मातेचे ऋण

बर्‍याच पूर्वी लिहीलेली अन ऐसीवर न टाकलेली एक कविता-

A builder builded a temple
he wrought it with grace & skill
pillars & groins & arches
all fashioned to work his will
men said as the saw it's beauty,
"it shall never know decay
great is thy skill o builder!
thy fame shall endure for aye!"

A mother builded a temple
with loving & infinite care
planning each arch with patience
lying each stone with prayer
None praised her unceasing efforts
none knew of her wonderous plan
for the temple the mother builded
was unseen by the eyes of man

Gone is the builder's temple
crumpled into the dust
low lies each stately pillar
food for consuming rust
but the temple the mother builded
will last while the ages roll
for that beautiful unseen temple
was a child's immortal soul

वरील कवितेवर आधारीत माझी कविता -

कलाकार घडवे सुघड मूर्ती
ओतुनी आपुले कौशल्य
पणास लावे कसब सारे
कणकणात डोलवे चैतन्य||१||
_____

रंगरंगोटी जरी करीतसे
करीतसे कलेची कुसर जरी
परंतु कालांतराने तरी
माती होतसे मूर्ती तरीही||२||
_____

जननी घडवे घडा सुबकसा
राऊळातील जणू कलश असे
कठोर संयम, त्याग, शिस्त अन
अथक परीश्रम त्यात वसे||३||
______

अनंत काळापर्यंत उजळे
अलौकीक तेजाने तो घडा
देई स्फूर्ती, चैतन्य, आदर्श
जगास अपुल्या आचरणा||४||
______

कलाकार दिसतसे जगासी
माता जरी ती दिसत नसे
जगतावरचे बहुमोलाचे
मातेचे ऋण फिटत नसे||५||

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

रुपांतर नै जमलेय असे वाटले. स्वारी. Sad
मुळ कवितेत जरा वेगळा भाव आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

असू शकेल पण मला तर एकच अर्थ वाटतोय Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अर्थ म्हणजे अर्थच्छटा, मुळ कवितेत आईचे मंदिर म्हणजे अपत्याचा घडवलेला अमर्त्य आत्मा आहे (that beautiful unseen temple
was a child's immortal soul) जे या कवितेत येत नाही.
दुसरे असे की कलाकार मुर्ती घडवणे आणि आईने मुलाला घडवणे असे रुपांतरात आले आहे, तर मुळ कवितेत एका स्थापत्यकाराने मंदीर नी आईने आत्मा - अर्थात नाते म्हणा, संस्कार म्हणा किंवा अशी काहितरी अमूर्त तरीही अक्षय चीज बनवल्याचे कवी सांगतो आहे, रुपांतरात हा भाव हरवतोय. अजूनही आहे.

तुमचे रुपांतर वेगळी कविता म्हणून वाचली तर खटकणार नाहि सुद्धा, माझा अभिप्राय रुपांतरापुरता आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मी वाचून पाहीन पूर्वी लिहीली होती. पण बहुधा मलाही तुमच्यासारखेच वाटलेले स्मरते. म्हणूनच "आधारीत" शब्दाचा आधार घेतला Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0