महाराष्ट्रातील (तुमच्या परिसरातील) वनस्पती

वृक्षवल्ली आम्हा सोयरीं वनचरें ।
पक्षीही सुस्वरें आळविती ॥१॥

वनस्पती संवर्धन आणि संगोपनासाठी सर्वसामान्य ते वनस्पती तज्ञ यांच्या आपापसातील माहितीच्या सुविहीत देवाण घेवाणीस महत्व आहे. विवीध क्षेत्रातील ज्येष्ठ वनस्पती तज्ञांना मराठी संकेतस्थळे आणि मराठी विकिपीडियाच्या माध्यमातून परिसरातील वनस्पतींची सर्वसामान्य जनतेकडून आणि विद्यार्थ्यांकडून माहिती हवी असते आणि वनस्पती तज्ञ त्यांच्याकडची माहिती शेअर करण्यात ती मंडळी उत्सूक असतात असे आढळून येते.

मराठी विकिपीडियावर बरेच जण वनस्पती या विषयावर उत्साहाने काम करत असतात. विकिपीडिया:विकिप्रकल्प वनस्पती असे प्रकल्प पानही आहे. सर्वसामान्य वनस्पती प्रेमी आणि ज्येष्ठ वनस्पती अभ्यासक मंडळी रस दाखवताना विद्यार्थी खासकरून वनस्पतीशास्त्रातील विद्यार्थीवर्गाचा मात्र अबसेन्स जाणवतो असे का होत असावे ते समजत नाही.

एनी वे सर्वसामान्य वनस्पती प्रेमींनाही ऐसी अक्षरेच्या आणि विकिपीडिया:विकिप्रकल्प वनस्पतीच्या माध्यमातून माहितीची देवाण घेवाण केल्यास उपयूक्त ठरू शकते. (असे मलाच नव्हे वनस्पती क्षेत्रातील ज्येष्ठ तज्ञांनाही वाटते).

मराठी संकेतस्थळांवर अनेकजण स्वतंत्रपणे लिहितही असतील पण स्वतंत्रपणे लिहिले की माहिती कॉपीराईटेड होते संदर्भ देऊन लिहिण्याची सवयही आपल्याकडे कमी असल्याने विकिपीडिया लेखांपर्यंत माहिती पोहोचण्यास विलंब होतो. म्हणून हा धागा. तुम्हाला माहित असलेल्या वनस्पतींची माहिती द्या, अथवा अगदी तुम्हाला माहित नसलेल्या (तुमच्या परिसरातील) वनस्पतींची छायाचित्रे इथे टाकावीत आणि ज्यांना त्या वनस्पतींविषयी माहिती आहे ती द्यावी हेही चालेल.

*विकिपीडिया:विकिप्रकल्प वनस्पती अंतर्गत करावयाची कामे:

** येथे वनस्पती क्षेत्रातील शब्दार्थांची बरीच चर्चा झाली परंतु तिथे इंग्रजी शब्दार्थासाठी सुद्धा टाईप न करता आल्या मुळे तसेच चर्चा धाग्यांच्या विस्कळीत स्वरूपामुळे चर्चेतील उपयूक्त शब्दार्थ आणि माहिती वापस संकलीत करावयाचे राहून गेले आहे या कार्यात बायलॉजी विषयातील अभ्यासूंचे सहकार्य हवे आहे.

*** वनस्पती विषयक शब्दार्थ मराठी विक्शनरी प्रकल्पातून सुद्धा जोडता येतील.

** वनस्पती लेखातील जैविक वर्गीकरण नेमके कसे करावे ? मराठी विकिपीडिया लेख लेख लिहिण्यात सहभागी व्हा अथवा येथे चर्चा करा.

** तुमच्या परिसरातील वनस्पतींविषयी चर्चा करा. विकिपीडियावर वापरण्यासाठी विकिमीडिया कॉमन्स प्रकल्पातून वनस्पतींची, पाना, फुले, फळे, मुळे इत्यादी आपण स्वतः काढलेली छायाचित्रे कॉपीराईट फ्री स्वरूपात शेअर करा.

** मराठी विकिपीडियावरील वनस्पती विषयक लेखातील नवे बदल पहा आणि तपासा

इतरही गोष्टी या धाग्यावर प्रसंग परत्वे जोडता येतील. आपले या धाग्यावरील प्रतिसाद विकिप्रकल्पांमध्ये वापरले जाऊ शकणार असल्यामुळे प्रताधिकारमुक्त समजले जातील. (कृपया इतरांच्या माहितीचे कॉपीपेस्ट टाळून स्वतःच्या शब्दात लिहिलेली माहिती द्यावी)

field_vote: 
2.5
Your rating: None Average: 2.5 (2 votes)

प्रतिक्रिया

पुन्हा एकदा काय एक्सपेक्टेड आहे?
मला परिसरातील वनस्पती, पक्षी यांचे निरिक्षण करणे, त्यांच्या सायकल्सचे निरिक्षण करण्याची सवय आहे.

मात्र परिसरातील वनस्पती हा फार व्हेग टॉपिक झाला.

लहान वनस्पती, झुडूपे:
माझ्या परिसरात पावसाळात उगवणार्‍या आघाडा वगैरे दिसू लागला आहे. शिवाय रस्त्यावार गटाराच्या कडेला अनेक ठिकाणी ओवा दिसू लागला आहे.
झेंडू, तेरडा, गुलबक्षी आदी झुडपेही वेगात वाढत आहेत. लवकरच त्यांना भरपूर फुले धरतील.
दुर्वाही भरपूर दिसत आहेत
घायपात, हळद आदी पाती उगवली आहेत.
मश्रुम्स, शेवाळे, पावसाळी रानभाज्या जरा आडवाटेला गेलो की दिसताहेत.

मोठी झाडे:
आपटा, कांचन आदी झाडांना नवी पालवी फुटली आहे.
गुलमोहर, सोनमोहर, बहावा, जॅकरँडा, कडीपत्ता आदी झाडांचा बहर ओसरला आहे.
आंबे, जांभूळ यांचा सीझन संपला आहे मात्र नवी पालवी फुटल्याने ही झाडे अधिक छान दिसत आहेत
एकुणात सध्या फुलण्यापेक्षा, नवी पाने, फांद्या वगैरेच्या सहाय्याने मोठ्या झाडांचे वाढणे चालु आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

एवढ्यात धोत्राच्या फुलांना (datura flower) पण बहर आला आहे. रस्त्याच्या कडेला बरीच दिसून येतात, काळ्याकुट्ट अंधारात चांदण्यांसारखी चमकून नजरेला पडतात तेव्हा फारच मोहक दिसतात ही फुलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओके, चर्चेस व्यापक परिघ मिळाला तर अधिक प्रतिसाद येतील असा विचार होता, तो व्हेग झाला आहे या बद्दल सहमत. खरेतर वनस्पतींच्या जातीच्या जाती इतिहास जमा होऊ शकतात हि संभाव्यता लक्षात घेऊन महाराष्ट्र जनुक कोश हि संकल्पना डॉ. माधव गाडगीळ यांनी मांडली होती. जी वनस्पती तुमच्या परिसरात आहे पण कोणती आहे ते तुम्हाला माहित नाही त्यांची छायाचित्रे मिळवणे (विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष वनस्पतींची पाने फुले इत्यादी गोळा करून शाळेत जमा करणे) वनस्पतींचा परिचय असलेल्यांनी त्यां वनस्पतींची ओळख पटवणे, ज्या वनस्पतींची ओळख पटत नाही ती विषयातील तज्ञांकडे पाठवणे आणि मग त्यांचे संवर्धनाचे प्रयत्न इत्यादी डॉ. गाडगीळांना अपेक्षीत भाग. हि वनस्पतींची माहिती मराठी आंतरजालावर टाकणे आणि ओळख पटवणे यांत त्यांना मराठी आंतरजालावरील वनस्पती प्रेमींचा सहभाग अपेक्षीत असावा.

बॉटनी विभागातील इतरही प्राध्यापक आणि संशोधकांना त्यांचे संशोधन वापरले जावे जनतेला (विशेषतः मराठीतून) माहित व्हावे असून असते असे त्यांच्या आलेल्या इमेल्स वरून कळले होते फक्त जुन्या पिढ्यांना मराठी युनिकोड येत नाही आणि वनस्पती शास्त्रातील विद्यार्थ्यांना प्राध्यापक मंडळीनी आवाहन करूनही निरुत्साह दाखवतात अशी काहिशी समस्या असावी (हि आवाहने विकिपीडियन्सच्या सांगण्यावरून नव्हे ते स्वतःहून करतात) हा दुसरा भाग झाला.

मराठी विकिपीडियावर वनौषधी आणि आयुर्वेद संबंधी माहितीची वाचकांकडून मागणी असते. आणि शेती विषयक वनस्पतींची माहितीची ही मोठ्या प्रमाणावर गरज असते कारण मराठी विकिपीडियाचा मोठा वाचकवर्ग ग्रामीण आहे. शालेय विद्यार्थ्यांकडून पर्यावरण आणि वनस्पती हा विषय निबंध लेखनाच्या माहिती साठी हवा असतो. अर्थात लिहिणारे कमी आणि माहिती मागणारे जास्त अस हे सध्याच इक्वेशन आहे. म्हणून वनस्पतीं विषयी सर्व प्रकारचे (ललितेतर) लेखन/ माहिती हवी असते. ( संबंधीत वनस्पतींबद्दल ललित साहित्यातील उल्लेखांची माहिती वेगळ्या विभागात नोंदवता येते म्हणून तीही संदर्भा सहित मिळाल्यास चालू शकते)

एकुण विषयाचे सर्व निव्वळ चाहते, रोपवाटिका, बागकाम इत्यादींची आवड असणारे, पर्यावरणाची दखल घेणारी मंडळी, वनस्पतींवर उपजीविका करणारे शेतकरी आणि आदिवासी , वनस्पतींचा अभ्यास करणारे विद्यार्थी, त्या विषयाशी संबंधित शिक्षक आणि संशोधक वर्ग, आणि आयुर्वेदाशी निगडित व्यक्ती - या साऱ्यांना उपयूक्त होणारी माहिती चालू शकेल. पण एवढा व्यापक परिघ दिल्याने वाचक गोंधळत असतील तर एसीच्या वाचकांना आवडणार्‍या गोष्टी बद्दल वेगळे धागे काढण्यासही हरकत नाही.

धागा लेखात बदल केल्याने अधिक प्रतिसाद मिळत असतील तर तेही सूचवावेत तसे ते मी करेन अथवा संपादक म्हणून आपणही मोकळेपणाने करावेत. एकुण काय माहिती संकलन आणि जराशी आवडीचा विषय असणार्‍यांची आपापसातील रोचक चर्चा. जमलेच तर वनस्पती विषयावरील मराठी विकिपीडियावरील लेखांसाठी अधीक संपादक लेखक मिळवणे Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

माझ्या मनात नेहमी घोळणारा अजून एक वनस्पती विषयक एक वेगळा प्रश्न म्हणजे इतरत्रच्या मानवी आहारात समाविष्ट असलेल्या पण महाराष्ट्रीय आहारात नसलेल्या वनस्पती कोणत्या?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.