ओळख विकिपर्यटन प्रकल्पाची

विकिपर्यटन (अथवा विकिव्हॉयेज) हा विकिपीडियाच्या बन्धूप्रकल्पांच्या यादीतील त्यातल्या त्यात नवीन प्रकल्प. विकिपीडियातही भौगोलीक प्रदेशांची माहिती असतेच पण विकिपीडियातील संबंधीत लेखांना ज्ञानकोशीय परिघाच्या मर्यादा येतात. विकिपीडियात वर्णनात्मक अलकांरीक लेखन, विशेषणे यांना टाळल जात, विकिपीडियात संदर्भांची/दुजोर्‍याची बर्‍याचदा गरज असते. त्या शिवाय प्रेक्षणीय काय ? कसे जाल, कुठे उतराल, खवय्येगिरी,खरेदी अशा बर्‍याच पर्यटन प्रेमींकरता बर्‍याच बाबी विकिपीडियाच्या कार्यक्षेत येत नाहीत त्या सर्वबाबी विकिपर्यटन (विकिव्हॉयेज) मध्ये कव्हर करता येतात, सोबत वर्णनात्मक अलकांरीक लेखन, विशेषणे लावून तुमच्या स्वतःच्या लेखन शैलीत लिहिण्याच बरच स्वातंत्र्य विकिव्हॉयेज मध्ये मिळत.

पर्यटन विषयक लेखनासाठी इतर असंख्य संकेतस्थळ असताना विकिव्हॉयेजचा काय उपयोग ? इतर विकिंप्रमाणे एकाच लेखात एकत्र लेखन हे वैशिष्ट्य आहे दुसरा मुख्य फायदा म्हणजे जगातील जास्त भाषात माहिती अनुवादीत होण्याची वाढीव शक्यता ज्यामुळे पर्यटनास अधीक वाव मिळू शकतो.

सध्या इंग्रजी सहीत मोजक्याच भाषातून विकिव्हॉयेज स्वतंत्रपणे उपलब्ध आहे. मराठी आणि इतर भाषांमध्ये सध्या तो इथे इनक्यूबेटर मध्ये आहे. कोणत्याही भाषेस २० ते ३० लोकांचे सातत्याने संपादन मिळू लागले की तो विकिप्रकल्प काही महिन्यात स्वतंत्र होतो तशी मराठीसही संधी आहे. मुख्य म्हणजे लिहिण्यासाठी कमी स्वातंत्र्यामुळे ज्यांनी विकिपीडियास हात लावला नाही त्यांच्या साठी विकिव्हॉयेज एक चांगला प्रकल्प आहे.

* इंग्रजी विकिव्हॉयेज
* मराठी विकिपर्यटन (इनक्यूबेटर)
** मराठीत काम चालू असलेले लेख (तुम्ही नव्या लेखांची निर्मिती सुद्धा करू शकता)
** आपले या धाग्यावरील प्रतिसाद लेखन प्रताधिकारमुक्त होत असल्याचे गृहीत धरले जाईल.

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

उत्तम प्रकल्प आहे. वेळ मिळताच भर नक्की घालेन
तुर्तास धागा वर काढतो आहे.

ऐसीवर भटकंतीचे काही धागे आहेत. त्यापैकी माहिती उपयुक्त असल्यास लेखकाची परवानगी घेऊन विकीप्रकल्पात भर घालायला हरकत नाही.
पैकी मी लिहिलेल्या भटकंती विषयक लेखाकडे संदर्भसुची व/वा बाह्य दुवे येथे योग्य तो निर्देश करून, लेखातील माहिती विकीवर नेण्यास माझी हरकत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!