जुन्या कविता

कविता पूर्वप्रकाशित आहेत, एकमेकींशी संबंधित नाहीत, अमुक एका विशिष्ट क्रमानंही नाहीत.

***

पाणी

उसळता एकान्त येथे
निरवतेचा बोल आहे
आज इथले खोल पाणी
वाट फोडत वाहताहे

रम्य तारे रम्य वारे
पाखरे दवी न्हायलेली
मात्र पाणी साहताहे
रात्र काळी रात्र ओली

उजळलेले काठ काही
नांदते घर वाट पाही
चंद्र पोटी पोसणार्‍या
पाण्यास त्याचा ठाव नाही

***

वाटा आणि मुक्काम

जे जे म्हणायसाठी तगमग होते जिवाची
ते ते सारं निरर्थक आहे हे कळून घेताना
एकाच वेळी आतून भरून येणारे आपण
क्षितिजापर्यंत रिते होत जाताना
आत शिरलेल्या वाळूच्या कणाभोवती
मुकेपणानं मोती विणत जाताना
आधी कधीच न दिसलेल्या रिकाम्या जागा
अर्थपूर्ण मौनांनी भरल्या जाताना
कुठे चाललेले असतो आपण?
वाटा आणि मुक्काम
सारंच तर एकमेकांत मिसळत गेलेलं...

***

स्वप्नसर्प

जागांशी जडती नाती
नात्यांच्या दुखर्‍या जागा
पावसात गुंतून राही
मायेचा अवघड धागा

माळावर सूर्य उद्याचे
दिवसाची देती ग्वाही
रात्रींचा हुरहुरवारा
तरी जिवास वेढून राही

चढलासे बघ मज सखया
हा मोहफुलांचा अर्क
देहात फुलांचे दंश
डसला स्वप्नांचा सर्प...

field_vote: 
3.75
Your rating: None Average: 3.8 (8 votes)

प्रतिक्रिया

वाटा आणि मुक्काम फार आवडली.

देहात फुलांचे दंश
डसला स्वप्नांचा सर्प...

सुंदर!

स्वप्नसर्प देखिल खास आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चार तारका दिल्यात

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

वाटा आणि मुक्काम आवडली सगळ्यात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाटा आणि मुक्काम व स्वप्नसर्प दोन्ही आवडल्या नी पोहचल्यासुद्धा !!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाटा & मुक्काम आणि स्वप्नसर्प या दोन कविता खासच आवडल्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

छान आहेत. आवडल्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"वाटा आणि मुक्काम" आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दगड तो, नका त्यास शेंदूर फासू
अशानेच नाच्यास नटरंग केले

"वाटा नी मुक्काम" खासच छान!
बाकी दोन ठिक.

तिघीचा म्हटला तर परस्परसंबंध लावता यावा, पण गरज वाटली नाही.
तसे काही स्वतः कवियीत्रीच्या मनात होते का? नसल्यास

एकमेकींशी संबंधित नाहीत, अमुक एका विशिष्ट क्रमानंही नाहीत

हे पुनर्वाचनात वाचले
तरी हा प्रश्न कायम आहेचः तीन्ही कविता एकत्र देण्याचा उद्देश काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

तीन्ही कविता एकत्र देण्याचा उद्देश काय?

चारोळी टंकणं बरं वाटेना, म्हणून. आकारानं एकमेकींच्या कुळातल्या आहेत, इतकाच सारखेपणा. बाकी त्या लिहिल्याही आहेत वेगवेगळ्या काळात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

एकाच वेळी आतून भरून येणारे आपण
क्षितिजापर्यंत रिते होत जाताना
आत शिरलेल्या वाळूच्या कणाभोवती
मुकेपणानं मोती विणत जाताना

ही उपमा मिस्स केलेली होती. फार आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुरेख कविता...भावगर्भ !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिन्ही कविता आवडल्या!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me