अनंतहस्ते कमलावराने ....

पूर्वी अन्यत्र प्रकाशित केलेली पण ऐसीवर न टाकलेली मुक्तछंदातील माझी आवडती कविता -
_____________________________________________

एखाद्या धुंद सायंकाळी पश्चिमा केशराने माखलेली असताना
गुलमोहोर माणकासारख्या जर्द लाल फुलांनी पेटलेला, बहरलेला असताना,
तुझा हात हातात घेऊन तो तेजाचा गोळा,
डोंगररांगांखाली बुडताना पहायचाय.
.........
एखाद्या प्रसन्न, सुगंधी पहाटे,
तळ्यातलं शुभ्र कमळ आपले ओठ उघडून,
पहील्यांदा आकाश चुंबत असेल तो क्षण तुझ्यासमवेत टिपायचाय.
............
जमलं तर कधी डोंगरमाथ्यावर,
रात्री लक्ष लक्ष तारका पहात जागरण करायचय.
अफाट आकाशगंगेत हरवून जायचय तुझ्या सोबत.
......................
खरं सांगायचं तर काहीच पुरेसं वाटत नाही.
एवढ्याशा कुडीत तुझ्याबद्दलचं प्रेम, भावना मावतच नाही.
तू दिसतोस, भासतोस सगुण , साकार
पण जाणवतोस निराकार, अथांग, अमर्याद
अन माझी स्थिती नेहमी

"अनंतहस्ते कमलावराने
देता किती घेशील दो कराने"

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (4 votes)

प्रतिक्रिया

अजून धागे आज तरी टाकत नाही. कल्जी करु नये Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहाहा! काय उत्तम लिहिलंय!
"केशराने माखलेली" मस्तच Smile

एखाद्या प्रसन्न, सुगंधी पहाटे,
तळ्यातलं शुभ्र कमळ आपले ओठ उघडून,
पहील्यांदा आकाश चुंबत असेल तो क्षण तुझ्यासमवेत टिपायचाय.

ही कल्पनाही लाजवाब! नेमका मूड पकडणारी

लकी "ही"! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

छान.
-----------------
बादवे - कमलावर म्हणजे कोण?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

कमलावर = विष्णू कारण कमला = लक्ष्मी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वा! मस्त!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0