बोल अबोल हिमालयाचे --भाग १

पुस्तक प्रकाशित झाले असल्याने ही मालिका जालावर प्रकाशित करणं थांबवलं आहे.

******************प्रस्तावना सुरु******************
माझ्या मित्राच्या घरी एक जुनी डायरी सापडली. त्याचे आजोबा संघ परिवाराशी संबंधित सेवाकार्यात कार्यरत होते.
त्यांनी हिमालयाच्या कुशीतल्या काही ठिकाणी वास्तव्य व भटकंती केली आहे. तीनेक दशकापूर्वी त्यांनी हे अनुभव डायरी म्हणून लिहून काढले.
आजोबांची परवानगी मित्राने घेतली. त्यांचं लेखन जालावर का असेना प्रसिद्ध करावं अशी मित्राची इच्छा.
जमेल तसं ते हस्तलिखित मी इथं टंकणार आहे.
माझं काम केवळ टंकलेखकाचं असणार आहे.
****************** प्रस्तावना समाप्त******************
.
.
ज्या भूमीमध्ये जन्म घेतला त्या पवित्र भरतभूमीची संपूर्ण यात्रा ही प्रामुख्याने तीर्थक्षेत्रे पाहणे आणि तेथील देवतांचे दर्शन घेणे ह्या दृष्टीने व्हावी ही मनातील आत्यंतिक इच्छा. यातूनच ठिकठिकाणचा समाज ,त्यांची ठेवण, वृत्ती प्रवृत्ती, वागण्याच्या पद्धती, चालीरिती, श्रद्धा वगैरे सर्व अभ्यासता येतात आणि शिवाय वेगवेगळ्या ऋतूतील निसर्ग , हवामान आणि प्रेक्षनीय स्थळे यांचे ज्ञान होते.मला असणार्‍या छंदामध्ये भ्रमणाचा छंद थोडा जास्त. त्यातही खास आकर्‍षण गंगामातेचं आणि नभाधिराज हिमालयाचं.
माझी बहुतेक भारत यात्रा एव्हानापर्यंत झाली आहे. त्यात हिमालय तीन चार वेळेस जवळ केला आहे. तीन वर्षापूर्वी हिमालयाची पश्चिम टोकापासून पूर्व टोकापर्यंत तीन महिने सखोल यात्रा झाली; तिचे बोल थोडक्यात असे :-
निवृत्तीनंतरच्या या स्वच्छंदी परिभ्रमणात मला एका सेवानिवृत्त साथीदाराची हमी घ्यावी लागली. हे साथीदार म्हणजे पोस्ट खात्यातील अधीक्षक माननीय द भि कुलकर्णी उपाख्य काका कुलकर्णी(वय ७५ वर्षे) हे होत. याप्रमाणे यात्रेला जाण्याचे निश्चित झाल्यानंतर तयारीला लागलो. मनामध्ये काही गोष्टी निश्चित केल्या.
१.एखाद दुसरे समविचारी सहप्रवासी सोबत घेणे
२. ही यात्रा तीनेक महिन्यात पूर्ण व्हावी.
३.मिलाल्यस लोहमार्गाची सवलत घ्यावी.
प्रयत्न करुनही आम्ही योजिलेल्या यात्रेची सवलतीची तिकिटे औरंगाबाद सोडेपर्यंत मिळाली नाहित म्हणून ती दिल्लीसच काढण्याचे ठरले.
४. सामानाचा फापटपसारा न वाढविता पाठीवर वाहून नेता येइल अशा पिशवीमध्ये आवश्यक तेवढे ते घेणे
५.यात्रेचे वेलापत्रक व घरच्यांची पत्रे यात्रेत मिळण्याकरता लागणारे पत्ते ठरवून टाकणे.(द्वारा : स्टेशनमास्त्र किंवा पोस्ट मास्तर अशा पत्त्यावर मागविल्यास
त्यांना भेटून पत्रे मिळवता येतात.)
६.यात्रेत खरेदी टाळणे.
७.रोख पैसे व प्रवासी चेक्स सुरक्षित राहण्यासाठी आतील चड्डीस आतून खिसे करुन घेणे.
८.यात्रेचा मार्ग, वापरायची वाहने,निवासाची जागा, प्रेक्षणीय स्थळे आणि दर्शनीय मंदिरे,त्यास लागणारा वेळ, त्यासाठी वापरावी लागणारी वाहने , भोजनाच्या वेळा,
प्रवासी चेक्स वठविण्याच्या वेळा वगैरे गोष्टी विचारात घेउन एक अंदाजे आराखडा करणे.
९. पंडे लोकांची मदत न घेता शक्यतो गुरुद्वारात उतरणे.

पाखरांनी झेपेसाठी फुफ्फुसे भरली. सिमेंटच्या पिंजर्‍यामधून उडाली आणि....

--मनोबा

field_vote: 
3.666665
Your rating: None Average: 3.7 (3 votes)

प्रतिक्रिया

वाह! मनोबा
ऐसीच्या फ्रिजमधे नेहमीपेक्षा वेगळी/नवीन भाजी किंवा फळ येणार असं दिसतेय.

ऐसी ला फ्रिज ची उपमा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाचतेय.
लेखाच्या शेवटी लेखकाचे नाव हवे होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ये ब्बात!

हिमालयाचं वर्णन बहुदा "नगाधिराज" असं असावं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

टंकून देण्याची मदत करून ऐसीच्या वाचकांनाही वेगळ्या प्रवासाचं वर्णन वाचण्याची संधी दिल्याबद्दल मनोबाला धन्यवाद.

तीन दशकांपूर्वी प्रवास करणं आतापेक्षा किती वेगळं होतं याच्या काही झलकी दिसत आहेत. विशेषतः प्रवासात असताना घरच्यांनी संपर्क ठेवण्याचा मार्ग म्हणजे स्टेशनमास्तर किंवा पोस्टमास्टरकडे पत्रं पाठवणं हे आता सेलफोनच्या जमान्यात फारच विचित्र वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

समविचारी सहचराचा काँसेप्ट रोचक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

साधारण ह्या लेखातील काळाच्या सुमाराला १९७४ साली आम्ही दोघे दिल्लीतील करोलबागेत 'पणिक्कर ट्रॅवल्स' नावाच्या व्यावसायिकाच्या माध्यमामधून बद्री-केदारची १० दिवसांची सफर केली होती त्याची आठवण झाली. सर्व प्रकार खाजगी असल्याने सोयी अगदी मर्यादित होत्या अणि तसेहि हरिद्वार सोडले की सर्व अति-प्राथमिक स्वरूपाचे होते. तपशील असे:

हरिद्वारपर्यंत सार्वजनिक वाहन. तेथे पणिक्करने एक खाजगी बस ठरवली होती. त्या बसने रोज एक टप्पा प्रवास. रस्ते एकमार्गी, अतिअरुंद आणि वळणावळणांचे त्यामुळे अपघाताची सारखी भीति. तात्री प्रवास प्रतिषिद्ध. (मधून मधून रस्ता खचल्याने दरीच्या कडेवर जाऊन ड्रायवर गाडी चालवीत असे.) संध्याकाळी मिळेल त्या गावी पणिक्करच्या माणसाने ठरविलेल्या एका खोलीत आपापल्या बिस्तर्‍यावर मुक्काम. गावातील टपरीवर मिळेल ते जेवण - बहुधा दाल-चावल किंवा पुरी-बटाटयाची भाजी. सकाळी जवळच्या नाल्यावर एका दिशेस पुरुष आणि दुसरीकडे स्त्रिया. ह्याला काहीहि पर्याय नव्हता कारण त्या कुग्रामांमधून कसलीच हॉटेले वा टूरिस्टांची सोय नव्हती.

बद्रीनाथला बसनेच गेलो पण केदारनाथला गौरीकुंडापासून एक दिवसाची चाल.

इतक्या गैरसोयी सहन करूनहि हिमालयाचे दर्शन घडल्याचा आनंद पुरेपूर उपभोगला हे सांगणे नलगे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रोचक! पुढील भाग वाचण्यास उत्सुक आहे. पटापट येऊदेत. लोकांनी वर म्हटल्याप्रमाणे लेखकाचे खरे नाव येऊदेत. स्वसंपादनाची सोय असल्याने ते करता यावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

उत्तम उपक्रम. शेवटी लेखकाचे नाव दर लेखाला दिलेस तर अधिक उत्तम

१९९० च्या दशकापासून मी ही वेगवेगळ्या ट्रीप्सच्या प्लानिंगमध्ये विविध भुमिका निभावत आलो आहे. वरील तयारीची यादी वाचुन मला त्याचीच आठवण झाली. ९०च्या दशकांत टेलिफोन असल्याने (गल्लीत एकाकडेच असला तरी होता, शिवाय एस्टीडी बुथ्स असायचे) पत्रांचा प्रश्न आला नाही. मात्र काही तत्पर प्रसंगी तार पाठवायची झाल्यास आम्ही ज्या धर्मशाळांत उतरायचो त्याची यादी घरी दिलेली असायची (अजूनही ही खोड गेलेली नाही. जिथे जातोय त्या प्रत्येक हॉटेलचे फोन नंबर घरी देऊन ठेवलेले असतात)

यात्रेचा मार्ग, वापरायची वाहने,निवासाची जागा, प्रेक्षणीय स्थळे आणि दर्शनीय मंदिरे,त्यास लागणारा वेळ, त्यासाठी वापरावी लागणारी वाहने , भोजनाच्या वेळा,
प्रवासी चेक्स वठविण्याच्या वेळा वगैरे गोष्टी विचारात घेउन एक अंदाजे आराखडा करणे.

काळाने यात मात्र फार बदल केलेला नाही, अपवाद प्रवासी चेक्सचा. आता ट्रॅवल कार्ड आल्यापासून ट्रॅवलर्स चेक्स आर सो आउटडेटेड यु नो Wink

पंडे लोकांची मदत न घेता शक्यतो गुरुद्वारात उतरणे.

उत्तर भारतातील बहुतांश ट्रीप्स आम्ही सुद्धा धर्मशाळांमध्ये वास्तव्य करून केल्या आहेत. ९०पर्यंत अत्यंत स्वच्छ असणार्‍या या धर्मशाळा २०१०मध्ये भयंकर झालेल्या पाहून मात्र अतिशय खेद वाटला होता.
बाकी उत्तरेलाच काय अगदी नाशिकसारख्या ठिकाणीही पंड्यांचा त्रास मात्र अजूनही कमी झालेला नाही Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

त्याचे आजोबा संघ परिवाराशी संबंधित सेवाकार्यात कार्यरत होते.

एक काळ असा होता कि संघाचं नाव घेणं देखिल माध्यमांत अपवित्र, लज्जास्पद मानलं जायचं. वाजपेयी, मोदी काँबोने संघाचं इंप्रेशन बदललं आहे. मला स्पष्ट आठवतं कि एका व्यक्तिची एका हिंदी चॅनेलवर मुलाखत चालली होती (२००५?). ती संघाची होती नि तिने बरंच चांगलं सामाजिक कार्य केलं होतं. मग तो माणूस वाक्यागणिक मला संघाने हे शिकवलं, संघात असं असतं, इ इ म्हणायचा नि त्याचा मुलाखतकार प्रचंड अवघडून जायचा. त्या माणसाने जितक्यांदा संघाचा उल्लेख केला ते पाहता एक प्रश्न तरी संघावर, त्याच्या संघाच्या संबंधांवर अपेक्षित वाटावा. पण छ्या.
मोदी पंतप्रधान बनले नि ३-४ चॅनेलांनी संघशक्ती म्हणून संघाबद्दल तासभराचे शो दाखवले. त्यात सुर इतका प्रो-संघ होता कि खरे वाटेना.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मोदी पंतप्रधान बनले नि ३-४ चॅनेलांनी संघशक्ती म्हणून संघाबद्दल तासभराचे शो दाखवले. त्यात सुर इतका प्रो-संघ होता कि खरे वाटेना.

हा शो मी पाहिला नाही, परंतु यासम अनेक गोष्टी वर्तमानपत्रांत वाचल्या आहेत. खरेच विश्वास बसत नाही, संघ अन संघोट्यांना इतके चांगले दिवस कसे काय आले? काहीतरी चुकल्याचुकल्यासारखं वाटतं खरंच. संघ म्ह. काहीही असला प्रत्यक्षात तरी मीडियात टेररिस्ट संघटना म्हणूनच प्रोजेक्टेड आहे त्यामुळे आश्चर्याचा धक्का वगैरे बसला. त्यातून अजून सावरलेलो नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मस्त आहे उपक्रम. टंकनात माझी काही मदत हवी असल्यास मागणे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

पुढचा भाग कधी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

सर्व वाचकांचे आभार.
पुढील अंक इथे आहे :-
http://www.aisiakshare.com/node/3023

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars