दत्त संप्रदाय - माहिती हवी

कृष्णा नदी बद्दलच्या धाग्यावर काम करताना दत्त संप्रदायाची गुरुपरंपरा प्रामुख्याने कृष्णा नदीच्या खोर्‍यातून येते असे लक्षात आले आणि मराठी विकिपीडियावर नाथ आणि महानुभाव या दत्तानुनयी संप्रदायांपेक्षा दत्त संप्रदायाची ज्ञानकोशीय माहिती कमी आहे म्हणून हा धागा काढत आहे. आपले या धाग्यावरील प्रतिसाद लेखन प्रताधिकार मुक्त होत असल्याचे गृहीत धरले जाईल.

खालील विषयांबद्दल अधिक माहिती देऊ शकाल.

* दत्त संप्रदायाची (श्रीपाद वल्लभ पंथ) ओळख आणि परंपरा

* गुरुचरित्र

* श्रीपाद वल्लभ, नृसिंह सरस्वती, स्वामी समर्थ,

* सायंदेव, सरस्वती गंगाधर, वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंबेस्वामी
* नृसिंह सरस्वतींचे सायंदेव यांच्या शिवायचे बाकी सहा शीष्य कोण ?

* पीठापुरम , कुरवपूर-कुरुगड्डी, लाड कारंजा, औदुंबर (जि.सांगली) , गाणगापूर, अक्कलकोट, श्री शैल्यम, पांचाळेश्वर
या गावांची सर्वसाधारण माहिती तसेच संप्रदायाशी संबंधीत माहिती हवी.

* महाराष्ट्राबाहेरील दत्त संप्रदाय विशेषतः पंजाब, राजस्थान, गुजराथ, कर्नाटक, आंध्र, ओरीसा, पश्चिम बंगाल

* माहूर आणि नारायणपूर ह्या दत्तात्रेय स्थळांचे महत्व नाथ संप्रदायात अधीक आहे का ? की हि स्थळे दत्त संप्रदायाशी संबंधीत आहेत

* औदुंबर (वृक्ष)

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

http://www.kardaliwan.com/GetCriteria.php?iLanguage=2&sFolder=Marathi इथे काही माहिती असावी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

आपण दिलेल्या दुव्यावर दत्तक्षेत्रां बद्दल एक उपयूक्त माहिती देणारी पिडीएफ दिसली. माहिती दुव्यासाठी धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

सुदैवाने मराठीत या विषयायवर रा.चि.ढेरेंसारख्या सर्वोच्च अधिकारी व्यक्तीचे विपुल साहित्य सहज उपलब्ध आहे. दत्त, नाथ, अवधूत या संप्रदायांवर त्यांनी भरपूर संदर्भांसहित सखोल विवेचन केले आहे. ही सर्व माहिती कोणीतरी संक्षेपाने आणि विकी-अनुकूल अशी लिहून द्यावी अशी आपली अपेक्षा दिसते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होय आपण म्हणता ते बरोबर आहे. महानुभाव आणि नाथ संप्रदाय या मानाने काही स्वामी समर्थ हे लोकप्रीय संत सोडल्यास मराठी विकिपीडियावर दत्तसंप्रदाय विषयक माहिती कमी आणि जी आहे ती विस्कळीत स्वरूपात आहे. आणि आंतरजालावर स्वतः शोध घेऊन लिहीताना माहितीत बरीच सरमिसळ दिसते दुजोर्‍यां शिवाय नेमकी माहिती निवडून लिहिण जटील आणि वेळ लागणार आहे. शिवाय सध्या लक्ष कृष्णा खोरे या विषयावर आहे म्हणून या दत्तसंप्रदाय विषयावर आपण म्हणता त्या प्रमाणे लिहून मिळाल्यास दुधात साखर असेच म्हणता येईल. ऑदर वाईज थोडी थोडी माहिती सावकाशीने जोडत गाडा ढकलावा लागेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.