राष्ट्रकुल स्पर्धा २०१४: ग्लासगो

आजपासून ग्लासगो येथे राष्ट्रकुल स्पर्धा सुरू होत आहेत, या ३ ऑगस्ट पर्यंत चालतील. २०१०मध्ये भारतात झालेल्या या स्पर्धांमध्ये भारताची कामगिरी खूपच चांगली झाली होती व ऑस्ट्रेलियापाठोपाठ भारताने दुसरे स्थान पटकावले होते. आता यावेळी काय होते ते पहायचे.

सदर धागा या स्पर्धेविषयी चर्चा, माहितीचे आदानप्रदान करण्यासाठी आहे. विजेत्या खेळाडुंचे अभिनंदन करण्यासाठी वेगळा धागा आहेच (दुवा शेवटी देतोय) त्याचा वापर करावा.
या स्पर्धेची माहिती जालावर उपलब्ध आहे- स्पर्धांचे वेळापत्रक इथे मिळेल. शिवाय या स्पर्धेचे मोबाईल अ‍ॅप इथून उतवऊन घेता येईल.

हा धागा आपण सगळ्यांनी मिळून चालवायचा आहे. जर तुम्ही एखादी स्पर्धा बघत असाल तर त्याचे अपडेट्स इथे टाकत रहा. मला वेळ मिळेल तेव्हा मी आगामी खेळ व झालेल्या खेळांचे निकाल इथे टाकत राहिनच. आजपासून या धाग्याद्वारे ताज्या घटना, पदक तालिका, व दर दिवसांचे खेळ या धाग्यावर देण्याचा प्रयत्न राहिल, तुम्हाला शक्य असल्यास तुम्हीही देऊ शकता. जर एखाद्या दिवसाची चर्चा रंगली किंवा एखाद्या दिवशी भारताचा मोठा सहभाग असेल तर त्या दिवसासाठी वेगळा धागा काढला जाईल.

या स्पर्धेतील काही खेळांची माहिती पूर्वी ऑलिंपिकच्या निमित्ताने लिहिलेली होती ती पुढील धाग्यांवर वाचता येईल. (सदर माहिती ऑलिंपिक्सच्या दृष्टिकोनातुन लिहिलेली आहे, मात्र जनरल नियम तसेच राहतील. यातील सगळे खेळ राष्ट्रकुल स्पर्धेला असतीलच असे नाही. पण जे आहेत त्यांना संदर्भ म्हणून दुवे देत आहे)
A-B C-E F-H I-S T U-Z

सदस्यांना राष्ट्रकुल स्पर्धेच्या बातम्यांबद्दल, एखाद्या नियमाबद्दल शंका विचारण्यासाठी किंवा संबंधीत विषयावर गप्पा मारण्यासाठी ही बातमी वाचलीत का?मनातील छोटे मोठे प्रश्न हे धागे उपलब्ध आहेतच. त्याचाही लाभ घेता येईल.

पदक तालिका

क्रमांक देश सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
इंग्लंड ५८ ५९ ५७ १७४
ऑस्ट्रेलिया ४९ ४२ ४६ १३७
कॅनडा ३२ १६ ३४ ८२
स्कॉटलंड १९ १५ १९ ५३
भारत १५ ३० १९ ६४

पदकविजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करण्यासाठी या धाग्याचा वापर करावा.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

हा प्रतिसाद खोडसाळ वाटण्याची शक्यता आहे तरीही - राष्ट्रकुल स्पर्धा म्हणजे (टू दि क्राऊन) गुलामगिरीच्या मानसिकतेचे निदर्शक आहे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सिंबॉलिक का होईना, पण गुलामगिरीचेच निर्देशक आहे. भारताने यांच्या पेकाटात एक लाथ घातली पाहिजे आणि बाहेर पडून एशियन, सौथ एशियन, आफ्रो-एशियन, युरेशियन, इ.इ. क्याटेगर्‍यांत भाग घेतला पाहिजे. तेहीं नसतां या इन्व्हेंट केल्या पाहिजेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ग्लासगोचा उच्चार असा अस्तोय व्हंय!

स्कॉटिश / गेलिक लोक जे बोलतात ते आजिबात कळत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

मला तर त्या उच्चारात सुप्त मराठी एक्स्प्लेटिव्ह दिसले बॉ Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मी ही अंदाजानेच दिलाय.
ɡlɑːzɡoʊ चा याहून वेगळा व प्रमाण उच्चार देवनागरीत कोणी लिहून दिला व इतरांचे त्याला अनुमोदन असेल तर तो मी आनंदाने बदलेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

यूट्यूब/गूगलवर 'हाऊ टू प्रोनाऊन्स अ-ब-क' शोधणे हा एक उपाय आहे.

उदा.-

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सगळ्यांचे आभार. उच्चारलेखन सुधारले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

उद्या २४ जुलै रोजी भारत कोणत्या खेळात असेलः

सायकलिंग :ट्रॅक (१ मेडल मॅच)
रिदमिक जिमनॅस्टिक्स (ऑल राऊंड प्रकाराचे एक मेडल)
हॉकी: महिला प्रिलिम्स (भारत वि. कॅनडा)
ज्युडो पुरूष: ६६ किलो (राऊन्ड ऑफ ३२), ६० किलो (राऊंड ऑफ १६) (या सर्व वजनी गटांत पुढे जिंकत गेल्यास दिवस अखेर पदकासाठी सामना)
ज्युडो महिला: ४८ किलो, ५७ किलो (राउंड ऑफ १६), ५२ किलो (थेट क्वार्टर फायनल)(या सर्व वजनी गटांत पुढे जिंकत गेल्यास दिवस अखेर पदकासाठी सामना)
लॉन बॉल: पुरूष ट्रिपल, महिला फोर्, महिला सिंगल (राउंड १ व २), पुरूष पेअर (राऊंड १),
स्क्वॅशः पुरूषसिंगल (राउंड ऑफ ६४) तीन मॅचेस (संधु, घोसाळ व माणगावकर यांच्या मॅचेस)
स्क्वॅशः महिला सिंगल (राउंड ऑफ ६४) भारत वि. केनिया
स्विमिंग
टेबल टेनिस (महिला) भारत वि. बर्बाडोस (ग्रुप मॅच)
टेबल टेनिस (पुरूष): भारत वि. वानुअटु
भरोत्तोलन (५६ व ४८ किलो): फायनल लिस्ट लागायचीये

या व्यतिरिक्त नेट बॉल व ट्रायथ्लॉनच्याही मॅचेस होतील ज्यात भारताचा सहभाग नसेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

भाप्रवे १:०० वाजता लॉनबॉल सुरू झाले.
लॉनबॉलः पूरूष आणि महिला दोघांच्याही लॉनबॉल मॅचेस चालु आहेत. पुरूष २-१३ (वि. स्कॉटलंड) व महिला ८-१५ (वि. फिजी) पिछाडीवर आहेत.
पुरूष ६-२७ (वि. स्कॉटलंड) पराभूत
महिला ८-१९ (वि. फिजी) पराभूत

आता काही मिनिटात भारत विरूद्ध घानाची बॅडमिंटन मॅच सूरू होईल,
पाच मॅचेस होतील आज भारताने पुरुपल्ली कश्यप, व्ही. पुसराला, देवलकर - चोप्रा जोडी, ज्वाला गट्टा नी मच्छिमंद जोडी, कदंबी - चान जोडी उतरवली आहे. घानासोबतचा सामना भारताला सहज जिंकता येईल असे वाटते.
सध्या भारताने दोन मॅचेस जिंकून २-० ची आघाडी मिळवली आहे.
भारताने सर्व बॅडमिंटन चे सामने जिंकत ५-० ने ग्रूप मॅच मध्ये घानावर विजय प्राप्त केला आहे.

टेबल टेनीस महिला टीम च्य मॅचेसही सुरू झाल्या आहेत. भारत १-० (वि. बार्बाडोस) ने पुढे आहे.
भारताने बार्बाडोसला ३-० ने हरवले आहे

ज्युडो स्पर्धा सुरू झाली आहे. अजून थोड्यावेळाने (२०-१५ मिनिटांनी) भारताच्या दोन वजनी गटातील स्पर्धकांची कामगिरी समजेल

६६ किलो वजनी गटात एम नंदाल याने माल्टाच्या खेळाडूना हरवत विजय प्राप्त करून राउंड ऑफ १६ मध्ये प्रवेश मिळवला आहे.
६६ किलो वजनी गटात एम नंदाल याने बार्बाडोसच्या खेळाडूला हरवत विजय प्राप्त करून क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश मिळवला आहे.
६० किलो वजनी गटात एन चाना याने ऑस्ट्रॅलियाच्या खेळाडूना हरवत विजय प्राप्त करून क्वार्टर-फायनल मध्ये प्रवेश मिळवला आहे.
६० किलो वजनी गटात एन चाना याने प्रतिस्पर्धी खेळाडूला हरवत विजय प्राप्त करून सेमी-फायनल मध्ये प्रवेश मिळवला आहे.

आता महिलांचे ज्युडो स्पर्धा चालु आहेत.
५७ किलो वजनी गटात शिवानीला कॅनडाच्या खेळाडूने राउंड ऑफ १६ मध्ये हरवले आहे
४८ किलो वजनी गटात एस लिक्माबाम हीने कॅमरूनच्या खेळाडूला हरवत विजय प्राप्त करून क्वार्टर-फायनल मध्ये प्रवेश मिळवला आहे.
४८ किलो वजनी गटात एस लिक्माबाम हीने प्रतिस्पर्धी खेळाडूला हरवत विजय प्राप्त करून सेमी-फायनल मध्ये प्रवेश मिळवला आहे.
५२ किलो वजनी गटात के. थोउडम हीने ऑस्ट्रॅलियाच्या खेळाडूला हरवत विजय प्राप्त करून सेमी-फायनल मध्ये प्रवेश मिळवला आहे.

नुकताच ट्रायथ्लॉन चा मेडल ईव्हेंट चालु झाला आहे. अजून काही वेळात पहिली मेडल्स घोषित होतील. सध्यातरी न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया व इंग्लंड पहिल्या ३ स्थानांवर आहेत. या स्पर्धेत भारत क्वालीफाय झालेला नाही.

स्विमिंगः १०० मीटर फ्रीस्टाईलमध्ये पी.करमरकर याने १:०४.८६ इतकी वेळ देऊन पाच जणांच्या हीटमध्ये चौथे स्थान पटकावले. पहिल्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूची वेळ ५५ सेकंदाच्या आसपास होती. अजून फायनल रँकिंग घोषित व्हायचे आहे पण अपेक्षेप्रमाणे १०० मी मधील आपले आव्हान संपल्यासारखेच आहे.

आता थोड्याच वेळात पुरूषांची टे.टे म्याच चालु होईल
टेटे पुरूषांचा संघ १-० ने आघाडीवर आहे.

आणखी काही वेळात (साडेचार वाजता) स्क्वॅश स्पर्धेत एम्.माणगावकर केनियाच्या खेळाडूशी भिडेल
महिलांच्या स्क्वॅश मॅच मध्ये ए. अलंकमोनी हिने प्रतिस्पर्धी केनियाच्या खेळाडूवर ३-० ने विजय मिळवत राउंड ऑफ १६ मध्ये प्रवेश केला आहे

======

>> सदर प्रतिसाद वेळ मिळेल तसा अपडेट करत जाईन. माझ्या अ‍ॅपवर येणारे अपडेट्स आहेत, थेट प्रक्षेपण बघत नाहिये.
>> तुम्हीही प्रतिसाद दिवसाच्या मुळ प्रतिसाला उपप्रतिसाद देऊन देऊ शकता

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

२०१०च्या दिल्लीतील स्पर्धांशी तुलना करताना काही बाबी लक्षात घ्यायला हव्यातः
१. आर्चरी व टेनिस (ज्यात भारताला मेडल मिळत असे) यावेळी समाविष्ट नाहित. गेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत हे दोन खेळा मिळून आपण तब्बल १२ पदके जिंकली होती.
२. शुटिंग आणि कुस्ती मधील स्पर्धा प्रकारही कमी केले आहेत
३. या वेळी आपण होम कंट्री नाही. त्यामुळे नुसत्या वातावरणातच नाही तर सहभागी खेळाडूंच्या संख्येवर आपोआप मर्यादा येते. होस्ट कंट्री प्रत्येक प्रकारात आपले खेळाडू उतरवु शकतो.

तेव्हा अर्थातच २०१०च्या दिल्लीतील खेळांइतकी कामगिरी होणे कठीण वाटते आहे.
अर्थात, ही पदके सोडली तर गेल्यावेळी जिंकलेली पदके टिकवता आली व काही नव्या स्पर्धांत पदके मिळाली तरी आपली कामगिरी चांगली झालीये हे म्हणता यावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सध्या वेळ मिळाला की दर २ तासातून एकदा तरी अपडेट्स द्यायचा प्रयत्न करतोय. दरवेळी जमेलच असे नाही.
पण प्रश्न असाय हे अपडेट्स कोणी वाचतंय का ते समजायला मार्ग नाही. का अशा अपडेट्सपेक्षा रोज सकाळी एकदा आजचे होणारे खेळा (त्याच्या वेळा) व आदल्या दिवसाचे रिझल्ट्स एकदाच वाचायला आवडतील?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

Judo आणि Weightlifting या खेळांमधील अप्रतिम कामगिरीमुळे भारताची पदक संख्या ७ झाली आहे हो!!!!!!!

ऋषिकेश यांना -
मुळात धागा सुरू केल्याबद्दल धन्यवाद! त्यामुळेच उत्सुकता निर्माण झाली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहमत आहे. फक्त ज्युडोमध्ये काल एन.चानाची फायनल बघत होतो. त्याला पेनल्टी कार्ड्स मिळाली ती योग्य असली तरी प्रतिस्पर्ध्याला आणखी दोन कार्डे अपेक्षित होती, शिवाय पंचांचा निर्णय निर्णय चुकल्याने मधे मिनिटभर नुसतेच दोघे उभे होते ज्यात टेंपो हरवतो. Sad
एकुणात फायनल तुल्यबळ असली तरी चाना किंचित वरचढ होता असे माझे (आणि समालोचकांचेही) मत होते, पण दुर्दैआने तोपराभूत झाला नी आणखी एक गोल्ड निसटले

भारोत्तोलनातही, ४८ किलो महिला गटात आपले १ गोल्ड व १ सिल्वर नक्की झाले होते. फक्त चानु सायखोम (जीला सिल्वर मिळाले) तिने शेवटच्या प्रयन्तात तब्बल ९८ किलो स्नॅच अँड जर्क उचलले होते. माझ्यासारख्या प्रेक्षकांनाच काय, समालोचकांना, तिच्या कोचेसना, प्रेक्षकांना व तिला स्वतःलाही गोल्ड जिंकल्यासारखे वाटले. पण तीन जजेसपैकी दोघांना ती "फेअर लिफ्ट" न वाटल्याने तो प्रयत्न गणला गेला नाही व तिला सिल्वरवर समाधान मानवे लागले. असो.

पहिला दिवस ७ पदके, ही कामगिरी चांगली असली तरी या दोन्ही बाबतीत पंचांचे निर्णय मला समजले नाहीत. (म्हणजे ते चुकीचे असतील असे नव्हे, फक्त ते मला समजले नाहित)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आज २५ जुलै रोजी भारत कोणत्या खेळात असेलः

बॅडमिंटन
बॉक्सिंगचे सामने आजपासून सुरू होतील. भारताल याही प्रकारात पदकांची आशा आहे
सायकलिंग :ट्रॅक (१ मेडल मॅच)
हॉकीमध्ये आज पुरूष गटात भारताचा सामना वेल्स बरोबर असेल
ज्युडो पुरूष व महिला गटात वेगळ्या वजनी गटांच्या मॅचेस असतील. काल या प्रकारात आपण पदके जिंकल्यानंतर आजही या प्रकारात पदकांची आशा आहे. अर्थात, वजनी गटात आपण जसजसे वर जाऊ लागतो आपला पर्फॉर्मन्स कमी होत जातो असा पूर्वानुभव आहे.
लॉन बॉल: पुरूष ट्रिपल, महिला फोर्, महिला सिंगल (राउंड १ व २), पुरूष पेअर (राऊंड १),
स्क्वॅशः महिला व पुरूष दोघांच्याही ग्रुप मॅचेस होतील, तसेच सिंगल्सही होतील
स्विमिंग
टेबल टेनिस (महिला) व पुरूषांच्या मॅचेस होतील
भरोत्तोलन इथेही वेगळ्या वजनी गटाच्या मॅचेस होतील. याही प्रकारात वजनी गटात आपण जसजसे वर जाऊ लागतो आपला पर्फॉर्मन्स कमी होत जातो (व नायजेरियन्स पदके जिंकू लागतात) असा पूर्वानुभव आहे.
शुटिंगच्याही स्पर्धा सुरू होतील. यातही भारताला बर्‍यापैकी पदकांची अपेक्षा आहे.

या व्यतिरिक्त नेट बॉलच्या मॅचेस होतील ज्यात भारताचा सहभाग नसेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आतापर्यंतः
हॉकी: भारताने वेल्सना ३-१ ने हरवले
लॉनबॉलः महिलांची चौघींची टिम मलेशियाकडून १३-१९ने, तर तीन पुरूषांची टिम नमिबियाकडून १५-१२ने पराभूत
ज्युडो: पुरूष: ७३ किलो गटात बी. सिंग राउंड ऑफ ३२ मध्ये मोझंबिकच्या खेळाडूकडून पराभूत
ज्युडो: पुरूष: ८१ किलो गटात व्ही. विकेंदर सिंग राउंड ऑफ ३२ मध्ये कॅमरूनच्या खेळाडूकडून पराभूत
ज्युडो: महिला: ७० किलो गटात एस्.हैद्रोम राउंड ऑफ १६ मध्ये विजयी क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश
ज्युडो: महिला: ७० किलो गटात एस्.हैद्रोम क्वार्टर फायनलमध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडूकडून पराभूत रीपीज स्पर्धा जिंकल्यास ब्रॉन्झसाठी ट्राय करता येईल
ज्युडो: महिला: ६३ किलो गटात जी.चौधरी क्वार्टर फायनलमध्ये स्कॉटिश खेळाडूकडून पराभूतरीपीज स्पर्धेतही ब्रिटीश खेळाडूकडून हरल्याने स्पर्धेतून बाहेर

टेबल टेनिसः महिला टीमने केनियाला ३-० ने हरवले. भारत गटात सर्वोत्तम.
टेबल टेनिसः पुरूष टीमने गयानाला ३-० ने हरवले. भारत गटात सर्वोत्तम.

सध्या लॉनबॉलच्या दोघांच्या पुरूष टीमची मॅच फिजी सोबत चालु आहे ८-८ तुल्यबळ फाईट चालु आहे.
स्क्वॅशः सध्या जे चिन्नप्पा हिची महिलांच्या राउंड ऑफ १६ मध्ये न्यूझीलंडच्या खेळाडूबरोबर मॅच चालु आहे. पहिला सेट हरून चिन्नप्पा ०-१ ने पिछाडीवर आहे.

संध्याकाळी बॉक्सिंग व शुटिंगच्या पुढच्या फेर्‍या सुरू होतील तेव्हा पदकाच्या अपेक्षा वाढतील. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मस्त रे ऋ. गेम न पाहिले तरी हिकडं पाहून मजा येते तेवढीच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

गेले काही दिवस जाल अ‍ॅक्सेस करत नसल्याने अपडेट्स दिले नाहित. आता पदक तालिका अपडेट केली आहे.
काही महत्त्वाचे बदलः
-- काल इंग्लंडला प्रथम स्थान सोडावे लागले व ऑस्ट्रेलियाने दरवेळेप्रमाणे त्यावर कब्जा जमवला आहे
-- भारत आठव्या स्थानापर्यंत घसरला होता. आपल्याला बरीच जास्त रौप्य पदके आहेत. त्यांना शेवटच्या क्षणी सुवर्ण पदकांत कन्व्हर्ट करणे जमत नैये. काल मिळालेल्या तीन सुवर्ण पदकांनी आता पुन्हा ६व्या स्थानी आलो आहोत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

कालही भारत चार वजनीगटात, कुस्तीच्या अंतिम सामन्यांपर्यंत पोचला नी हरला. चार रौप्य पदके वाढली वात्र सुवर्णाचा वेध घेता आला नाही Sad
आता साउथ आफ्रिका ९ पदकांसह आपल्या मागे केवळ एकाच सुवर्णपदकाने आहे. आज सुवर्णपदके मिळाली तरच ६ वा क्रमांक टिकवता येउ शकेल (नायजेरीया सुद्धा ६ सुवर्णपदके घेऊन फार लांब नाही. अ‍ॅथलेटिक्स खेळ जसजसे रंगात येतील नायजेरियाची पदके वाढू लागतील)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

थाळीफेक स्पर्धेत काल शिव गौडा याने सुवर्ण तर महिलांच्या कुस्तीत बबिता कुमारी आणी एस. दत्त हिने मिळावलेल्या सुवर्णपदकांमुळे भारताच्या पदकतालिकेत वाढ तर झालीच, एका मानांकनाने प्रमोशन झाले Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

काल स्पर्धा संपली. १५ सुवर्ण व एकुण ६४ पदकांसह भारत पाचव्या स्थानावर राहिला.
अ‍ॅथलेटिक्समध्ये, स्क्वॅश, पुरूष एकेरी बॅडमिंटन वगैरे खेळात मिळालेली सुवर्णपदकं विशेष होती.

आता काही आकडे पाहुया:

-- यावेळी सर्वाधिक पदके नेमबाजी (शुटिंग)ने (१७) तर सर्वाधिक सुवर्णपदके (५) कुस्तीने दिली
-- गेल्या चार स्पर्धातील ही आपली सर्वात कमी सुवर्णपदके आहेत, तसेच सर्वात खालचे स्थान आहे (२००२ मध्ये ३० सुवर्णांसह चौथे, २००६- २२ सुवर्णांसह चौथे, २०१० - ३८ सुवर्णांसह दुसरे स्थान होते)
-- यंदा आतापर्यंतच्या खेळातील सर्वाधिक रौप्य पदके भारताने पटकावली आहेत. अर्थात फायनलला सर्वाधिक पराभव यावेळी आपल्याला लाभले. त्याच्या अर्धे+१ पराभव जरी टाळू शकलो असतो तरी ३० सुवर्णांसह आपण ३र्‍या स्थानी असतो (दोन फायनल कॅनडा विरूद्ध हरलो)
-- शुटिंगमधील काही क्रिडाप्रकार कमी झाल्याने आपल्याला मोठा तोटा झाला (किमान ५ पदके)
-- अ‍ॅथलेटिक्समध्ये सुवर्णपदक आशादायी आहे.
-- १९९०सालापासून दरवेळी प्रथमस्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियाचे प्रथमस्थान बर्‍याच काळाने हिसकावले गेले.

====

सर्व विजेत्यांचे अभिनंदन करतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ह्या स्पर्धेतली २५ उत्तम छायाचित्रे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काहीकाही छायाचित्रे कसली सुंदर आहेत. धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सिल्वर मेडल्सवरून हे आठवलं. थोडसं क्रौर्यपूर्ण आहे पण मजेशीर आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

Smile फारच मस्त टेक आहे, परत पहायला मजा आली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0