीची पिढी नारायण पेठेपासून पुणे स्टेशनला (रिक्षाने) जाताना पौड रस्त्यामागे जाते?

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

पुण्यातील पूर्वीचे रिक्षावाले अनभिज्ञ गिर्‍हाइकाला बरेच फिरवत असत, अशी किंवदंता आहे. हल्लीची पिढी शहाणी झाली असेल, असे वाटले होते. पण कसचे काय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पु ल म्हणून गेलेत पूर्वीचे पुण् राहिलं नाही आता. हल्ली कुठेलेही न आईकलेले प्रांत पुणे म्हणून पुढे येतात आणि वर लोक म्हणतात तुम्हाला हे माहिती नाही. त्यामुळे चालायचेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'हिंजवडी' नावाचा काही स्थलविशेष पुण्यात किंवा पुण्याच्या आसपास अस्तित्वात आहे, हे 'आमच्या काळा'त आमच्या गावीही नव्हते. चालायचेच.

('हिंजवडी' नेमके कोठे आहे, हे मला आजही ठाऊक नाही. असो.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नव-आयटीभाषेत हिंजेवाडी (जे जेमिनीतला)

तत्सम तलावदे आणि रंजनगाँव ही स्थळंही उद्भवलेली आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

पण ते हिंजेवाडीच आहे ना? इंग्रजीमधे e लिहीतात की. ळ आणि ण उत्तरेकडच्यांना उच्चारता येत नाही नीट हे मात्र खरंय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इंग्रजीत काहीपण लिहितात. मराठीत हिंजवडीच दिसते सगळीकडे पाट्यांवर. ते मिल्ट्रीवाले तर 'लोहगाव'चे 'लोहेगाव' करून टाकतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आणि खडकीचे किरकी Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

...नव्हे, बरे का, मिझ अस्मि... 'कर्की'! 'कर्की'!!!

- 'न'. बा. ठिगळे ('सर'!)

बाकी चालू द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'अजमेरी गेट', 'कश्मीरी गेट', 'लाहौरी गेट' वगैरेंची स्पेलिंगे अनुक्रमे 'Ajmere Gate', 'Kashmere Gate', 'Lahore Gate' अशी होतात. (निदान 'आमच्या वेळी' तरी व्हायची. नंतर गेल्या पंचवीसएक वर्षांत बदलली असल्यास कल्पना नाही.)

(अवांतर: 'परळ'चे 'परेल' होणे हा 'लोहगांव'चे 'लोहेगांव' होण्यातलाच प्रकार असावा काय?)

(अतिअवांतर: पण मग इंग्रजी 'टम्बलर'चे मराठीत जर 'टमरेल' होऊ शकते, तर मग मराठी 'परळ'चे इंग्रजीत 'परेल' का होऊ नये? गूज़रावांना जो न्याय, तोच ग्याण्डरतैंनाही लागू होऊ नये काय?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हिंजेवाडी म्हणजे देहुरोड-कटराज बायपास रोडवर आहे ते का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

देहुरोड-कटराज बायपास रोड कुठेय नक्की माहीत नाही. पण हिंजेवाडी मुंबई बंगलुरू हायवेवर आहे. पुण्याकडून मुंबईकडे जाताना उजवीकडे कात्रज - सिंहगड रोड - वारजे - चांदणी चौक - सुस - बाणेर - वाकड - रावेत असे लागते. बाकी सगळ्या फाट्यांवर हायवेसाठी उड्डाणपूल आहे. फक्त वाकड फाटापाशी हायवेला सिग्नल आहे आणि वाकडकडून हिंजेवाडीकडे जाणारा उड्डाणपूल आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

देहुरोड-कटराज बायपास रोड कुठेय नक्की माहीत नाही.

त्यांना देहूरोड-कात्रज बायपास रोड म्हणायचे असावे बहुधा. (चूभूद्याघ्या.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चायला.... एक्सप्लेन करायचं म्हणजे फारच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

नैतर काय!!!! पूना में आये और कटराज भी नहीं जानते!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हे हे हे. कटराज पहील्यांदाच ऐकलं Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हिंजवडीतला एक प्रोजेक्ट आहे. कोलते पाटील लाइफ रिपब्लिक. व्हिडिओ अवश्य पहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

फूटबॉल स्टेडीयम :O येड लागलय लोकांना. तो ब्ल्यू रिज प्रोजेक्ट, तिथे गोल्फ कोर्ट आहे म्हणे. ७५०० रेट चालूय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हिंजवडी मी पण पहिली नाही अजून. बाकी आता चाकण पर्यंत पुण्याच विस्तार झाला आहे. त्यामुळे काय वाटेल ते होऊ शकते. सगळ्या भारताची अशीच अवस्था आहे. एकाच आपले शहर घ्यायचे आणि ते प्रचंड फुगवून ठेवायचे. मग एक बायपास रस्ता काढायचा. त्याच्या आजूबाजूची सगळी जमीन चढ्या भावात विकायची. मग थोड्याच कळत तो रस्ता आणि बाकीची गावे आणि प्रचंड मोठा परिसर गावात घालायचा. असा खेळ आपला खेळत राहायचे. फक्त खंडाळ्याचा घाट आहे म्हणून नाहीतर पुणे-मुंबई एकाच गाव करायला आपली लोक कमी करणार नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोण हे खंडाळे? काय घाट घातलाय त्यांनी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

थ्यांक गॉड फॉर खंडाळ्याचा घाट!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तसे पहाता सरदार बिबवे, रास्ते, भुजबळ जाउन अनेक वर्षे झाली अन्यथा बिबवेवाडी, रास्ता पेठ, कोथरुड(किंवा कोथ्रुड) हे भागही पुण्याला बाहेरचेच. कसबाच ते काय खरे पुणे म्हणावयाचे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आमच्या लहानपणी कोथरूड हे तर नुसते बाहेरचेच नाही, तर लाऽऽऽऽऽऽऽऽम्बवर तेथे कोठेतरी कोण कशाला झक मारायला जातेय छाप होते. असो चालायचेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोथरूड फारच लांब राहिले, आपण एरंडवणेला राहिला जाणार म्हणून मी अनेक वर्ष दुखी होतो. बाकी फारच लहानपणी विट्ठलवाडीला सहल वगैरे जायची आणि आमचे वडील तेंव्हा म्हणायचे आमच्या शाळेची सहज अरण्येश्वरला जायची. पण हा विस्तार व्हायला किमान ३०-४० वर्षे गेली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रत्येकजण नारायण पेठेपासून पुणे स्टेशन हाच प्रवास करतो व करू शकतो अशी तुमची कशी काय समजूत झाली ?

अहो मी पुण्यात कुठून कुठे फिरले ह्याला महत्व नाहीये इथे. क्ष ठिकाणापासून य ठिकाणापर्यंत जाताना रिक्षा पौड रोड वरून गेली एवढाच अर्थ घेतला असतात तरी चालले असते.

बाकी पुणे शहराचा विस्तार आणि आता कोणती ठिकाणे पुणे शहरात सामील होतात हा अवांतर चर्चेचा विषय झाला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सिद्धि

प्रत्येकजण नारायण पेठेपासून पुणे स्टेशन हाच प्रवास करतो व करू शकतो अशी तुमची कशी काय समजूत झाली ?

असा दावा मी कधी केला?

मी फक्त एक संभाव्य, प्रतिवादात्मक उदाहरण दिले.

काही महाभाग, उदाहरणादाखल, सोमवार पेठ ते शनवारवाडा, किंवा सहकारनगर ते स.प. कॉलेज, झालेच तर मित्रमंडळ कॉलनी ते स्वारगेट, किंवा इंजिनियरिंग कॉलेज ते शिवाजीनगर स्टेशन, असाही प्रवास रिक्षाने करत असतील. त्यांनाही वाटेत पौड रोड पास होत असेल, याबद्दल साशंक आहे.

'मी पुण्यात रिक्षाने फिरत असे तेव्हा मला पौड रोड पास होत असे', असे म्हटले असतेत एक वेळ, तर समजू शकले असते. पण 'पुण्यात रिक्षाने फिरताना पास होतो पौड रोड'??? कोणी हे वाक्य वाचले आणि त्यावर 'माहिती', 'सामान्यज्ञान' म्हणून अवलंबून राहिले, नि उद्या 'जॉग्रफी बी'मध्ये ठोकून दिले, तर काय होईल??? संबंधितांचे आईवडील तुम्हाला त्यांच्या पाल्याची दिशाभूल केल्याबद्दल कोर्टात खेचतील ना! (बहुधा कलम ४२०खाली??? चूभूद्याघ्या.)

(अतिअवांतर: 'पुण्यात रिक्षाने फिरताना पास होतो पौड रोड' हे एखाद्या मराठी वर्तमानपत्रातल्या किंवा च्यानेलवरच्या मथळ्यासारखे वाटत नाही काय? म्हणूनच, ही 'बातमी' नाही, असे खाली लिहिण्याची सक्ती करणारा कायदा पाहिजे. संभाव्य ग्राहकांची दिशाभूल होऊ नये म्हणून.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"पास होतो पौड रोड" हे भूतकाळातील घटनेचे अशा तर्‍हेने वर्णन अनेक वेळा वाचले आहे. व्याकरण दृष्ट्या अचूक नसेलही. पण मला लेख वाचताना ते पुण्यातील माहितीच्या स्वरूपात - चालू वर्तमाऩकाळात- लिहील्यासारखे वाटले नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>पण मला लेख वाचताना ते पुण्यातील माहितीच्या स्वरूपात - चालू वर्तमाऩकाळात- लिहील्यासारखे वाटले नाही.

पुण्यात वर्तमानकाळ नसतो* फक्त भूतकाळ असतो असं कुठेतरी ऐकलं होतं Blum 3

*हे मुंबईला हिवाळा हा ऋतु नसतो अशा धर्तीवर वाचावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

बाकी पुणे शहराचा विस्तार आणि आता कोणती ठिकाणे पुणे शहरात सामील होतात हा अवांतर चर्चेचा विषय झाला.

तो कसा काय?

हे 'ट्रान्झीशन'च नव्हे काय?

पूर्वी 'पुण्या'तल्या लोकांना 'अ'हून 'ब'ला जाताना वाटेत पौड रोड सहसा पास होत नसे. आता होऊ लागला. हे ट्रान्झीशन असे नकळतच कसे झाले?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे ट्रान्झीशन असे नकळतच कसे झाले?

धागाकर्तीलाही हाच प्रश्न पडलाय असं वाटतं. तुम्ही परत तोच प्रश्न का विचारताय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

धागाकर्तीलाही हाच प्रश्न पडलाय असं वाटतं.

Quod Erat Demonstrandum. धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मराठीत सांगा. धन्यवाद

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

क्यू ई डी म्ह. जे प्रूव्ह करावयाचे ते प्रूव्ह झाले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

'हेच दाखवून द्यायचे होते!' किंवा, 'याचिसाठी केला होता अट्टाहास!'

'धागाकर्तीलाही हाच प्रश्न पडलाय' बोले तो, हा प्रश्न पडणारी धागाकर्त्री एकटी नव्हे. मग आम्ही तरी इथे वेगळे काय बोलून राहिलोय? आमचा बोलण्याचा विषय अवांतर कसा काय?

हेच दाखवून द्या. हो.! या. के. हो. अ.!!! Q.E.D.!!!

(Rather, Quite Easily Done!!!!!!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>पुण्यातील पूर्वीचे रिक्षावाले अनभिज्ञ गिर्‍हाइकाला बरेच फिरवत असत, अशी किंवदंता आहे

सारसबागेहून डेक्कन जिमखान्याला रिक्षाने जाताना रिक्षावाल्याने "स्टेशनवरून घेऊ का?" असं विचारलं होतं. पण आम्ही पुण्यात तेव्हा नवीन नसल्याने त्याचा प्रयत्न फसला. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

सारसबागेहून डेक्कन जिमखान्याला रिक्षाने जाताना रिक्षावाल्याने "स्टेशनवरून घेऊ का?" असं विचारलं होतं

ROFL ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हिंदुस्थान हुडकण्यासाठी निघताना पश्चिममार्गाने जाण्याची कल्पना कोलंबसाने पुणेरी रिक्षावाल्यांकडूनच ढापली असावी, असा आमचा एक जुना कयास आहे.

--------------------------------------------------------------------------------------------------------------

सुमारे पाच मिनिटे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सारसबागेहून डेक्कन जिमखान्याला रिक्षाने जाताना रिक्षावाल्याने "स्टेशनवरून घेऊ का?" असं विचारलं होतं

डॉळे पाणावले. आधी सारसबागेहून (किंबहुना कुठूनही) डेक्कनला (किंबहुना कुठेही) जायला पुण्यातील रिक्षावाला असा तयार झालेला पाहून त्या आनंदात आम्ही स्टेशनच काय बंड गार्डन, वानोरी असे कुठूनही घ्यायला बहुदा परवानगी दिली असती! पुण्यातील रिक्षावाला कोणत्याही इच्छित स्थळी (आणि पिंपरी चिंचवडातील रिक्षावाला मीटरवर!) यायला तयार होण्याच्या अत्यानंदाच्या प्रसंगी विवेक शाबुत रहायला आम्ही काय थत्ते चाचा आहोत! Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

तो तयार झाल्याचे कारण कदाचित "व्हाया स्टेशनचे गिर्‍हाइक मिळाले" असा झालेला समज असू शकेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

रोचक!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखिकेला आपल्या स्मरणरंजनी, सिंहावलोकनी धाग्याचं रूपांतर पुणेरी/भौगोलिक चर्चेत झाल्यावर 'हे ट्रांझिशन कधी झालं?' असा प्रश्न पडला असावा. वेलकम टु ऐसी, एवढंच म्हणतो. Smile (पण तसे बरे लोक आहेत हो हे...)

शाळेच्या शेवटापर्यंतची वर्षं ही ट्रांझिशन्सनी भरलेली असली तरी त्याचबरोबर आपलीही वाढ होत असल्यामुळे ती थोडी नैसर्गिक वाटतात. बरीचशी आठवतही नाहीत. बहुतेक बदल हवेसेच असतात. कॉलेजमध्ये मिळणारं स्वातंत्र्य हा परमोच्च बिंदू असतो. त्यानंतर मात्र जे बदल होतात ते केवळ परिस्थितीजन्य असतात - शारीरिक बदलांतून येणारे नसतात. या सगळ्याकडे वळून बघण्याचा दृष्टिकोन काहीसा स्थिरावत जातो. हव्याशा अनेक गोष्टी असल्या तरी नाविन्य त्या मानाने कमी झालेलं असतं. आणि म्हणूनच की काय, सिंहावलोकन करायला वेळही जास्त मिळत असावा.

ट्रांझिशन्स त्यानंतरही चालूच राहतात. कदाचित हा लेख वीस वर्षांनी वाचताना तुम्हालाच 'आपल्या विचारांत इतका बदल झालाय, हे ट्रांझिशन कधी झालं?' असा प्रश्न पडेल. त्याला उत्तर शोधायचं, की त्या उत्तरासाठी आत्तापासून तयारी करायची, की तो प्रश्न नुसताच सोडून द्यायचा... आत्तासाठी तिन्ही रस्ते मोकळे आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्यानंतर मात्र जे बदल होतात ते केवळ परिस्थितीजन्य असतात - शारीरिक बदलांतून येणारे नसतात. या सगळ्याकडे वळून बघण्याचा दृष्टिकोन काहीसा स्थिरावत जातो.

सहमत. किंवा असं म्हणता येईल की एकदा नोकरी-व्यवसायाच्या घाण्याला माणूस जुंपला की ट्रान्झिशन्स संपतातच जवळजवळ ३०-३५ वर्षे. त्यामुळे स्थिरावल्याचे फीलिंग येते. मग ट्रान्झिशन्स फक्त तरुणांमध्ये आणि आपल्यामध्ये किती अंतर पडलं आहे ते मोजण्यापुरतेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

थोडक्यात केलेलं सिंहावलोकनात्मक स्फुट/स्वगत आवडलं. विशेषतः शेवटचा परिच्छेद!

ऐसीवर स्वागत!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

इथे टगेगिरीही चालू असेल; पण वाचणारं पब्लिकही आहे.
लिहीत रहा; जमेल हळूहळू.
बाकी टागेगिरीला योग्य जागी मारलेलं उत्तम.

प्रकाश घाटपांडे ह्यांचा http://www.aisiakshare.com/node/2323?page=2#comment-38671 प्रतिसाद पहावा.

तो भाविक - विवेकवादी ह्या नजरेतून न पाहता टगेगिरी संदर्भात पाहिला तरी बराचसा लागू व्हावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

सहमत. इथल्या प्रतिक्रिया बघून कोण कशाला मरायला ललित लिहायला येईल, असं वाटलं. खरंच इथे एरवी अत्यंत दर्जेदार अवांतर आचरटपणा करतात. वर झालाय तसा निरर्थक शिमगा नसतो.
असो. ऐसीवर स्वागत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

हो !! अनुमोदन आणि धन्यवाद !! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सिद्धि

बाकी टागेगिरीला योग्य जागी मारलेलं उत्तम.

म्हणजे कुठे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

मलातरी फारशी टगेगीरी वाटली नाही प्रतिसादांत. आणि ललित लेखनावर प्रचंड काथ्याकूटदेखील एकच आठवतोय.
असो. सिद्धि जुन्याच आहेत तरी सगळेजण तिसर्या लेखावर स्वागत चे प्रतिसाद देतायत म्हणून आमीबी 'स्वागत' म्हणतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मलातरी फारशी टगेगीरी वाटली नाही प्रतिसादांत.

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नेहमीच्याच टगेगिरीची एक 'न'वी बाजू दिसली इतकेच. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0