ती हिंगाची ज्यादा चिमूट - मुळ लेखक गवि

या प्रतिसादानिमित्ताने मनात खूप काळापासून असलेला एक विचार जागा झाला.

अगदी प्रचलित पदार्थच, पण एखाद्या व्यक्तीच्या हातून इतरांपेक्षा अत्यंत जास्त चांगले बनतात. अगदी आउटस्टँडिंग.

ती व्यक्ती अन्य सर्वच पदार्थांबाबत सुगरण (चवीच्या दृष्टीने आणि आवड या दृष्टीनेही) असेलच असं नव्हे.

उदा. एखादा नातेवाईक फक्त पिझ्झाच छान करतो.

कोणाचे साधे पुडिंगही लक्षात राहते.

कढी हा तर किती नेहमीचा पदार्थ, पण अन्य बराचसा स्वयंपाक न येणारे माझे बाबा खरोखर अत्यंत उत्कृष्ट कढी बनवायचे.

उकडलेल्या बटाट्याची भाजीसुद्धा करणार्‍या व्यक्तीनुसार अतिसामान्य बेचव ते "हे काय, संपलीसुद्धा, अर्र" अशा मोठ्या रेंजमधली असते.

याहून जास्त मुद्दा मांडण्यची गरज नाहीच. सिंप्ली पुट, या विषयावर लोकांनी टिप्स द्याव्यात इतकाच विनंतीवजा मुद्दा आहे. पण केवळ हाताला चव आहे असं नसतं.. त्या व्यक्तीचा त्या पाककृतीत एक काहीतरी खास बदल किंवा अ‍ॅडिशन असते.

एका कोणाचीतरी साबुदाण्याची खिचडी प्राणप्रिय म्हणावी इतकी मऊसूत आणि खमंग होत असताना त्याविषयी अन्य एका स्त्रीकडे बोलले असता "हॅ.. तूप अन दाणकूट ढप्पळभर घातले की मऊ होईलच खिचडी.." असे उत्तर मिळाले.

पण हे बरोबर नाही.. तूप जास्त किंवा दाणकूट जास्त घातल्याने जर खिचडी उत्तम होत असेल तर कधीतरी तशी करुन खाण्याची इच्छा आहे.

बटाट्याच्या भाजीत हिंगाची चिमूट नेहमीपेक्षा जास्त मोठी घातल्याने तो घमघमाट स्वर्गीय होणार असेल.. किंवा फणसाच्या नेमक्या मधल्या स्टेजला भाजी केल्याने ती जास्त चविष्ट होणार असेल आणि अन्य स्टेजला कडू होणार असेल तर ते माहीत हवे.

"ती हिंगाची ज्यादा चिमूट" अश्या काहीशा नावाने एक धागाच काढायचे मनात होते. पण हा प्रतिसाद पाहून इथेच टंकले..

======

व्यवस्थापकः या विषयावर अधिक अंगाने + पदार्थांवर चर्चा व्हावी, विविध पाककृती करताना वापरल्या जाणार्‍या गोष्टी (जणू खांसाहेबांच्या चिजा Smile ) या चर्चेतील प्रतिसादातून खुल्या व्हाव्यात या उद्देशाने तसेच भविष्यात शोधायला सोपे जावे म्हणून धागा वेगळा काढत आहोत. लेखकाला आवश्यक वाटल्यास चर्चाप्रस्ताव अधिक व्यापक / बांधीव करू शकेलच. मुळ प्रतिसाद इथे होता.

व्यवस्थापकः मुळ लेखकाला श्रेणीदान करता यावे म्हणून मूळ लेखकाच्या परवानगीने धाग्याचा लेखक बदलला आहे.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
4.25
Your rating: None Average: 4.3 (4 votes)

येस! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बदामाला बडा बदाम म्हणतात असे ऐकले होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

असेलही. माझ्या ऐकण्यात आले नाय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

एवढ्या अवांतर प्रतिसादांनंतर उत्तर द्यावं की नाही विचार करत होते.
थोडक्यात, शेंगदाणे बी नसून (बदाम,काजू प्रमाणे) लेग्युम आहे आणि जमिनीखाली उगवतं. उरलेलं इथे वाच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इच्यार अन कसला करायचा? असो. उत्तराबद्दल धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बदाम भिजवून ठेवून नंतर खाल्ल्यास अधिक उपयुक्त ठरतात असे ऐकले आहे.
खखोदेजा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

भिजवलेला बदाम दिसतो किती सुंदर अन लागतोही फार छान, त्याच्यावरच्या लालसर कोवळ्या शिरा तरारुन उठतात अन ती नक्षी... सिंपली ब्युटिफुल!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आम्ही १ महिन्याच्या वर बाहेर राहिले तर खवट होऊ शकेल, अळ्या/किडे होऊ शकतील असा तमाम माल फ्रिज/फ्रिजर मध्ये ढकलतो,त्यासाठीच बंपर साइज फ्रिज घेतलाय. पैकी काजू/बदाम्/बेदाणे फ्रिज मध्ये असतात(फ्रिजर मध्ये नाही) त्यामुळे ताबडतोब काढून नुसते पण खाता येतात, एखाद्या पदार्थात घालायचे असतील तरी प्रश्न नाही!

पै़की शेंगदाणे, बदामला आम्च्या कडे नुसते खायला गि-हाईक नसते (मला चव आणि टेक्शचर दोन्ही आवडत नाही या दोन नट्सचे!). काजू मात्र तुफान संपतात, फक्त दिवसाला १५-२० च्या वर एकावेळी खाल्ले तर दुसर्‍या दिवशी पोट बिघडणाच्या वारंवार अनुभवामुळे मी ८-१० ला थांबते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

पै़की शेंगदाणे, बदामला आम्च्या कडे नुसते खायला गि-हाईक नसते

तसेही शेंगदाणे (आणि काजू) 'नुसते' खाण्यात कै मजा नै! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तसेही 'बिगरनुस्ते' खायचे काजू हे खारवल्या जातात मगच बरे लागतात, नै?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

फ्रिजमधे उघडेच ठेवते की बंद झाकणाच्या डब्यात?
हो नट्स वगैरे जड असतात पचायला आणि वजनपण वाढेल जास्त खाल्ल्यास म्हणून मोजूनच खाणारै. दिवसाची सुरूवात फ्रूट अँड ड्रायफ्रूट्सने Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तू.....वजन वाढण्याबद्दल बोलतेस? जिभेला काही हाड? Wink

बादवे मी बंद डब्यात ठेवते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

ही हॉ हॉ हॉ Wink
ओके थँक्यू Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मोदकाचे फोटू टाकले नैत कोणी यावेळी.
तांदूळाची पिठी न मिळाल्यास www.maayboli.com/node/50159 हे ट्राय करा आणि www.maayboli.com/node/19553 हे असे सुंदर मोदक बनवायचा प्रयत्न करा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बालपणी मटन दालचा आणि चावल बरेच वेळा खाल्ले आहे. ते कसे बनवतात कोणाला माहिती आहे का?
---------------
ओके. मिळाली पाकृ www.cooks.ndtv.com/recipe/show/lamb-and-dal-dalcha-366339

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

This comment has been moved here.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काल फोडणीचा भात केला होता त्याला कूटाच्या मिरच्यांची फोडणी दिली. यावेळच्या भारतवारीमध्ये महडहून आणल्या होत्या. त्या मिर्च्यांम्ध्ये मूळातच मुबलक मीठ असतं हे लक्षात न आल्याने आणि वरुन मीठ घातल्याने, भात जरा खारट झाला.
.
फोडणीच्या भातात कांदा परतलेला पण जरा जाडसर, कच्चट आवडतो मला. अति परतलेला तितकासा आवडत नाही. परतलेले शेंगदाणे किती किती छान लागतात.
.
कूटाच्या मिर्च्या आहेत तोवर त्यांची फोडणी दिलेला सरसरीत दही भात करायला हवा. त्याला ग्रीक योगर्ट चालणार नाही. फार फार घट्ट असतं ते, पाणी काढूनच टाकलेलं असत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

साबुदाण्याची खिचडी बनवताना, सासूबाई साबुदाणा शिजताना साखर मीठ, नारळाचा चव घालत नसत. तर साबुदाणा उपसल्यानंतर त्यातच हे जिन्नस घालून, हाताने व्यवस्थित भरभरवत (असा शब्द आहे का?) असत. डाव, पळी नाही. ते हातानेच नीट सगळीकडे लागते. अरे हो आणि झाकुन ते थोडा वेळ ठेवत, अन्य कामे करत असत. मला वाटतं पदार्थांना एकमेकांमध्ये मिसळायला जरा वेळ दिला की त्यांच्यात काहीतरी ऋणानुबंध तयार होतात Smile कारण खरच पदार्थ जास्त चविष्ट बनतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाने