मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास

field_vote: 
4.714285
Your rating: None Average: 4.7 (7 votes)

प्रतिक्रिया

दुव्यांबद्दल धन्यवाद. अतिशय उत्तम सुरुवात. उतार्‍यांमधून पुलंच्या लेखणीचा बहर अन फटके अनुभवायास मिळावेत ही इच्छा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पुलंचं "गाळीव इतिहास" हे पुस्तक प्रचंड आवडतं. परिचय दिल्याबद्दल - आणि संदर्भ पुरवल्याबद्दल - आभार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

सहमत. अत्यंत आवडते पुस्तक.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पुलंचं "गाळीव इतिहास" हे पुस्तक प्रचंड आवडतं. परिचय दिल्याबद्दल - आणि संदर्भ पुरवल्याबद्दल - आभार.

डिट्टो!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

+१
बॅट्याचे गैर-ग्रीक धागेही भारी असतात असे दिसते.
त्याने इकडेही लक्ष द्यावे असे सुचवतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

'गाळीव इतिहास' माझं आवडतं पुस्तक. बरीच पारायणं केली आहेत. वेळ मिळाला की उतारा(रे) टाकेन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मराठी वाङ्मयाचा इतिहास एवढ्या सोप्या शब्दात सांगितला आहे, अनेक धन्यवाद बॅटमॅन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जयवंत दळवींच्या 'ठणठणपाळ' मालिकेतील पुस्तकांप्रमाणेच याही पुस्तकात सरवट्यांची रेघ अत्यंत मार्मिक आणि समर्पक चित्रे देते.
कित्येक वाक्यांसाठी ते चित्र इतके समर्पक होते की दोन्ही एकत्रच लक्षात राहतात.

पुस्तकाची पार्श्वभूमी आणि दुवे आणि एकूणच धागा यांबद्दल कृतज्ञतापूर्वक अनेकानेक आभार !
---------
या निमित्ताने पुन्हा एकदा आठवण झाली...
गाळीव इतिहासाचा दुसरा भाग (अर्वाचीन इतिहास) येणार होता असे काहीसे आठवते. बहुधा 'लोकसत्ता'मध्ये काही भाग प्रसिद्धही झाला होता, असे पुसटसे आठवते.... किंवा माझी स्मरणशक्तीही दगा देत असेल !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ब्याटम्यान भाऊ… क्या बात है!

हे तर माझे सगळ्यात आवडते पुस्तक आहे. पुलंनी यात जे विनोदाचे चौकार षटकार ठोकले आहेत ते केवळ अप्रतिम! आज पहिल्यांदा हे पुस्तक आवडणारे लोक भेटले!!

तुम्ही दिलेल्या दुव्यांमुळे आता पुस्तकाचा आनंद ससंदर्भ द्विगुणीत होईल. त्याबद्दल तुम्हाला कितीही दुवा दिल्या तरी कमीच आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझंही हे अत्यंत आवडतं पुस्तक, आत्मशांतीसाठी अशा पुस्तकांची मधेमधे पारायणं करावी लागतात Smile
नक्की कोणता उतारा द्यावा याचा इचार करतोय!

तु दिलेली पुरवणी माहितीही अतिशय उपयुक्त. काही बाबी माझ्यासाठी नवीन, तस्मात, आभार!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सर्व गाळीव चाहत्यांना अभिवादन आणि एक हाय 'फायू'!!!!! अमुकराव म्हणताहेत त्याप्रमाणे 'गाळीव' च्या मौजेने काढलेल्या आवृत्तीच्या प्रस्तावनेत तसा उल्लेख आहे, परंतु पुढचा भाग कै कुठे वाचनात आलेला नाही. कुणाच्या वाचनात जर कुठे आलेला असेल तर कृपया सांगावा ही विनंती. तदुपरि सरवट्यांच्या व्यंगचित्रांबद्दल तर क्या कहने!!पुलंची कैक पुस्तके त्यांनी अजरामर केलीत. गाळीव इतिहास तर त्यांनी इतका तुफान रंगवलाय की त्याला तोड नाही. समस्तांकडून आवडत्या उतार्‍यांच्या प्रतीक्षेत.

माझा अजून एक लै आवडता भाग.

'अवजड आर्येकडून पाकनिष्पत्ती होत नसावेसे दिसते' ही तुफान कोटी आणि त्याला साजेसे व्यंगचित्र सरवट्यांनी जे काढलेय ते अफाट आहे. हे वाक्य मूळ सारस्वतातले, त्याचा असा अफलातून टर्न अराउंड केला की त्याला तोड नाही. इथे 'अवजड आर्या' आणि 'सुटसुटीत आर्या' म्ह. वरिजिनली वृत्तभेद अभिप्रेत आहे. मोरोपंत ज्या आर्येसाठी विख्यात होते त्या वृत्तास संस्कृत छंदःशास्त्रात गीति अशी संज्ञा आहे. पहिल्या चरणात १२-१८ तर दुसर्‍या चरणात १२-१५ अशा मात्रा आहेत, तर गीती वृत्तात दोन्ही चरणांत १२-१८ हीच वृत्तरचना आहे. पंतांनी पहिल्यांदा कृष्णविजय नामक ग्रंथ लिहिला, पण तो कै नीट जमला नै-नारिकेलपाकासम अवघड झाला. मग त्यांचे गुरू बाबा पाध्ये यांच्या सांगण्यावरून त्यांनी अंमळ सिम्प्लिफाय करून पुढचे ग्रंथ लिहिले, त्याला वरिजिनल सारस्वतात 'कपिला गाईचे दूध' अशी संज्ञा आहे. तत्संबंधीची आर्या पुलंनी इतकी जबराट रचली आहे की वाह ताज!

'गर्जत गागत पाध्ये आले दारी मयूरपंताच्या
संतापे आदळल्या पोथ्या मग त्य कृष्णविजय ग्रंथाच्या ||
म्हणती, "जठर बिघडलें तुमच्या त्या नारिकेलपाकानें"
धाकानें डरला कवि, पाजी मग दुग्ध त्यासि टाकानें ||

वरील आर्येचे वृत्त 'पंतार्या'च आहे, शिवाय दुसर्‍या आर्येत पाकाने-धाकाने-टाकाने हे टिपिकल पंतीय दामयमकही जबर्‍या साधल्या गेले आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

लिखाण सापडले !
दुसरा भाग 'अघळपघळ' या पुस्तकात १५८ व्या पानापासून आहे. ते बहुधा अपूर्णच राहिलेले काम आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वाह!!!!!!

बहुत धन्यवाद अमुकराव. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

जबरी ओळख. बरीच नवीन माहिती मिळाली. आता या संदर्भांवरून हे पुस्तक पुन्हा (पुन्हा) वाचायला मजा येइल. माझ्या सर्वात आवडत्या पुस्तकांपैकी एक.

जेव्हा प्रकाशित झाले तेव्हा बहुधा फक्त ४० रूपयांत हे मिळत असे. मुखपृष्ठच एवढे जबरी होते आधी तेच आपण बघत बसतो. खतरनाक पुस्तक आहे. मला सगळे विनोद व त्यांचा संदर्भ कळाला असणे शक्य नाही, पण तरीही इतकी धमाल येत हे पुस्तक वाचताना. ते "हल्ला चालेल पण उर्दू आवरा" व त्या पानावरचे "पाव लगाके पळता हय के नही" करत मोगल शिपायच्या मागे धावणारा मावळा हे चित्र पाहून अनेकवेळा हसून मेलो आहे.

त्याचा दुसरा भाग पूर्ण झालाच नाही बहुधा - तो जेवढा आहे तो बहुधा "उरलंसुरलं" की "गाठोडं" यापैकी कोणत्यातरी ते गेल्यानंतर आलेल्या पुस्तकात आहे. आज बघून नक्की सांगतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अघळपघळ का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लिटर लिटर शांतरस बसल्या बैठकीला रिचवणारे डॉक्टर ऑफ लिटरेचर इ.इ. प्रस्तावनेत पाहून फुटलो हे ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

रोचक माहिती आणि ROFL उतारे. अजून येऊद्यात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

===
Amazing Amy (◣_◢)

ब्याट, ब्यांक, ब्याडमिंटन, गूड ह्याबिट्स यांड ब्याड ह्याबिट्स वगैरे ऐकून स्वतःचे इंग्रजी सुधारावयाला तो मायदेशी परतला."

ROFL मस्त अजुक युदे....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त्यात कायतरी "पूर्वी महाराष्ट्रातील लोक 'पैशाची'* नावाची भाषा बोलत" असे लिहिले आहे. आणि नंतर "आजही लोकांना पैशाची भाषाच समजते" अशी कोटी केली आहे.

*पैशाची = पिशाच्च शब्दावरून व्युत्पन्न झालेला शब्द आहे.

"श्रीमती ळ" असा काहीतरी शारिरिक विनोद आहे आणि त्याशेजारी ळ सदृष आकाराच्या नितंबिनीचे चित्र आहे. तो ज्योक त्याही काळी हीन वाटला होता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

पैशाची सगळ्यांना समजते, तरीही न समजल्याचा आव आणतात इ.इ.

सौ ळ चा विनोद तेव्हाही कै झेपला नव्हता.

मराठी कुठल्या भाषांपासून तयार झाली असावी हे सांगताना त्यांनी पैशाची आणि राक्षसी भाषांची उदा. दिलेली आहेत, उदा. फडशा, नरडे, टांग, गटागटा, इ. शब्द राक्षसी भाषेतून आलेले असावेत तर इनाम, वशिला, इ. शब्द पैशाची भाषेतून आलेले असावेत. बाल राक्षसीचे उदा. तर कहर आहे-

काका उठा
जबडा उघडा
हा रामा आला
त्याचा फडशा पाडा ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

छान धागा. चित्रांमध्ये नामदेवांचा फ्यामिली फोटो आठवतोय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

नामदेव कॉटेज इंडस्ट्री, शिवाय प्रत्येक फ्यामिली मेंब्राच्या प्रॉडक्शन आउटपुट फिगरजवळ त्याची शेरेबाजी केली होती ती निव्वळ जबराट!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

शिवाय तो तिसर्‍या अगर चौथ्या अगर नवव्या शतकातील शिलालेखः

"कापासीदामासूंबाल्याचावुंडाये |
किडमेंअस्सऊन लठ्ठ | बुक्कें लीहतें ||"

आणि 'वाचताही न येणारा, शिवाय अर्थही न लागणारा तिसर्‍या अगर चौथ्या अगर नवव्या शतकातील शिलालेख' आणि त्यामुळे रागावून त्याचे दोन तुकडे केलेला दगड यांचे चित्र तर केवळ अफाट.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

गाळीव इतिहास ऑल टाइम फेवरिट पैकी एक आहे. महानुभाव वाङ्मयाचे विडंबन मला फार आवडले होते. कुणाच्याही शैलीची नक्कल करता येण्यासाठी मुळात त्या त्या शैलीचे बारकावे माहीत असायला हवेत. त्यासाठी अभ्यासू वाचन हवे. पुलंचे व्यक्तिमत्व किती चतुरस्र होते ते यातून दिसते. शास्त्रीय संगीत गाताना 'अनवट' म्हणून कुठलातरी राग रसिकांच्या माथी मारण्याच्या प्रकाराचेही त्यांनी फार सुंदर विडंबन केले आहे. संगीतावरची त्यांची तिरकस पण निर्मळ शेरेबाजी त्यांच्या साहित्यात ठायी ठायी दिसते. बालगंधर्वांच्या गायकीचे वर्णन (विडंबन नव्हे) करणारा उतारा तर मराठी साहित्याचे लेणे ठरावा इतका अप्रतिम आहे.
अनेक क्षेत्रांत संचार आणि प्रभुत्व असल्यामुळे त्यांच्या लिखाणातल्या संदर्भांचा आणि विडंबन विषयांचा परीघ अतिशय व्यापक आहे. पुल वाचल्यानंतर हसून हसून फुटणे एवढ्यावरच आपली प्रतिक्रिया मर्यादित राहात नाही तर त्यांच्या या अफाट आणि सूक्ष्म ज्ञानाने, मुख्य म्हणजे विषयाप्रतीच्या ममत्वाने दिपून जातो, थक्क होतो.
'कान्होजी आंग्रे'च्या भाषांतरात त्यांच्या कुठलीही शैली सहीसही उचलण्याच्या हातोटीमुळे मोठी गंमत आली आहे. मूळ पुस्तक इंग्लिशमध्ये आहे, साहजिकच त्यात काही जुन्या दस्त-ऐवजांतले उतारे इंग्लिशमध्येच आहेत. पण पुलंनी भाषांतरात ते इतक्या बेमालूमपणे त्या त्या काळच्या मराठीत लिहिले आहेत की हे उतारे मुळातलेच आहेत आणि इंग्लिश पुस्तकात त्यांचे भाषांतर आहे असे वाटावे. अनुवादित साहित्याचा विचार करताना हे पुस्तक मला अव्वल दर्जाचे वाटते कारण मूळ पुस्तकाची साहित्य म्हणून गुणवत्ता कशीही असो, (त्यामुळे अनुवादित पुस्तकाचीही गुणवत्ता तितपतच राहाणार,) अनुवाद मूळ मजकुराशी तडजोड न करता अधिक वाचनीय झाला आहे.
लेख छानच आहे. एका उच्च पुस्तकाला नव्याने चर्चेत आणि स्मरणात आणल्याबद्दल आभार.
ता.क. : नवनीत लहानपणीच हाती पडले. 'काव्यामृताचा नवनीत भेला, हा गोड लागो तुमच्या जिभेला' हे तेव्हा चमत्कृतीपूर्ण वाटले होते, आता त्यातली 'रसिकांना हे आवडावे' ही प्रामाणिक कळकळ जाणवते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रतिसादाकरिता धन्यवाद! उत्तम माहितीपूर्ण प्रतिसाद. 'कान्होजी आंग्रे' वाचले पाहिजेत एकदा.

नवनीत तुमच्या हाती लहानपणीच लागले हे जबरी. जुन्या पिढीत हे फार फेमस पुस्तक होते. (शिवाय परशुरामतात्यांचेच वृत्तदर्पण हेही एक अतिशय प्रसिद्ध पुस्तक होते. कैक खटपटीनंतर कोल्हापुरात अजब पुस्तकालयात २००२ साली वृत्तदर्पण हाती लागले तेव्हा खूप आनंद झाला होता.) नवनीतात

'हे वेचे बहुयत्ने मेळविले परशुरामतात्याने
ज्याने त्याने अवलोकावे, पावावी शीघ्र रसिकता त्याने' अशी त्यांची स्वकृत खास पंतशैलीतली आर्याही मस्त आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

लेख वाचायला उशीर केल्यामुळे गाळीव इतिहासातली ताबडतोब आठवणारी सगळी गमतीदार उदाहरणं लोकांनी आधीच देऊन झालेली आहेत. सरवट्यांची चित्रं आणि पुलंचे नर्मविनोद यांचं अप्रतिम मिश्रण आहे. सरवट्यांच्या बाबतीत तर 'तुमच्या फॉरिनात जन्माला आला असता तर लोक डोक्यावर घेऊन नाचले असते' असं म्हणता यावं.

मूळ संदर्भांबद्दलची माहिती देणारा उत्तम लेख. लगे रहो बॅटाभाई!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

राघा: धन्यवाद आणि पूर्ण सहमत!

या निमित्ताने एक प्रश्न आहे: मराठीत कसा गाळीव इतिहास आहे, तत्सम काही अन्य भाषांत लिहिलेले कुणाच्या परिचयाचे आहे काय? कुठलीही भारतीय भाषा असो, नैतर युरोपियन नैतर अन्य कुठलीही: एतत्सदृश काहीदेखील कधी वाचलेले किंवा त्याबद्दल ऐकलेले असे कोणी आहे का? असल्यास ती उदाहरणेही टंकावीत ही विनंती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पुस्तक वाचनात आले. धन्य झाले. भरून पावले. बॅट्याचे विशेष आभार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मराठी वाङ्मयातील रत्ने नावाचे एक पुस्तक वाचल्याचे अंधुकसे आठवते त्यात दहा बारा जुन्या पुस्तकांची ओळख करून दिली आहे . बदलापुरचा इतिहास, लोखंडी रस्त्यावरचे रथ, जलमार्गे मुंबई ते काशी, न केलेली काशी यात्रा इत्यादी.
या लेखाबद्दल अतिशय आभार.
श्रेणी देण्यापलिकडचे.
पुलं खरे फुटतात ते अशा लेखनांतून.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मूळ लेख गायब? Sad
बाकी प्रतिसाद पण मस्तच.. आज या पुस्तकाचं पारायण करणार.. Biggrin

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एका हातात भाव्यांचं महाराष्ट्र सारस्वत आणि एका हातात गाळीव इतिहास असं घेऊन वाचायचं...
सार्वकालिक आवडत्या पुस्तकांपैकी एक पुस्तक Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0