वैचारिक वगैरे

प्रस्तावना -
एका खुशालचेंडू ऐसी-वाचकाने करमणूकीसाठी म्हणून हा धागा (अनावधानानेच अर्थात) उघडला.
त्यानंतरची मनस्थिती वर्णन करणारे हे करूण काव्य आम्हाला आमच्या गुहेबाहेर सापडले.
ते इथे देतो आहे.

=======================

कोण उन्हाळा भण्ण दुपारी
चालू होता फुल्लटू एसी-
टंकत टंकत कामावरती
वाचत बसलो होतो ऐसी!

लेखामागून लेख आडवे
धाग्यांनाही फुटती धागे
नव्या नव्या त्या श्रेणी येती
रोचकवांतर आगे मागे.

धागे कसले धगधगते हे
वैचारिकसे अग्निकुंड
टंकत त्वेषे अपुली प्रतिमा
हर एकाचे नवेच बंड

'विंदा' समजुनि वाचू गेलो
हाय! तो असा 'विदा' निघावा?
छंद कोणसा बाळगितसे जो
आलेखांचा भुगा पडावा?

टीपा अन् तळटीपांनाही
कमी न येथे पानोपानी
डोळे करती आर्त विनवणी
होता अक्षर वरती-खाली

वा़क्यामागुनि वाक्य चालली
प्यारेसुद्धा संपत येति!
इतुके सारे होउनिसुद्धा
दिग्गज म्हणति "नेति नेति"

अहोरात्र कुणी ऐसीवरति
विचार टंकीत असतो जागा
तुंबत जाते वाचनीयता
वाहत जातो विचार धागा...

field_vote: 
4.8
Your rating: None Average: 4.8 (10 votes)

प्रतिक्रिया

आयला कसली गेय अन चपखल कविता आहे. बाकी खुशालचेंडू संकल्पने बद्दल एक वाक्य मला अति प्रिय आहे -

“You show me a lazy prick who's lying in bed all day, watching TV, only occasionally getting up to piss, and I'll show you a guy who's not causing any trouble.”

― George Carlin, Brain Droppings

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कार्लिन मस्त आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होय त्याची २-३ पुस्तके वाचली आहेत. व एक इतकं आवडलं की माझ्या एका मित्राला पुण्यात पाठविले होते. टवाळ गिरी, मिष्किलपणा, तिरकसपणा, बुद्धेमत्ता सगळच थोर आहे.

इतुके सारे होउनिसुद्धा
दिग्गज म्हणति "नेति नेति"

__/\__

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कार्लिन माझा ही फेव्ह.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

_/\_ केवळ थोर!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

कविता मस्त आवडली रे जांबुवंता! गेयता उत्तम आहेच, थोडी शरदिनीतैंची आठवण करून देणारीही वाटली Wink

उदा. डुडुळगावचा गोलंदाज.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

भरून पावलो!
पण "त्या" लेवलला पोचणं अशक्य आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाहाहा. ते आहेच म्हणा.

पण तिथे नुस्तीच गेयता, तुझ्या कवितेच्या गेयतेमुळे शरदिनी आठवली इतकेच. हिकडं आशयही जबराट.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

होय तिथे दुर्बोध गेयतेची मजा इथे आशयपूर्ण गेयतेची. असेच म्हणते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शरदिनीतैंचा बुरखा दूर झाल्यानंतर त्या कवितांवरचे प्रतिसाद वाचायला जास्त मजा येते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी अगदी!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अहोरात्र कुणी ऐसीवरति
विचार टंकीत असतो जागा
तुंबत जाते वाचनीयता
वाहत जातो विचार धागा...

हाहा, मस्त! Smile

वा़क्यामागुनि वाक्य चालली
प्यारेसुद्धा संपत येति!

बॅटमॅन आणि इतरसंस्थळविहारी मंडळींना यात एक अपघाती कोटी सापडावी Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा हा हा, अगदी अगदी ओ नंदनशेठ Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

प्यारेसुद्धा संपत येति!
........हो ना ! एकदा जीभ जड झाली की 'र' काय 'ल' काय सारखेच..

.......बॅटमॅन आणि इतरसंस्थळविहारी मंडळींना यात एक अपघाती कोटी सापडावी
........या नंदनशेठना अपघातातही कोट्या सापडतात ! काही दिवस थालेपारट म्हणून अक्कलकोटला पाठवून द्यायला हवे. Wink
----------------
अस्वलभाऊ कविता मस्त. कवितेचे नांव 'फुल्लटू एसी' ऐसे ठेवायला हरकत नाही. Smile
बाकी दिवसभर/रात्री काय चरता हो तुम्ही ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्हाला फुल्लटू ऐसी म्हणायचं होतं का ? J)

बाकी दिवसभर/रात्री काय चरता हो तुम्ही ?

मदारी दरवेशी देईल ते खातो झालं...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नव्हे.
खूप झाले वैचारिक, आता कवितेवाटे थोडी 'ठंडी हवा आन्दे' म्हणत 'एसी'च.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हो ना ! एकदा जीभ जड झाली की 'र' काय 'ल' काय सारखेच..

"तुल्यास्यप्रयत्नं सवर्णम्" चे उदा. सांगताना खुद्द कात्यायनसाहेबांनी "ऋलृवर्णयोर्मिथ: सावर्ण्यं वाच्यम्" असे सांगितले आहे, तस्मात र-ल च्या सारखेपणासाठी फक्त जीभ जड होणे जरूर नाही. Smile

पण नंदनशेठना अक्कलकोटला पाठवले तर ते नव्या अकलेने अजून कडे'कोट' सोडतील आपल्यावर, तेव्हा ते नकोच. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मस्त

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Somewhere in the world a woman gives birth to a child every minute. We have to find this woman and stop her.

च्या चालीवर -

अहोरात्र कुणी ऐसीवरति
विचार टंकीत असतो जागा

- कोण आहे तो, आवरा त्याला!!! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Somewhere in the world a woman gives birth to a child every minute. We have to find this woman and stop her.

भाषेचे दौर्बल्य.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

झकास कविता. _/\_

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

च्यायला, इथे आमचा जीव जातो टंकून अन बॉसच्या नजरा चुकवून आणि याना थट्टा सुचताहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

अस्सं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

काय जबरदस्त कविता आहे! दंडवत!

डुडूळगावच्या गोलंदाजाची आठवण मलाही झाली. शर्दिनीदादांना परत कविता पाडायला प्रवृत्त केलं पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

वा!
("अग्निकुंड"मध्ये एका मात्रेची समिधा कमी पडली. म्हणून दिग्गज सुद्धा चुकार मात्रा इकडेतिकडे शोधत "नेति नेति" म्हणत असावेत का?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

थोर वैचारिक, प्रासादिक, आंतरिक उर्मीपूर्ण वगैरे काव्य.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मार्मिक वगैरे... Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कहर आहे _/\_

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जब्रा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

अरेच्च्या, ही कविता वाचायचीच राहिली होती. त्यावरून 'आम्ही कोण' ही कैफियत आठवली. त्याहीपलिकडे जाऊन आम्हाला असले प्रश्न विचारण्याची जुर्रत करणारे तुम्ही कोण? असाही प्रश्न विचारलेला दिसला. पण सध्या तरी तसा प्रश्न विचारण्याची गरज वाटत नाही म्हणून आम्ही कोण एवढंच सांगतो.

आम्ही कोण म्हणून काय पुसता आयाळ पिंजारल्या?
ब्लॉगी, आंतरजालि लेख न तुम्ही का अामुचा वाचिला?
धागा संस्थळि ज्या ज्वलंत समिधा-काड्यांमुळे पेटला,
आम्ही होत तयांस सारत तरी का ना तवे देखिल्या?

ते आम्ही - नवबाजु दावुन तुम्हा विस्फारवू लोचने
ते आम्ही - करु प्रश्न सूतसरळा - मल्टीवेरीएटरी
डोळ्यादेखत घालुनी दरवडा आम्ही गुगालाघरी
त्याचे विद्धन वापरून सजवू ऐसी सदा अक्षरे

वीद्याची भरगच्च घेउनि सदा काखोटिला पोतडी,
दावू काढुनि ग्राफ तळ्टिपा आम्हीच लेखांमधे,
सत्याचे घट बैसवून करु या आम्ही तयांचा 'उदे'
ना-सत्त्यावर एकटेच तुटुनी की लोंबवू चामडी!

आम्हाला वगळा-गतप्रभ झणी होती विदावादळे!
आम्हाला वगळा-खलास चर्चा - बाकी मुकी अक्षरे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अल्ला! मार डाला Smile मस्त! मस्त!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मनोरंजक

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

कृपया आपल्या मागील पंजांचा फटू द्यावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0