३ आवडते चित्रक्षण

मला काही चित्रपट बेफाम आवडतात. काही नटही खूपच आवडतात. पण हल्ली एक नवीन क्याटेगरी मला जाणवली- चित्रपटातले सर्वात भावलेले क्षण. इंग्रजीत moments म्हणू शकतो.
त्याला इथे चित्रक्षण म्हटलेलं आहे. ह्या चित्रक्षणांत काही विषेश असेल नसेलही,पण निमिषार्धात आपल्या अभिनयाने एक सुंदर भावना आपल्यापर्यंत पोचवण्याचं त्यांचं सामर्थ्य मला प्रचंड आवडतं.
आणि ह्या चित्रक्षणांमुळे माझे आवडते नट मला अजून आवडायला लागतात!
तेव्हा असे ३ चित्रक्षण-

१. गुब्बारे आणि नाना

बर्याच वर्षांपूर्वी "१० कहानिया" नावाचा एक चित्रपट आला होता. त्यातल्या काही कहाण्या रंजक वाटल्या. त्यातली आजही लख्ख लक्षात आहे अशी कहाणी म्हणजे गुब्बारे.
तर गोष्ट आहे एका बस प्रवासाची. कथेचा रूढ नायक आणि नायिका बसमधून कुठेतरी चालली आहेत. एक छोटंसं भांडण- त्यामु़ळे रूसलेली नायिका.
बसमधल्या बसमधे रूसण्याला लिमिटेड जागा असल्याने आपली सीट सोडून पुढे आलेल्या नायिकेला एक सहप्रवासी "हेलो" म्हणतो, तो नाना.
ह्या विडियोत १:३७ पासून त्याची स्वतःची कथा उलगडते. त्याची आणि बायकोची छोट्याछोट्या कारणावरून होणारी भांडणं,तिचे रूसवेफुगवे, मग त्याची मनधरणी असं काय काय तो नायिकेला सांगतो.
मग पुढे काय काय होतं ते तुम्ही बघा, त्यात मजा आहे!

माझा आवडता भाग - नानाचं पूर्ण क्यारेक्टरच लाजवाब आहे. त्याचं सुरूवातीपासूनचं काहीसं स्वप्नाळू बोलणं, मिश्किलपणा आणि खोडकर हसू एकदम ...बेश्ट!
मग बायकोच्या खेळीमेळीतल्या तक्रारी सांगतानाचं त्याचं हसणं तर १वन. पण ह्या तक्रारींच्या ओघात जेव्हा ४:३२ ला तो "अब क्या ...." म्हणून जी काही स्वमग्न आनंदाची गिरकी घेतो ती निव्वळ अविस्मरणीय आहे.
मला नक्की माहिती नाही त्याला कसं शब्दबद्ध करायचं ते. कदाचित त्यातच खरा आनंद आहे!

२. इश्किया नसीर
इश्कियातलं हे गाणं तर सुरेख आहेच. पण त्यातले २ चित्रक्षण मनात घर करून बसले आहेत.
गाण्याची सुरूवातच बसमध्ये होतेय. गाण्याच्या सुरूवातीलाच नासीर बसमधे उभाय आणि मिजासी इश्किया असल्यावर नैन लडने को कितना वक्त लगता है साहब?
नसीर आणि त्या बसलेल्या मुलीची नजरबंदी त्या सहप्रवाशालाही कळलीये! तर गाण्याची पहिले ४० सेकंद ह्या नैनभाषेत जातात. बसण्याची ऑफर स्वीकारण्यापूर्वीची ०:३३ वाली नसीरची अदा..
आणि तो बसल्यावर त्या मुलीचं त्याकडे टक लावून पहाणं.. हाय!
आता त्या मुलीच्या खांद्यावर मान ठेवून नसीर एक झकास डुलकी घेतोय.

ह्या अदाकारीतून वाचलात, आणि शब्दांकडे लक्ष असेल तर पहिल्या ४० सेकंदांचं गाण्याशी नातं कसलं जुळून आलंय ते समजेल.
थोडं पुढे जाऊन नसीरच्या दिवास्वप्नांमधून वाट काढली की माझा दुसरा चित्रक्षण येतो.
१:१९ ला नसीरला जाग आलीये- आजूबाजूच्या बायका खिल्ली उडवतायेत, सहप्रवासी कुतूहलाने बघताहेत. एक साळसूदपणाचा मिश्किल आव आणत जणू आपण ह्या गावचेच नाही असं तो दाखवतो, आणि खूष होऊन खिडकीबाहेर नजर टाकतो. आणि ह्या दरम्यात त्याची सहप्रवासी कौतुकमिश्रीत स्मितहास्य आपल्यावर फेकते, आणि पुन्हा बाहेर पाहू लागते.
किती बघू आणि काय बघू! निव्वळ १० सेकंदांच्या खेळात मी मात्र उद्धवस्त होउन जातो.

३. इरफान आणि दु:ख
रोग हा चित्रपट लक्षात ठेवायचं काहीच कारण नाही. या चित्रपटाचं it came , no one saw it and it flopped असं काहीसं वर्णन चुकीचं ठरणार नाही.
पण अलिकडेच ह्यातलं एक गाणं पाहिलं आणि इरफानला दंडवत घातला. एक पोलीस इन्स्पेक्टर, त्याची एका मॉडेलशी झालेली फोटोरूपी भेट. पण त्या चित्रातलं सौंदर्यच त्याला वेड लावायला पुरेसं आहे.
पूर्ण चित्रपट आता आठवत नाही पण ह्या गाण्यतून इरफानचं दु:ख आणि त्याच्या छटा समोर येतात.

कॅफेमधला प्रसंग - त्या जोडप्याच्या बर्थडे सेलिब्रेशन्स बघून उमटलेलं स्मित, ओठांतून जीभ घोळवत (इरफान स्पेशल) टाळ्यांचा वेधक प्रयत्न आणि मान तुकवून त्यांच्या केकचा केलेला स्वीकार हे सगळं बाह्य रुपडं.
पण नंतर त्यांचा आनंद बघताना इरफानच्या १००० काजव्यांइतकी चमक असलेल्या डोळ्यांचा १:२४ ते १:२७ वाला अभिनय का-ति-ल.
काहीतरी अप्राप्य गोष्टीमागे भान हरपून धावण्याचं दु:ख. आणि ते कधीच मिळणार नाही हे कळून चुकल्यावर येणारी विमनस्कता. पुढे २:४० ते ३:१० त जीपमध्ये बसलेल्या इरफानला बघताना प्रत्यक्ष "विमनस्क" शब्दाला पडद्यावर पहातोय असंच वाटतं. ३:११ चा त्याचा आवंढा मलाही जाणवलाय.

तुमचे काही आवडते चित्रक्षण असतील तर जरूर सांगा!

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
4.333335
Your rating: None Average: 4.3 (3 votes)

प्रतिक्रिया

रोचक लेख. इतरांचे प्रतिसाद वाचण्यास उत्सुक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाचुन उत्सुकता वाढलीये.
घरी पोचुन व्हिडीयो बघतो. हाफिसातून अ‍ॅक्सेस इल्ले

बाकी चित्रक्षण हा शब्दही आवल्डा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

छान लेख. इतरांनीही असेच चित्रक्षण शेअर केलेले आवडतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या निमित्ताने "नुवो सिनेमा पाराडीसो" या इटालियन चित्रपटातला एक अविस्मरणीय चित्रक्षण आठवला.

अल्फ्रेडो हा एका छोट्याशा गावातल्या चित्रपटगृहात प्रोजेक्टर चालवणारा माणूस. अल्फ्रेडो आणि ७-८ वर्षांचा छोटा तोतो या दोघ्यांच्या सुंदर मैत्रीची कथा सांगणारा हा चित्रपट.

चित्रपटाचा खेळ बघता येत नाही म्हणून बाहेर ऊभे असलेले लोक गोंधळ करत असताना अल्फ्रेडो एक युक्ती करतो. प्रोजेक्टर चा reflector प्रोजेक्टर रूम च्या खिडकीतून बाहेरच्या दिशेला वळवतो आणि चित्र एका घराच्या भिंतीवर दिसू लागतं. प्रोजेक्टर रूम मधून हळू हळू बाहेर सरकत जाणारं चित्र, घराच्या भिंतीचा पडदा झाल्याने जणू काही जिवंत झालेला परिसर, त्यात आणखी speaker पण खिडकीत ठेवून लोकांना अजून आनंद देणारा अल्फ्रेडो, हे सगळं खूप जादुई वाटायला लागतं.

एकूणच हा सगळा भाग चित्रकर्त्यांनी खूप प्रेमाने आणि हळुवार हाताने चितारलाय. छोटा तोतो हे सगळं पाहून जसा भारावून जातो तसंच होतं माझं प्रत्येक वेळी हा चित्रक्षण पाहताना. काही चित्रपट पाहताना आपण खरोखर त्यातलंच एक पात्र आहोत असं मानायला लागतो, तर काही चित्रपटात आपण जे समोर घडतंय ते एकदम अलिप्तपणे, दुरून पाहतोय हे सारखं जाणवत राहतं. माझ्यासाठी हा चित्रक्षण पहिल्या प्रकारात मोडतो. त्या अल्फ्रेडो च्या जादूने मी प्रत्येक वेळी "तोतो" बनतो आणि त्या खिडकीत उभा राहून बाहेरच्या भिंतीवर चित्रपट पाहण्याची मजा चाखतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काही चित्रपट पाहताना आपण खरोखर त्यातलंच एक पात्र आहोत असं मानायला लागतो, तर काही चित्रपटात आपण जे समोर घडतंय ते एकदम अलिप्तपणे, दुरून पाहतोय हे सारखं जाणवत राहतं. माझ्यासाठी हा चित्रक्षण पहिल्या प्रकारात मोडतो

नक्कीच! पहिला गट म्हणजे उत्तम कलाकृती असं अतिढोबळमानाने म्हणू शकतो, ज्यात पात्रांची सुखदु:ख आपलीशी वाटतात.

आणि भिंतीवरून सरकत जाणारा चित्रपट सीन हे तर उच्चच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दुसऱ्या प्रकारात मोडणारा, "Lake Tahoe" नावाचा मेक्सिकन चित्रपट आठवतोय. "Pune International Film Festival" दरम्यान पहिला होता (बहुदा २००९, नक्की आठवत नाही!).

यात दिग्दर्शकाने जाणून बुजून प्रेक्षकाला अलिप्त ठेवलंय. कॅमेरा एका scene वर fix करायचा, प्रेक्षकांना वातावरण अनुभवण्याचा, पात्रांच्या आसपास काय असणार आहे याचा किंवा पुढलं नाट्य कुठे घडणार आहे याचा पुरेपूर अंदाज यायला वेळ द्यायचा, आणि मग त्या scene मध्ये पात्रं येऊन चित्रपटाची कथा त्या scene पुरती पुढे सरकवतात.… मग नव्या scene ला पुन्हा तीच वातावरणनिर्मिती! एकंदर चित्रपट यामुळे खूप कूर्मगतीने सरकत राहतो, पण तरीही बोर होत नाही. किमान मला तरी हा चित्रपट फार आवडला होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

http://www.youtube.com/watch?v=lrhNPS4nbmQ

र्हेट अन स्कार्लेटची भेट, त्यांची चकमकच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखाची कल्पना, लेख आणि प्रतिसाद आवडले.

'दस कहानियां'ची फित आज प्रथमच पाहिली. दहा मिनिटांमधली शेवटची, नानाच्या स्वगताची दोन-तीन मिनीटं उगाच आहेत. ती तिथे दरवाज्यापाशी जाते, नाना तिथे एका ठिकाणी बसलेला दिसतो. आजूबाजूला कबरी, एवढंच दाखवून पुरलं नसतं का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पुरलं असतं अन अधिक परीणामकारक झालं असतं. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कथेच्या दृष्टीने नक्कीच!
पण त्या शेवटच्या - स्मशानातल्या सीनमध्येसुद्धा - नाना बोलताना एकदा त्या फुग्याला जपून, सांभाळून हाताळत आपल्या बायकोशी बोलतो- तेपण माझं फेवरिट आहे Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

टिपलेले चित्रक्षण आणि त्यांचं वर्णन आवडलं.

'द ग्रॅज्युएट' या चित्रपटातलं शेवटचं मिनिट आठवलं. टिपिकल and they lived happily ever after शेवट न करता, हळूहळू वास्तवाचं भान येत चाललेल्या नवविवाहित जोडप्याचा:

अवांतर - मुक्तपीठीय 'पकडलेले क्षण' Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कंपनीत असो किंवा इतर कुठे, असे क्षण आयुष्यात बर्‍याचदा येतात, तेव्हा मी नेहमी ही क्लिप बघतो.

एक पुलिस इंस्पेक्टर जॉइंट कमिशनर के साथ क्या आर्ग्युमेंट कर सकता है?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अब तक ५६ हा संपूर्ण सिनेमाच "अफलातून" आहे. दोन फेवरिट संवाद-
spoilers

१. नाना आणि दुबईचा डॉन (प्रसाद पुरंदरे) ह्यांचा फोनवरील संवाद. एक नंबर- विशेषतः नाना मध्येच त्याच्या बायकोशी बोलतो आणि मग डॉनला "होल्ड"वर टाकतो वगैरे!
२. शेवटचा "strength and nuisance value" वाला भाग. ह्यात उंदीर मांजराचा खेळ चालू आहे, पण उंदराचा गैरसमज आहे की ते मांजर आहे, आणि हळूहळू ते उघड होतं. मग शेवटी- बघाच!

शिवाय फोन टॅप केला असताना हाती आलेला विनोदी ऐवज वगैरे रँडम गोष्टी तर भलत्याच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होय नाना आहे मग पहायचाच्च आहे.
_____
काल फेसबुकवर नानाच्या नावे हा लेख पाहीला. खरा खोटा माहीत नाही.-

"अप्रतिम लेख by नाना पाटेकर"

वयाच्या तेराव्या वर्षी, 1963ला नोकरीला लागलो. दुपारी शाळा संपली की घरी असेल-नसेल ते खाऊन दोनच्या सुमारास आठ किलोमीटर चालत जायचं. रात्री नऊ-साडेनऊ ते दहा वाजता पुन्हा आठ किलोमीटर चालत यायचं. घरी पोहोचायला साडेअकरा, कधीकधी बारा वाजायचे. पुन्हा सकाळी पावणेसहाला उठून शाळेला. नोकरीचे महिन्याला 35 रुपये आणि रात्रीचं एक वेळचं जेवण मिळायचं. जाताना एकदा आणि येताना एकदा असं दोन वेळा स्मशान लागायचं. कधीच भूत दिसलं नाही. पोटातली भूक भुतापेक्षा भयाण होती. कुठल्याही शाळेत न मिळणारा धडा, परिस्थिती शिकवत होती. हळूहळू कशाचीच भीती वाटेनाशी झाली. मरायचं नव्हतं. येणाऱ्या दुखऱ्या क्षणांना बेदरकार होऊन सामोरा जात होतो, पर्याय नव्हता.
रात्रीचं एक वेळचं जेवण गिळताना भाऊ आणि आई-वडिलांची आठवण यायची. ‘त्यांनी काही खाल्लं असेल का?’ असा वांझोटा विचार मनात यायचा आणि भुकेच्या वावटळीत भिरकावला जायचा.
अपरात्री परतत असताना रस्ता निर्मनुष्य आणि भयाण असायचा. तेव्हाची मुंबई वेगळी होती. एखादा दारुडा झिंगत माझ्या आडवा आला, तर त्याला चुकवून पुढे सरकताना मागून शिवी ऐकू यायची आणि मग मीसुध्दा मागे वळून आई-बहिणीवरून शिव्या द्यायचो. तो वळून पुन्हा शिवी द्यायचा. त्याचा तोल जात असायचा. अंतर राखून मी परतफेड करत असायचो. एखाद वेळी रस्त्यावरचा दगड कुठलाही विचार न करता भिरकावत असायचो. परिणामाची भीती नव्हती. उद्याचा विचार नव्हता. आला क्षण जगायचा होता, जसा जमेल तसा. कधी काळी कुणी मागे धावला, तर जमेल तसा पळूनसुध्दा जात असायचो. नंतर खूप अंतरावरून शिव्यांची उजळणी.
नकळत मरणाची भीती धूसर होत गेली. समोरच्याला जोखण्याची ताकद रुजली डोळयात. तेराव्या वर्षी तिशीची समज आली. कधीतरी अपरात्री घरी परतत असताना फुटपाथवर चाललेला शृंगार पाहताना किळस आणि शिरशिरी एकाच वेळी येत होती. मुलींच्या चेहऱ्यावरून नजर छातीकडे सरकायला लागली होती. पण का कोण जाणे, पोटातली भूक कधी खाली घरंगळली नाही.
भर दुपारच्या उन्हातून चालताना उडप्याच्या हॉटेलमधल्या वासाने चाल मंदावायची. क्षण दोन क्षण रेंगाळून पुन्हा चालायला लागायचो. एकदा जरा जास्त रेंगाळलो, तेव्हा आतून एका मुलाने दोन इडल्या ठेवल्या हातावर आणि मी ओरडलो होतो, ”मी भिकारी नाही.” तिथून निघाल्यावर पुढचा रस्ता धूसर झाला होता. रात्री झोपेतसुध्दा खूप रडलो, असं सकाळी आई म्हणाली. खूप खोदून विचारल्यावर मी खरं काय ते सांगितलं आणि शाळेत गेलो. दुपारी घरी आल्यावर खिडकीतून डोकावलं तर आई-वडील रडत होते. मी थोडा वेळ बाहेर फिरून मग घरी गेलो. तोपर्यंत पाऊस ओसरला होता.
मुलांसाठी काही करता येत नाही म्हणून वडील खूप खंतावायचे. बोलायचे नाहीत, पण आतून खूप खूप तुटायचे. त्या मानानं आई धीराची. मला वडिलांची खूप काळजी वाटायची. हळवे होते. माळकरी, कुठलंही व्यसन नाही, मांसाहार नाही. ही कमी पुढे मी पुरी केली. वडिलांचा व्यवसाय चांगला चालत असताना आम्हाला खूप नातेवाईक होते.
सुटीच्या दिवशी रात्रीचं जेवण घरच्यांसोबत. दोन चपात्या आणि डाळ. हिरवी मिरची खायचो. मग खूप पाणी. पोट भरायचं. आजही तिखटाची सवय सुटलेली नाही. चपातीच्या वासाची सर जगातल्या कुठल्याही फुलाच्या सुवासाला नाही. सणावाराला शेजारच्या घरातून गोडाचा वास यायचा. खावंसं वाटायचं. आज गोडाचा तिटकारा आहे. माणसंसुध्दा गोड वागली की संशय येतो.
अगदी जेवणाच्या वेळी ”कसं आहे?” अशी वांझोटी चौकशी करण्यासाठी मी कितीतरी वेळा मित्रांच्या घरी गेलेलो आहे.
माझी सगळयात गोड मैत्रीण भूक
काय नाही दिलं या मैत्रिणीनं?
त्या वयातला तो अप्रतिम प्रवास.
पावला पावलागणिक किती शिकवलं तिनं!
सारी शिकवण पोटातून.
माझ्या पौगंडावस्थेत माझ्यासोबत कायम झोपलेली ही एकमेव मैत्रीण. खरं तर मी शिणून झोपायचो. ती कायम जागी असायची. माझ्या जिवंतपणाची खूण म्हणून. माझी खात्री आहे, न कळत्या वयात ज्यांना म्हणून ही मैत्रीण लाभली, ती मंडळी खूप सुखावली असतील पुढील आयुष्यात.
खूपदा कुणीतरी खात असताना मी आवंढे गिळलेत. आपण खातोय ही कल्पनाच सुखद होती त्या वेळी. अभिनय म्हणजे काय सरतेशेवटी? कल्पनाच की! पुढे होऊ घातलेल्या नटाच्या ढुंगणावर परिस्थिती दुगाण्या झाडत होती.
गळयात दप्तर, पोटात भूक आणि पायात पेटके घेऊन वर्गात गेल्यावर खोडया काढणं हा एकमेव उपाय होता भूक विसरण्याचा. गुरुजींनी कायम ओणवा उभा केल्यामुळे फळयावरचे सुविचार मी उलटे वाचले. आजही या वयात कमरेचं दुखणं नाही. त्या गुरुजनांचा मी आभारी आहे, ज्यांनी मला पायाचे आंगठे धरायला शिकवले.
डोळयाजवळचा दुसरा अवयव कुठला? असा प्रश्न विचारला तर सामान्यत: नाक, तोंड, कान असं लोक म्हणतील. पण शालेय जीवनात माझ्या डोळयाजवळचा अवयव माझ्या पायाचे अंगठे होते. आजसुध्दा व्यायाम करताना पायाचे अंगठे पकडतो, पण त्या वेळची गंमत न्यारी होती.
माझ्या भुकेचे मला लाड नाही करता आले. सारखं काहीतरी मागायची खायला, पण मी तिला शेफारू दिलं नाही. खपाटीला गेलेल्या पोटात निपचित पडून असायची. नंतर नंतर तिला अर्धपोटी राहायची सवय झाली. गोडाधोडाकडे परक्यासारखं पाहायला लागली ती. आपले डोळेच बुजवून टाकले तिने. त्याचा फायदा असा झाला की, मी वेतासारखा शिडशिडीत झालो. गालाची हाडं वर आल्यामुळे बालपणीच्या अब्राहम लिंकनसारखा लुक आला थोडासा. गळयाजवळचा कंठमणी टकमक टोकासारखा बाहेर आला. सारखं पाणी पिण्याची सवय लागली. त्यामुळे किडनीचे विकार दूर पळाले. पाणी पिताना कंठमणी गमतीदार हलायचा. डोळे खोल गेल्यामुळे चेहऱ्याला वेगळीच खुमारी आली.
भुकेचा एक मित्र होता. ‘अपमान’ त्याचं नाव.
हा आला की खबदाडात गेलेल्या डोळयांना पाझर फुटायचा.
त्यामुळे डोळे स्वच्छ. कुठलाही विकार नाही.
खूप दूरचं लख्ख दिसायला लागलं.
रोजच्या चालण्यामुळे आरोग्य उत्तम.
मित आहारामुळे पचनेंद्रियांना योग्य तो आराम.
या सगळयाचा परिणाम म्हणजे सतत कूस बदलणारी उत्तम झोप, त्यामुळे मेंदू सतर्क.
माझ्या या मैत्रिणीला मी कुठेही घेऊन गेलो की तिथे अपमान हमखास टपकायचा. सुरुवातीला घाबरलो त्याला. नंतर वारंवार भेटल्याने सवय झाली. त्यानं मला चिंतन करायला शिकवलं. बरं, हा सर्वव्यापी. कुठेही, कधीही आणि कसाही पाठीराखा असल्यासारखा. पुढे यायचा कमी झाला, पण त्या आधी खूप शिकवून गेला.
(भूक आणि अपमान यांची खूप गट्टी. सगळीकडे बरोबरीनं जाणार. खूप दिवस मुक्काम होता माझ्याकडे यांचा. एकदा का जुळवून घेतलं या जोडगोळीबरोबर, की योगसिध्दी प्राप्त झाल्याचा साक्षात्कार होतो.)
अपमान हा कुठल्याही प्रसंगाकडे त्रयस्थपणे पाहायला शिकवतो तुम्हाला. सकाळ-संध्याकाळ अपमान पाण्याबरोबर गिळल्यास भूक शमते. असा स्थितीत कुठल्याही अंमली पदार्थाचं सेवन न करता उत्तम ग्लानी येते. एका वेगळयाच विश्वाचा फेरफटका घडून येतो. अपमान गिळताना सुरुवातीला थोडा त्रास होतो, डोळयातून पाणी येतं. पण एकदा सवय झाली की मात्र गोंडस कोडगेपणा येतो. एकदा तो आला की अपमान पचवता येतो आणि अपमान पचायला लागला की एक प्रकारची मेणचट, लोचट तुकतुकी येते चेहऱ्यावर. दिवस सरले.
‘अपमान आणि भूक’ विद्यापीठातून उच्च शिक्षण प्राप्त करून बाहेर पडलो. जगातली कुठलीही गोष्ट आता मला भिवडवू शकत नव्हती. कितीही उंचावरून फेकलं तरी चार पायावर पडणाऱ्या मांजरासारखा झालो मी. एक बेधडक निर्लज्ज हसू उगवलं माझ्या चेहऱ्यावर. माजुर्डी रग आली हालचालीत. मूठ वळण्यासाठीच असते, याची जाणीव झाली. समोरच्यालासुध्दा आपल्याइतक्याच वेदना होतात, ही उमज आली.
प्रत्येकाच्या आतडयात भूकेची वसवट आहे, याचा साक्षात्कार झाला.
अपमानाला जात नसते, याचा उलगडा झाला.
उभं राहण्याआधी प्रत्येक जण रांगतो, हे उमगलं.
उत्कर्षाच्या अलीकडच्या पायऱ्या आहेत भूक आणि अपमान.
आता मी पलीकडच्या तिरावर पोचलोय.
ही गुरू मंडळी अलीकडच्या तिरावर.
आता दुसऱ्यांची शिकवणी चाललीय.
अजून पुढचा तीर असेल कदाचित.
आज इथं एकटाच बसलो असताना मी या माझ्या गुरूंकडे पाहत असतो. माझ्या वाटेला येत नाहीत आता. ओळख नसल्यासारखे वागतात. पण मी त्यांना विसरलो नाही.

--
"दोन गुरु" - नाना पाटेकर

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अब तक ५६! असा पिक्चर पुन्हा होणे नाही…

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मकबूल सिनेमा अत्यंत आवडतो मला. त्यातला हा एक जबरदस्त प्रसंग. पंकज कपूरच्या चेहर्‍यावरचे बदललेले भाव बघण्यासारखे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

.
.
.

ह्या गाण्यातला सर्वात-भारी चित्रक्षण म्हणजे ३:१० च्या पुढे.
देव आणि नूतन बसले आहेत. २ कडव्यांएवढी नूतनची मनधरणी केल्यावर ती आता खूष आहे. देव तिच्या कानात कुजबुजतोय, सोबत एस डीचं संगीत सोबतीला फक्त गुणगुणतंय -
"बस्ती के दियों को बुझ जाने दे
लेहरा के न रुक रुक जाना"

म्हणताना देव तिच्या आणखीच जवळ येतो.
"चाहत का लबों पे नाम आने दे-" हे त्याच्या तोंडून इतक्या जवळून ऐकताना तिचे डोळे आपसूकच मिटले जातात-
मग पुढे बघाच Smile
एस डी चं संगीत - देवची खट्याळ हरकत - त्यानंतर नूतनचे विस्फारलेले सुंदर डोळे- चैन आहे नुसती!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाहाहा!!! मस्त आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विशाल भारद्वाज च्या उत्तमोत्तम चित्रपटांच्या यादीतला "The Blue Umbrella" हा चित्रपट म्हणजे रस्किन बॉंड यांची मस्त कथा, आणि पंकज कपूरचा ताकदवान अभिनय यामुळे विशेष! पत्र्याचं मोडकं "हाटेल" चालवणारा, लिंबाचं लोणचं प्रचंड आवडणारा, आणि जपानी निळ्या छत्रीसाठी लहान मुलासारखा हट्ट धरून बसलेला हिमाचली "खत्री" त्याने अगदी "खतरी" वठवलाय.

या सिनेमातला मला आवडणारा चित्रक्षण म्हणजे, खत्री त्या छत्रीच्या एवढ्या नादी का लागलाय ते त्याच्या नोकराला समजावून सांगत असतो तो. प्रत्यक्ष संवाद तर स्वप्नाळू आहेच, पण पंकज कपूरचे तेवढेच स्वप्नाळू डोळे "दिल" जिंकून जातात. स्वप्नरंजन करत करत एका क्षणासाठी त्याच्या नोकराला उद्देशून बोलायला त्याचे डोळे वास्तवात येतात, आणि पुढच्याच क्षणी पुन्हा स्वप्नात मग्न होतात, "कुछ पिछले जनम का संबंध है… छत्री और खत्री का!" असं म्हणत…

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

घरी गेल्यावर बघते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चार्ली चॅप्लीन च्या अनेक अजरामर चित्रपटांपैकी एक
त्यातील हा प्रसंग ..
www.youtube.com/watch?v=n_1apYo6-Ow

१९३६ साल चा हा चित्रपट . अधुनिकीकरणाची सुरूवात होत होती त्या वेळेचा
एका मशिन च्या डेमो साठी चार्लीला बोलावतात . आणि मग ...
यातील उच्च वर्गीयांची दादागिरी , त्यांची निर्विकार असंवेदनशीलता, त्या प्रसंगाच्या प्रेक्षकांची हतबलता , चार्ली ची असहायता आणि यातुन झालेली विनोद निर्मिती
विनोदाचा बादशहा वगैरे विशेषणे थिटी वाटावी अशी विलक्षण प्रतिभा

हा प्रसंग पहाताना सगळेजण हसत असतात , पण का कोण जाणे ? ... मी हसू शकत नाही . Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

तसा विनोदीच वाटला आहे हा प्रसंग.
दरवेळी खाणयंत्राची कामगिरी आटोपल्यावर शांतपणे येऊन तोंड पुसणारं यंत्र...ते बेष्ट!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लॉज ऑफ अ‍ॅट्रॅक्शन सिनेमा आवडला. या सिनेमात, खूप मजेशीर क्षण आहेत. पैकी माझा आवडता पुढील क्षण जेव्हा हिरविण जी की वकील आहे , पॅरॅनॉइड होऊन डायरेक पुरुष प्रसाधनगृहात शिरते अन हिरोची (तो तिचा प्रतिस्पर्धी वकील असतो)खरडपट्टी काढू पहाते. प्लीज हा सीन शेवटपर्यंत पहा. Smile -

https://www.youtube.com/watch?v=PJXQz5-Pqus
_____________

त्याच सिनेमातील हा क्षण पण मजेशीर आहे Biggrin ..... हिलॅरिअस!!!!
https://www.youtube.com/watch?v=4glpR60YDX0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0