देणे - एक कला


देणे - एक कला...

देणे - एक कला...

अनेक गोष्टींच्या एकमेकातील व्यवहाराला एकत्रित नाव ‘देणे व दुसऱ्या बाजूने घेणे’ असे सामान्यपणे म्हणता येते.

देणे ही एक कला म्हणून पाहू जाता -

सल्ला प्रथम येतो. न मागता तो देणे ही घरच्यांची मेहेरबानी. तर सल्ला कला कला देता देता अशीलाचा खिसा रिता करायची कला वकील लोक जोपासतात. बायकोच्या भावाने दिलेला सल्ला मानभवीपणे ऐकून तो कटाक्षाने न पाळणे ही कला. सल्ल्याचे एक भाऊबंद - उपदेश. ती वरिष्ठांची जागीर, तो संतांची वचने, कवने, संस्कृत श्लोकातून खडाखड देता येणे ही कला.

दान देणे हे तर आजकालच्या प्रतिष्ठेचा मापदंड आहे. ज्यांनी आयुष्यभर धड कपडे नेसले नाहीत अशा औलियांच्या मूर्तींच्या अंगावर किलो किलोच्या दागदागिन्यांचा सोस मांडून आपल्या दानाचे अवास्तव दर्शन करवणे ही कला. या हाताचे त्या हाताला कळू न देणे म्हणजे विशुद्ध दान. पण ते अकला नसलेले कलाबाजच करतात.

हातापेक्षा पायांनी देणे ही कला जास्त प्राविण्याची. वरिष्ठांच्या पाठीवर पाय देताना त्यांच्या कलाने घ्यावे लागते. तेच गर्दभाच्या पाश्वभागी व बॉसच्या सामोरा उभे न राहण्याची कला खुबीने साध्य करावी लागते.

देणे फार काळ उधार राहिले तर नजर चुकवायला नव्या युक्त्या शोधणे ही कला. चोरून कान देणे ही माजघरातील कलहाची कला तर गुप्तहेरानी ती बिनबोभाटपार पाडणे ही चतुराईची कला. लेखी निरोप कमलदलावर देणे ही शकुंतलेची कला. मसालेदार बातमी देणे पत्रकारितेचे कलाकसब. सुंदर लकेरीला दाद देणे कला. कशालाही दाद न देणे निगरगट्टाचे लक्षण.

शिवी देणे ही एक पुढारलेली कला मानतात. सभ्यपणाच्या कक्षा ओलांडून जवळच्या नातेसंबंधांचे शिव शब्दोच्चार शिवी देऊन केलेले भावातिरेक विरेचन भाषावैभवाची कला दर्शवतात. जे मानसिक समाधान विपस्यना ध्यानानंतर मिळतेच असे नाही, ते शिवीतून खात्रीलायक मिळते. उच्च स्वरामुळे दरारा वाढतो तो वेगळाच.

जा म्हणायच्या आत निरोप देणे ही कला साध्य नाही केली तर सभास्थानी निरोपाच्या चिठ्ठ्या येऊ लागतात. वेळीच दवापाणी नाही केले तर जगाचा निरोप अवेळी द्यायची संधी प्राप्त होते.

अशी ही देता देता न संपणारी कला.

field_vote: 
2.8
Your rating: None Average: 2.8 (5 votes)

प्रतिक्रिया

देणार्‍याने देत जावे, घेणार्‍याने घेत जावे,
घेणार्‍याने घेता घेता, देणार्‍याचे हात घ्यावे!!!
_____

जपजी साहीबमध्ये ओळी ऐकलेल्या नीट उच्चार माहीत नाहीत.
देंदा देवेंदे थक पाहे, जुगा जुगान्तर खाही खाह,
हुक्मे, हुक्म चलाए रा!!!

काहीशा अशा त्याओळींचा अर्थ आहे की - दाता देत जातो अन घेणारा घेऊन घेऊन थकतो पण देणारा थकत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile
अजून विस्तार करता आला असता. हे ही मजेशीर आहेच.

ऐसीवरच या देण्यामध्ये "श्रेणी देणे" याचा सुद्धा एक कला म्हणून वापर व्हायला हवा. (खरंतर मिळाल्यल्या श्रेण्यांपासून बोध घेणे हा सुद्धा)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

श्रेणी देणार्‍यांचे मत काय आहे ते तेवढे कळते तिथून. त्यापासून बोध आणि कसला व कशासाठी घ्यायचा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धाग्याचे शीर्षक बदलता येइल काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

खरं. वरून तमाशा आतून किर्तन वाटतय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

आता लवकरच आतही अवांतराचा तमाशा सुरू होईलच मग अंतर्बाह्य एकसारखा होईल धागा! कल्जी नको!

बाकी, मला तरी शीर्षक अगदी योग्य वाटले. काय चुकीचे आहे शीर्षकात?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मौज वाटली पण मजा नाही आली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0