वजननियंत्रणाची ऐशीतैशी

आज सकाळी पेपर उघडला आणि एक लिफलेट हातात पडले. ती एक वजन नियंत्रण कार्यक्रमाची जाहिरात होती. अशा प्रकारच्या जाहिरातीत लोकांच्या मनावर ठसविण्यासाठी काही सक्सेस स्टोरीज म्हणुन काही व्यक्तींचे उपचारपूर्व आणि उपचारोत्तर फोटो दिले होते. अशा प्रकारच्या लिफमेट मध्ये स्थान मिळालेल्या व्यक्तीमध्ये एक पॅटर्न दिसतो. यामध्ये ४० शी ओलांडलेले सहसा कुणीही दिसत नाही. फोटो उपचारोत्तर लगेच काढलेला असतो, त्यामुळे टिकाऊ परिणामाचा दावा किती खरा किती खोटा याचा पत्ता लागत नाही. ज्या लोकांमध्ये पचन आणि उर्जेशी संबंधित संतुलन मूलत: बिघडलेले असते, त्यांच्यात अशा कार्यक्रमाचा किती परिणाम होतो याविषयी कुणी काहीही बोलताना दिसत नाही.

माझे स्वत:चे वजन चाळीशी नंतर एकदम प्रमाणाबाहेर वाढायला लागले. त्यानंतर मी याविषयावरचे ताजे संशोधन तपासायला सुरुवात केली. हे करत असताना वजन वाढण्याची कारणे असंख्य असतात असे लक्षात आले. उदा.

o चयापचय वयोपरत्वे कमी होणे
० थायरॉईडच्या कार्यक्षमेत घट
० जीवनसत्त्वांच्या (विशेषत: ड ) पातळीत घट
० आहारात कॅल्शियम-मॅगनेशियमचा अभाव
० स्वादुपिंडावरील ताण
० चयापचय कमी करणारी औषधे (रक्तदाबावरील, मनोविकारांवरील औषधे)
० स्नायविक दुर्बलता निर्माण करणारी औषधे (मुख्यत: स्टॅटीन)

मी माझ्या वजनवाढीच्या चिकित्सेसाठी जेव्हा व्यवसायिक आहारतज्ञांचा सल्ला घेतला तेव्हा माझ्या असे लक्षात आले की यच्चयावत आहारतज्ञ हे अत्यंत बिनडोक असतात. त्यांच्याकडे वरील कारणांसाठी काय करायचे याची उत्तरे तर नसतातच पण "उष्मांक-नियंत्रण" आणि व्यायाम या लाडक्या मंत्राचा जप एव्हढया भांडवलावरच त्यांनी दुकान थाटलेले असते. स्नायविक दुर्बलता निर्माण झालेली असेल तरीही हे आहारतज्ञ व्यायाम करत/वाढवत नाही म्हणुन अंगावर खेकसायला कमी करत नाहीत.

नुकतेच "उष्मांक-नियंत्रण" या लाडक्या समजाला छेद देणारे काही संशोधन नुकतेच वाचनात आणि पहाण्यात आले. "उष्मांक-नियंत्रण" करूनही कायमस्वरूपी वेट्लॉसची ग्वाही देता येत नाही, हा मुद्दा अधोरेखित करणारी काही संशोधने देत पुढे देत आहे.

https://www.ted.com/talks/sandra_aamodt_why_dieting_doesn_t_usually_work सांद्रा आमोट या न्युरॉलोजिस्ट बाईंचा टेड टॉक
http://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC2895000/ - उष्मांक नियंत्रण दीर्घकालीन परिणाम देत नाही, किंबहुना त्याचेही दुष्परिणाम असतातच

आणखी एक दूर्लक्षित मुद्दा -
http://www.biologicalpsychiatryjournal.com/article/S0006-3223%2814%29003... - ताणामुळे लठ्ठपणा वाढतो

तात्पर्य, एखाद्या आहारतज्ञाने अमक्या सेलेब्रिटीचे वजन कमी केले म्हणून तो/ती आपले करू शकेल याची खात्री देता येत नाही. वजनवाढीच्या कारणांचा शोध न घेऊ शकणारा आहारतज्ञ हा बिनडोक समजावा. व्यायाम करायलाच हवा पण व्यायामाची काठीन्यपातळी आपल्याला झेपेल एव्हढीच ठेवावी आणि स्वत:च्या वकुबानुसारच वाढवावी. जिम प्रशिक्षकाच्या दबावाला जास्त किंमत देऊ नये.

field_vote: 
3.75
Your rating: None Average: 3.8 (4 votes)

प्रतिक्रिया

द्या टाळी. आहारतज्ञच्या जागी ज्योतिषी हा शब्द वापरून अस्साच सेम लेख टाकावा का, याचा विचार करतोय.
जसे: मी माझ्या मानसिक चिकित्सेसाठी जेव्हा व्यवसायिक ज्योतिष्याचा सल्ला घेतला तेव्हा माझ्या असे लक्षात आले की यच्चयावत ज्योतिषी हे अत्यंत बिनडोक असतात. त्यांच्याकडे वरील कारणांसाठी काय करायचे याची उत्तरे तर नसतातच पण "मंगळ-शनी" आणि राहू-केतू या लाडक्या मंत्राचा जप एव्हढया भांडवलावरच त्यांनी दुकान थाटलेले असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्हणुन म्हणतो ठेविले अनंते तैसेची रहावे चित्ती असू द्यावे समाधान.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

"मी माझ्या मानसिक चिकित्सेसाठी जेव्हा व्यवसायिक ज्योतिष्याचा सल्ला घेतला तेव्हा माझ्या असे लक्षात आले "

ही तुमची चूक आहे आणि ज्योतिषांना का बदडता. ज्योतिषांकडे मानसिक चिकित्सेकडे जाणे याला मी मूर्खपणा म्हणेन. आयुष्यातील "अनिश्चतता आणि अपरिहार्यता" हाताळायला असमर्थ असाल तर ज्योतिषाचा विचार करावा ... पण ठराविक मर्यादेतच. त्या मर्यादा कोणत्या याबद्दल लिहीत असतोच पण एकत्र संकलन करून परत कधीतरी लिहीन.

बाकी एखाद्याला ज्योतिषाकडे जावे लागणे, हे त्याच्या आप्तस्व़कीयांचे आणि हितचिंतकांचे अपयश आहे. त्यांनी स्वत:च्या थोबाडित एक नाही तर अनेक मारुन घ्याव्यात, असे माझे मत आहे. कारण त्या व्यक्तीची समस्या सोडविण्यात त्यांनी पुरेसा रस न घेता फक्त उंटावरून शेळ्या हाकलेल्या असतात. रॅपो, एम्पथी या गोष्टी तर दूरच राहील्या... असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"मी माझ्या मानसिक चिकित्सेसाठी जेव्हा व्यवसायिक ज्योतिष्याचा सल्ला घेतला तेव्हा माझ्या असे लक्षात आले "

ही तुमची चूक आहे आणि ज्योतिषांना का बदडता. ज्योतिषांकडे मानसिक चिकित्सेकडे जाणे याला मी मूर्खपणा म्हणेन. आयुष्यातील "अनिश्चतता आणि अपरिहार्यता" हाताळायला असमर्थ असाल तर ज्योतिषाचा विचार करावा ... पण ठराविक मर्यादेतच. त्या मर्यादा कोणत्या याबद्दल लिहीत असतोच पण एकत्र संकलन करून परत कधीतरी लिहीन.

बाकी एखाद्याला ज्योतिषाकडे जावे लागणे, हे त्याच्या आप्तस्व़कीयांचे आणि हितचिंतकांचे अपयश आहे. त्यांनी स्वत:च्या थोबाडित एक नाही तर अनेक मारुन घ्याव्यात, असे माझे मत आहे. कारण त्या व्यक्तीची समस्या सोडविण्यात त्यांनी पुरेसा रस न घेता फक्त उंटावरून शेळ्या हाकलेल्या असतात. रॅपो, एम्पथी या गोष्टी तर दूरच राहील्या... असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

टेड टॉक खूपच परिणामकारक वाटला. लठ्ठपणा + चांगल्या सवयींचा (योग्य अन्न, व्यायाम, सिगरेट न ओढणं, दारू मर्यादेत पिणं) अभाव हे खरं धोकादायक आहे, पण लठ्ठपणाबरोबर जर चांगल्या सवयी असतील तर लठ्ठपणा धोकादायक नाही हे एका चार्टमध्ये खूप छान सांगितलं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रोचक.
नुकतेच वाचलेले www.maayboli.com/node/48355 www.maayboli.com/node/50148 हे दोन धागे आठवले.
कदाचीत अवांतर: ड जीवनसत्व कोवळ्या सूर्यकिरणांतून मिळते की मध्यानीच्या?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला लहानपणे शिकलेले आठवते की सकाळच्या कोवळ्या उन्हात ड जीवनसत्त्व विपुल प्रमाणात असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मलापण हेच आठवत होतं पण परवाच कुठल्यातरी प्रतिसादात दुपारच कडक ऊन (१२ ते १.३०) असं वाचलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इतक्या टळटळीत उन्हाने कदाचित ड जीवनसत्त्व मिळत असेलही पण कर्करोगाचे धोके जास्त उद्भवत असावेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बहुधा उन्हात जीवनसत्त्व नसते. कोवळ्या उन्हात ते त्वचेखाली तयार होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

सकाळच्या कोवळ्या उन्हात ड जीवनसत्त्व विपुल प्रमाणात असते.

हे मटा किंवा बालाजी तांबेंच्या लेखात ठीक दिसेल!
उन्हातल्या UV किरणांमुळे त्वचेतल्या घटकाचं रुपांतर, तो घटक रक्तप्रवाहातनं लिव्हर आणि किडनीची वारी करून आला की, व्हिट डी मधे होतं. पण अशा किरणांच्या अतिरिक्त एक्स्पोजरमुळे त्वचेच्या कर्करोगाचा धोका वाढतो. त्यामुळे 'सकाळच्या उन्हात अर्धा तास' हे योग्य प्रमाण समजतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

धागा उघडला तेव्हा 'वजने-मापे नियंत्रण' (Department of legal metrology) या विषयावर आहे असे वाटले होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

माझे कॉलेजात असताना उंचीच्या मानाने वजन खूपच जास्त होते. बीएमआय बहुदा २७च्या पुढे असावा. नोकरीच्या सुरुवातीच्या दिवसात उष्मांक नियंत्रण व चालण्याच्या व्यायामाने मी बऱ्यापैकी वजन कमी केले. लग्नापूर्वी बीएमआय २५ पर्यंत खाली आणला होता.
लग्नानंतर बायकोने स्वयंपाकघरातील विविध प्रयोगांच्या चाचण्यांसाठी माझा गिनीपिग म्हणून वापर केल्याने पुन्हा वजन वाढू लागले. गेल्या सहा महिन्यांपासून पुन्हा एकदा उष्मांक नियंत्रण व माफक व्यायाम - प्रामुख्याने चालण्याचा - सुरु केल्याने वजन नियंत्रणात आले आहे. बीएमआय २४ पेक्षा कमी झाला आहे.

उष्मांक नियंत्रण, खाण्याच्या वेळा पाळणे व माफक व्यायाम यामुळे हार्मोनल अडचणी नसणाऱ्या कोणाचेही वजन नियंत्रणात राहू शकते असे वाटते. विशेषतः दररोज काय काय खाल्ले जाते याची फक्त नोंद करण्यास सुरुवात केली तरी जंक खाण्यावर नियंत्रण येऊ शकते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त बी एम आय २४ पेक्षा कमी म्हणजे उत्तमच आहे. माझं बरेचदा यो-यो होतं. पण हळूहळू जास्त कमी होण्याकडे झुकतय.
सकाळी चहा-कॉफी घेतली की भूक लवकर लागत नाही असे लक्षात आले आहे.
मी बीईंग अ मॉर्निंग पर्सन, संध्याकाळी मूड एकदम थकवा असलेला होऊन जातो. तेव्हा जर व्यायाम केला तर तो सुधारतो असे लक्षात आले आहे.
खरं तर सकाळीही व्यायाम करायची इच्छा असते. पण घाम येतो. चांगल्या डीओड + पर्फ्युम मध्ये इन्व्हेस्ट केले तर ती समस्या दूर होईलसे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0