वाळवणी, ़कॅनिंग, लोणची, मुरांबे वगैरे.

इथे उत्तरेला थंडीच्या देशांत उन्हाळ्यात निसर्ग अगदी दोहो हातांनी फळफळावळ, भाज्या, फुले यांचे दान देत असतो. एकदा हिवाळा सुरु झाला म्हणजे मात्र साठवलेले बटाटे, बीट, गाजरे वगैरे सोडून काही म्हणजे काही स्थानिक भाज्या-फळे मिळत नाही (तीन फूट बर्फाखाली -३०से. तापमानाला काय पिकणार म्हणा!) त्यामुळे उन्हाळ्यात मिळणार्या या भरगोस मेव्याला हिवाळ्यापर्यंत वाळवणी करून किंवा लोणची घालून किंवा मुरांबे वगैरे बनवून टिकविण्याचा प्रयत्न असतो. हे काम वेळखाऊ असले तरी कुटुंबातल्या सर्वांचा सहभाग असेल तर फार मौजेचे प्रकरण असते. इथे आपापल्या घरातल्या खास पाककृतींचा संग्रह करता यावा म्हणून या धाग्याचे निमित्त. शिवाय वेगवेगळ्या मोसमात येणार्या वेगवेगळ्या मेव्याबद्दल त्या निमित्ताने चर्चा होईल अशी अपेक्षा आहे.
गतवर्षीप्रमाणे या वर्षीही मी स्ट्रॉबेरी जॅम, चेरी कॉन्सर्व, गूजबेरीचे लोणचे वगैरे बनविले आहे.
image

त्याशिवाय कम्युनिटी गार्डनमधे फोफावलेल्या मुळ्याच्या शेंगा वाळवतेय.
image
थोड्या मिरच्याही भरून वाळवल्या आहेत.
image
(फोटो अगदीच बेक्कार आहेत. Sad)
स्वयंपाकघरात नवीन यंत्र घेणार नाही असा निश्चय केल्याच्या दुसर्याच दिवशी डिहायड्रेटर घेण्याचे निश्चित केले आहे (स्माईल) त्यात बरीच फळे, भाज्या वगैरे सुकवायचे मनसुबे आहेत. शिवाय जमले तर स्वस्त टोमॅटो आणून कॅनिंग करणार आहे.
तुमचे काय प्रकल्प? काय जमले काय फसले काय मनसुबे आहेत ते लिहिलेत तर 'एकमेका साह्य करू, अवघे धरु सुपंथ'!

4
Your rating: None Average: 4 (3 votes)

Comment viewing options

Select your preferred way to display the comments and click "Save settings" to activate your changes.

भरल्या मिरचीत काय घालतात

भरल्या मिरचीत काय घालतात ?
बाकी, लिंबाच्या लोणच्यापेक्षा ईडलिंबाचे मस्त होते. रसही लिंबापेक्षा भरपूर अन दाट होतो.

काय मस्त लेख आहे. . कालच

काय मस्त लेख आहे.
.
कालच विचार करत होते, अनेकांचे अनुभवविश्वच इतके तोकडे असते की ते घुसळून घुसलून अशी किती ललीतं अन कथा निघणार Sad मग विचार केला अनुभवविश्व म्हणजे काय अन नक्की ते कसं विस्तारायचं. हाती काही लागलं नाही. पण वरील लेख वाचून त्या प्रश्नाचं बर्‍याच प्रमाणात उत्तर मिळालं.

तुम्ही आहात होय ऐसीवर !!!

तुम्ही आहात होय ऐसीवर !!!

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता (माझ्या घरी) चालत आहे. पण ऑफीसमधून चालत नाही.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

:-)

(दात काढत)

?

किंचित मीठ भुरभुरविणे (एक वेळ) ठीक आहे, पण कैरीच्या मुरांब्यावर कांदा???

(नाही, काही म्हणणे नाही, फक्त इतःपर, कोणी 'आपण तर ब्वॉ श्रीखंडावर लसणीची फोडणी देऊन खातो. अप्रतिम लागते!' म्हणून जरी सांगितले, तरी तेही ऐकून घेण्याची तयारी ठेवलेली आहे.)

(अतिअवांतर: ते 'अनवट', 'अनवट' की काय ते यालाच म्हणत असावेत काय?)

डुप्रकाटा

डुप्रकाटा!

वाह!

या धाग्यावर 'अतिशहाणा' यांच्या प्रतिसादाला प्रतिसाद द्यायला गेले तर भलतंच झालं! असो.

कैरीचा मुरांबा मला आवडतो. विशेषकरून जर ब्रेडच्या स्लाईसवर जॅमसारखा लावला आणि त्यावर अगदी बारीक चिरलेला कांदा टाकून किंचित मीठ भुरभुरले आणि वरतून दुसरी स्लाईस ठेवून खाल्ले तर सुभानल्लाह!

यावेळी लिंबांची लोणची, खारवलेले लिंबू, दह्यातल्या मिरच्या केल्या. आणखी काही करायला वेळ नाही मिळाला.

आधी मिठात २ दिवस खारवून, बारीक वाफ देऊन, लगेच

आधी मिठात २ दिवस खारवून, मग किंचित वाफ देऊन मग साखर/पाक घालून लगेच मऊ मुरले होते.

वाफवले नाही तरी लिंबापेक्षा थोडे लवकर मुरत असेल असे वाटते.

रोचक.

आजच संत्री आणली आहेत. हे लवकर मुरत असावं. साधारण किती वेळ लागेल?

पूर्वी कोकणातील

पूर्वी कोकणातील नातेवाईकांकडून येता जाता हा वाळवणाचा स्टॉक येत असे.
आता (त्या मंडळींचा वयोमानानुसार प्रवास मंदावल्याने)तो रतीब रोडावल्याने काही वर्षे विकतच्या वस्तुंचा अत्याचार सहन केला, आता माझ्या सासुबाई सगळी वाळवणं करतात त्यामुळे आमच्याकडे पुन्हा स्टॉक खूप असतो. (स्माईल)

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

वा! आयडीया आहे राव. मस्त.

वा! आयडीया आहे राव. मस्त.

:-)

आवडला लेख आणि मजा आली वाचून. त्या बरोबरच आपल्या बदललेल्या जीवनशैलीतही गूजबेरीचं लोणचं बनविताना त्याचा मसाला स्वतःच बनविला होता, ते बनविण्यात सगळ्या कुटुंबाचा (फक्त स्त्रीयांचा नव्हे) सहभाग होता, त्याची चव घेताना मुलीच्या चेहेर्यावरही असेच 'मस्त आहे पण तिखट आहे' भाव आले होते हे आठवून समाधान वाटले. शेवटी आपल्याला 'हव्या असलेल्या' आणि 'हव्या त्या प्रमाणे' परंपरा चालू ठेवण्याचं स्वातंत्र्य आपल्याकडे आहे याचं अधिक समाधान वाटलं. वाक्यात विरोधाभास अहे थोडा पण तो अपेक्षितच आहे (स्माईल)

कहाणी बेगमीच्या लोणच्याची

किंचित अवांतर - ह्या धाग्याच्या निमित्ताने मायबोलीवरचा 'कहाणी बेगमीच्या लोणच्याची' हा लेख आठवला.

संत्र्याचे गोड लोणचे

लिंबाचे गूळ/साखर-मीठ-तिखट घालून लोणचे करतात, मागे तशाच प्रकारचे लोणचे मी संत्र्याचे केले होते. बरे लागले.

फार्मर्स मार्केटातून विकत

फार्मर्स मार्केटातून विकत आणलेल्या एका प्रकारच्या मार्मालेडात मिरच्यांचे बारीक तुकडेही सापडले. ते ही छान लागत होते. मिरच्या फार तिखट नव्हता, त्यामुळे तिखट-आंबट-गोड असं ते मिश्रण आवडलं.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सांडगे, पापड, भाज्या वगैरे वाळवणी

सांडगे, पापड, भाज्या वगैरे वाळवणी आजकाल कोणी घरी करत नाही काय? लहानपणी दारात वाळत घातलेल्या वाळवणी राखायच्या निमित्ताने ओलसर साबुदाण्याचे सांडगे तोंडात टाकायच्या मस्त आठवणी आहेत. शेवया, पापड वगैरे करताना एकमेकांच्या घरी जाऊन श्रमविभागणी केली जायची तेही आठविले. अलिकडे माझ्या खाण्यापिण्याच्या पध्दती, हवामानात बरेच फरक झाल्याने यातले बरेच पदार्थ फार लागत नाहीत पण उन्हाळ्यात मिळणार्या भाज्यांचा उपयोग करून काही वाळवणी करावीत असा विचार आहे. वाळवलेल्या भाज्या, डाळींचे पदार्थ, वाळवलेले मांस (आणि मासे)असे काही नाविन्यपूर्ण पदार्थ माहित असेल तर नक्की लिहा. मला वाटते मागे विवेक पटाईतांनी मुगाच्या डाळीच्या सांडग्यांची पाकृ लिहिली होती, तीही रोचक वाटली.

...

पण आंब्याचा करतो तसाच केलेला संत्र्याचा मुरांबा अधिक आवडतो. त्यात किंचित संत्र्याच्या सालीचा वरचा भाग किसून घातला की मजा येते.

त्यास 'मार्मलेड' या नामाभिधानाने संबोधतात, नाही का?

उन्हाळाभर नी आताआतापर्यंत

उन्हाळाभर नी आताआतापर्यंत भरपूर मेथांबा केला व खाल्ला, हा बाहेर जास्त टिकत नसल्याने (फ्रिजमध्येही पुण्याची हवा कोरडी म्हणून फारतर महिनाभर, मुंबईत तर फ्रिजमध्येही पंधरवडाच)

बाकी साखरांबा, गुळांबा, कैरीचे लोणचे हे प्रकार दरवर्षीप्रमाणे घरी केलेले आहेत (त्यात बनवण्यात माझा सहभाग शुन्य, खाण्यात समप्रमाणात सहभागी (जीभ दाखवत)). यंदा लोणचे खूपच कमी केले आहे.

आता पावसाळ्याच्या मध्यावर भाज्यांचे लोणचे, मिरचीचे मोहरी फेसलेले लोणचे वगैरे करू.
स्ट्रॉबेर्‍यांशी चाळे हिवाळ्याच्या शेवटाला (स्माईल)

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

धाग्याची कल्पना आवडली.

जॅम, मुरांबे प्रकरणाची फारशी आवड नाही, म्हणून क्वचितच बनवते. पण आंब्याचा करतो तसाच केलेला संत्र्याचा मुरांबा अधिक आवडतो. त्यात किंचित संत्र्याच्या सालीचा वरचा भाग किसून घातला की मजा येते.

आई ग!!! खासच.

आई ग!!! खासच.

हेच. फक्त मिठाऐवजी शेंदेलोण.

हेच. फक्त मिठाऐवजी शेंदेलोण. आणि कसुरी मेथी.

*********
(सहीपुरतेच) ..आबा कावत्यात! (एरवी हानगं कुत्रं विचारत नै...)

कसे बनवता?

हळद, आले, लिंबाचा रस, मीठ..की अजून काही? लवंगाची युक्ती पण छान आहे.

मी ओल्या हळदीचं लोणचं नेहेमी

मी ओल्या हळदीचं लोणचं नेहेमी बनवतो. आणि लवकरात लवकर संपवून टाकतो. (डोळा मारत)

मध्यंतरी फोडणी थोडी गार झाल्यावर त्यात लवंगा टाकल्या होत्या. उष्णतेमुळे त्या भंगल्या आणि आतलं तेल फोडणीत उतरलं. चांगली चव आली होती.

(प्रेरणा: काही पान खाणारे लोक पान लावायच्या (आयई - घडी करायच्या) आधी त्यात लवंग जाळून घालतात.)

*********
(सहीपुरतेच) ..आबा कावत्यात! (एरवी हानगं कुत्रं विचारत नै...)

मुरांबा

कैरीचा मुरांबा बनवला आहे. यंदा बाकी काही नाही.

गूजबेरीजचे लोणचे चक्क घरी

गूजबेरीजचे लोणचे चक्क घरी बनविलेला कैरी लोणचे मसाला वापरून केले, छान होते. जॅमसाठी मी निम्मे फळ निम्मी साखर वजन करून घेते, पेक्टीन वापरत नाही. काही कस्टमायझेशन असे नाही पण साखर जास्त घातल्याने समतोल म्हणून थोडा लिंबाचा रस घालते. जॅम्स बनवायची कृती तशी खूप साधी असते पण स्वच्छ्ता खूप पाळावी लागते आणि जॅमचा सेटिंग पॉईंट बरोबर ओळखायला लागतो.

अगदी टिंकरबेल सारखच म्हणते.

अगदी टिंकरबेल सारखच म्हणते.

यंदा लोणची घातलीच नाहीत

यंदा लोणची घातलीच नाहीत Sad नाहीतर उषा प्रभाकरन यांच्या पुस्तकातले दोन-तीन प्रयोग तरी प्रत्येक वर्षी होत असतात. जॅमचा एकदाच प्रयोग केला होता - कॅलिफोर्नियातल्या मायर लेमन्स चा मार्मलेड. मस्त झालं होतं. इथे एकदा लीची फळाचा प्रयोग केला होता, पण अगदी गोडट्ट, चिवट जॅम झाला.

रोचक धागा. गतवर्षीप्रमाणे या

रोचक धागा.
गतवर्षीप्रमाणे या वर्षीही मी स्ट्रॉबेरी जॅम, चेरी कॉन्सर्व, गूजबेरीचे लोणचे वगैरे बनविले आहे. > हे सर्व कसे बनवले, काही भारतीयकरण, रूची स्पेशल कस्टमायजेशन असल्यास तेदेखील लिहा.

Amazing Amy