सखे "शब्द" झाले...

जेव्हा आठवांचे
नभ दाटूनी आले
काठी लोचनांच्या
दव "गोठूनी" आले

                                         


नेहमीच हसलो
भिजल्या पापण्यांनी
आसवांचे कटू घोट
"प्राशूण" झाले

       जेव्हा सोसवे ना
व्यथा काळजाची
माझेची काव्य
मला "यार" झाले
शोधते जयांना
नजर सर्वतेथे
तयांनाही आमुचे
आता "विस्मरण" झाले


केली लाख कोशिश
लपवाया तुज कवितांत
तरी आज कैसे
हे शब्द "फीतूर" झाले

प्रार्थनेत सदा
खुषाली तयांची
सुखांनाही आमुच्या
"गहाण" ठेवून झाले


न देई साथ जेव्हा
आपुली सावलीही
तेव्हा फक्त माझे
सखे "शब्द" झाले

नाही कोसीले कधी
आम्ही प्राक्तनाला
दु:खांनाही साऱ्या
"आलिंगून" झाले


नको साथ खोटी
मला मतलबाची
एकांतावरीच आता
मला "प्रेम" झाले

                                                                                                        - सुमित विसपुते

पूर्वप्रकाशित

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

उद्धरणचिन्हांतील "शब्दां"चे काही वैशिष्ट्य आहे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्या त्या कडव्यांमध्ये, ते "शब्द" मला जास्त महत्वाचे वाटलेत...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- सुमित

"दिसे जे कवीला,न दिसते रवीला...सांगूनी गेले कुणीसे शहाणे..."

जास्त महत्त्वाच्या शब्दांकरिता अधोरेखन किंवा जाड किंवा तिरका ठसा वापरून प्रयोग केला आहे का?
वाक्ये नव्हे पण सुटे शब्द उद्धरण चिन्हांत घातले, तर "मी खुद्द हा शब्द वापरला नसता, पण लोक हा शब्द वापरतात" असा अर्थ वाचकाला जाणवू शकतो.

उदाहरणार्थ -
असल्या "कवी"ला भाषेच्या लयीचे सोयरसुतक नसते.

वरील वाक्यात "कवी" हा महत्त्वाचा इतकेच वाटत नाही. वाक्य लिहिणाराला असले म्हणजे खरे कवी वाटतच नाहीत, पण लोक असल्यांना कवी म्हणतात, हे ध्वनित असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाक्ये नव्हे पण सुटे शब्द उद्धरण चिन्हांत घातले, तर "मी खुद्द हा शब्द वापरला नसता, पण लोक हा शब्द वापरतात" असा अर्थ वाचकाला जाणवू शकतो.

"उद्धरण चिन्हांचा अर्थ प्रत्येक वेळी असाच काढला जातो अथवा काढावयास ह्वा..." याच्याशी (माफ करा पण) मी सहमत नाही...

काही ठिकाणी जो अर्थ अधोरेखन किंवा जाड किंवा तिरका ठसा, यांनी निघू शकतो तो "उद्धरण चिन्हांने" देखिल येतो...
खरंतर अर्थ काय आणि कसा घ्यायचा हे त्या लिखाणावर / काव्यावर अवलंबून असतं, असं मला वाटतं...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- सुमित

"दिसे जे कवीला,न दिसते रवीला...सांगूनी गेले कुणीसे शहाणे..."

हा प्रश्न पडला
आणि काव्य ज्या पद्धतीने मांडले आहे ती आकर्षक आहे, पण त्यामागचा कार्यकारणभाव (अजून तरी) लक्षात आलेला नाही.
पण मांडणीसाठी +१ Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभरी आहे...

वरच्या एका प्रतिक्रियेच्या उत्तरात कदाचित आपणास मझा हेतू कळू शकेल... Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- सुमित

"दिसे जे कवीला,न दिसते रवीला...सांगूनी गेले कुणीसे शहाणे..."

अशा प्रकारची कडव्यांची मांडणी मी मागे "उन्हाळ्यातले थेंब (हायकू)" या ठिकाणी केली होती. त्या वेळी मला अतिस्पष्टीकरणाची हुक्की आली, आणि मांडणीबाबत विवरण मी दिले होते.

येथे प्रस्तुत कवितेत मात्र मांडणीचा अर्थ पूर्णपणे लागलेला नाही, खरा. कदाचित नऊ छोटी कडवी पृष्ठ वर-खाली न-ओढता एका नजरेत दिसावीत हा इतका हेतू असेल, आणि तो पुरेसा असावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कदाचित नऊ छोटी कडवी पृष्ठ वर-खाली न-ओढता एका नजरेत दिसावीत हा इतका हेतू असेल, आणि तो पुरेसा असावा.

हो... काही हेतूंपैकी हा "एक" होतच... Smile

पण तुम्ही नीट बघितले तर कदचित लक्ष्यात येइल की, पहीली ३ कडवी "होणार्‍या त्रासाबद्दल" आहेत...
पुढची ३ "शब्दांनी दिलेल्या साथीबद्दल" आहेत... तर शेवटची ३, "या सर्‍या गोष्टी मान्य केल्याबद्दल" आहेत...

तरी आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभरी आहे...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- सुमित

"दिसे जे कवीला,न दिसते रवीला...सांगूनी गेले कुणीसे शहाणे..."

शेवटची ३ कडवी खूपच आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद सारीका... Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- सुमित

"दिसे जे कवीला,न दिसते रवीला...सांगूनी गेले कुणीसे शहाणे..."

नाही कोसीले कधी
आम्ही प्राक्तनाला
दु:खांनाही साऱ्या
"आलिंगून" झाले

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- सुमित

"दिसे जे कवीला,न दिसते रवीला...सांगूनी गेले कुणीसे शहाणे..."

शोधते जयांना
नजर सर्वतेथे
तयांनाही आमुचे
आता "विस्मरण" झाले

असेंच काही म्हणायचे आहे. शिवाय ५० गाठल्यानंतर एकांतावर प्रेम आपसूकच होतो. नव्या पिढीला आपण out dated झालेलो असतो. शिवाय....

को साथ खोटी
मला मतलबाची
एकांतावरीच आता
मला "प्रेम" झाले

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा हा... खरंय, पण काही गोष्टी वाटायला अथवा अनुभवायला वयाचं बंधन नसतं...
ज्या गोष्टींचा अनुभव उतार वयात अपेक्षित असतो, तो कमी वयात अनुभवणार्‍यांचीही सध्या कमी कुठेय? Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- सुमित

"दिसे जे कवीला,न दिसते रवीला...सांगूनी गेले कुणीसे शहाणे..."