बदामी हलवा

लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
१.कार्न फ्लोर - 1 कप
२. साखर - 2 कप
३. तूप - 1/2 कप
४. पाणी - १/२ लिटर
५. काजू - पाव कप (छोटे तुकडे करुन)
६. बदाम व पिस्ते - २ टेबल स्पून (छोटे तुकडे करुन)
७. हळद / केशर वेलची सिरप / तुमच्या आवडीचा खायचा रंग, ह्यापेकी एक - १/२ टी स्पून
८. वेलची पावडर - १/२ टी स्पून

क्रमवार पाककृती:
१. प्रथम पाणी आणि साखर एकत्र करून मंद आचेवर विरघळण्यासाठी ठेवा.
२. कॉर्न फ्लोरमध्ये थोड पाणी घालून पातळ मिश्रण तयार करा. अजिबार गुठळ्या राहू देऊ नका.
३. साखरेच्या पाण्यात थोड थोड कॉर्न फ्लोरच मिश्रण घालून ढवळा. गॅस मंद आचेवर ठेवा.
४. साखरच पाणी आणि कॉर्न फ्लोरच मिश्रण मिक्स झाल की त्यात अर्धी वाटी तूप घालून ढवळा.
५. लगेच काजू, बदाम व पिस्त्याचे तुकडे आणि खायचा रंग घालून ढवळा.
६. मिश्रण पारर्दशक झाले की गोळा व्हायला सुरुवात होईल.
७. थोडा घट्ट गोळा झाला की गॅस बंद करा आणि वेलची पावडर घालून ढवळून घ्या.
८. अ‍ॅल्युमिनियमच्या ट्रेला तूप लावून हे मिश्रण सेट व्हायला ठेवा.
९. हलवा पूर्ण थंड झाला की प्लेटमध्ये काढून हव्या त्या आकाराचे तुकडे कट करा.
१०. छोटे तुकडे करुन खायला दया.
११. हव तर काजूने सजवा.
वाढणी/प्रमाण:
तुमच्या आवडीप्रमाणे
अधिक टिपा:
मिश्रण पारर्दशक झाले की शिजले अस समजा.
साखरेचा घट्ट पाक झाला तर घाबरून नका त्यात थोड पाणी घालून पातळ करा.
मी पाव कप तूप वापरून करून पाहिला छान झाला. १/२ कप तूपाचा थोडा तूपकट लागतो.
कॉर्न फ्लोर ऐवजी आरारुट पावडर वापरु शकता. माझ्या सखीने आरारुट पावडर वापरुन केला होता.

माहितीचा स्रोत:
माझी सखी - मेघा

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

चविष्ट

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

ऐसीवर स्वागत.

पाकृ आवडली.
फोटोसहित असती तर अजून मजा आली असती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

इथे फोटो कसा द्यायचा. प्लिज मदत करा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इथे पहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

अर्रे परवाच हल्दीरामचा बदामी हलवा खाल्ला. नाय आवडला. चिकट असतो पण दिसतो छान.
ऐसीवर स्वागत आहे Smile लिहीत रहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या पदार्थाला बदामी हलवा म्हणायचे कारण काय? यात बदाम तर एक टेबलस्पून आहेत फक्त.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद सर्वांना. लवकरच इथे फोटो देण्यासाठी प्रयत्न करेन. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दातांपासून हा पदार्थ अधिक लवकर विलग व्हावा यासाठी काही युक्ती आहे का? चव चांगली असते पण ....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाहाहा खरय!!! तो दातावर क्राऊन बसवताना चिकट्ट मोल्ड लावतात ना. मला तसा वाटतो हा पदार्थ. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आरारूट हा नक्की काय जिन्नस असतो?
या पदार्थांमध्ये कॉर्न फ्लारच्या जागी इतर काही पदार्थ घातल्यामुळे चिकटपणा कमी होईल काय?
यातला चिकटपणा बहुतांश साखरेमुळेच येतो का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आरारूट हा नक्की काय जिन्नस असतो?
...........आरारूट हा जिन्नस अ‍ॅरोरूटचा अपभ्रंश करून मिळवितात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

२ वर्षांपूर्वी मी इस्तंबूलला टूरिस्ट म्हणून गेलो होतो. तेथे 'टर्किश डिलाइट' नावाची खास मिठाई मिळते ती अवश्य चाखा असे आमच्या मित्रांनी जाण्यापूर्वी बजावून सांगितले होते. त्याप्रमाणे एक दिवशी सायंकाळी खोलीकडे परततांना मुद्दाम मिठाईच्या दुकानात शिरलो आणि 'टर्किश डिलाइट' दाखवायला सांगितले. पुढे काय यावे? आपल्या सुपरिचित बदामी हलव्याच्या वडया.

(त्या मुक्कामात हेहि कळले की आपला गोडाचा शिरा 'हलवा' ह्या नावाने मिळतो. तेथीलच अजून एक मजेशीर अनुभव. आम्ही जेथे बुकिंग केले होते तेथे काही दुरुस्ती काम निघाल्यामुळे आमची सोय जवळच्याच दुसर्‍या हॉटेलात करण्यात आली होती. आमची 'गैरसोय' झाली म्हणून नव्या ठिकाणी आम्हाला Turkish Bath वाली upgraded खोली देण्यात आली आहे असे आवर्जून सांगण्यात आले. खोली छानच होती आणि संगमरवराचा Turkish Bath हि नेहमीच्या शॉवरव्यतिरिक्त होता. काय होता हा Turkish Bath? संगरवरात कोरलेले एक घंगाळवजा पसरट भांडे, वर गार-गरम पाण्याचे नळ, समोर बसण्यासाठी एक संगमरवरी दगड आणि तांब्याचे एक पसरट छोटे भांडे! दगडावर बसायचे, संगमरवरी घंगाळात पाणी काढायचे आणि पसरट भांडयाने ते अंगावर ओतायचे! हात्तेच्या, मी शाळेत असतांना आमच्या सातारला घरोघरी Turkish Bath च होते, फक्त ते संगमरवरी नव्हते इतकेच काय ते.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इस्तंबूलच्या विमानतळावर 'टार्किश डिलाइट' खाल्ले आहे. वेगवेगळ्या स्वादांचे नमुने चाखले आहेत पण बदामी हलव्याइतके चिकट नव्हते. बहुधा बाहेरून लावलेल्या पिठीसाखर/ कोरड्या नारळाच्या बारीक किसामुळे तितकेसे चिकटत नसावे. आपल्याकडला बदामी हलवा (बहुधा एकमेकांना चिकटू नयेत व नीट रचता यावेत म्हणून) बाहेरून तुपाने थबथबलेला असतो.

हात्तेच्या, मी शाळेत असतांना आमच्या सातारला घरोघरी Turkish Bath च होते, फक्त ते संगमरवरी नव्हते इतकेच काय ते.
................बहुधा टर्किश टॉवेलने अंग पुसल्यावरच टर्किश बाथ संपन्न होत असावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'टर्किश टॉवेल' जगात सर्वप्रथम तुर्कस्तानातील 'बूर्सा' ह्या ऐतिहासिक गावामध्ये करू लगले अशी समजूत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0