प्रेम

चार वर्षांपूर्वी अन्यत्र लिहीलेला लेख येथे टाकत आहे. आता जरी विचार थोडेफार बदलले असले तरी या लेखात ओळखीची धग की धुगधुगी अजुनही जाणवते आहे. त्यातच या लेखात प्रकट झालेल्या सचोटीचे रहस्य असावे किंवा मी तरी अजून फार बदलले नसावे Smile व्हॉटेव्हर!!!

______________________________________

"प्रेमाची व्याख्या कशी करशील?" मी मैत्रिणीला विचारलं
एक जण आत्मविश्वासानी म्हणाली - "सोप्प आहे प्रेम अथांग समुद्रासारखं असतं. सर्व चूका पदरात घेणारं. परमेश्वराच्या कृपेसारखं"
दुसरी जरा अवखळ होती, म्हणाली "शुचि प्रेम मला झर्‍यासारखं वाटतं ग. येणार्‍या वाटसरूला निर्मळता बहाल करणारं, सदोदीत खळखळून वहाणारं."
ह्म्म .... माझं काही या उत्तरांनी समाधान झालं नाही.
पुढे काही मैत्रिणींनी देखील अशीच उत्तरं दिली - कडक उन्हात सावली देणार्‍या वृक्षासारखं परोपकारी तर कुणी म्हटलं शीतल चांदण्यासारखं.
मी ठरवलं व्यक्ती तितक्या प्रेमाच्या व्याख्या.
पण मग माझी प्रकृती कशी? माझं का समाधान होत नव्हतं कोणत्याच व्याख्येनी? मला जी तीव्रता, अनिवार आकर्षण, इच्छा , प्रेमाची स्वतःमधे सर्वस्व विलीन करून टाकण्याची ताकद हे प्रेमाचे पैलू कळत होते त्यावर कोणाच कवीनी काही लिहीलं नव्हतं की माझं वाचन कमी पडत होतं? नक्कीच माझं वाचन कमी पडत होतं.
मधे काही काळ .... खूप काळ गेला ज्यात मला प्रेमाला उपमा मला रुचेल अशी उपमा माहीत नव्हती.
समुद्र, झरा, झाड, चांदणं या उपमा मला रुचत नव्हत्या.
पण एक गंमत झाली - कारमधून फिरायला जात असताना माझ्या मुलीनी तिला आवडणारं एक "कन्ट्री सॉन्ग" लावलं. जे मी ऐकलं आणि परत लावलं, परत लावलं, परत परत परत लावत राहीले इतक्या वेळा की नवरा म्हणाला "काय हे कितीदा ऐकणारेस? काहीतरी आपलं चळ लागल्यासारखं!"
हा हा .... मला चळच लागला होता. कारण मला प्रेमाची चपखल व्याख्या सापडली होती.
जॉनी कॅश चं हे ते गाणं "रिंग ऑफ फायर"-
Love is a burning thing
And it makes a fiery ring
Bound by wild desire
I fell into a ring of fire .....

I Fell Into A Burning Ring Of Fire
I Went Down, Down, Down
And The Flames Went Higher

The Taste Of Love Is Sweet
When Hearts Like Ours Meet
I Fell For You Like A Child
Oh,But The Fire Went Wild

अतिशय इन्टेन्स आणि सु-रे-ख गायलेलं हे गाणं आहे एकेकाळी टॉप वर असलेलं. जरूर ऐका.

http://www.youtube.com/watch?v=mIBTg7q9oNc

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

आमच्या कंपूतील चर्चोत्सुक मंडळींपैकी एकाचा सगळ्या 'कपल' लोकांना हा एक पेटंट प्रश्न असे- की बाबारे, तुम्ही एकमेकांवर करता तेच प्रेम असं तुम्हाला कधी आणि कसं कळलं?
"तसं सांगता येत नाही ते. प्रेम होऊन जातं" इत्यादी उत्तरं ऐकल्यावर हा मित्र विचारी की मग तुला ती आणि तिला तू आवडतोस, बरोबर?
"हो"
"मग तसं आणि नेमकं तेच म्हणा की. प्रेम वगैरे काँप्लेक्स गोष्टी कशाला बोलताय?"
"कारण आम्ही खरंच प्रेम करतो एकमेकांवर. आवडणं वेगळं आणि प्रेम वेगळं".
"प्रेम या शब्दाचा अर्थ न कळूनसुद्धा? कठीण आहे."

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0