महाराष्ट्रातील आदिवासींबद्दल माहिती हवी

मराठी विकिपीडियावर पुरेशी माहिती नसलेला आणि (सांस्कृतीक अंगाने) माहितीची मागणी असलेला विषय म्हणजे "महाराष्ट्रातीत आदिवासी". मला वाटते महाराष्ट्रातील शाळांमधून या विषयावर निबंध किंवा प्रॉजेक्ट करून लागत असावेत म्हणून मराठी विकिपीडिया धुंडाळणे चालू होत असावे. एनी वे सर्वसाधारण पणे सर्वांनाच आदिवासी संस्कृतींबद्दल जाणून घेण्यात उत्सूकता असतेच समज गैरसमज असतात, अगदी दोन वेगवेगळ्या आदिवासींना एकमेकांच्या संस्कृती विषयक माहिती असेलच असे नाही.

महाराष्ट्रातील इतिहासात भिल्ल समाजाचे बरेच उल्लेख येतात या महाराष्ट्रातील भिल्ल संस्कृतीचे स्वरूप कसे होते, सध्या कसे आहे याची मलाही जिज्ञासा वाटते. या धाग्याचा उद्देश आदिवासी समाज महाराष्ट्रात सध्या कुठे कुठे आहे, त्यांचा इतिहास, त्यांची वस्ती स्थाने, उदर निर्वाहाची साधने, त्यांच्या श्रद्धा, संस्कृती यात त्यांचा दैनंदीन दिनक्रमाचे स्वरूप आणि दिनक्रमातील सांस्कृतीक अंग, सण, समारंभ, कला, नृत्य इत्यादीचा समावेश असावयास हरकत नाही. तुम्ही एखाद्या आदिवासी समाजातून असाल तर माहितीचे स्वागतच आहे. सोबतच आदिवासी विषयातील तज्ञ अभ्यासक इत्यादींच्या ग्रंथांची माहिती वृत्तपत्रीय लेखांचे दुवे इत्यादीचेही स्वागत असेल.

बोली भाषांबाबत वेगळा धागा मागेच काढलेला आहे. राजकीय आणि आरक्षणादी संदर्भाने मागेही धागे काढले गेले असतील किंवा अजूनही समांतर चर्चा धागे काढता येतील; हा संस्कृती विषयक धागा विषयांतरात हरवून जाऊ नये म्हणून ते विषय शक्यतोवर या धाग्यात टाळावेत. या धाग्याचा मुख्य उद्देश सांस्कृतीक स्वरूपाची माहिती आणि सद्य स्थितीची माहिती/नोंदी मिळवणे, दखल घेणे असा आहे.

या धाग्यावरील आपले प्रतिसाद प्रताधिकार मुक्त गृहीत धरले जातील. चर्चेतील आपल्या प्रतिसादांसाठी सहभागासाठी धन्यवाद.

field_vote: 
0
No votes yet