मोठा माणूस जन्मत: मोठा असतो???

मोठा माणूस जन्मत: मोठा असतो. त्याला मोठे व्हावेच लागते. आईच्या गर्भात असतानाच त्याला पुढे भविष्यात तो मोठा होणार याची जाणीव असते. बालपणी अन्य कार्ट्यांंप्रमाणे हातवारे करत माकडाप्रमाणे तो उड्या मारत नाही. कधी मोठ्यांच्या नकला करत खदाखदा हसत नाही. कधी आपल्या बहिणीची शेपटी ओढून तिला त्रास देत नाही. भविष्यात आपण उदा: मोठे कवी किंवा लेखक बनणार असू तर आपले जीवन लोकांसमोर आदर्श राहिले पाहिजे म्हणून तो कधीच खोड्या करीत नाही. बालपणापासूनच सदैव धीर गंभीर चेहरा करून वावरणे त्याच्या नशिबी. भविष्यात त्याच्या लेखनावर चिंतन करणाऱ्या चिंतातूर अति शहाण्यांना शब्दांचा कीस काढून किंवा शीर्षासन करून अर्थ लावण्याची पाळी येऊ नये म्हणून काही बोलण्याआधी प्रत्येक वाक्याच्या प्रत्येक शब्दाचे चिंतन मनन करूनच आपल्या मुखातून शब्द बाहेर फेकीत असे. लिहितानाही तोलून-मोलून लिहित असे. त्याला माहित असते, त्याने गमंत म्हणून ही काही हलंक-फुलंक लिहील, उदा:


माझा शेजारचा पोरगा, सावळा ग बाई.
कान्हा सारखा, खोडकर ग बाई.
काळीज त्याचे, काळेकुट्ट ग बाई.
लबाडाने माझे, सर्वस्व लुटले ग बाई.
माझी मी आता, राहिले ना ग बाई.

तर भविष्यातले समीक्षक यातून ही अध्यात्म इत्यादी शोधून काढतील. म्हणून तो असले हलके-फुलके लेखन बालपणापासूनच करीत नाही. खंरच मोठे लोक बालपणा पासून असे वागले आहेत का?

खंर म्हणाल तर कुठला ही मोठा माणूस बालपणा पासून मोठा होत नसतो. तो ही सामन्यांसारखाच असतो. महात्मा गांधी चष्मा आणि काठी सहित जन्मले नव्हते. जीवनाच्या दीर्घ प्रवासानंतर त्यांना हे स्वरूप प्राप्त झाले. एका सामान्य घरातला खोडकर आणि चहा विकणारा आज देशाचा पंतप्रधान झाला आहे. भविष्यातल्या राजनीतिक समीक्षकाने त्यांचे बालपण वेगळ्या चष्म्याने पाहू नये म्हणजे मिळविले.

नदीला समुद्राचे स्वरूप प्राप्त करण्यासाठी हजारो मैलाचा प्रवास करावा लागतो, पर्वत, घाटी, मैदान आणि समुद्राला मिळताना प्रत्येक टप्प्यात तिचे स्वरूप वेगळे असते. त्याच प्रमाणे कवी असो वा लेखक त्यांना ही या प्रवासातून जावे लागते. त्यांच्या प्रत्येक लेखनातून समुद्रा सारखा धीर-गंभीरता शोधण्याचा प्रयत्न मूर्खपणाच. टवाळा आवडे विनोद या धर्तीवर ते ही हलंक-फुलंक, विनोदी लिहू शकतात. असो.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

भापो. आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0