बोल अबोल हिमालयाचे --भाग २

पुस्तक प्रकाशित झाले असल्याने ही मालिका जालावर प्रकाशित करणं थांबवलं आहे.
मूळ लेखकाचे नावः- रघुनाथ विष्णू जोशी
मला केवळ आद्याक्षरे ठाउक होती. पूर्ण नाव मिळविण्यासआठी वेळ लागला. स्वारी.\

मागील अंक :-
http://www.aisiakshare.com/node/3013

आम्हांस पाहिजे होती त्या मार्गाची गोल यात्रेची तिकिटं दिल्लीस मिळाली. आणि पठाणकोटमार्गे ज्वालामुखीच्या मार्गाला लागलो. प्रदेश वनश्रीने नटलेला आहे. दूरवर हिम्शिखरे दिसतात. नवीन नवीन आकर्षक नैसर्गिक फुलांचे ताटवे इतस्ततः पसरलेले. मन मोहून टाकनारा प्रदेश व सावकाश जाणारी गाडी यामुळे प्रवास विशेष प्रसन्न.
ज्वालामुखीस रेल्वे स्थानकापासून बसने जावे लागते. अग्रवाल धर्मशाळा निवासास उत्तम. मंदिर मध्यम आकाराचे व अतिस्वच्छ. तेथे देवता अशी कोणतीच नाही तर एक मीटार लांबी रुंदी खोलीच्या यज्ञकुंडासारखा कुंड असून त्यात पश्चिम बाजूस अंगथ्याच्या आकाराच्या व वीतभर लांबीच्या दोन ज्वाला - ज्य्तोइ येत असतात. त्यांना वास नाही; धूर नाही. त्यांचा आकार अविरत तेवढाच असतो.
अशाच दोन ज्वाला ज्योति मंदिराच्या पाठभिंतीतून येत असतात. शिवाय मंदिरापासून पंधरा वीस मीटर अंतरावर पण जरा उंच जागी आणखी दोन ज्वाला-ज्योति आहेत. या सर्व ज्योतिंचे दर्शन घेउन प्रसन्नता प्राप्त होते. नाविन्याचे समाधान दाटते. हा नैसर्गिक भू-वायूचा प्रकार असावा.
दर्शन घेउन रात्री मुक्कामास जोगिंदर नगर गाठले. तेथे सनातन धर्म मंदिरात निवासास असताना शेजारी आठ दहा साधू होते. त्यांचा सर्व व्यवहार पहात असताना तो त्यांचा धंदा आहे आणि त्याचे भांडवल म्हणूनच भगवी वस्त्रे व जटा हे आम्ही समजून चुकलो.कारण सर्व चर्चा ऐहिक विषयावरच होती.
वरील प्रकरनाचे नाव होते :- ज्वालामुखी
.
.
.
नवे प्रकरण सुरु :-
मनीकरण
जोगिंदरनगरहून मंडी -कुलू मार्गे मनालीस जात असताना कुलूच्या अलिकडे नऊ किमी अंतरावर "भूंतर" लागते. तेथे उतरून बियास पार करुन ३२ किमी असणार्‍या मनीकरणला पोचलो. सर्व बसमार्ग सुमारे चार मीटार रुंदिचा आणि पार्वती नदिच्या डाव्या काठाकाठाने.एका बाजूस खोल दरी तर दुसर्‍या बाजूस उंचच उंच पहाडी. रस्त्यावर गिट्टॅए पसरण्याचे व डांबरीकरणाचे काम चालू होते.मार्ग अरुम्द, प्रतिमार्ग शक्यच नाही, त्यातून मार्गावर गिट्टी,दगड्,विटा,मुरुम ,रेती,अ‍ॅस्फाल्टची टिपे, डिझेल रोलर्,ढकल गाड्या. एकंदरितच सर्च अडचणीच अडचणी. शिवाय वाहतूक चालू राहिलीच पाहिजे.कमाल आहे काम करणार्‍या लोकांची.
मनीकरणला पाच मजली सुरेख गुरुद्वारा असून शेकडो गरम पाण्याचे झरे तेथे आहेत्.पैकी काही सात आठ मीटार कारंजाप्रमाणे उंच उडणारे.
पाणी तर उकळतेच म्हणा ना. गुरुद्वाराजवळील अशाच एका अति गरम पाण्याच्या झोतावर आडवा पत्रा बसवून त्यावर गुरुद्वार लंगरच्या रोट्या भाजल्या जात होत्या. पाण्यास गंधकाचा अगर कसलाच वास नाही. निसर्ग्-नदी-परिसर, निवासाची व्यवस्था , गरम पाण्याचे स्नान, गुरुद्वारा,लंगर मधील चहा-नाश्ता ,भोजन व्यवस्था आणि व्यवस्थापकांचे आदरातिथ्य सर्व कसे एकाहून एक सरस. वर्णन करताना शब्द कमी पडावेत. येथील प्रधान वंदनीय श्री नारायण हरिबाबा जागतिक द्वितीय महायुद्धापासून येथे ठाण मांडून व कंबर बांधून काम करीत आहेत. त्यांचीच ही सर्व निर्मिती. या कर्मयोग्याचे दर्शन हा ही एक भाग्याचाच योग.

हे प्रकरण पुढील अंकात पूर्ण केले जाइल.

--मनोबा

field_vote: 
3.333335
Your rating: None Average: 3.3 (3 votes)

प्रतिक्रिया

छान. दोन्ही ठिकाणे बघितलेली आहेत. (१९९६/९७ मध्ये)
पैकी मणिकर्ण (मनीकरण) तेव्हाही वर्णन केल्याप्रमाणे चांगली व्यवस्था असलेले होते. कुंडातले पाणी मात्र अतिगरम असल्याने स्नान शक्य झाले नव्हते - त्यामुळेच ते स्वच्छही असावे बहुदा Wink
अर्थात तिथेही व्याप बराच वाढला आहे, आजुबाजुलाही बरीच वस्ती आहे. (माझ्या काकूचे वडील ६०च्या दशकांत गेले होते तेव्हा तिथे अगदी जुजबी वस्ती होती असे कळते)
आम्ही इथे तांदूळ रुमालात बांधून एका काठीच्या टोकाला लाऊन पाण्यात सोडले होते व ताजा भात केला होता Smile

ज्वालामुखीमात्र भाविकांचा बुज्बुजाट झाला होता.

वर्णन छान चालु आहे. वेळ लागला तरी चालेल पदरचा संक्षेप नको

आणि मुख्य म्हणजे शेवटी स्वतःच्या सहीऐवजी मुळ लेखकाचे नाव लिहावे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मूळ लेखकाचे नाव धाग्याच्या सुरुवातीलाच लिहीले आहे आता दुरुस्ती करुन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

सदर ठिकाणाचे मूळ नांव 'मणिकर्ण' असे आहे. इथे गुरुद्वारा प्रमाणेच राममंदिरही आहे.

पाण्यास गंधकाचा अगर कसलाच वास नाही.

मी या पाण्यात डुंबलो आहे आणि गंधकाचा वास त्याला येतो हे स्वानुभवावरुन सांगू शकतो.

लेखमाला उत्कंठेने वाचत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0