दाक्षिणात्य भाषातील, अक्षरांचे, शब्दांचे देवनागरी-मराठी लेखन, उच्चारण कसे करावे ? आव्हान !

नमस्कार,

धागा लेखाचे शीर्षक सदस्य विनंती लक्षात घेऊन बदलले आहे.

१) കാഞ്ഞങ്ങാട് या मल्याळम गावाच्या नावाचे देवनागरी-मराठी लेखन कसे करावे ? एक आव्हान !

केरळराज्याच्या कासरगोड जिल्ह्यात കാഞ്ഞങ്ങാട്(मल्याळम विकिपीडियातील लेखदुवा) नावाचे गाव/छोटे शहर आहे. त्याचे इंग्रजी विकिपीडियातील लेखन सध्या Kanhangad असे केले गेले आहे. आणि मराठी विकिपीडियात कान्हागड असे लेखन केले गेले आहे. बहुधा इंग्रजी आणि मराठी विकिपीडियातील दोन्ही लेखन चुकीचे असण्याची आणि मुळाबर हुकूम नसण्याची प्रथम दर्शनी शक्यता वाटते. കാഞ്ഞങ്ങാട് या लेखनात बहुधा एकापाठोपाठ वेगवेगळी अनुनासिके असण्याची शक्यता वाटते (चुकभूल देणे घेणे) तसे जर असेल तर त्याचे देवनागरी लेखन आणि वाचन कदाचित एक आव्हान असू शकेल (चु.भू.दे.घे.)

अर्थातच ऐसी अक्षरेवर मल्याळम येत असणारे कुणी असण्याची शक्यता कमी आहे पण मदतीसाठी इंग्रजी विकिपीडियावरील मल्याळम फोनॉलॉजी आणि मराठी विकिपीडियावरील भारतीय अक्षरांतरण हा (आयपीए लेखांतर्गत) विभाग उपलब्ध आहे.

लेखन चालू
१) കാഞ്ഞങ്ങാട് = കാ ഞ്ഞ ങ്ങാ ട് हे बरोबर असेल का ?
२) കാ = ?
३) ഞ്ഞ = ?
४) ങ്ങാ =?
५) ട് =?


आपले या धाग्यावरील लेखन प्रताधिकारमुक्त गृहीत धरले जाईल. विषयांतरे टाळण्याची आग्रहाची विनंती आहे. प्रतिसादांसाठी विषयांतरे टाळण्यासाठी धन्यवाद

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

१) കാഞ്ഞങ്ങാട് = കാ ഞ്ഞ ങ്ങാ ട് हे बरोबर गृहीत धरून माझा स्वतःचा प्रयत्न

२) കാ = का ?
३) ഞ്ഞ = ഞ+ഞ = ञ+ञ =?
४) ങ്ങാ = ങ് =ङ, ങ്ങാ = ङङा ?
५) ട് = (ട = ट) , ട്= ट् ?

കാഞ്ഞങ്ങാട് = काञ्ञङङाट् ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

१. पहिले अक्षर माझ्या माहितीनुसार 'का' आहे.
२. ह्या गावाबद्दल विशेष आपुलकी का बरे? म्हणजे ह्या गावात इतके काय खास आहे? मलयाळम गावाचे नाव रोमन लिपीत नीट लिहिले गेले का हे पाहणे हे माझ्या मते मलयाळम भाषकांचे काम आहे.
३. अशा प्रश्नांसाठी वेगळा धागा बरोबर वाटत नाही. (मराठी विकी आणि त्याच्या कामाला समर्थन आहेच, गैरसमज नसावा). असे छोटे प्रश्न हे 'मनातले छोटे-मोठे प्रश्न' धाग्यात विचारावेत किंवा विकीसाठी अनेक धागे बनवण्यापेक्षा एकच धागा बनवून त्यात विचारावेत असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

३. अशा प्रश्नांसाठी वेगळा धागा बरोबर वाटत नाही. (मराठी विकी आणि त्याच्या कामाला समर्थन आहेच, गैरसमज नसावा). असे छोटे प्रश्न हे 'मनातले छोटे-मोठे प्रश्न' धाग्यात विचारावेत किंवा विकीसाठी अनेक धागे बनवण्यापेक्षा एकच धागा बनवून त्यात विचारावेत असे वाटते.

विकीसाठी एकच धागा बनवून त्यात विचारावेत याला मुख्य धाग्यावर विषयांतरे वाढत नाहीत तो पर्यंत तत्वतः समर्थन आहे. देवनागरीत लिपीचिन्हे नसलेली उच्चारणे कोणती ?
हा ह्याच नाही तर आसपासच्या उद्देशाने धागा काढला, सुतावरून स्वर्ग गाठत झालेली विषयांतरे अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा आदर म्हणून विषयांतरीत चर्चांच स्वतःच महत्वम्हणून ठिकच पण ऐसीच्या श्रेणी देण्याच्या पद्धतीत विषयांतर झालेल्या प्रतिसादांना चांगल्या मिळणार्‍या श्रेणींवर जळायच नाहीए पण एक नेमकी माहिती एवढी वेचणारा विकिपीडियन म्हणून ते एकुण त्रासदायक आहे. विषयांतर न करता नेमके प्रतिसाद देऊ इच्छिणार्‍यांना हतोत्साहीत करणार आहे.

२. ह्या गावाबद्दल विशेष आपुलकी का बरे? म्हणजे ह्या गावात इतके काय खास आहे? मलयाळम गावाचे नाव रोमन लिपीत नीट लिहिले गेले का हे पाहणे हे माझ्या मते मलयाळम भाषकांचे काम आहे.

विकिपीडियात दिली जाणारी माहिती वस्तुनिष्ठ असणे हे त्या त्या भाषिक विकिपीडियनचही काम आहे. मराठी विकिपीडियातन दिली जाणारी माहिती वस्तुनिष्ठ असणे हे मराठी विकिपीडियनच काम आहे. ( एखादा महाराष्ट्रीयन केरळात गेला आणि चुकीचे उच्चारण अथवा लेखन करू लागला तर ज्ञानकोशाचा उद्देश असफल होतो. या कंसातील वाक्यांचा खीसपाडून कुणी विषयांतर करणार नाहीत ही आशा)

तीच बाब इंग्रजी विकिपीडियाची आहे. अर्थात इथे रोमन लिपीचा उल्लेख संदर्भासाठी केला आहे. जिथपर्यंत मल्याळी भाषकांच काम आहे हा भाग आहे तर ते कोण्या मल्याळी माणसाने मराठी विकिपीडियावर दुरुस्त करण्याचा त्याच्या मतीने केलेला प्रयत्न फसला नाही तर माझ कशाला लक्ष गेलं असत आणि मलाही जुळणी करताना कुतुहल वाटल एकुण या विषयावर विषयांतर न करणारा एकच धागा असावयास माझी हरकत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

२. ह्या गावाबद्दल विशेष आपुलकी का बरे? म्हणजे ह्या गावात इतके काय खास आहे?

काञ्ञङङाट् मध्ये .............................. ञ स्वतःच जोडाक्षर होऊन दोनदा पाठोपाठ ङ च जोडाक्षर आकारांत ङ (ङा) शी കാഞ്ഞങ്ങാട് या गावाच्या नावाकरता 'काञ्ञङङाट्' माझ हे लेखन बरोबर असेल तर सर्वसाधारण पणे याच उच्चारण कस करणार ? आता हे लेखन असच असेल तर याच्या उच्चारणात काही खास असेल ना ? मराठी विकिपीडियावर तमीळ व्यक्तीने "काञ्ञङ्ङाटु" असा लेखन प्रयत्न केला ङ् हा अर्धा लिहिलाय ട= ट तर ട്= ट् व्हावयास हवा असे वाटते (चुभूदेघे) ट् निभृत उच्चारण असून त्याच प्रत्यक्ष उच्चारण अथवा लेखन टु केल जात असेल तर ठाऊक नाही.

काञ्ञङ्ङाट् हे देवनागरी लेखन अचूक असल्याचे जवळपास निश्चित आहे पण ञ्ञङ्ङा अशा अनुनासिकांचे एकापाठोपाठ उच्चारण सर्वसाधारणपणे मराठी माणसाने कसे करावे असा एक प्रश्न शिल्लक राहतो


एकुण यात ञ्ञङङाट् च्या लेखन उच्चारणाच आव्हान असल्या शिवाय आव्हान हा शब्द लेख शीर्षकात वापरला नाही. आणि त्यात काहीच विशेष नसताना हा लेख धागा काढलेला नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

काञ्ञङ्ङाट् असे लिहीत असतील तर तसाच उच्चार करावा! Smile 'ञ' हे व्यंजन मलयाळम भाषक सहजतेने उच्चारतात आणि मलयाळममध्ये ते इतर भारतीय भाषांच्या तुलनेत विपुलतेने आढळते. 'ङ'चा उच्चार करण्यात काही अडचण असू नये. इथे ऐसीचे सदस्य धनंजय यांचे संस्कृत उच्चारणाबद्दलचे काही पॉडकास्ट आहेत. त्यातील '२. स्पर्शवर्ण' हा भाग ह्या संदर्भात उपयुक्त ठरावा. माझ्या अल्प ज्ञानानुसार तेथील ञचा उच्चार आणि मलयाळममधील ञचा उच्चार सारखेच असावेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धनंजय यांचे संस्कृत उच्चारणाबद्दलचे पॉडकास्ट मस्तच आहेत क्रमांक २ ऐकली. कदाचित अजुन एकदोनदा ऐकावी लागेल असे वाटते. आधी एक विचार आला होता तो म्हणजे गोंगाट ऐवजी गोञ्ञङ्ङाट् असा उच्चार प्रयत्न करून मग काञ्ञङ्ङाट् असा प्रयत्न करावा पण पोडकास्ट ऐकल्या नंतर फरक असावा असे वाटते, पोडकास्ट कदाचित अजुन एकदोनदा ऐकावी लागेल असे वाटते.

माहितीसाठी आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

विकीसाठी अनेक धागे बनवण्यापेक्षा एकच धागा बनवून त्यात विचारावेत असे वाटते.

या सूचनेशी सहमत आहे. एकाच धाग्यावर काय ते विकीरण होऊ द्या Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

திருவள்ளூர் தட்டை கிருஷ்ணமாச்சாரி हे नेहरुकालीन भारताचे माजी अर्थमंत्री होते. திருவள்ளூர் தட்டை கிருஷ்ணமாச்சாரி या तमीळ लेखनाचे नेमके देवनागरी लेखन कसे करावे ?

धन्यवाद

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

तिरुवळ्ळूर तट्टै कृष्णमाचारी असे लेखन करावे.

तमिळमध्ये त-द यांना एकच चिन्ह (த) आहे. तसेच ट-ड यांनाही एकच चिन्ह (ட) आहे. त्यामुळे चार पर्याय येतात. त्यातला पायजे तो निवडावा. बेष्ट आप्षन इज, लिसनिंग फ्रॉम अ तमिळ गाय. अपडेटः विकीवरील इंग्लिश स्पेलिंगनुसार तट्टै हा पाठ योग्य आहे.

शेवटच्या शब्दात लिटरली वाचले तर 'किरुष्णमाच्चारी' असे होईल. पण तमिळमध्ये जनरली कृष्ण हा शब्द किरुष्ण, कन्या हा शब्द कन्निया असा लिहिला जातो. तस्मात कृष्णमाचारी हाच पाठ योग्य आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

शेवटच्या शब्दात लिटरली वाचले तर 'किरुष्णमाच्चारी' असे होईल. पण तमिळमध्ये जनरली कृष्ण हा शब्द किरुष्ण, कन्या हा शब्द कन्निया असा लिहिला जातो. तस्मात कृष्णमाचारी हाच पाठ योग्य आहे.

म्हणजे उच्चारण कृष्णमाचारी पण लेखन किरुष्णमाच्चारी आणि उच्चारण कन्या पण लेखन कन्निया असे काही असण्याची शक्यता आहे का की त्यांची तमीळ उच्चारणे किरुष्णमाच्चारी आणि कन्निया शी मिळती जुळती असण्याची शक्यता असेल ?

माहितीपूर्ण प्रतिसादांसाठी धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

उच्चार किरुष्णम्माचारी व कन्निया नव्हेत, फक्त लेखन तसे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बेष्ट आप्षन इज, लिसनिंग फ्रॉम अ तमिळ गाय.

तसेच करायचे झाले, तर प्रत्येक तमिळ शब्द देवनागरीत 'म्हsssss' असा (आणि रोमनमध्ये 'mooooooo' असा) - कदाचित काही अवग्रह अथवा 'o' कमी किंवा जास्तीच्या फरकाने - ट्रान्सलिटरेट करावा लागेल.

(कदाचित 'म्हsssss' की 'म्हॅsssss' असा काही सूक्ष्म पाठभेद निर्माण होण्यास वाव आहे खरा, पण तो तेवढाच.)

(अतिअवांतर ओपन शंका: 'लिसनिंग फ्रॉम' की 'लिसनिंग टू'? रादर, (मथितार्थ लक्षात आला, पण तरीही, या संदर्भातसुद्धा) 'टू लिसन फ्रॉम' ही वैध कॉन्स्ट्रक्ट असू शकते का? कानाला काहीशी चमत्कारिक वाटतेय. (असेलच, असे नाही.) चूभूद्याघ्या.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हम्म, रैट्ट. 'लिसनिंग धिस फ्रॉम अ तमिळ गाय' असे म्हणायला पाहिजे होते खरे. सर्वनाम गाळल्या गेले.

(आता परत किंतु आला- वरील रचना योग्य आहे की नाही?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

(आता परत किंतु आला- वरील रचना योग्य आहे की नाही?)

कदाचित 'लिसनिंग टू धिस फ्रॉम अ तमिळ गाय'? किंवा, त्याहीपेक्षा, 'टू लिसन टू धिस फ्रॉम अ तमिळ गाय', असे काहीसे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओह रैट्ट सार! बरोबरे. धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

'म्हsssss' असा (आणि रोमनमध्ये 'mooooooo' असा)

म्हणजे लहानपणी मला 'हम्माsssss' असं शिकवायचे ते चूक होतं तरं! वा... आज कुछ नया सिखनेको मिला. आंतरजालानी ज्ञानाची कवाडं उघडली असं म्हणतात ते खोटं नाही...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

म्हणजे लहानपणी मला 'हम्माsssss' असं शिकवायचे ते चूक होतं तरं!

असा दावा (निदान अद्याप तरी) आम्ही केलेला नाही. बहुधा हादेखील पाठभेद स्वीकारार्ह असावा.

चला, या निमित्ताने तमिळ शब्दांच्या देवनागरीतील ट्रान्सलिटरेशनच्या वेगवेगळ्या पद्धती प्रकाशात येत आहेत, ही चांगलीच बाब आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१) तमिऴ संधिनियमांमुळे काही प्रकारची जोडाक्षरे निषिद्ध असतात. अशा ठिकाणी ह्रस्व इकार घालून जोडाक्षर अलग करतात. (कित्येक प्राकृतांमध्येही काही विवक्षित नियमित ठिकाणी अशी "स्वरभक्ति" होते, हे समांतर आठवते.) "कन्निया", "पिरभाकरन्" वगैरेंकरिता हे स्पष्टीकरण.

२) अघोष-सघोष स्पर्श व्यंजनांत (म्हणजे क-ग, च-ज, ट-ड, त-द, प-ब या जोड्या) तमिऴ भाषा उच्चारांत फरक करत नाही, हे विधान बरेच शिथील आहे. संधिनियमांमुळे मूळ द्रविड तमिऴ शब्दांत या जोडीपैकी एकच कुठल्याही संदर्भात येऊ शकते. शब्दाच्या सुरुवातीला किंवा द्वित्त जोडाक्षरात स्पर्श व्यंजन येते, तेव्हा संधिनियमांच्या अनुसार अघोष उच्चरण होते (क*, च*, ट, त, प) आणि दोन स्वरांच्या मध्ये वा अनुस्वाराच्या नंतर जर स्पर्श व्यंजन आले, तर ते सघोष उच्चारले जाते (-ग*-, -ज*-, -ड-, -द-, -ब-). त्यामुळे एकाच चिन्हानी दोन्ही उच्चार लिहिले तरी कधीही घोटाळा होत नाही. संधी = "त्या भाषेतील सवयीप्रमाणे जीभ आपोआप वळून" अघोष किंवा सघोष उच्चार होतो.

काही शतकांपूर्वी संस्कृतोद्भव-प्राकृतोद्भव शब्द तमिऴमध्ये येऊ लागले, तसे दोन स्वरांच्या मध्येसुद्धा अघोष स्पर्श व्यंजने अर्थपूर्ण होऊ लागली, आणि काही लोकांची जीभही तशी वळू लागली. आता लिपी बदलण्याऐवजी द्वित्त वापरून अघोष व्यंजने लिहिण्यात येऊ लागली. द्वित्त (क्क, च्च, ट्ट, त्त, प्प) हे "अघोष" सांगते, दुप्पट वजन नव्हे. "आच्चारि" मधल्या द्वित्त "च्च"करिता हे स्पष्टीकरण.

तळटीप :
{*क, *ग,} {*च, *ज} : या दोन वर्गांत तमिऴ ध्वनी स्पर्शाकडून उष्मवर्णांकडे सरकलेले आहेत.
{*क, *ग,} -> ह
{*च, *ज} -> स
त्यामुळे अधिक गुंतागुंत होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विश्लेषण रोचक आहे. मुत्तुस्वामी हे नाव तमिळमध्ये त्त वापरून लिहून वर मु'त्तु'स्वामी असा उच्चार करताना तमिळ लोकांना पाहिले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होय, "मुत्तु" मूळ द्रविड उद्भव शब्द आहे ना?
मूळ-द्रविड उच्चारी द्वित्ते अघोषच असतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

द्वित्त (क्क, च्च, ट्ट, त्त, प्प) हे "अघोष" सांगते, दुप्पट वजन नव्हे.

ह्याबद्दल प्रश्न होता. तमिळमध्ये लिहिताना अघोष द्वित्त असेल तर ते उच्चारताना एकत्त आहे की द्वित्त हे ओळखायला काही मार्ग आहे का? मूळ द्रविडी शब्दात जर लिखित रूपात द्वित्त असेल तर उच्चारात द्वित्त असतेच, असे काही आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यग्जाक्टलि हीच शंका. विशेषतः लेखनात द्वित्ताने सुरू होणारे शब्द असतात त्यांचे उच्चार कसे करावेत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

माझे अपूर्णज्ञानप्रदर्शन येथे करतो Smile

मिहिर : होय, द्वित्तास दुप्पट वजन द्यावे की नाही, याकरिता व्युत्पत्तीचा आधार घ्यावा लागेल. मराठीमधील शुद्धलेखनात कधीकधी (तत्सम की तद्भव) असा व्युत्पत्तीचा आधार घेतात, तसाच समांतर प्रकार. (विकिपीडियाच्या मते एकल आणि द्वित्त व्यंजनांच्या मध्ये काही भाषांमध्ये लक्षणीय फरक नसतो, त्या यादीत त्यांनी तमिऴ घातलेली आहे - http://en.wikipedia.org/wiki/Gemination )

बॅटमॅन : स्पर्श द्वित्ताने सुरू होणारे शब्द तमिऴमध्ये प्रचलित नसावेत. परंतु मुद्दामून असे शब्द घडवून कोण्या तमिऴ्स्वभाषकाला विचारता येईल.

येनीवे, येथे पुस्तकातूनच बघूया - माझ्या म्हणण्यापेक्षा अधिक विस्तारित सांगतात. म्हणजे दोन्हीकडे स्वर असले, आणि द्वित्त नसले, तर सर्वच मूळ-द्रविड बिगर-अनुनासिक स्पर्श "व्"च्या दिशेने बदलतात. बिगर-द्रविड शब्द मात्र घोष-व्यंजने होतात, वगैरे.

तरी आता अज्ञानप्रदर्शन पुरे करतो...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नै तसे नै. लेखनात समजा एखादे वाक्य आहे, त्यातला पहिला सोडून अन्य काही शब्द हे द्वित्ताने सुरू होतात. तर त्यांचा उच्चार कसा करावा इ.इ. समजा असा एखादा शब्द आहे, आणि तो प्प ने सुरू होतो. तर त्याआधीच्या शब्दाच्या शेवटी अर्धा प् लिहितात. तो अगोदरच्या शब्दाचाच भाग असल्यागत असतो. अन नंतरचा शब्द प पासून सुरू होतो. पण अर्थदृष्ट्या पाहिले तर आधीच्या शब्दात प् असायचा संबंध नाही. अशा केसमध्ये द्वित्त उच्चारावे की नाय? ते समजत नाय. माझ्याकडच्या तमिळ पुस्तकात द्वित्त उच्चारावे असे दिलेय, पण बाकीचं आठवत नै + कन्फ्यूज म्हणून इच्यारतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अघोष-सघोष विवेचन अतिशय रोचक आहे. नवीनच माहिती मिळाली. आणि द्वित्ताचे विवेचनही तितकेच रोचक! घरचे तमिऴ पुस्तक आता अधूनमधून वाचायला हवे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अरे अरे काय हे, मराठी संस्थळावर दाक्षिणात्य भाषेसंबंधी धागा, किती पुरोगामी असावं एखाद्या संस्थळाने.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कन्नडकानडीबद्दल नाही म्हणून चाल्ल्यात गमजा Wink ह. घ्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

'काञ्ञङङाट् ' हे उच्चारण बरोबर का चूक अशी चर्चा करण्याआधी 'ङ','ञ' ह्यांचे उच्चार महाराष्ट्रातील किती मराठी साक्षरांना माहीत आहेत असा प्रश्न विचारावासा वाटतो. एका शाळेतील मराठीच्या मॅडमनी 'ङ'चा उच्चार 'अडा' असे शिकवल्याचे उदाहरण मला ठाऊक आहे!'सिंह'चा उच्चार 'सींह' असा करणारे कित्येकजण मला माहीत आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सिंह'चा उच्चार 'सींह' असा करणारे कित्येकजण मला माहीत आहेत.

वरील उच्चार हा मराठीच्या एकूण उच्चारपद्धतीशी सुसंगतच आहे. त्याला चूक म्हणणे हे चूक आहे.

अर्थात- ङ आणि ञ यांचे उच्चार माहिती नाहीत आणि ते असायला हवेत याशी सहमत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

माहितगार ह्यांना अवान्तरे आवडत नाहीत तरीपण आम्हा टवाळांना विनोद आवडतात म्हणून माफी मागून 'तमिळ गाय'वरून आठवलेला विनोद सांगतो.

एक भारतीय बैल रस्त्याने चालला होता. उलट बाजूने काही अमेरिकन बैल आले. त्यांना पाहून भारतीय बैलाने त्यांना मैत्रीपूर्ण हाक मारली, 'हाय गाईज'. त्यामुळे अमेरिकन बैल भडकले, भारतीय बैलाच्या अंगाव शिंगे रोखून आले आणि त्याला धमकावणीच्या सुरात विचारते झाले,'का रे, आम्ही तुला गाई वाटलो काय? आम्ही बैल आहोत दिसत नाही?'

भारतीय बैल मान खाली घालून मुकाटपणे चालता झाला.

असाच चेन्नईवरचा विनोद. चेन्नईला 'चेन्नई' का म्हणतात?
उत्तर - 'चेन नाही!'

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पयल्या जोकमध्ये भारतीय अन आम्रविकन ही लेबले इंटरचेंज करावीत असे अर्थदृष्ट्या पाहता वाट्टे.

तदुपरि- दुसर्‍या जोकची अजूनेक व्हर्जन ऐकली आहे. चेन्नई = चेन् + नाई अर्थात एकप्रकारचे कुत्रे. चेन् चा तमिळमध्ये अर्थ विसरलो. नाय् = कुत्रे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आह्हा!!! कंय बोललात कंय बोललात Smile अगदी १००%.
काहीतरी अंतर्विरोध जाणवत होता पण काय तेच शब्दात मांडता येत नव्हतं ना मेंदूत स्पष्ट होत होतं.
आता यकदम आकळलं बगा!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाई अर्थात एकप्रकारचे कुत्रे.

'एका प्रकारचे' काय म्हणून?

तमिळमध्ये (आणि बहुधा कन्नडमध्येसुद्धा; चूभूद्याघ्या.) 'नाई' म्हणजे 'कुत्रे', अशी (निदान माझी तरी) समजूत होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहो चेन नाई म्हणजे विशिष्ट प्रकारचे कुत्रे म्हणायचे असावे, पण नक्की कसले ते विसरलेत ते. Smile
कन्नडे आणि बहुतेक तमिळे पण तो शब्द नायि लिहितात वाटते. (चूभूद्याघ्या). एकुणच शब्द देसायि, सायिनाथ अशा प्रकारे लिहितात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ठीक. आले लक्षात. धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गुगलून पाहिल्यास तमिळमध्ये तो शब्द 'नाय्' असा लिहिलेला दिसला.

तदुपरि- चेन म्हणजे तमिळमध्ये अर्थ काय आहे? सेन्दमिऴ मधला प्रीफिक्स न्हवे, तर दुसरा अर्थ अभिप्रेत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

धनंजय, बॅटमन आणि इतर सर्वांनाच माहितीपूर्ण प्रतिसादांसाठी धन्यवाद

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

१) ऄ (0904) ऎ (090E) (U+0944 ॆ) ऒ (U+091) (U+0948 ॊ) कंसातील युनिकोड क्रमांक कदाचीत जरासे वेगळे असू शकतील या युनोकोड चार्ट मध्ये म्ह्टल्या प्रमाणे देवनागरीत उपलब्ध केली जाणारी हि अक्षरे काश्मिरी बिहारी आणि दाक्षीणात्य (short e किंवा short o) उच्चारणे दाखवण्यासाठी उपयूक्त असू शकतील असे म्हटले आहे.

१ अ) ऄ (0904) ऎ (090E) (U+0944 ॆ) ऍ (090D) आणि मराठीचा अधिकृत अ‍ॅ (0972 ) यांच्या अभिप्रेत उच्चारणातील साम्य आणि भेद कोणते

१ ब) ऄ (0904) ऎ (090E) (U+0944 ॆ) ऒ (U+091) (U+0948 ॊ) हि अक्षरे काही अपवादात्मक कळफलक रचनात (किबोर्ड लेऑउट) मध्ये दिसून येतात. माझ्या मता प्रमाणे अपवादात्मक परिस्थितीत काश्मिरी बिहारी दाक्षीणात्य उचारणे दाखवण्यासाठी ती कॉपी पेस्टही करता येऊ शकतील. या अक्षरांचे मराठी कळफलकांवर असणे आणि काही गरजेच्या मराठी अक्षरांचे नसणे यामुळे काही लोकांच्या टंकनात समस्या उद्भवताना दिसतात तसेच मराठी कळफलकाच्या प्रमाणीकरणात अडथळा येतो असे वाटते. अर्थात हे माझे व्यक्तीगत मत झाले होता होईतो व्यापक सहमती साधता यावी म्हणून हा विषय येथे मांडत आहे. दुमत असल्यास कृपया सकारण नोंदवावे म्हणजे चर्चा करता येईल.

२ अ) ऍ (090D) हिंदी किंवा इतर कोणत्या भारतीय भाषेसाठी आहे का ? आणि या अक्षराचे मराठी कळफलकांवर असणे गरजेचे आहे का? कारण इनस्क्रिप्ट सारख्या महत्वाच्या कळफलकावर अ‍ॅ (0972 ) ची गरज असताना विनाकारण ऍ (090D) ने जागा अडवली आहे. त्यामुळे हि इनस्क्रिप्ट वाली मंडळी अ + ॅ = अॅ असे करून दुधाची तहान ताकावर भागवतात पण अ‍ॅ (0972 ) हा एक संघ अ‍ॅ आणि अॅ (अ + ॅ ) हे युनिकोडात वेगवेगळे असल्यामुळे शोध यंत्रात एकसंघ अ‍ॅ (0972 ) चा शोध घेताना अॅ (अ + ॅ ) असे लेखन केलेल्या अ‍ॅ ंचा तसेच त्या विरुद्ध प्रकारच्या शोधातही मराठी अ‍ॅ चे सर्व शोध आंतर्भूत होऊ शकत नाहीत.

२ ब) केवळ 'मनोगत संस्थळ' हा अ‍ॅ (0972 ) बरोबर वापरत परंतु गमभन मध्येच मर्यादा आल्यामुळे त्यावर आधारीत ऐसी मिपा इत्यादीत अ + ॅ = अॅ हे असे जोडाक्षरीत टंकन होते जे प्रमाणी करणासाठी योग्य नाही असे वाटते. गमभन मध्ये असे येण्याचा उगम बहुधा इन्स्क्रीप्ट वापरकर्त्यांना कळफलकावर अ‍ॅ (0972 ) ची सुविधा नसल्यामुळे त्यापैकी कुणीतरी मायबोलीकर अजय गल्लेवालेंना अ + ॅ = अॅ सुचवले असावे (हा माझा कयास) आणि अजय गल्लेवालेंनी गमभनच्या ओंकार जोशींना इमेल लिहून तसे सुचवले असावे तो इमेल गमभन ने ऑनलाईन उपलध ठेवला असल्याचे http://www.gamabhana.com/?q=node/22 येथे दिसून येते. तत्पुर्वी (२००९) मायबोली आणि गमभन दोघेही ऍ (090D) वापरत असावेत असे इमेल वरून दिसून येते.

२ क) मराठी विकिपीडियावर वैश्विक टायपिंग सुविधे अंतर्गत (मायक्रोसॉफ्टच्या मदती शिवाय) जे क्वेरी/जावा अधारीत मराठी इनस्क्रिप्ट कळफलक उपलब्ध आहे किमान मराठी विकिपीडियावरच्या इनस्क्रिप्ट कळफलकात ऍ (090D) काढून बरोबर अधिकृत मराठी अ‍ॅ (0972 ) तांत्रीकदृष्ट्या शक्य होईल असे वाटते. तत्पुर्वी ऍ (090D) चा मराठी अथवा मराठी बोलींसाठी काही उपयोग असण्याची फारशी शक्यता नसल्याबद्दल दुजोरा हवा आहे.

* महाराष्ट्र टाईम्स सुद्धा विकिप्रमाणे ऑनलाईन इन्स्क्रीप्ट सुविधा पुरवते असे दिसते त्यात त्यांनाही विकिप्रमाणे सुधारणा कळफलकात ऍ (090D) काढून बरोबर अधिकृत मराठी अ‍ॅ (0972 ) तांत्रीकदृष्ट्या शक्य होईल असे वाटते.

* बराहाची एक महिन्यासाठी फुकट मिळणारी आव्रुत्ती तपासली त्यांनी मराठी फोनेटीक पर्यायातून ऍ (090D) चा पर्याय काढूनच टाकला आहे; सगळ्यात आधी ऍ (090D) होता मग ऍ आणि ॲ दोन्ही होते पण आता केवळ एकसंघ ॲ (0972 ) ठेवल्याचे दिसते. सोबतच त्यांच्या मराठी इन्स्क्रिप्ट कळफलकातूनही त्यांनी ! चिन्हाच्या जागी उपलब्ध असलेल्या ऍ (090D) चे उच्चाटन करून ॲ (0972 ) ला जागा दिली आहे असेच मराठी विकिंवर उपलब्ध कदाचित मटाच्याही इनस्क्रिप्टातही असा बदल त्यांना करणे शक्य होईल असे वाटते

२ ड) कुणाकडे मायक्रोसॉफ्ट विंडोज ८ असल्यास त्याच्या मराठी इनस्क्रिप्टात सुद्धा अजूनही ऍ (090D) ने जागा अडवलेली आहे का याची माहिती हवी आहे.

२ इ) मायक्रोसॉफ्ट विंडोज संगणकांसोबत गेलेल्या अथवा भविष्यात वितरीत होणार्‍या मराठी इनस्क्रिप्टात सुद्धा अजूनही ऍ (090D) ने जागा अडवलेली आहे ती जागा बरोबर अधिकृत मराठी अ‍ॅ (0972 ) ला मिळवून देण्यासाठी आणि उपयोग कर्ते सजगते साठी काय करता येऊ शकेल. ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

बूच मारण्यात आले आहे. एकदाच काय ते लिहा बघू. दर वेळी नवीन प्रतिसाद म्हणून यायचे आणि तोच प्रतिसाद पाहायचा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मराठीभाषक लेखकांना (आणि अन्यभाषक लेखकांना) सोयीस्कर अशी चिन्हे कळफलकावर सहज उपलब्ध असली, तर चांगली सोय होईल. अशा कळफलक-चौकटी (mapping) उपलब्ध करून देणे प्रणालीलेखकांकरिता अगदीच कठिण नसावे असे माझे (अज्ञानमूलक) मत आहे. असे व्हावे त्यावे प्रोत्साहन सदस्य माहितगारमराठी देत आहेत, ते उत्तम.

शोधयंत्रांबाबत त्यांचा मुद्दा उत्कृष्ट आहे. एकच लेखी/दर्शनी चिन्ह जर संगणकाच्या अंतर्गत लिपीत दोन-तीन वेगवेगळ्या प्रकारे योजलेले असेल, तर शोधात अडचण येईल. वापर करणार्‍याला कुठल्याही अंतर्गत प्रकारांनी केलेले उल्लेख सारखेच हवे असतात, पण शोधयंत्र प्रणालीला मात्र ते उल्लेख वेगवेगळे म्हणून कळून येतात.
याबाबत दोन्ही बाजूंनी उपाय हवा :
(अ) एक वर सुचवलेला उपाय, की इतःपर लेखन करताना त्या चिन्हाकरिता एकच काय ते प्रमाण वापरावे
(आ) पूर्वी लिहिलेला मजकूर शोधता यावा, म्हणून शोधयंत्राच्या प्रणालीत अमुक-इतके वेगळे अंतर्गत लेखनाचे प्रकार समसमान म्हणून नोंदण्यात यावे. याचे उदाहरण काही प्रमाणात रोमन लिपीतील शोधशृंखलांकरिता वापरलेले दिसते. अधिक विस्ताराने : एखाद्या शृंखलेत "i" हे अक्षर असले, जसे "higado" तर गूगल शोधयंत्र " í ì ï " वगैरे अन्य चिन्हे सुद्धा शोधते. आता Hígado हा शब्द स्पॅनिशमध्ये प्रचलित आहे, आणि जरी शोधातील चिन्ह वेगळे असले, तरी गूगल शोधात ते सापडते :
तुलना करा :
https://www.google.com/search?q=higado
https://www.google.com/search?q=h%C3%ADgado

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0