आपण का लिहिता ?

आज आपण अंतर्जालावर लिहितो. पण का लिहतो? हा एक प्रश्न किती दिवसांपासून मनात येतोय. आपण लिहितो त्या मागे काही कारणे असतातच. म्हणून हा प्रश्न.

माझ स्वत:चे म्हणाल तर वयाच्या पन्नासी नंतर अंतर्जालावर आपण लिहू शकतो हे आणि लोक ते वाचतील ही. मी मोडकी-तुटकी का होईना मराठीत लिहायचा निर्णय घेतला. अर्थात लिहिताना पुष्कळ समस्या आल्या पण लिहिणे सुरु ठेवले. माझा लिहिण्याचा उद्देश्य समाजातले आर्थिक, सामाजिक आणि राजनैतिक सत्य लोकांसमोर ठेवणे.

सत्याबाबत म्हणाल तर सहा आंधळ्यांनी, सहा प्रकारे हत्तीचे वर्णन केले. सर्वांचे वर्णन वेगळे असले तरी प्रत्येकाच्या दृष्टीने ते सत्य होते.

मला दिसलेले सत्य लोकांना पटले पाहिजे असा माझा आग्रह नाही.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
3.666665
Your rating: None Average: 3.7 (3 votes)

मला लिहायला आवडते म्हणून मी लिहितो.
मनातले विचार, मते लिहिल्याने - लिहिताना माझ्या विचारांना हळूहळू आकार व स्पष्टता येऊ लागली आहेच, प्रसंगी मते बदललीही गेली आहेत असा माझा समज आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आपापल्या धाग्यांची जाहिरात करण्याची सध्या फ्याशन आहे. माझ्याही ब्लॉगची झैरात! 'आपल्याला मुळात लिहावंसं का वाटतं?'

टीपः या पोस्टमध्ये खाली काही लिंका आहेत. मूळच्या पोस्टहून या लिंका जास्त वाचनीय आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

काहीजण जास्त चढली म्हणून लिहीत असावेत.
काहीजण बोचकारण्यासाठी लिहीत असावेत.
काहीजण संपूर्ण जगाला ज्ञानाचा प्रकाश वाटायला लिहीत असावेत.
काहीजण लोकांचे अंतःकरण पार पालटवून थोर माणूस घडावणे आणि आख्ख्या जगाअचे भले करणे ह्यासाठी लिहीत असावेत.
काहीजणांना जालिय डायरिया झाला असावा.
काहीजणांना काही ठराविक विचारसरणीचा मंत्रचळ (ocd) झाला असल्याने लिहीत असावेत.
काहीजणांना एकाच विचारसरणीत आख्ख्या जगाच्या हरेक समस्येचे उत्तर वा समस्येचे मूळ सापडते ;ते बोंबलून सांगण्यासाठी ते लिहित असावेत.
काहीजणांना अधिक चांगल्या प्रकारे वेळ कसा घालवायचा समजत नसावं.
काहीजणांना सर्व स्त्रीवाद्यांचं, पुरोगाम्यांचं आपल्या केवळ प्रतिसादांच्या फटकार्‍यानं निर्दालन करायचय म्हणून ते लिहीत असावेत.
ही काही थोडीशीच कारणं.
अजून काही मेगाबायटी लिहिलं जाउ शकतं.
तरीही कारणं संपणार नाहित.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

काहीजण संपूर्ण जगाला ज्ञानाचा प्रकाश वाटायला लिहीत असावेत.
काहीजणांना जालिय डायरिया झाला असावा.
काहीजणांना काही ठराविक विचारसरणीचा मंत्रचळ (ocd) झाला असल्याने लिहीत असावेत.
काहीजणांना एकाच विचारसरणीत आख्ख्या जगाच्या हरेक समस्येचे उत्तर वा समस्येचे मूळ सापडते ;ते बोंबलून सांगण्यासाठी ते लिहित असावेत.
काहीजणांना सर्व स्त्रीवाद्यांचं, पुरोगाम्यांचं आपल्या केवळ प्रतिसादांच्या फटकार्‍यानं निर्दालन करायचय म्हणून ते लिहीत असावेत.

यातल्या प्रत्येक लक्षणाच्या वेळी वेगवेगळ्या आयडींची नावे डोळ्यासमोर तरळून गेली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

आख्खीच्या आख्खी भगवदगीता असताना ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी का लिहिली असावी - याचे उत्तर मला आज सापडले ओ मनोबा.

(क्षेम देऊ गेले परि मी ची मी एकली - हे झूठ आहे असा साक्षात्कार झालेला) गब्बर

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ज्ञानेश्वरीचे दुसरे नाव आहे भावार्थदीपिका. पुढे शिवकाळात वामनपंडितांनी 'यथार्थदीपिका' लिहिली, थ्राईस द साईझ ऑफ ज्ञानेश्वरी & फ्रॉम ए कट्टर वैष्णव पर्स्पेक्टिव्ह. म्हणजे बघा, ग्रंथ सांगितला कृष्णाने अर्थात विष्णूच्या अवताराने. अन त्याच्या सुरुवातीला ज्ञानेश्वर "ॐ नमोजी आद्या" म्हणून गणपतीची स्तुती करतात? हे तर शिर्क़ आहे! त्यामुळे त्यांनी ज्ञानेश्वरीवर कडक टीका केली.

"भगवंत म्हणा वेडा | अथवा त्या टीकेची श्रद्धा सोडा |
गीता सोडोनि व्यर्थ गोष्टींचा पवाडा | वाचणे, तरी वाचा गोड गोष्ट ||"
"गीता जाई पूर्वेकडे | टीका चढे पश्चिमपर्वताचे कडे |" इ.इ.

फॉर द रेकॉर्डः वामनपंडितांचे नाव वामन नरहर शेषे. चिरेबंदी तप्तमुद्रांकित वैष्णव. अन बायकोचे नाव गिराबाई. सोवळे इतके कडक की बायकोच्या हातचेही चालत नसे, स्वतःच स्वयंपाक करावयाचे! त्यामुळे 'रांधा वाढा उष्टी काढा' ही तक्रार गिराबाईंनी कधीच केली नाय (इति गाळीव इतिहास). झालंच तर एका गावाहून दुसर्‍या गावी जाताना एक उंट भरून पोथ्यापुस्तके यांच्या बरोबर असावयाची अशी वदंता आहे. रामदासांनी यांनाच 'यमक्या वामन' हा खिताब दिलेला होता. 'वंशी नादनटी' वाली टीपार्टीदेखील त्यांचीच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

माहितीपूर्ण.

वामनपंडितांचे नाव वामन नरहर शेषे. चिरेबंदी तप्तमुद्रांकित वैष्णव. अन बायकोचे नाव गिराबाई. सोवळे इतके कडक की बायकोच्या हातचेही चालत नसे,

नुसते तेवढेच नाही तर, स्वतःच्या डाव्या हताचे देखील चालत नसे, डाव्या हताने पाणी पिऊ नये असा दंडक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हो, पण तो निषेध जवळपास सर्वच पाळत. पंडितांचा युनिकनेस सांगण्यास सबब पुरेशी नाय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सहमत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काही नवीन वाचतां कंडुअतिशमनार्थ लेख तो ल्याहावा |
तेहीं नसतां मग प्रतिसादोन काळ काढावा ||

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

माझा लिहिण्याचा उद्देश्य समाजातले आर्थिक, सामाजिक आणि राजनैतिक सत्य लोकांसमोर ठेवणे.

संस्थळं म्हणजे वैयक्तिक विकीपिडीया असा समज अनेकांचा होतो, पण संस्थळावर येणार्‍या बहुतांशांचा उद्देश्य 'संवाद' असतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'उद्देश' आणि 'उद्देश्य'मध्ये गल्लत झाली काय मालक?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

झाली गल्लत खरी, पण बुच बसल्याने समजुन घ्या. आणि धन्यवाद

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रत्येक वेळी एखादा लेख किंवा साधा प्रतिसाद लिहून पोस्ट केला की मला हाच प्रश्न पडतो की मी का लिहितो?
पण पुढच्यावेळी परत उत्साहाने काहीतरी लिहितोच. संभोगानंतरच्या नैराश्यासारखेच आहे हे. Fool

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संभोगानंतरच्या तृप्तीसारखं की नैराश्यासारखं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

संभोगानंतरची अवस्था? ती काय असते?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

नैराश्य म्हणण्यापेक्षा क्रेस्ट फॉलन अशी एक भावना असते तशी म्हणता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"रतिक्लांत" नावाचा अफलातून शब्द आहे त्याला.

http://sanjopraav.wordpress.com/2009/10/30/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E... या ब्लॉगवर एका वेगळ्या संदर्भात हा शब्द मी वाचला. -

एकेक तुकडा इडली सांबाराच्या चमच्याबरोबर खाणे हे नवख्याचे काम. जाणकार कोण काय म्हणेल याची पर्वा न करता इडली आणि सांबार यांची आधी जिवाशिवाचे ऐक्य करुन घेतो. हे झाले की आणखी एक प्लेट सांबार मागवावे आणि मग जीभ रतिक्लांत होईस्तोवर हे मिश्रण हाणावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाही. रतिक्लांत म्हणजे संभोगश्रमाने दमलेला/ली. त्याचा वैराग्याशी संबंध नाही. क्रेस्टफॉलन इ. शी तर आजिबातच नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ननिंना तेच म्हणायचय. त्यांना जी अवस्था म्हणायची आहे तिचा "वैराग्याशी" सुतराम संबंध नाही. क्लांत अवस्थाच म्हणायचय त्यांना. - असा कयास.
__________________

किंवा असेलही. काही काळ वैराग्य येते तेच असेलही Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ननि म्हणताहेत क्रेस्टफॉलन. त्याचा अर्थ दु:खी इ. होतो.

रतिक्लांत म्हणजे 'प्रियाया: प्रत्यूषे गलितकबरीबंधनविधौ' इ.इ. आठवते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

दु:खी....शक्य आहे."La petite mort, French for "the little death", is an idiom and euphemism for orgasm.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आयला..खत्रा टर्म आहे.

त्यावरून "लामूर" i.e. L'amour (स्पेलिंगमध्ये चूभूदेघे) बद्दलचे पुलंचे विवेचन आठवले.

"तो शब्द म्हणताना डोळे बंद ठेवून हात पसरायचे असतात. डोळे उघडे ठेवून लामूर म्हटले तर '६५ वर्षांच्या नवर्‍याने ६० वर्षांच्या बायकोवर, ४० वर्षे संसार आणि १० मुले झाल्यानंतर केलेले प्रेम' असा अर्थ होत असेल". ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हाहाहा Smile मस्त!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आयला..खत्रा टर्म आहे.

अगदी!

खतरा तर आहेच. शिवाय, 'वीर्यनाश हाच मृत्यू' संकल्पनेशी बर्‍यापैकी मिळतीजुळती आहे, नाही?

'ब्रह्मचर्य हेच जीवन'वाल्यांचे काही फ्रेंच कनेक्षन असावे किंवा कसे, अशी शंका येऊ लागण्याइतपत मिळतीजुळती!

बाकी, 'फ्रेंच कनेक्षन'च्या आद्याक्षरांचे आणि फ्रेंच अक्षरांचेही (दूरान्वयाने) नाते - किंवा, (ओढूनताणून) संबंध - अंमळ रोचकच. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

येस! La petite mort! मस्त फ्रेज आहे.
पण वादावादीच्या रणकंदनात शाहीद्याचाच अनुभव जास्तवेळा यायला लागला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रतिक्लांत म्हणजे संभोगश्रमाने दमलेला/ली.

या बाबतीत क्रियाविशेषणामध्ये समानतेची आवश्यकता नाही. ऑरगॅझम (मराठी?) मुळे झरणारा अंतस्राव एकच असला तरीही स्त्री-पुरुषांवर निरनिराळा परिणाम करतो. रतिक्लांत पुरुष दमतात पण मदनक्लांत स्त्रिया दमत नाहीत. (टुकटुक)

(आजच) एका व्हीडीओमुळे झालेलं 'ज्ञान' वाटण्यासाठी (किंवा ट्यँवट्यँव करण्यासाठी) मी लिहिते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हाहा, ओक्के.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मराठीत हा शब्द पापिलवार करणार्‍या गदिमांच्या कवितेत मात्र ('जोगिया') हा शब्द एका स्त्रीच्या तोंडी येतो -

तो हाच दिवस हो, हीच तिथी ही रात,
ही अशीच होत्ये बसले परि रतिक्लांत.

बाकी La petite mort वरून दुसर्‍या टोकाचं 'कतरा कतरा जीने दो' आठवून गेलं आणि शीर्षकातली कवितेची ओळही Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रतिक्लान्त झाल्यास काय करावे? उत्तर: श्रीखंड खावे!

पहा 'शिखरिणी' ह्या कृतीचे वर्णन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आहाहाहाहाहा. नासदीयसूक्तभाष्यातले आहिताग्नीच आठवले एकदम. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

प्रत्यक्ष जीवनात इथले जसे दोस्त दुश्मन आहेत तसे कोणी लोक आजूबाजूला नाहीत म्हणून. एरवी ऐसीवर (वाचन, लेखन उद्युक्त करणारं) ढासू कायतरी आलं आणि माझा दुधवाला माझ्याशी कितीही वेळ गप्पा मारू लागला तर मी सगळ्या ऑनलाईन माध्यमांकडे दुर्लक्ष करतो नि त्याच्याशी गप्पा चालू ठेवतो. (पण त्यालाही कधी फार वेळ असल्याचं आढळत नाही.).
दुसरं हे कि मला कि मला खरंच लिहायला आवडत नाही, प्रायवसी काँप्रो होते म्हणून लोक फोनवर बोलत नाहीत, अन्यथा फोन असताना टाईप का करा? मी नेहमी फोनवर बोलणे पसंद करतो. नविन लोकांची ओळख करून घ्यायची जागा आणि त्यासाठीचे कष्ट यापलिकडे या लिहिण्याला मोल नाही.
ऐसी प्रचंड यूजर फ्रेंडली आहे (तांत्रिक तसेच व्यवस्थापनाचे वर्तन) म्हणूनही मी टायपत राहतो.
------------------
आता मनोबावाला पार्ट.
बहुतेक दरवेळी उद्देश वेगळा असतो.
--------------
ऑफिसमधून आरामात करता येतं. अगणित गणिते नि कंत्राटे यांच्यामधे तुम्ही एका वेगळ्या जगाला चिकटून राहता हि कल्पनाच गोड आहे. मीमराठीवर मी लिहिण्यापूर्वी (किंवा मायबोलीवर मराठी वाचण्यापूर्वी) मला ऑफिस मंजे "शुद्ध पकावू जागा" वाटे. आता लिहित असल्याने, विरंगुळा वाढला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

या प्रतिसादाने आम्ही तुमचे फॅन झालो बघा.
(उगीच ते शब्दबंबाळ काथ्याकूट लिहिण्याऐवजी असे मनातले साधे-सोपे-सरळ प्रतिसाद इथले सदस्य लिहितील काय?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(उगीच ते शब्दबंबाळ काथ्याकूट लिहिण्याऐवजी असे मनातले साधे-सोपे-सरळ प्रतिसाद इथले सदस्य लिहितील काय?)

तसं झालं तर रोचक आणि उद्बोधक प्रतिसाद व चर्चा होणार कशा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

- असेच टंकत राहिलो, तर एक ना एक दिवस समग्र शेक्सपियर (मराठी अनुवादित आवृत्ती) नाही, तरी गेला बाजार ज्ञानेश्वरी तरी टंकून जाऊ, या आशेने.

- 'दिसामाजि काहीतरी ते लिहावे' असे लायसन खुद्द समर्थ रामदासांनी जेथे आम्हाला दिलेले आहे, तेथे हा प्रश्न आम्हांस विचारू पाहणारे आपण नेमके कोण?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जाहिरात मोड ऑन
जॉर्ज ऑरवेल - मी का लिहितो?
जाहिरात मोड ऑफ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

खूप लहानपणी आम्हाला एक कविता होती. सारखा सारखा वाहून वाऱ्याचे पाय दुखत कसे नाहीत? सारखी सारखी वाहून नदी थकत कशी नाही? सारखी सारखी कामं करून आई दमत कशी नाही? अशी काहीशी ही कविता होती. ती आम्हांला सगळ्यांना खूप आवडायची. पण ही कविता शिकवताना, बाई आम्हाला म्हणाल्या, “सारखं सारखं बोलून तुमचं तोंड दुखत कसं नाही?” आणि हे ऐकताना आम्हाला सगळ्यांना एकदम खुद्कन हसूच फुटलं. आम्ही सगळ्या मुली खूप बडबड्या होतो. त्यात मी नेहमी आघाडीवर. माझा छंद काय? असं विचारल्यावर मी कधीकधी ’गप्पा मारणे’ असं उत्तर आजही देते. माझ्या मते, प्रत्येक माणसाला माझ्याइतकं तीव्रतेने नसेल कदाचित, दुसऱ्याशी बोलावंसं वाटतच असतं. पण नीट विचार केला, तर असं वाटतं की हे बोलणं म्हणजे नुसतीच बडबड नव्हे. नुसते स्वगत नव्हे आणि एखाद्याला ’पिळणे’ तर नव्हेच नव्हे. हे बोलणं म्हणजे जिवाभावाच्या सुहृदांना काहीतरी सांगणं असतं. काही गोष्टी त्यांच्याकडून ऐकणं असतं. सुखदुःखं वाटून घेणं असतं. पुलंनी वटवट या नाटकामधे,

’अमुच्या भाळी सदैव लिहिली कटकट वटवट करण्याची’
ही केशवसुतांची ओळ उद्धृत करून म्हटलंय, की जीवनाचा सारा गोडवा या गोड वटवटीतच सामावलेला आहे.

माफ करा पण रहावलं नाही म्हणून, ऐसीवरील अदिती (नंबर २), यांच्या या ब्लॉगवरील ओळी उधृत करुन एवढेच म्हणते की वरील कारणासाठीच लिहावेसे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आमचं उलट असावं.प्रत्यक्ष आयुष्यात मी अत्यंत अबोल म्हणून बदनाम आहे. बाजूच्याच धाग्यावर कुणीतरी त्यामुळं "मनोविजयसिंग" अशी पदवी त्यामुळं दिली आहे.
तर सांगायचं म्हणजे प्रत्यक्ष आयुष्यात अबोल, जालिय धाग्यांमध्ये मात्र सक्रिय; हे असं आमच्या वर्तणुकीचं कॉक्टेल आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

write the things that you want to read! हे एकदा आंजावर वाचलं ते पटलं.
जे काही आंजावर मराठीत असावं असं वाटतं -ते बहुधा नस्तं. त्याला अनुसरून जे जे काही मराठीत वाचावसं वाटतं, त्याबद्दल ऐसीवर टंकतो. ऐसीवर आल्याने त्याला गूगलातही अग्रक्रम मिळतो आणि बाकी लोकांनाही ते वाचता येतं - असा शुद्ध स्वार्थी आणि क्षुल्लक दृष्टीकोण आहे.
बाकी -
"आज लिहिणं स्वस्त झालंय म्हणून लोक लिहितात-वाचतात. एक एक पान कोटी रुपयांना विका, मग कितिसे लोक लिहितील आणि किती लोक वाचतील?" असं एक भरघोस मिशिवाले चष्मिश काका कुठेतरी म्हणालेच आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0