बंडू. दिगु नि डिंगडोंग महाराज

“काय, बंडू काय चाललय’? दिगुने बंडूला विचारले. दिगुला आपल्या घरी पाहून बंडू नेहमीप्रमाणे आनंदी झाला. दोघांच्या गप्पा सुरु झाल्या. हल्ली बंडूची तब्बेत ठीक नसते असे बंडूने दिगुला सांगितले. हल्ली बंडूला छातीत जळजळ होत असे . बंडूला डॉक्टरकडे जाने फारसे पसंद नसे तो शेजारच्या नाक्यावर असलेल्या वैद्य बुवांकडे जात असे. परंतु ते गावी गेले होते . दिगु त्याला म्हणाला, “बंडू, आपण डिंगडॉंग बाबाकडे जावू या का’?
‘अरे, असले कसले नाव त्यांचे’.
‘अरे, नावाशी काय घेणे आहे आपले काम झाल्याशी मतलब’.हल्ली आपल्या विभागात हे डिंगडोंग बाबा फारच फेमस आहेत. त्यांचे खरे नाव ‘दगडू’. एकदा त्यांना कसलातरी दृष्टांत झाले नि ते इकडे तिकडे न जाता सरळ फोरेनला गेले. तेथेच त्यांनी आपले नाव बदलून घेतले. फोरेनला त्यांनी इतके चमत्कार केले कि शेवटी ते लोकच त्यांना म्हणाले, महाराज तुमची खरी गरज भारतात आहे तुम्ही तिकडेच जा. मग आपली बहुमुल्य सेवा देण्यासाठी ते आपल्या इथे आलेत. त्यांच्या मठा बाहेर लिहिलेले आहे डिंगडोंग महाराज फोरेन रिटर्न’. ‘म्हणजे फोरेनहून रिटर्न पाठवलेले’ बंडू उद्गारला.

‘अरे, दिगु पण हे महाराज पावरफुल आहेत ना’?.

‘अरे, पावरफुल म्हणजे फुल्ल पावर. आपला नाक्यावरचा मारवाडी करोडीमल हा पण महाराजांचा भक्त आहे’.

‘काय, बोलतोस दिग्या, अरे त्याच्याकडे अफाट पैसा असेल. तो सुद्धा महाराजांचा भक्त मला तर हे डिंगडोंग महाराज बरेच पावरफुल दिसतायत’.
‘मग उगीच का एवढे लोक त्यांच्याकडे जातात. आपल्या गण्याला जो पोरगा झाला तो हि ह्या महाराजांच्या आशीर्वादाने. गण्याला पाच पोरी नि हा महाराजांच्या कृपेने झाला तो सहावा मुलगा. गण्या हा महाराजांचा निस्सीम भक्त त्याला तर खर पोरगाच पाहिजे होता पहिले पाच वेळा बाबांनी त्याला व्रत दिले ते चुकले त्यामुळे पाचही वेळा मुली झाल्या सहाव्या वेळी मात्र गण्याने व्रत बरोबर केले नि मुलगा झाला. चुकी महाराजांची नव्हती गण्याच आपला व्रत चुकवत बसला’.
‘अरे, बापरे ह्या महागाईच्या काळात सहा सहा पोर गण्याच काही खर नाही’ इति बंडू.

“अरे, महाराज त्याच्या पाठीशी आहे त्याला कसली चिंता”.

‘ पण मुलगा पाहिजे नि मुलगी पाहिजे हे कशाला? दोघेही सारखेच ना’इति बंडू.

“अरे ते खर पण हे गण्या म्हणजे उलट्या खोबनीचाच कुणाच ऐकेल तर शपथ. परवाच गण्याला मी विचारले गण्या सहा सहा पोर कसे रे सांभाळतोस तर गण्या बोलला ज्याने चोच दिली तो दाना हि देईल’.
‘वा, वा, किती सुंदर विचार आहेत रे गण्याचे बंडू उद्गारला. ‘पण, काय रे गण्या तुझ्याकडे कशाला आला होता?
’त्याच्या चौथ्या मुलीची शाळेची फी भरायची होती ना म्हणून आला होता पाचशे रुपये मागायला’.
’वा हे छान चोच ह्यांची नि दाने दुसर्यांकडे मागायचे.. इति बंडू..

दुसऱ्या दिवशी बंडू नि दिगूने डिंगडोंग महाराजांकडे जाण्याचे ठरवले. मठात महाराज आपल्या सेविकेशी गप्पा मारत होते दोन जन आपल्याच दिशेने येतात हे पाहून त्यांनी ध्यान लावले. दिगु नि बंडू जावून महाराजांपुढे बसले महाराज ध्यान लावून बसले होते. दोघे त्यांच्या पुढे बसून राहिले पाच मिनिटानंतर आक छी बंडू इतका जोरात शिंकला कि ध्यानाला बसलेले महाराज खडबडून जागे झाले. बंडू वरमला घाईघाईने आपले नाक हातानेच पुसून त्याने तोच हात महाराजांकडे मिळवण्यासाठी पुढे केला महाराजांनी त्याच्या हाताकडे दुर्लक्ष म्हणजे एकदमच दुर्लक्ष केले.
'बोल, वत्सा तुझी समस्या बोल'. महाराजांनी बंडूला विचारले. बंडूने आश्चर्याने दिगुकडे पाहिले महाराज आंतरज्ञानी आहेत असे दिगुने त्याला सांगितले होते. दिगुने दुसरीकडे तोंड फिरवले. बंडूने महाराजांना आपली समस्या सांगितली कि छातीत फार जळजळ होते.

महाराजांनी बंडूला सांगितले कि ‘तू डॉक्टरकडे न जाता माझ्याकडे आलास हि फार मोठी गोष्ट आहे. अरे विज्ञान जिथे संपते…..तेथे अध्यात्म सुरु होते’.. असे म्हणून महाराजांनी हातातल्या रिमोटने टीव्ही बंद केला.व आपल्या आपल्या उशा खालुन कुंकू काढले ते कुंकू बंडूच्या माथ्यावर लावून महाराज मनातल्या मनात काही मंत्र पुटपुटले नि म्हणाले, ‘जा, बंडू तुझी छातीतली जळजळ आता नष्ट होईल. तू आता इथून सरळ डॉक्टरकडे जा तो जे औषध देईल ते घे. त्या औषधाच्या प्रभावाने नव्हे तर ह्या कुंकवातून निघणार्या आध्यात्मिक प्रभावाने तू बरा होशील.अरे असे कुंकू लावून मी कित्येक जणांना व्याधीमुक्त केलेय. मला डिंगडोंग बाबाबरोबरच अनेक भक्त कुंकूवाले बाबा म्हणूनही ओळखतात. आता तुम्ही जा आणि हे लक्षात ठेवा विज्ञान संपते तेथे’............’अध्यात्म सुरु होते’ एकसुरात बंडू नि दिगू ओरडले.

महाराजांची वामकुक्षीची वेळ झाली होती बाहेर बराच उकाडा होता म्हणून महाराजांनी सेविकेला ए सी लावायला सांगितला नि ए सी च्या गार हवेत महाराज बघता बघता गार झोपून गेले. सेविकेने बंडूला सददान रिसेपशनिस्ट कडे द्यायला लावले.
‘सददान म्हणजे काय’? बंडूने विचारले.

सेविका म्हणाली,‘अहो, तुम्ही अध्यात्मिक क्षेत्रात नवे दिसताय. म्हणजे व्यावहारिक भाषेत म्हणायचे तर जुनिअर केजी मधेच आहात. महाराजांना शरण जा लवकरच पी.एच.डी व्हाल. अहो एखाद्याला दिले जाते ते साधे दान पण चांगल्या कार्याला, व्यक्तीला दिल्या जाणार्या दानाला सददान म्हणतात. काहींचे नुसते गुरु असतात काहींचे सदगुरू कळाले’.

बंडू रिसेपशनिस्ट कडे गेला तिने बंडू कडून १००० रुपये सददान म्हणून घेतले. १००० रुपयांचा आकडा एकूण बंडूच्या छातीतील जळजळ अजूनच वाढली. तो नि दिगु तेथून निघाले नि डॉक्टर कडे गेले गेले डॉक्टरने बंडूला सांगितले कि काही नाही साधी असिडिटी आहे बंडू ने दिगुकडे एक कटाक्ष टाकला दोघेही कुत्सितपणे हसले डॉक्टरला त्याची फी ३० रुपये देवून दोघे बाहेर निघाले. बंडू दिगुला म्हणाला,’बघितलास, दिगू हा डॉक्टर म्हणतोय साधी असिडिटी. ह्या असल्या डॉक्टरांना हटवून त्यांच्या जागी डिंगडोंग महाराजांसारखे लोक बसवलेना तर जनतेच आरोग्य ठीक राहील’.

बंडू घरी पोहोचला छातीत जळजळ जाणवतच होती त्याने पाकिटातून महाराजांनी दिलेलेल्या कुंकवाची पुडी काढली नि कपाळाला मधोमध लावली १५ मिनिटे झाली जळजळ काही कमी होईना तेव्हा त्याला आठवले अरेच्च्या आपण त्या डॉक्टर ने दिलेले औषध घेतलेच नाही तेव्हा त्याने डॉक्टर ने दिलेल्या गोळ्या घेतल्या.चार तासांच्या झोपेनंतर दिगुची छातीतली जळजळ पार निघून गेली.

बंडू जोशात म्हणाला “डिंगडोंग महाराज कि जय’! जिथे विज्ञान संपते….. तेथे अध्यात्म सुरु होते….

नि हे बोलून बंडू फ्रीज मधले थंडगार पाणी पिण्यासाठी स्वयंपाक घराकडे वळला.

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

छान. स्तुत्य प्रयत्न.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्तुत्य प्रयत्न. तिरकसपणा जरा जास्त उघड झाला आहे इतकंच. शेवटच्या प्रसंगात तो डॉक्टरची गोळी घेतो. तीन मिनिटांत काही परिणाम जाणवत नाही, मग तो कुंकू लावतो, आणि तीनचार तासात कुंकवाच्या प्रभावाने बरा होतो असं दाखवलं असतं तर अधिक मजेशीर वाटलं असतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0