पुस्तक परिचय – विज्ञानाच्या दृष्टीकोनातून चार्वाकवाद आणि अध्यात्म


पुस्तक परिचय – विज्ञानाच्या दृष्टीकोनातून चार्वाकवाद आणि अध्यात्म

फोटोत डावी कडून श्री. श्री श्री भट, शशिकांत ओक, डॉ. प.वि. वर्तक आणि धनुर्धारीचे संपादक-मालक श्री सापळे

लेखक– प्राचार्य (नि) अद्वयानंद गळतगे. मोबाईल क्रमांक –०9902002585

वेदान्तविवेक प्रकाशन. भोज, जि. बेळगाव कर्नाटक.591263. पाने- 156. किंमत – रु. 150/-.

हे पुस्तक पुर्वीविविध नियतकालिकातून प्रसिद्ध झालेल्या लेखाचा संग्रह आहे. लेखांचे विषय वेगवेगळेअसले तरी सर्वांचे सूत्र विज्ञान हेच आहे. अध्यात्मात विज्ञान कुठे आले? असा काही जणांना प्रश्न पडेल. विज्ञानम्हणजे पाश्चात्यांचे आधुनिक भौतिक विज्ञान अशी अनेकांची समजूत आहे. पण वस्तुतःसत्यशोधनाच्या पद्धतीला विज्ञान असे म्हणतात. या अर्थाने विज्ञान शब्द आपल्या प्राचीनऋषिमुनींनी उपनिषदातून फार पुर्वीचा वापरला आहे. अतींद्रिय सत्य बुद्ध्यातीतअसूनही भौतिक विज्ञानाने त्याचे ज्ञान बुद्धिला (तात्विक व अप्रत्यक्ष रीतीने काहोईना) होते, म्हणून भौतिक जगाचा वैज्ञानिक अभ्यास (भौतिक संशोधन) हा अध्यात्मिकसत्याच्या अनुभवासाठी आवश्यक आहे असे प्राचार्य अद्वयानंद गळतगे यांचे या पुस्तकातूनप्रतिपादन आहे. त्यांचे सर्व लेख अशा संगतवारीने आहेत की ते पुस्तकाच्या शीर्षकालान्याय देतात.

या सुसंगत संकलनातलेखकाचा अप्रतिहत सर्वांगिण व्यासंग व भाषेवरील प्रभूत्व, सुक्ष्म व सखोल चिंतनथक्क करणारे आहे. विशिष्ट हेतू मनांत ठेऊन लेखन करणाऱ्या पुरोगामी विचारवंतांनागीतेसारख्या ग्रंथांचे विकृतीकरण केल्याशिवाय ‘स्ववैशिष्ठ्यवादी’म्हणून सन्मान मिळत नाही. अशांचाखरपुस समाचार लेखकाने घेतला आहे.

चार्वाकवादावर लेखनकरताना ते म्हणतात, चार्वाकांच्या प्रत्यक्ष प्रामाणवादचे तत्व (जेथे धूर आहे तेथेअग्नी आहे हे अनुमानाने सिद्ध होत नाही. अग्नीचे अस्तित्व केवळ प्रत्यक्षाने सिद्धहोते.) स्वीकारणे विज्ञानाला अशक्य आहे. कारण विज्ञानाचा जन्मच अनुमानातून झालाआहे. तर चार्वाक त्या अनुमानालाच ठोकरून देतात.

चार्वाकांचादेहात्मवाद (आत्मा किंवा जीव म्हणून देहाव्यतिरिक्त काही नाही ) हा आधुनिक भाषेतीलयंत्रवाद होय. तो कसा भ्रामक व चुकीचा आहे ते प्रथम प्रकरणात त्यांनी अनेकउदाहरणांनी दाखवून देतात. त्यामुळे चार्वाकांचा सुखवाद (देहाचे सुख तेच खरे सुख) व्यावहारिकतेच्याकसोटीवरही टिकू शकत नाही. माणूस केवळ घृत (अन्न) आणि अंगनालिंगन (मैथुन) एवढ्याचसाठीजगतो हे खरे नाही. कारण तेवढे सुख मिळाल्यावर तो सुखी होताना दिसत नाही. बुद्धी,विवेकशक्ती, भाषा यांचे मानवी जीवनात कार्य काय? शरीरसुखासाठी त्यांची गरज आहे काय? असा प्रश्न करून निसर्गाला ही चार्वाकवाद मान्य आहे काय? असे ते विचारतात.

प्रकरण 2 मधे प्राचार्य अद्वयानंद गळतगे यांनीप्रामाण्यवादाच्या पुरस्कर्त्यांना इशारा दिला आहे. सत्य जाणण्याचे अंतिम प्रमाण भौतिकनसून आत्मिक (अनुभाविक) आहे. त्यासाठी भौतिक प्रमाणवाद टाकून अनुभवप्रमाणवादी बनणेआवश्यक आहे. नेमके तेच कथन क्वांटम सिद्धांतात ‘परस्पर विरोध’(पॅरॉडॉक्सिकल) रुपाने, तर अध्यात्मशास्त्रात ‘सदसद्विलक्षण’रुपाने सांगितला जातो असे ते म्हणतात.

प्रकरण 3 मधे ‘जीवोत्पत्ती हे रुढ जीवशास्त्राला नसुटलेले कोडे’ यात ते म्हणतात, ‘जीव हा तुकड्यांनी बनलेला नाही तरमाहितीने बनला आहे. योगायोगाने नव्हे तर नियमानुसार निर्माण झाला आहे. अपघाताने नव्हेतर स्वाभाविकपणे बनला आहे असे संगणकयंत्राने गणितीय नियमांनी दाखवून दिले आहे.मात्र अडचणीची समस्या सोडवण्यासाठी काही शास्त्रज्ञ ती समस्या टाळण्याचा किंवा नसल्याचाप्रयत्न करताना दिसतात.’तो कसा खोटा आहे हे लेखकाने सप्रमाण दाखवून दिले आहे.

प्रकरण 4 ‘प्लँचेट’ या रंगतदार विषयाला वाहिलेले आहे. त्याचे नियम, विलक्षण अनुभव, पाश्चात्यांनीत्यावर केलेले प्रयोग सर्व माहिती नवी आहे. प्लँचेट करून मिळणारी उत्तरे कोण देतो? यावर त्यांचे मत मोलाचे आहे. ते म्हणतातकी मानवी मनाच्या अतींद्रिय शक्तीचे ते रुप आहे.

प्रकरण 5 ज्योतिषशास्त्रातील ग्रह मानवावर प्रभाव पाडतात काय? यावर प्रश्नावर आधारित आहे. त्यांना तो प्रभाव हा एका व्यवस्थेचा भागम्हणून मान्य आहे. त्यात नाडी ग्रंथांवर भाष्य करताना ते म्हणतात. ‘फलज्योतिष हे कुंडलीवरून वर्तवलेले भविष्यअसते. याच्या उलट नाडीग्रंथ भविष्य हे कुंडलीचेच भविष्य असते. म्हणजेच एखाद्याव्यक्तिचे भविष्य वर्तवण्य़ासाठी तिच्या कुंडलीची आवश्यकता नाडीग्रंथाला मुळीच नाही,कारण तिच्या कुंडलीचे भविष्यच नाडीग्रंथ वर्तवतात. त्यांनी यावरून असा निश्कर्षकाढला आहे की कुंडली किंवा ग्रह व त्या ग्रहस्थितीप्रमाणे जन्म घेणारी व्यक्तीम्हणजेच मानवी जीवन व ग्रहांची भ्रमणे ही दोन्ही एकाच व्यवस्थेने निश्चित होत असतात.म्हणजेच ती एकाच व्यवस्थेचे अंग असतात व मानवावर ग्रहा-नक्षत्रांचा परिणाम होतो काय? ही जटिल समस्या जटिल तर नाहीच पणसमस्याही राहात नाही.

प्रकरण 6 संतसाहित्यातूनअंधश्रद्धा निर्मूलन कसे केले आहे?यावर प्रकाश पाडणारे आहे. मात्र संतांचे अंधश्रद्धा निर्मूलन व्यावहारिक पातळीवरील असून ते बेगडी, तोंडदेखले व निरीश्वरवादी लोकांनी ठरवलेल्या साच्याचे नाही. असेत्यांनी विविध संतवचनांची वचने देऊन ठासून सांगितले आहे. या प्रकरणात डॉ. नी.र. वऱ्हाडपांडेनिर्मित संताच्या ‘चमत्कारवादातील’ भ्रामक कथनातून त्यांनीवाचकांची दुहेरी वैचारिक फसवणूक कशी केली आहे याची चिरफाड केली आहे. ‘संतांची इच्छा असेल तेंव्हा संतांनाचमत्कार करता येतात’हे डॉ. वऱ्हाडपांड्यांचे कथन खोटे आहे. हे प्राचार्य अद्वयानंद गळतगे त्यांनी, ‘संतांच्या जीवनात चमत्कार आपोआप घडतात. ते त्यांच्या इच्छेवर अवलंबूननाहीत. ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली, रेड्यामुखी वेद बोलविले ते संत म्हणून नाही तरयोगी म्हणून आणि योग हे भौतिक शास्त्राप्रमाणेच एक काटेकोर शास्त्र आहे’, असे प्रतिपादन केले आहे.

प्रकरणे 7 ते 10 मधूनप्राचार्य अद्वयानंद गळतगे यांनीं काही विवेकवादी लेखकांनी भगवद्गीतेतील कथनांना ‘समस्या’ ठरवून वाद उकरण्याचा प्रयत्न केला आहे, त्यावर आधारित आहेत. त्यातील प्रकरण 7 मधे ज्ञानेश्वरीतील ‘विश्वोपत्तीच्या’ निरुपणावर प्राचार्य अद्वयानंद गळतगे यांनी वैज्ञानिक दृष्ट्या प्रकाशटाकला आहे. तर प्रकरण 8 मधे गीतेतील नवव्या अध्यायासंदर्भात ज्ञानेश्वरांनी (काहीही)‘न करता भजन जाहले’ म्हटले आहे, त्याचा मतितार्थ कसा लावावाकिंवा कसा लावू नये?याचा वस्तुपाठ आहे. ते म्हणतात, ‘प्रत्येककर्म परमेश्वराप्रित्यर्थच आहे हे जो ‘जाणतो’ किंवा असे जाणून प्रत्येक कर्म करतो तो परमेश्वराचे भजनच करतो. कारणत्याच्या त्या ‘जाणण्यामुळे’ ते कर्म परमेश्वरालाच पोहोचते. पण हे जोजाणत नाही त्या अज्ञानी मुर्खाच्या हातून हे परमेश्वराचे सहज (न करता) होणारे भजनघडत नाही’.

प्रकरण 9 मधे ‘गीतेत निष्काम कर्मयोग नाही?, गीता नीतिशास्त्रावरील ग्रंथ आहे काय?, आत्मा हा डब्यातील लाडवा प्रमाणे आहे कीढगातील वाफेप्रमाणे असावा?,गीता कथनाला युद्धभूमि योग्य किंवा अयोग्य?, विश्वरुपदर्शन हा काय प्रकार असावा? आदि प्रश्नांची उकल करून त्यातील वैचारिकफोलपणा उकलून दाखवला आहे. प्रकरण 10 मधे ‘गीतेचे अधिकारी कोण?असा नेहमी विचारला जाणारा प्रश्न उत्पन्न केला आहे. त्यावर समर्पक उत्तर देतानाप्राचार्य अद्वयानंद गळतगे ज्ञानेश्वरांच्या ओवीचा दृष्टांत देताना म्हणतात, ‘तैसे अध्यात्मशास्त्री इये। एक अंतरंगचि अधिकारिये। येर वाक् चातुर्ये। होईलसुखिया।। म्हणजे एक अंतरंगी व्यक्तीच गीतेची अधिकारीआहे. बाकीचे (येर) बहिरंग गोष्टींमुळे सुखी होतात. ते कसे? तर- वधूची आई वरात श्रीमंतीपहाते, बाप वरात शिक्षण पहातो, भाऊबंद वरात जात पहातात, इतर लोक वराचे मिष्टान्नपाहून खुष होततात. असा रीतीने इतर लोक अवांतर गोष्टीं पसंत करतात. एकटी वधूच वराला‘वर’ म्हणून निवडते, पसंत करते. म्हणजेच ‘जन्माचासोबती’ म्हणून निवडते.म्हणून तिचा एकटीचाच वरावर ‘अधिकारचालतो’. इतर कुणाचाच नाही. गीतेच्या अधिकारीव्यक्तिबद्दलही तसेच आहे. कारण त्याला गीता ही जन्माची सोबती (जीवनाचार) म्हणूननिवडाची असते.

प्रकरण 11 हे या पुस्तकाचा मुकुटमणी आहे. ‘अष्टावक्र गीता अर्थात कैवल अदैत वेदांत - म्हणजे काय?’ राजा जनकाला आठ ठिकाणी वाकलेल्या योग्याने केलेला उपदेश व श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेला उपदेश यातील तुलना, केवल वेदांतातील ‘दृष्टीसृष्टीवाद’ तो काय? मुक्त पुरुष जगात कसा वावरतो? दृष्य़ जग व देह हे खोटे कसे ? यावरील त्यांचे वैज्ञानिकदृष्टिकोनातून केलेले विवेचन रंजक आहे. अनेक उपनिषदांचे, संतांचे व पाश्चात्यविचारकांचे संदर्भ देण्याची त्यांची हातोटी विलक्षण आहे. त्यांच्या लेखनातून प्राचार्यअद्वयानंद गळतगे हे ज्ञानी व्यक्तिमत्व ‘स्वानुभवविश्वाचे माणिक-मौत्तिकांचे आगर’ आहेत असे जाणवते.

पुस्तक बुकगंगा.कॉम वर उपलब्ध

संकलक - शशिकांत ओक.

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
2.333335
Your rating: None Average: 2.3 (3 votes)

प्रतिक्रिया

उत्तम पुस्तकपरिचय. परिचय वाचून पुस्तक "विज्ञान आणी बुद्धिवाद" या त्यांच्या दुसर्‍या पुस्तकाप्रमाणेच असावे असा अंदाज आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अपरिमेय जी,
आपण विज्ञान आणि बुद्धिवाद पुस्तक वाचले आहेत असे दिसते. त्यांचा विज्ञान आणि चमत्कार ग्रंथ वाचलात काय नसेल तर जरूर वाचा. त्या ग्रंथाचा ही परिचय काही काळानंतर करून देता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'विज्ञान आणि चमत्कार' हे पुस्तकसुद्धा वाचले आहे. ते आणी 'विज्ञान आणि बुद्धिवाद' यांचा आशय आणी विषयाची केलेली मांडणी जवळपास सारखी वाटली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वि आणि च मधे आधीच्या वि आणि अंनि, बुद्धिवाद मधे नमूद केलेल्या घटनांच्या कार्यकारण भावाची उकल केली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शशिकांतजी, विज्ञानवाद्याने सवत्याने आपले मत मांडणे वेगळे, अध्यात्मवाद्याने पुन्हा सवत्याने मत मांडणे वेगळे, दोहोंची जी आपलीच री ओढण्याची पद्धत आहे ती एकसुरी होते. असा कोणता ग्रंथ आहे का जिथे प्रख्यात (शिवाय संतुलित) अध्यात्मवाद्यात नि प्रख्यात (शिवाय संतुलित) विज्ञानवाद्यात चर्चा झाली आहे नि १. पैकी एकाने माघार घेतली आहे. २. पैकी एकाने आपली भूमिका बरीच बदलली आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मित्रा,

अध्यात्म व विज्ञान यांनी एकत्र येऊन अभ्यास करायला प्रवृत्त व्हावे असा परस्पर समावेशक विचार करता येऊ शकतो. सध्या सर्वांना नाही जमले तरी काही विचारकांच्या समोर ही परिस्थिती बदलाच्यासाठी प्रयत्न करावेत असे वाटत असेल. काही जण ते करत असतील.

क्वांटम सिद्धांताबाबत अनेक विज्ञानवाद्यांमधे तट पडून सुरवातीला बरेच आढेवेढे घेऊन नंतर वस्तूस्थितीला मान्य केले तसे काहीसे याबाबत घडले तर नवल नाही कदाचित त्याला अजून काळ लागेल असे वाटते. हार व जीत या पारड्यात न घालता आपण पाहायला शिकले पाहिजे असे प्रतिपादन प्रा. गळतगे करतात.

प्रा. गळतगे यांच्या लिखाणाचा कल अशी भूमिका घ्यायला भारतीयांचे तत्वज्ञान वाचावे व त्यातून वैचारिक बैठक तयार व्हावी असा आहे. पण तशी परिस्थिती येईपर्यंत विज्ञान व अध्यात्म एकमेकांविरूद्ध उभे करून पाहिले जाणे अपरिहार्य असावे.

तोवर एकमेकांचे विचार समजून घ्यायला काय हरकत आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण तशी परिस्थिती येईपर्यंत विज्ञान व अध्यात्म एकमेकांविरूद्ध उभे करून पाहिले जाणे अपरिहार्य असावे. तोवर एकमेकांचे विचार समजून घ्यायला काय हरकत आहे?

साधारणतः ईश्वरवादी, धर्मवादी व अध्यात्मवादी हे विज्ञानाकडे आदराने पाहतात. ते त्यांना तसे पाहावेच लागते कारण विज्ञानाचा जगावर झालेला परिणाम कोणी नाकारू शकत नाही. विज्ञान हे जिथे पटेल असे स्पष्टीकरण देण्यास असमर्थ आहे असे त्यांना वाटते तिथे हे लोक ईश्वर, धर्म, अध्यात्म आदिंचा आश्रय घेतात. याच्या फार उलट केस विज्ञानवाद्यांची आहे. त्यांना जवळजवळ सर्व वैश्विक सत्ये माहित झाली आहेत असा त्यांचा भाव असतो. ते ज्या पद्धतीने अध्यात्मवाद्यांना तुच्छ लेखतात ते जवळजवळ असभ्यच असतं.

आता या अशा मोठ्या नि विद्वान लोकांतले हे दोन प्रवाह काय करतात हे तितकेसे महत्त्वाचे नाही. परंतु जोपर्यंत समाजाचा प्रश्न आहे तोपर्यंत त्यांचेतील संवादाला प्रचंड महत्त्व आहे. सामान्य समाजाचा फार मोठा घटक एक तर धर्म नि अध्यात्म त्यागत आहे वा किमान त्यापासून दूर होत आहे. अध्यात्मातलं क्लिष्टतम ज्ञान सत्य असेल वा नसेल पण ईश्वरप्रणित, धर्मप्रणित जीवनसंस्था ज्या मूल्यांचा हिरीरीने पुरस्कार करते त्या सगळ्या मूल्यांवर विज्ञान शांत आहे. येथपर्यंत ही ठिक आहे. पण यापुढे जाऊन विज्ञान या मूल्यांवर प्रश्नचिन्ह उभे करते. आता कशावरही प्रश्नचिन्ह उभे करणे हे विज्ञानाचे कामच आहे. पण "मूल्यांचे मानवी जीवनातील स्थान" हा "विज्ञानाच्या प्रयोगशाळेतील प्रश्न" असला पाहिजे. रस्त्यावरच्या कच्च्या मडक्यांच्या चर्चेत हे प्रश्न थेट उत्तर काढण्यासाठी वापरले जाऊ नयेत. कारण वि़ज्ञान हाच शुद्ध आधार मानला तर कोणतेही सन्मूल्य बाळगण्याचे काही कारण आढळत नाही. आजघडीला केवळ पारंपारिकतेचा प्रचंड प्रभाव आहे म्हणून लोक बाय डिफॉल्ट मूल्याशिष्ठित वर्तन करताना. पण २-३ पिढ्यातच कोणत्याच मूल्याला काहीच आधार, अर्थ उरणार नाही.

आज दुर्दैवाने विज्ञान वा अध्यात्माची एकच केंद्रिय बॉडी नाही. म्हणून संभ्रम प्रचंड आहे. किमान आजतरी विज्ञानाचा रोल पदार्थजीवन समृद्ध करणे नि अध्यात्माचा रोल चांगल्या मानवी मूल्यांचे रोपण करून जीवनाला सार्थता देणे असा असायला हवा. यात थोडाफार ओवरलॅप झाला तर हरकत नाही. (त्यांच्या त्यांच्या प्रयोगशाळांत त्यांनी परस्परांच्या विषयांत कितीही हस्तक्षेप केला तरी काही हरकत नसावी.)

एकमेकांची भूमिका समजून घ्यावी असे आपण म्हणताहात खरे, परंतु सामाजिक मूल्यांचे संगोपन ही जबाबदारी धर्मसंस्थेची आहे. वि़ज्ञानाची ही एक तर जबाबदारी नाही, उलट ती पार पाडण्यात ते एक उपद्रवी घटक आहे. विज्ञान जसजसा एकेक नवनविन शोध लावतं तसतसं ते कितीतरी मूल्यं प्रत्यक्षाप्रत्यक्षपणे ढवळून काढतं. म्हणून संवादाची जबाबदारी धर्मवाद्यांची आहे. शिवाय धर्म, अध्यात्म, ईश्वरसंबंधित श्रद्धा या संकुचित अस्मितांचे विषय नसावेत. भविष्यात कधी मूल्यसंस्था कशी असावी हे सांगण्याची क्षमता विज्ञानात येऊ शकते. त्यावेळी प्रांजळ हस्तांतरण करावे. पण त्यापूर्वीच खूप मोठा शिक्षित, विचारी, स्वतंत्र असा प्रचंड मोठा जगातला मध्यमवर्ग भलत्याच मूल्यांच्या आहारी गेला तर ईतक्या खोलात जाऊन अभ्यासलेल्या अध्यात्माच्या शाखेचा, तिच्या उदात्त प्रणेत्यांचा तो पराभव असेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

विज्ञान वा अध्यात्माची एकच केंद्रिय बॉडी नाही. म्हणून संभ्रम प्रचंड आहे.

या मताशी सहमत...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण तशी परिस्थिती येईपर्यंत विज्ञान व अध्यात्म एकमेकांविरूद्ध उभे करून पाहिले जाणे अपरिहार्य असावे. तोवर एकमेकांचे विचार समजून घ्यायला काय हरकत आहे?

साधारणतः ईश्वरवादी, धर्मवादी व अध्यात्मवादी लोक विज्ञानाकडे आदराने पाहतात. त्यांना आदराने पाहावेच लागते कारण विज्ञानाचा जगावर झालेला परिणाम कोणी नाकारू शकत नाही. तो फार उघड आहे. मात्र विज्ञान हे जिथे पटेल असे स्पष्टीकरण देण्यास असमर्थ आहे असे त्यांना वाटते तिथे हे लोक ईश्वर, धर्म, अध्यात्म आदिंचा आश्रय घेतात. याच्या फार उलट केस विज्ञानवाद्यांची आहे. त्यांना जवळजवळ सर्व वैश्विक सत्ये माहित झाली आहेत असा त्यांचा भाव असतो. ते ज्या पद्धतीने अध्यात्मवाद्यांना तुच्छ लेखतात ते जवळजवळ असभ्यच असतं. आम्हाला जे माहित नाही त्याबद्दल अन्य विचारसरणींची काय मते आहेत त्यांना आमच्या दृष्टीने काही महत्त्व नाही असा त्यांचा पावित्रा असतो. एखाद्या बाबीवर आम्ही जितके कष्ट घेतो नि जितक्या उत्तम पद्धतीने घेतो ती पाहता अन्य मते अग्राह्य ठरावीत असे विज्ञानवाद्यांना वाटते.

आता या अशा मोठ्या नि विद्वान लोकांतले हे दोन प्रवाह काय करतात, काय म्हणतात हे तितकेसे महत्त्वाचे नाही. परंतु समाजाच्या दृष्टीने त्यांचेतील संवादाला प्रचंड महत्त्व आहे. सामान्य समाजाचा फार मोठा घटक एक तर धर्म नि अध्यात्म त्यागत आहे वा किमान त्यापासून दूर होत आहे. अध्यात्मातलं क्लिष्टतम ज्ञान सत्य असेल वा नसेल पण ईश्वरप्रणित, धर्मप्रणित जीवनसंस्था ज्या मूल्यांचा हिरीरीने पुरस्कार करते त्या सगळ्या मूल्यांवर विज्ञान शांत आहे. येथपर्यंतही ठिक आहे. पण यापुढे जाऊन विज्ञान या (तसे तर सर्वच) मूल्यांवर प्रश्नचिन्ह उभे करते. आता कशावरही प्रश्नचिन्ह उभे करणे हे विज्ञानाचे कामच आहे. पण "मूल्यांचे मानवी जीवनातील स्थान" हा "विज्ञानाच्या प्रयोगशाळेतील प्रश्न" असला पाहिजे. रस्त्यावरच्या कच्च्या मडक्यांच्या चर्चेत हे प्रश्न थेट उत्तर काढण्यासाठी वापरले जाऊ नयेत. कारण वि़ज्ञान हाच शुद्ध आधार मानला तर कोणतेही सन्मूल्य बाळगण्याचे काही कारण आढळत नाही. उदा. चोरी करावी का? हत्या करावी का? मदत करावी का? या प्रश्नांचे उत्तर विज्ञान काहीही देऊ शकते. आजघडीला केवळ पारंपारिकतेचा प्रचंड प्रभाव आहे म्हणून लोक बाय डिफॉल्ट मूल्याधिष्ठित वर्तन करताना. पण २-३ पिढ्यातच कोणत्याच मूल्याला काहीच आधार, अर्थ उरणार नाही. प्रचंड कॅओस असण्याची शक्यता खूप जास्त आहे.

आज दुर्दैवाने विज्ञान वा अध्यात्माची एकच केंद्रिय बॉडी नाही. त्यांचे मुखपत्र वा मुखवाणी नाही. म्हणून काय चाललं आहे त्याबद्दल जनसामान्याला प्रचंड संभ्रम आहे. मूल्यांचं मूल्यमापन किचकट बनत चाललं आहे नि आयुष्यात मूलभूत गरजा भागवायला देखिल कमी वेळ मिळत आहे. म्हणून अर्धज्ञानाधारित मूल्ये बाळगली जात आहेत. किमान आजतरी विज्ञानाचा रोल पदार्थजीवन समृद्ध करणे नि अध्यात्माचा रोल चांगल्या मानवी मूल्यांचे रोपण करून जीवनाला सुख, सार्थता देणे असा असायला हवा. यात थोडाफार ओवरलॅप झाला तर हरकत नाही. (त्यांच्या त्यांच्या प्रयोगशाळांत तर त्यांनी परस्परांच्या विषयांत कितीही हस्तक्षेप केला तरी काही हरकत नसावी.)

एकमेकांची भूमिका समजून घ्यावी असे आपण म्हणताहात खरे, परंतु सामाजिक मूल्यांचे संगोपन ही जबाबदारी धर्मसंस्थेची आहे. वि़ज्ञानाची ही एक तर जबाबदारी नाही, उलट ती पार पाडण्यात ते एक उपद्रवी घटक आहे. विज्ञान जसजसा एकेक नवनविन शोध लावतं तसतसं ते कितीतरी मूल्यं प्रत्यक्षाप्रत्यक्षपणे ढवळून काढतं. म्हणून संवादाची जबाबदारी धर्मवाद्यांची आहे.

धर्म, अध्यात्म, ईश्वरसंबंधित श्रद्धा या कोणाच्या संकुचित अस्मितांचे विषय नसावेत. हा मानवतेच्या सौख्याचा प्रश्न आहे. भविष्यात कधी मूल्यसंस्था कशी असावी हे सांगण्याची क्षमता विज्ञानातही येऊ शकते. त्यावेळी प्रांजळ हस्तांतरण करण्याची मानसिकता हवी. पण त्यापूर्वीच खूप मोठा शिक्षित, विचारी, स्वतंत्र असा प्रचंड मोठा जगातला मध्यमवर्ग भलत्याच मूल्यांच्या आहारी गेला तर आजपावेतो इतक्या खोलात जाऊन अभ्यासलेल्या अध्यात्माच्या शाखेचा, तिच्या उदात्त प्रणेत्यांचा तो पराभव असेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

वधूची आई वरात श्रीमंतीपहाते, बाप वरात शिक्षण पहातो, भाऊबंद वरात जात पहातात, इतर लोक वराचे मिष्टान्नपाहून खुष होततात. असा रीतीने इतर लोक अवांतर गोष्टीं पसंत करतात. एकटी वधूच वराला‘वर’ म्हणून निवडते, पसंत करते. म्हणजेच ‘जन्माचासोबती’ म्हणून निवडते.म्हणून तिचा एकटीचाच वरावर ‘अधिकारचालतो’. इतर कुणाचाच नाही.

होय हा श्लोक वाचला/ऐकला होता.पण वधू वराचे रुप पहाते असा काहीसा होता Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कन्या वरयते रूपं माता वित्तं पिता श्रुतम् |
बान्धवा: कुलमिच्छन्ति मिष्टानमितरेजना: ||

हा तो श्लोक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

व्व्वा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

वधूच वराला‘वर’ म्हणून निवडते, पसंत करते. म्हणजेच ‘जन्माचासोबती’ म्हणून निवडते.

ते करत असताना ती त्याचे रूप पसंत करते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्लँचेट विषय अन्य धाग्यावर विचारणेत आहे.

विज्ञानाच्या दृष्टीकोनातून ... पुस्तकातील या विषयावर प्रकरण 4 मधे 19 पानातून विशेष चर्चा प्रा. अद्वयानंद गळतगे यांनी केली आहे. त्यातील काही मुद्दे सादर करत आहे. अन्य लेखकांचे याविषयावरील लेखन वाचायला आवडेल.

१. प्लँचेटचा एक विलक्षण अनुभव
२. परदेशातील एक दाखला
३. प्लँचेटवर 'मृतात्मे' येतात या कल्पनेची पार्श्वभूमी
4. मृतात्मा प्रत्यक्ष दिसला!
5. प्लँचेटवर कादंबरीताल पात्राचा 'मृतात्मा' आला!
6. भारतीयांचे अनुभव
7. प्लँचेट हा एक भानामतीचा प्रकार
8. भानामतीतील मनःशक्तीचा नियंत्रित प्रयोग
9. प्लँचेटवर खरोखर कोण येते?
10. काल्पनिक भूत देहधारी बनले!
11. *बॅचेल्डार व ब्रुकीस-स्मिथ यांचे प्लँचेट विषयीचे शास्त्रीय प्रयोग
12. कृत्रिम भूत निर्माण करण्याचा यशस्वी प्रयोग
13 ** या शास्त्रीय सशोधनाचा निष्कर्ष

या प्रकरणाच्या शेवट करताना प्राचार्य अद्वयानंद गळतगे एक सावधगिरीचा इशारा देतात. ते म्हणतात, "शास्त्रीय संशोधन व प्रयोग एकाद्या गोष्टीतील सत्य शोधण्यासाठी केले जातात. या संशोधनातून व प्रयोगातून पूर्ण सत्य कळले असे समजण्याची चूक मात्र कधीच करू नये. भौतिक वा जड वस्तूंविषयीचे सत्य सुद्धा शास्त्रज्ञांना त्याविषयी असंख्य प्रयोग व संशोधन करूनही अजून कळालेले नाही. तर मानवी मना विषयीचे व अतींद्रिय घटनांविषयींचे सत्य अशा प्रयत्नातून कळेल ही आशा दूरच. या प्रत्येक घटनेला अनेक कारणे असतात अनेक बाजू असतात. त्याविषयी कोणताही एकच निष्कर्ष काढणे धोक्याचे असते.
प्लँचेटवर नेहमी मृतात्माच येतो या समजुतीतील एकांगीपणा असा संशोधनातून उपयोगी पडतो. पण म्हणून दुसऱ्या टोकाला जाऊन प्लँचेट वा सीयन्स मध्ये घडणाऱ्या घटनांचे कारकत्व मानवी मनाला देणे ही चुकीचे आहे. हा सुद्धा शास्त्रीय संशोधनाचा एकांगीपणाच आहे. मृतात्मे प्लँचेटवर येतात कि नाही, केंव्हा येतात या विषयीचा सर्व सामान्य निकर्ष कधीच काढता येत नाही. हे ज्या त्या परिस्थितीवर अवलंबून असते. अनाहूतपणे येणारे संदेश खऱ्या मृतात्म्यांकडूनच येतात (त्यांना drop-on म्हणतात) जीवंत व्यक्तींना त्यांच्या जीवनात सहाय्यभूत ठरणारे संदेश हे खऱ्या मृतात्म्यांकडूनच येतात. अपुऱ्या राहिलेल्या इच्छा तृप्त करण्यासाठी काही मृतात्मे येतात. वासनेमुळे पिशाच झालेले मृतात्मे जिवंत व्यक्तींना निष्कारण छळतात हे ही खरे आहे. मोठे सत्पुरूष, महात्मे, इतकेच नव्हे तर कोणताही मृतात्मा आपण बोलवू तेंव्हा येतो असे समजणे म्हणजे ते मृतात्मे आपल्या इच्छेच्या आधीन असलेले नोकर आहेत असे समजणे होय. कर्मसिद्धांताला छेद देणारी ही समजूत आहे. प्रत्येक आत्मा स्वतःच्या कर्माने बांधला गेला आहे. इतरांच्या कर्माने वा इच्छेने नाही. त्याच वेळी नोकरा प्रमाणे वागणारी वासनेमुळे पृथ्वीवर भटकणारी (earth bound) पिशाचे, व नैसर्गिक (सुष्ट वा दुष्ट) शक्ती (elementals) या जगात आहेत. हे ही सत्य आहे (त्यांना क्षूद्र देवता म्हणतात) पण म्हणून कोणतीही अतींद्रिय घटना घडली की ती मृतात्म्यामुळेच वा अशा शक्तींमुळेच घडली असे मानणे चुकीचे आहे.शेवटी मनुष्य हा ही पिशाचच (आत्माच) आहे. तो मृत नसून जीवंत आहे इतकेच. जे मृतात्मे (मृतात्म्यांची मने) करतात ते जीवंत आत्मे- (त्यांची मने) - का करू नयेत? आणि हेच सत्य शास्त्रीय संशोधनातून उघड झाले असून फिलीप हा त्याचा साक्षी आहे.

* Ref. Journal of the society for Psychical research 1966, 43
** The laws of he spirit world by Bhavnagaris part 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अनाहूतपणे येणारे संदेश खऱ्या मृतात्म्यांकडूनच येतात (त्यांना drop-on म्हणतात) जीवंत व्यक्तींना त्यांच्या जीवनात सहाय्यभूत ठरणारे संदेश हे खऱ्या मृतात्म्यांकडूनच येतात. अपुऱ्या राहिलेल्या इच्छा तृप्त करण्यासाठी काही मृतात्मे येतात. वासनेमुळे पिशाच झालेले मृतात्मे जिवंत व्यक्तींना निष्कारण छळतात हे ही खरे आहे. मोठे सत्पुरूष, महात्मे, इतकेच नव्हे तर कोणताही मृतात्मा आपण बोलवू तेंव्हा येतो असे समजणे म्हणजे ते मृतात्मे आपल्या इच्छेच्या आधीन असलेले नोकर आहेत असे समजणे होय. कर्मसिद्धांताला छेद देणारी ही समजूत आहे. प्रत्येक आत्मा स्वतःच्या कर्माने बांधला गेला आहे. इतरांच्या कर्माने वा इच्छेने नाही. त्याच वेळी नोकरा प्रमाणे वागणारी वासनेमुळे पृथ्वीवर भटकणारी (earth bound) पिशाचे, व नैसर्गिक (सुष्ट वा दुष्ट) शक्ती (elementals) या जगात आहेत. हे ही सत्य आहे (त्यांना क्षूद्र देवता म्हणतात) पण म्हणून कोणतीही अतींद्रिय घटना घडली की ती मृतात्म्यामुळेच वा अशा शक्तींमुळेच घडली असे मानणे चुकीचे आहे.शेवटी मनुष्य हा ही पिशाचच (आत्माच) आहे. तो मृत नसून जीवंत आहे इतकेच. जे मृतात्मे (मृतात्म्यांची मने) करतात ते जीवंत आत्मे- (त्यांची मने) - का करू नयेत? आणि हेच सत्य शास्त्रीय संशोधनातून उघड झाले असून फिलीप हा त्याचा साक्षी आहे.

अगदी क्वांटम फिजिक्स वाचल्यासारखं वाटतं. तिथेदेखिल एखादी गोष्ट होण्याची शक्यता असते, शक्यता-नियम असतो, निश्चित्-नियम नसतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

विचारां बद्दल धन्यवाद

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0