औरंगाबद, चिंचवड आणि मुंबईच्या लोकांना शिकायचय मराठी !

इंग्लिश विकिबुक्सच्या माध्यमातून इंग्लिश मधून मराठी शिकण्याची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करत आहे. https://en.wikibooks.org/wiki/Marathi हा दुवा आपण पाहू शकता. Marathi language portal/translations येथील आलटून पालटून माहितीच्या माध्यमातून कोणतीही एक माहिती https://en.wikibooks.org/wiki/Marathi येथे आपोआप निवडली जाते. Marathi language portal/translations येथे आपणही माहिती भरू शकाल. त्याच पद्धतीने https://en.wikibooks.org/wiki/Marathi_language_portal/Learn_with_pictures आणि https://en.wikibooks.org/wiki/Marathi_language_portal/Learn_with_ease असे दोन वेगळे प्रयोगही केले आहेत त्यात माहिती भरण्यात अथवा त्या बद्दल आपल्या अभिप्रायाचे स्वागत असेल. हा एक भाग झाला.

गूगलवर कोण काय किती शोधत आहे याचा अंदाजा गूगल ट्रेंड्सच्या माध्यमातून येतो म्हणून मी Learn Marathi आणि learn marathi तसेच सोबतीला Learn english असाही सर्च गूगल ट्रेंडला दिला. पहा १ पहा २ हे शोध मला जरासे अनपेक्षीत ठरले Learn Marathi आणि learn marathi चे शोध जास्त करून भारताबाहेरून अथवा महाराष्ट्राबाहेरून असतील असा अंदाज होता तर रिझल्ट पाहून नाही म्हटलेतरी जरासे आश्चर्यच वाटले. औरंगाबाद आणि चिंचवड येथून शोध सर्वाधीक आहेत त्या खालोखाल मुंबईचे लोक गूगलवर Learn Marathi अथवा learn marathi हे शोधत असावेत. चिंचवड आणि मुंबईत बाहेर राज्यातील व्यक्ती अथवा विद्यार्थी असतील म्हणून असा शोध येत असेल तर समजण्यासारखे आहे पण तो औरंगाबादेतून का येतो आहे हे नीटसे उमगले नाही. पर्यटक असतील का विद्यार्थी असा जरासा प्रश्न पडला.

दुसर्‍या बाजूला परदेशातन Learn Marathi अथवा learn marathi ला काहीच शोध नाहीत याचेही खेद पुर्वक आश्चर्य वाटले. परदेशात पुरेशी मराठी एन आर आयांची मुले असतील तर त्यांना मराठी शिकण्याची थोडी फार तरी इच्छा होऊन काही गूगल शोध व्हावयास हवेत तसे होताना दिसत नाही. मग मराठी शिकवीण्याचे धडे बनवताना नेमका कोणता ऑडीअन्स समोर ठेऊन बनवायचे असा जरासा प्रश्न पडतो आहे.

इतर राज्यांमधून नाही म्हणायला Learn Marathi अथवा learn marathi चा थोडा फार शोध कर्नाटक, गुजराथ, आंध्र, दिल्ली आणि तामीलनाडूतून येतो आहे. दिल्ली व्यतीरीक्त उत्तरेतल्या राज्यांचा यात समावेश नाही म्हणजे महाराष्ट्रातलेही औरंगाबाद मुंबई चिंचवडचे शोध हिंदी भाषकांकडन येत असतील असे नेमके सांगता येत नाही. हिंदी भाषक कदाचित हिंदीतून शोधत असतील अशी शक्यता थोडी फार असू शकते पण औरंगाबाद मुंबई चिंचवड पुणे येथील इंग्रजी शाळातील विद्यार्थी अथवा त्यांच्या पालकांकडून असा शोध घेतला जात असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

Learn english चा शोध घेण्यात भारतातील तामीळनाडू, पाँडेचेरी, आंध्र, कर्नाटक (दक्षीणेत केरळ मिसींग आहे आणि त्यांच मल्याळम विकिपीडियाच कामही जोरात चालू आहे रोचक योगायोग) हिंदी पट्ट्यातल्या दिल्ली उत्तराखंड आणि मध्यप्रदेशाची नावे येताहेत महाराष्ट्रासहीत इतर राज्ये मिसींगला आहेत.

महाराष्ट्रातील लोक Learn english तर गूगलवर शोधत नाहीत पण बाकी सर्व शोध इंग्रजीतन घेतात. गेल्याच आठवड्यात स्मिता तळवलकरांचा देहांत झाला त्यांच्या शोधांची आकडेवारी अभ्यासली तर त्यांच्या नावाचे केवळ २% शोध मराठी भाषा वापरून घेतले गेले ९८ टक्के शोध इंग्रजीतन घेतले गेले हे सर्वशोध महाराष्ट्रातनच घेतले गेले इतर राज्यातन नाही. विकिपीडियावरचेही अनुभव हेच सांगतात की अद्याप ९८ टक्के महाराष्ट्रीय जनता इंग्रजीतूनच शोध घेते. एकुण मराठी जनतेला इंग्रजीतन शिक्षण हव असेल पण इंग्रजीचा फार उमाळाही नाही आणि ऑनलाईन देवनागरी टाईपणं शिकण्यातही माघारच आहे. मी मागे मिपाच्या वाचकांच अलेक्साच्या आकडेवारीच्या साहाय्याने जे विश्लेषण केल त्यात मिपाकडे असा मराठी न टायपणारा वाचक वर्ग बराच असावा कारण त्याची वाचनवारी दिसते लेखन दिसत नाही.

या ऑगस्टच्या सुरवातीस मराठी विकिपीडियावर मराठीत कसं टायपाव याची मोठी आघाडी उघडली. मराठी विकिपीडियावर टायपिंग कस कराव याचा मोठ्या प्रमाणावर वापर वाढलेला आढळला पण प्रत्यक्ष लेखनात मराठी माणूस मागे उभ टाकण्याच चित्र फारस बदललेल नाही.

यावर कुणी काही वेगळ विश्लेषण अथवा मत मांडू शकेल ?

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

मला तर वाटतं, हे महाराष्ट्रातून होणारे शोध हे (मराठी माणसाच्याच) उत्सुकतेपोटी असावेत (बघुया बाबा, मराठी शिकण्याचे काही पर्याय आहेत का जालावर)!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शोध फार कमी असतील तर गूगल ट्रेंड दखलच घेत नाही (रिपोर्ट येत नाही). उत्सूकते पोटी करणारे तुमच्या माझा सारखी मंडळींची एवढी संख्या असेल की गूगल ट्रेंडवर नोंद व्हावी या बद्दल जराशी साशंकता वाटते आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

ही पाटी सदाशिव पेठेत सोनल वेफर्सजवळ पाहिली होती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

महाराष्ट्रात किती 'पुणी' आहेत म्हणे? Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ते 'पुण्या'चे अनेकवचन नसून, विभक्तिप्रत्यय लागण्यापूर्वीचे 'उत्तम मराठी'तील विकरण असावे, असे वाटते. (चूभूद्याघ्या.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ही पाटी सदाशिव पेठेत सोनल वेफर्सजवळ पाहिली होती.

हिच तर समस्या आहे, तुम्हाला सोनल वेफर्स माहित आहे, पण तिथेच समोर जे 'लोकवाङमय गृह' आहे ते माहित नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बटाट्याच्या काचर्‍या की दास क्यापिटल हा झगडा असूच शकत नाही.

(रच्याकने: लोकवाङ्मय गृह सोनल वेफर्सच्या समोर नाही. त्याच रस्त्यावर, पण अंमळ केळकर रस्त्याच्या बाजूला आहे.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

बटाट्याच्या काचर्‍या की डोक्याचं दही असं म्हणायचं का?

रच्याकने: लोकवाङ्मय गृह सोनल वेफर्सच्या समोर नाही. त्याच रस्त्यावर, पण अंमळ केळकर रस्त्याच्या बाजूला आहे.)

बरोबर रच्याकनेच आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फार फार पूर्वीच्या चित्रशाळेच्या जागेत होते ना?

(अतिअवांतर: 'लोकवाङ्मय गृह' अजून टिकून आहे???)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हो तिथेच आहे ते अजून, जुनी खोडं ती...सहजी हलायची नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'बोलायलां'मधल्या 'लां'वरचा अनुस्वार नजरेतून सुटला नाही, बरें कां? Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आज काय सगळ अनपेक्षीतच वाचण्यात येतयं. शेवटी बाप्पांची आणि त्याच्या भक्तांची इच्छा !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

मराठी शिकण्याची पाटी मराठीतच? मराठी न येणारी व्यक्ती ही पाटी कशी काय समजू शकेल? (मराठी वाचन येते मात्र 'संभाषण' येत नाही इतपतच -आमची कुठेही शाखा नाही छाप - मर्यादित टार्गेट ऑड्यन्स असल्यास प्रतिसाद गैरलागू)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पाटी 'मराठी बोलायला शिकण्या'बद्दल नसून 'उत्तम मराठी बोलायला शिकण्या'बद्दल आहे. 'अधम मराठी' बोलणार्‍यांनी कृपया अर्ज करावा, असे काही असावे.

(हे 'अधम मराठी' बोले तो, 'आमच्या वेळी' इंग्रजी माध्यमाच्या शाळांतून 'लोअर मराठी' नावाचा एक विषय असायचा, तसला प्रकार असावा बहुधा.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

किंवा 'केल्या गेल्या आहे' असे बोलणाऱ्यांसाठी शुद्ध मराठी उच्चारांची ओळख Wink

बाकी पुण्यात येऊन निदान आमचे तरी मराठी बिघडलेच. गावाकडे बोलण्याला छान हेल असायचा. आता एकदम सपक अळणी! तरी नशीब नाकातून उच्चार सुरु झाले नाहीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तरी नशीब नाकातून उच्चार सुरु झाले नाहीत.

आणि होणारही नाहीत. (लहानपणापासून अर्धे आयुष्य ४११०३०मध्ये काढून माझेही नाहीत.)

तसे उच्चार तोंडून येण्याकरिता पिढ्यानपिढ्यांचे संस्कार रक्तातच असावे लागतात. आपलेतुपले ते काम नोहे. (गरज काय, हा मुद्दाही आहेच.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

औरंगाबाद जवळ असलेल्या वेरूळ येथील लेण्या या "World Heritage" म्हणून जतन करण्यात आलेल्या आहेत. औरंगाबाद हे बऱ्याच परदेशी पर्यटकांसाठी महत्त्वाचे स्थळ आहे. त्यामुळे त्यांच्याद्वारे औरंगाबाद मधून "learn मराठी" search होत असावे असा एक निष्कर्ष काढल्यास ते चुकीचे होणार नाही. तसेच चिंचवड हे एक औद्योगिक केंद्र असल्याने परदेशी व्यावसायिक तिथे येत असतील आणि तिथून मराठी शिकण्यासाठी google वापरत असतील असा पण एक निष्कर्ष निघू शकतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

औरंगाबाद जवळ असलेल्या वेरूळ येथील लेण्या या "World Heritage" म्हणून जतन करण्यात आलेल्या आहेत. औरंगाबाद हे बऱ्याच परदेशी पर्यटकांसाठी महत्त्वाचे स्थळ आहे. त्यामुळे त्यांच्याद्वारे औरंगाबाद मधून "learn मराठी" search होत असावे असा एक निष्कर्ष काढल्यास ते चुकीचे होणार नाही.

अशा परिस्थितीत, औरंगाबादेस येण्याकरिता घरून निघण्यापूर्वीच अशी चौकशी असे पर्यटक करणार नाहीत काय?

तसेच चिंचवड हे एक औद्योगिक केंद्र असल्याने परदेशी व्यावसायिक तिथे येत असतील आणि तिथून मराठी शिकण्यासाठी google वापरत असतील असा पण एक निष्कर्ष निघू शकतो.

- चिंचवडला येणार्‍या व्यावसायिक आगंतुकांना आपले व्यावसायिक व्यवहार मराठीतून करण्याची गरज कितपत भासत असावी?

- अशा आगंतुकांस व्यवसायेतर व्यवहारांत (उदा., रिक्षावाल्याशी भाड्याविषयी हुज्जत घालताना वगैरे) मराठीची गरज भासल्यास चिंचवडास आल्यानंतर क्र्याशकोर्स करण्यात किंचित उशीर होत नाही काय? आणि अशा परिस्थितीत अशा पी-हळद-नि-शीक-मराठी-कोकाटे-फाडफाड-छाप कोर्सांचा काही उपयोग होण्याची शक्यता किती?

नाही म्हणजे, औरंगाबादेस किंवा चिंचवडास कायमस्वरूपी (किंवा दीर्घकाळाकरितासुद्धा) स्थायिक होऊ पाहणार्‍या परकीयांस मराठीच्या कोर्सांमध्ये स्वारस्य आणि अशा कोर्सांची उपयुक्तता असणे समजू शकतो. पण:
- असे कितीसे आगंतुक औरंगाबादेस अथवा चिंचवडात येत असावेत? आणि,
- ज्या टार्गेट आड्यन्साची आपण गोष्ट करीत आहात, ते यात कोठे बसतात? त्यांना अशा कोर्सांचा उपयोग आणि अशा कोर्सांत स्वारस्य असण्याची शक्यता कितीशी असावी?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अहो पण मला सांगा, भारतात येणारे पर्यटक औरंगाबादला जायचे असं ठरवून निघतात की भारतात जायचे असं ठरवून निघतात? भारतात अठरापगड भाषा आहेत, त्यातल्या १-२ कामापुरत्या शिकून निघत असतील फार तर… आणि ऐन वेळी एखाद्या ठिकाणी गेल्यावर उत्सुकतेपोटी इथली भाषा काय आहे असं search करावंसं वाटणार नाही का? मी फक्त शक्यता सांगितली आणि असे तहान लागल्यावर विहीर खोदणारे पर्यटक असू शकतात. अगदी स्वतःचे उदाहरण द्यायचे तर मी कुठेही जाताना गरजेपुरती माहिती घेऊन निघतो, पण त्या ठिकाणी जाऊन काही नवं कळलं तर, मी पण अगदी त्या क्षणी नाही पण वेळ मिळेल तसं google search करून त्याबद्दल आणखी जाणून घेतो. अगदी seriously मराठी शिकायचा कुणी प्रयत्न करत असेलही, पण बरेच google search हे सहज (casual) माहिती घेण्यासाठी पण होत असतात. त्यामुळे "learn marathi" च्या शोधाचा ट्रेंड बऱ्याच शक्यतांना मोजत असेल आणि त्यातली एक शक्यता (जी तुमच्या मते निरर्थक किंवा दुरापास्त आहे) ती मी मांडली एवढेच….

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शक्यता खूपच कमी आहे, इतकेच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शक्यातांबद्दलचं तुमचं मत खूपच strong आहे बुवा!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आहे खरे.

'स्वतःवरून जग पारखावे' म्हणतात, तशातली गत.

बोले तो, मी एखाद्या परक्या ठिकाणी गेलो, आणि तिथली भाषा मला येत नसली, तर मी (१) तिथे गेल्यावर त्या भाषेचा क्लास शोधण्याच्या भानगडीत पडत नाही, आणि (२) स्थानिक भाषेतले जे काही चारदोन शब्द चुकूनमाकून पूर्वी मी कधी ऐकले असतील, तेवढ्या भांडवलावर वाट्टेल तशी जुळवाजुळव करून मी 'स्थानिक भाषे'त सुरू होतो. (त्याकरिता स्थानिक भाषेचे क्लास घेतलेले असणे आवश्यक असतेच, असे नव्हे.) स्थानिक लोक मग 'बाबारे, तू म्हणशील ते तुला सांगतो, पण कृपा करून आमच्या भाषेत बोलू नको' म्हणून मला समजेल अशा भाषेवर उतरतात.

जगातील बहुतांश पर्यटक बहुधा हाच अल्गोरिदम वापरत असावेत, असा माझा कयास आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(२) स्थानिक भाषेतले जे काही चारदोन शब्द चुकूनमाकून पूर्वी मी कधी ऐकले असतील, तेवढ्या भांडवलावर वाट्टेल तशी जुळवाजुळव करून

असं करण्यापेक्षा काही लोक google वापरून ४-२ शब्द शोधत नसतील हे कशावरून? केवळ स्वतःला ४-२ शब्द माहित आहेत म्हणून google वापरूच नये हा कायदा आहे का?

स्वतःवरून जग पारखावे या तुमच्या उक्तीप्रमाणेच माझ्या मते असे ४-२ शब्द google वर शोधणाऱ्यांची संख्या जास्त आहे. आणि म्हणूनच तुमच्या "strong" मताशी मी सहमत होऊ शकत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

असं करण्यापेक्षा काही लोक google वापरून ४-२ शब्द शोधत नसतील हे कशावरून? केवळ स्वतःला ४-२ शब्द माहित आहेत म्हणून google वापरूच नये हा कायदा आहे का?

कायदा अर्थातच नाही. फक्त, परक्या ठिकाणी गेल्यावर (१) वायफाय (किंवा अन्य प्रकारचे इंटरनेट) कनेक्शन शोधणे, आणि (२) ल्यापटॉप (स्वतःचा बरोबर आणला असेल, तर; अन्यथा नेटक्याफे शोधणे आले आणि त्यात जो काही मिळेल त्या प्रकारचा कॉम्प्यूटर वापरणे आले) उघडून त्यावर गूगलशोध मारत बसणे अंमळ जिकिरीचे होत असावे, इतकेच.

स्वतःवरून जग पारखावे या तुमच्या उक्तीप्रमाणेच माझ्या मते असे ४-२ शब्द google वर शोधणाऱ्यांची संख्या जास्त आहे. आणि म्हणूनच तुमच्या "strong" मताशी मी सहमत होऊ शकत नाही.

अर्थात. तुम्ही माझ्याशी सहमत व्हावेच, असा कायदाही नाही आणि तशी माझी अपेक्षाही नाही.

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

अ‍ॅण्ड्रॉइड किंवा तत्सम काही वापरत असल्यास आणखीच गंमत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पुन्हा तुम्हाला बोर करतोय बरंका… तुमच्या algorithm मधल्या पहिल्या point वरून इंग्लिश विंग्लिश चित्रपट आठवला! एक साधीसुधी बाई फक्त भाचीच्या लग्नासाठी परक्या देशात जाते काय, आणि तिथे जाऊन तिथल्या भाषेचा क्लास करते काय… सारेच चमत्कारिक!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त्या पिच्चरमधील त्या (किंवा तत्सम) क्लासेसचा टार्गेट आड्यन्स हा प्रामुख्याने अमेरिकेत कायमस्वरूपी स्थायिक होण्यास आलेल्या इमिग्रण्टांचा असावा, असे सुचवावेसे वाटते. प्रस्तुत पिच्चरमधील हिरविणीची केस विरळा असावी. (चूभूद्याघ्या.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0