मराठी चित्रपटांची/मालिकांची मुलगा-सून द्वेष्टी मानसिकता !!!

"सून-मुलगा अति नालायक आणि वाईट असतात पण आई-वडील-नणंद-जावई ही माणसे देवापेक्षाही श्रेष्ठ आणि आदर्श माणसं असतात" असा संदेश देणारे मराठी चित्रपट बंद होत आहेत आणि मराठी निर्माते-लेखक-दिग्दर्शक प्रगल्भ होत आहेत असे मला वाटायला लागले असतांनाच मध्यंतरी एक "स्वातंत्र्याची ऐशी तैशी" हा चित्रपट आला आणि वाटलं की कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच राहाणार म्हणजेच मराठी चित्रपट हे सून-मुलगा द्वेष्टेच राहाणार!! असे हे चित्रपट नाण्याच्या केवळ एकाच बाजू साठी बनवले जाणारे चित्रपट असतात. नाण्याला दुसरी बाजू असते हेच मुळी त्यांना मान्य नसतं. हे कमी पडले की काय म्हणून बहुतांश मराठी सिरीयल सुद्धा रोज रोज हेच दळण दळत असतात.

मराठी निर्माते-लेखक-दिग्दर्शक यांना पक्के माहिती आहे की, मराठी चित्रपट (बक्कळ पैसा मिळवून देणाऱ्या मल्टीप्लेक्स सह) चालण्याचे एकमेव हक्काचे ठीकाण आहे पुणे आणि पुणे येथे पेन्शनर वृद्ध वयस्कर मंडळी जास्त राहातात. मग त्यांच्या मनाला कॅश करुया. मग असे चित्रपट काढतात. पैसे कमावतात.

तरूण मंडळी इमाने इतबारे आपल्या आई वडीलांची सेवा करतात. यात वाद नाही. आदर्शपणाने नव्हे तर प्रॅक्टीकली! शक्य होईल तसे ते आई-वडीलांची हौस मौज करतच असतात, गरजा पुरवतच असतात.

कोणतेच आई वडील सुद्धा आपल्या मुलांना आदर्शपणे वाढवत नाहीत. तेही प्रॅक्टीकली विचार करूनच शक्य तेवढे शिक्षणच मुलांना देतात. शक्य तेवढे ते मुलांसाठी करतात. स्वतःसाठी काही राखून! बरोबर?

त्याचबरोबर मग इच्छा मारून मुलेही न आवडणारे शिक्षण आई- वडिलांच्या दबावाखाली किंवा इच्छेखातर पूर्ण करतातच की!

मुले आयुष्यभर आई-वडीलांखातर, त्यांचे पांग फेडण्याखातर स्वत:च्या अनेक स्वप्नांवर आणि छंदांवर पाणी सोडतातच !!

मग हेच आई वडील एकदा का वृध्द झाले की अचानक मुलांकडून आदर्शवादी अपेक्षा करतात.का तर ते फक्त "वृद्ध" आहेत म्हणून?

मुलाला लहानपणी अभ्यासासाठी स्वतंत्र खोली सुद्धा न देऊ शकणारे आईवडील मुलगा नौकरीला लागताच शहरामध्ये त्याचेकडून २/3 BHK flat ची अपेक्षा करायला लागतात. हेच नाही तर लहान बहिणीचे/भावाचे ही सगळे मोठ्या मुलाने करावे असा आग्रह धरला जातो. हा मुद्दा मराठी चित्रपट का मांडत नाहीत ???

आजकाल गळेकापू स्पर्धेमुळे पुर्वीच्या पिढी पेक्षा तरुण मंडळींना दुप्पट तिप्पट संघर्ष करावा लागतोय हे लक्षात न घेता फक्त विविध प्रकारचा अपेक्षा ते करताच असतात. आणि या विरोधात मुलगा काही जरी बोलला तरी त्याचे खापर सुनेवर फोडले जाते. याच ठिकाणी त्याच आई- वडिलांचा जावई जर मुलीचे ऐकत असेल तर याच आई वडिलाना आपला जावई आपल्या मुलीच्या मुठीत आहे हे ऐकून कोण आनंद होतो आणि चित्रपटात हा मुद्दा कधीच विचारात घेतला जात नाही. त्या वेळेस मात्र जावयाचे आई वडील खडूस आहेत, आमच्या मुलीचा काही दोष नाही असा प्रचार केला जातो. लक्षात आला का विरोधाभास? हा मुद्दा चित्रपटात ठळकपणे दाखवला पाहिजे.

त्यात मग अशा सिनेमांमुळे तरुणांची गळचेपी, मुस्कटदाबी होते. काही घरांमध्ये असे आदर्शवादी आणि मुलगा-सून द्वेष्टे मराठी चित्रपट बघण्यासाठी "मुला-सूनेवर" दबाव टाकला जातो आणि टोमणे मारले जातात हे सत्य आहे. सगळीकडेच नसेल पण हे आहे. "पहा पहा कशा एकेक सुना असता बाई!!" "पहा तीने सासूचे पाय दाबायला नकार दिला?!

एकदा सुलोचना दिदी म्हणाल्या होत्या की, प्रेक्षकांनी जास्तीत जास्त मराठी चित्रपट पाहिले पाहिजेत. पण, निर्माते-लेखक-दिग्दर्शक यांचेकडे असल्या "आगलाव्या" चित्रपटांशिवाय दुसरे काही दाखवायला नसेल तर माझ्यासारखे असंख्य त्रस्त प्रेक्षक मराठी चित्रपटांकडे पाठ फिरवतीलच. हे विषय सोडले तर मराठी चित्रपटांचा दर्जा उत्तम असतो यात वादच नाही.

चित्रपटात दाखवतात त्याप्रमाणे कोणताच मुलगा-सून टोकाचे वाईट नसतातच. बहुतेक सासवा सुद्धा तश्या नसतात. मात्र हुंड्यासाठी सुनेला जाळून मारणाऱ्या सासवा आजही आहेत. त्यांना कायदेशीर पणे अटकही होते असे दाखवणारे चित्रपट का बनवत नाहीत?

अशा सासवा म्हणजे खुनीच की.
पुरुष एक खून केला की तुरुंगात खितपत पडतो.
मात्र घराघरातींल अशा "जाळकुट्या" आणि अखंडपणे शब्दांनी सुनेला छळत रहाणार्या "दहशतवादी" बायकांचे काय करायचे?? त्याना कोण अटक करणार??
त्यांच्यावर चित्रपट कधी निघणार?? चित्रपटात त्याना अटक होते आहे फाशी होते आहे असे कधी दाखवणार? जेणेकरून अशा प्रवृत्तीला आळा बसेल!!

याच सासवा स्वत:च्या मुलीच्या आणि जावयांच्या चुकांवर मात्र जाडजूड चादर पांघरतात आणि सुनेची छोट्यात छोटी चूक मोठ्ठी करुन सगळीकडे सांगितली जाते, याला काय म्हणावे?

सासू-सून वाद हे पिढीततले अंतर असल्याने आहे, हे एकवेळ समजू शकते, पण एकाच वयाचे, एकाच काळातले असूनही सून-नणंद-भावजय एकमेकांना समजावून का घेऊ शकत नाही??

अशा या अति भयानक घरगुती दहशतवादाला खतपाणी घालणारे हे चित्रपट बंद झाले पहिजेत असं मी म्हणत नाही, पण कमीत कमी त्याची कथा ही दोन्ही बाजू मांडणारी हवी.खतपाणी मी यासाठी म्हणालो की घराघरात मुलगा-सून हे आई-वडिलांना त्यांची चूक लक्षात आणून देवू शकत नाही कारण ते "मोठे" असतात आणि एक प्रभावी माध्यम म्हणून चित्रपटाकडे गेले तर ते चित्रपट सुद्धा "मुलगा-सून" हे नेहेमी चुकतातच असेच दाखवतात त्यामुळे सासू-नणंद याना फावते म्हणजेच त्यांच्या वागणुकीला खतपाणी घातले जाते. बरोबर की नाही?

महेश मांजरेकर नेहेमी हट के चित्रपट बनवतात. त्यांचे कडून एक तरी "मुलगा-सून" यांची बाजू मांडणारा चित्रपट पुढे येईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही.

हिंदी चित्रपटसृष्टी सुद्धा पूर्वी असे चित्रपट काढून वीट आणायचे (अवतार-राजेश खन्ना, उमीद, बागबान वगैरे)

जर असे मानले की "समाजातलेच प्रतिबिंब चित्रपटात उमटते" तर माझ्या आजूबाजूला आणि समाजात आणि मित्र मंडळी मध्ये मला इतके टोकाचे दुष्ट मुलगा-सून आणि आदर्श मुलगी-जावई कधी कुठे पाहाण्यात नाहीत.

याउलट वर्तमानपत्रांमधील ९० टक्के बातम्या पाहाता सासू-सासर्याच्या-नणंदेच्या छळवादी वृत्तीला आणि अत्याचाराला कंटाळून स्वत:ला संपवणार्या सुनांच्या बातम्याच वाचायला मिळतात....

काय वाटते आपल्याला?

असल्या अतिशयोक्तीपूर्ण चित्रपटांची/सिरीयल्सची आवश्यकता आहे का??

मुलगा आणि सून द्वेष्ट्या ढीगभर चित्रपटांची/सिरीयल्सची गरज आहे का?

दहा चित्रपट/मालिका "सून-मुलगा द्वेष्ट्ये" आणि "आई-वडील-मुलागीई-जावई धार्जिणे" असले तर एक तरी चित्रपट नाण्याची दुसरी बाजू दाखवणारा का नसावा???

मला एक हिंदीतला "वक्त" नावाचा अक्षय कुमार आणि अमिताभचा एक चित्रपट आठवतो तो मुलगा- सून यांची चांगली बाजू दाखवतो!!!

कुणाला माहिती आहे का असा एखादा मराठी चित्रपट ज्यात सून-मुलगा यांची चांगली बाजू मांडली आहे??

माहिती असेल तर येथे सांगावे. म्हणजे तो चित्रपट समाजातील "सून-मुलगा द्वेष्ट्या" सासू-सासार्याना दाखवायाला बरे!!! काय म्हणता? खरे की नाही?

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
3.333335
Your rating: None Average: 3.3 (3 votes)

१.इष्क
२.डी डी ए जे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मराठी चित्रपट, मालिका बघत नाही त्यामुळे त्याबद्दल काही मत मांडणे शक्य नाही.
पण लेखातल्या नातेसंबंध, कुटुंबसंस्थाविषयी भावनांशी सहमत आहे. साधारण अशीच मतं मी www.aisiakshare.com/node/2961#comment-63236 इथे व्यक्त केलेली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण लेखातल्या नातेसंबंध, कुटुंबसंस्थाविषयी भावनांशी सहमत आहे.

लेखाशी कि विडंबनाशी. मला हा लेख विडंबन/उपरोध वाटला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अवतार-राजेश खन्ना, उमीद, बागबान वगैरे >> काही पालक किंवा नातेवाइक आपल्या पाल्यासाठी अपायकारक असतात हे दाखवणारे हिंदी चित्रपट असे कितीसे आहेत? उडान, शैतान, द्याट गर्ल इन येलो बुट्स, हायवे, भुमिका, मान्सुन वेडींग, चांदनी बार

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काही पालक किंवा नातेवाइक आपल्या पाल्यासाठी अपायकारक असतात हे दाखवणारे हिंदी चित्रपट असे कितीसे आहेत?

स्पेसिफिकली अशा पिच्चरांची अपेक्षा करणं लैच रोचक वगैरे वाटलं. शेवटी ज्याची त्याची फेटिश हे आहेच, पण ष्टिल....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

१.बीवी हो तो ऐसी
२.घर हो तो ऐसा
३.स्वर्ग
४. गोविंदा- कादर खान- राज्किरण ह्यांचा "कर्ज चुकाना है"

एकूणातच late 80s मध्ये आलेले अगणीत सिनेमे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

अनिल, माधुरी - बेटा पण चालेल की मग. किंवा अमिर नायिका गरीब नायक यांच्या प्रेमात विघ्न आणणारे नायिकेचे वै.वै.दु. वडील ज्यात आहेत असे दिल, राजा हिंदुस्तानी, कहो ना प्यार है वगैरे? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१
त्यातही वैट्ट आई दाखवायला सावत्र असणे मस्ट असते का? सख्खी आई, बहिण वैट्ट नसतात.
आणि प्रेयसी व/वा प्रियकर वैट्ट (निगेटिव्ह शेडमध्ये) दाखवणारा चित्रपट काढणे सुचेल तरी का असा प्रश्न पडतो. (फारतर नवरा/बायको वैट्ट दाखवतील)

आपल्याकडे नात्यांमधील नाट्य रंगवताना त्यांचे पॉर्निकरण करतात - अतिभडक करतात. आणि काही नात्यांना "होलीयर दॅन ..." करून ठेवले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

प्रेयसी व/वा प्रियकर वैट्ट

- गुप्त
- कंपनी
- अपरिचित ( हा बहुदा डब आहे)
- अजून काही नावे आठवत नसलेले पण आहेत

खूप नसली तरी अगदीच दुष्काळ नाहीये या प्रकाराचा असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

येस बाजीगरमधला शारूकपण येइल या यादीत.
आणि गँगस्टरमधल्या इमरानला काय म्हणायचे? झालंच तर तो परवा आलेला अर्जुन कपूर परिणीती चोप्राचा शिन्मा.
किंवा सलाम बाँबेमधला नाना पाटेकर?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नै नै तसे वैट्ट नाहित
प्रियकर प्रेयसीसोबत (वा उलट) दुष्टपणे वागतोय

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हा उलट दिशेच्या पॉर्निकरणाचा हव्यास का म्हणू नये असा प्रश्न इथले प्रतिसाद पाहून पडतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

म्हणजे काय? नै कळ्ळे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आपल्याकडे नात्यांमधील नाट्य रंगवताना त्यांचे पॉर्निकरण करतात - अतिभडक करतात. आणि काही नात्यांना "होलीयर दॅन ..." करून ठेवले आहे.

हे एका दिशेचे पॉर्निकरण झाले- उदात्त दिशेचे. त्याच्या उलट दिशेच्या पॉर्निकरणाचा हव्यास आहे की काय अशा थाटाचे प्रतिसाद या धाग्यावर आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

प्रत्येक नाते त्या टोकाला नसेल तर या टोकाला रंगवावे असे नाही. पण दुसर्‍या टोकाचे नाते औषधालाही दिसु नये?
दुसरे टोक मला आवडेल असे नाही पण म्हणून ते कोणी रंगवूच नये? हव्यास कसला आला त्यात?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

प्रियकर वैट्ट इ. असतो असे दाखवणारे पिच्चर दाखवलेच आहेत, पण नुसत्या जेनेरिक वाईटपणाने समाधान न होऊन विशिष्ट प्रकारचा वाईटपणा दाखवण्याची अपेक्षा फार रोचक वाटते. त्यामुळे या अपेक्षेस पॉर्नीकरणाचा हव्यास म्हणूनही वर्णिता येऊ शकते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

घरोघरी मातीच्या चुली.
हा चित्रपट पूर्णपणे मुलीच्या(सुनेच्या) बाजूने होता. मुलगा-सून आधी काही निर्णय घेतात, आई त्याला इमोशनली ब्लॅकमेल करते आणि तो बायकोला काय वाटेल याचा विचार न करता निर्णय फिरवतो. प्रासंगिकरित्या सून बरोबर कशी असते हे सासरे मुलाला वेळोवेळी सांगत असतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मस्त कलंदर
उदरभरण नोहे

लेखाच्या गाभ्याशी एकदम सहमत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आजकाल बहुतेक तरुण सुना नोकर्‍या-व्यवसाय करतात त्यामुळे त्यांना दुपारी मालिका पाहायला वेळ नसतो आणि मग उरलेला मुख्य आड्यन्स सासवांचा असल्याने त्या आड्यन्सला आवडेल असे दाखवणे हे साधे व्यावसायिक गणित असावे असे वाटते. बाकी त्याचे सामाजिक-कौटुंबिक परिणाम वगैरेबद्दल पास.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तरुण स्त्रियांचं चित्रण 'पाशवी'पणे होत असेल तर मग असले चित्रपट आपल्याला आवडतील ब्वाॅ. आपण लोकांना घाबरायचं किंवा लोकांनी आपल्याला घाबरायचं असे दोनच (वायझेड) पर्याय असतील तर दुसरा अतिउत्तम. आपलं सगळं मजेत चालतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ROFL

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

तरुण स्त्रियांचं चित्रण 'पाशवी'पणे

अश्लिल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

"सून-मुलगा अति नालायक आणि वाईट असतात पण आई-वडील-नणंद-जावई ही माणसे देवापेक्षाही श्रेष्ठ आणि आदर्श माणसं असतात"

आपली संस्कृती एक प्रचंड समस्या निर्माण करते .... मर्यादांचे तत्वज्ञान नेसेसरी व सफिशियंट आहे असे आपल्या डोक्यावर लहानपासून लादून ... debt mentality ची बीजे आपल्या डोक्यात पक्की रुजवून त्याच वेळी विवेकपूर्ण चयनातून निर्माण झालेली नाती (उदा. पति पत्नी) कनिष्ठ मानते. equity mentality ही neither necessary nor sufficient आहे असे अप्रत्यक्षरित्या सांगून .... आपल्याला अपंग करते. त्याही पुढे जाऊन मुलं नाठाळपणे वागली तर् त्यांच्या कानाखाली आवाज काढण्यात काहीही चूक नाही. पण आईवडील नाठाळपणे वागले तर त्यांच्या कानाखाली सणसणीत आवाज काढण्याची अनुमती/अथॉरीटी आपल्याला देत नाही. नव्हे ते सर्वात अयोग्य आहे असे ठासून सांगते. नैतिकतेचा कोणताही नियम काल/स्थल्/परिस्थिती निरपेक्षरित्या सुयोग्य असू शकत नाही. पण आईवडीलांना त्यांच्या चुकीबद्दल कठोर शिक्षा करणे हा त्यास अपवाद आहे - आपल्या संस्कृतीनुसार.

खरंतर - Every authority should be subject to questioning ... on periodic basis. पण नाही. आईवडीलांना प्रतिप्रश्न करणे चूक, उलट बोलले तरी ते चूक. No matter how irrational/wrong they are.

गप्प बसा संस्कृती यातूनच पैदा होते.

नाही म्हणायला - आपल्याला प्रल्हादाची स्टोरी मात्र सांगितली जाते. किमान. But it attempts to supplant one authority by another.

अशा या संस्कृतीचा जयजयकार असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नुसते मार्मिक देऊन समाधान होईना! जय गब्बरदेव! __/\__

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

निवडलेलं नातं आणि मिळालेलं नातं हा फरक पटला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

चयन हा लिबर्टेरियनिझम च्या पायाशी असलेला की-स्टोन आहे ओ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0