बाबूंचे अच्छे दिन आले

बाबूंचे अच्छे दिन आले

(बाह्य दिल्लीत राहणारे काही बाबू जाणा-येण्याचा वेळ ही ८ तासात सामावून घायचे. आता कार्यालयात १० तास काम करावे लागतो आणि शिवाय जायला यायला दीड-दोन तास लागतातच. १५ मिनिटे उशीर झाला कि अर्धी सुट्टी कट. असे हे बाबूंचे अच्छे दिन सुरु झाले आहेत)

दोन तास जायला
दोन तास यायला
वर दहा तास काम
बाबूंचे असे
अच्छे दिन आले.


न घेताच सुट्ट्या
कश्या काय संपल्या
मिनिटाच्या उशिराने
पाण्यात त्या बुडाल्या.
बाबूंच्या सुट्ट्यांचे असे
अच्छे दिन आले.


कचर्याचे ढिगारे
आता स्वच्छ झाले.
पान-तंबाकू थुंकणे
आता बंद झाले.
कारीडोर भिंतींचे असे
अच्छे दिन आले


कागजी घोडे पुन्हा
दौडू लागले.
फाईलींना नवे
जीवन मिळाले.
सरकारी कामांचे असे
अच्छे दिन आले.

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

Smile
खरंच की काय? चांगलंय

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

फक्त एकच शंका आहे, कागदी घोडे खरोखरच रस्त्यावर धावतील का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दोन तास जायला
दोन तास यायला
वर दहा तास काम
बाबूंचे असे
अच्छे दिन आले.

तुम्ही सरकारी नोकरांना सहानुभूती दाखवू बघताय का? आजपर्यंतच्या अनुभवामुळे सरकारी नोकरांबद्दल खूप कमी सहानुभूती आहे. त्यांनी कार्यालयाच्या वेळेत, वेळेवर हजर रहाणे ही कायद्याची गरज आहे आणि लोकांची पण तीच अपेक्षा असते. त्यामुळे ते दोन तास प्रवास करून येतात की ४ तास, याच्याशी सामान्य नागरिकाला काहीही देणंघेणं नाही. प्रायव्हेट सेक्टरमधील लोक वर्षानुवर्षे हे आधीच करत आले आहेत. म्हणून आपल्या देशाच्या पंतप्रधानांना १५ ऑगस्टला लोकांना सांगावे लागले की सरकारी नोकर वेळेत कामावर येतात, ही नॅशनल न्यूज कशी काय होऊ शकते? सरकारी बाबूंना हे सांगणे अतिशय गरजेचे होते, घी देखा लेकिन बडगा नही देखा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चुकून बांबूंचे अच्छे दिन आले असं वाचलं. शक्य आहे. बासरी हे भारतीय वाद्य असल्यामुळे आता बांबूंनाही बांबू बसायला हरकत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पी एम ओ च नाही तर अन्य मंत्रालयातही मोदींनी हवा मस्त टाइट केली आहे. आमचे फायनान्स मिनिस्ट्रीत काम करणारे घरमालक सकाळी १० च्या जागी ८ लाच ऑफिसला जाताना दिसत आहेत. म्हणे नॉर्थ ब्लॉकही तापला आहे.
------------------
मोदी भाई की जय हो।

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.