परिपूर्ण एकटेपणा

जी ए कुलकर्णी यांच्याबद्दल आणि त्यांच्या एकांतप्रियतेबद्दल बद्दल अनेक कथा ऐकल्या आहेत . मुंबई पुणे सारखी जागा सोडून त्यांनी धारवाड या छोट्या जागी राहणे पसंद केले . त्याना भेटायला अनेक लोक राज्याच्या कानाकोपर्यातून यायची . त्यांना ते फारस आवडायचं नाही . म्हणून ते बाजूला खेळणाऱ्या मुलाला बोलावून त्याला घराला बाहेरून कुलूप लावायला सांगत आणि स्वतहा आत बसून राहत . एका creative genius ची फ़क़्त एक लहर म्हणून त्याकडे बघतात का ? मुळात तुमचा हक्काचा एकांत मिळवण्यासाठी तुम्हाला जी ए सारख creative genius असणेच आवश्यक आहे का ? अनेकदा १० ते ५ नौकरी करणाऱ्या तुमच्या माझ्यासारख्या लोकांची पण ती गरज असतेच की . हि गरज दाबून बहुतेक लोक जगतात .

मी एका nuclease मध्यमवर्गीय कुटुंबातल अपत्य . एकुलता एक मुलगा . आई बाबा दोघेही नौकरीला . त्यामुळे मला लहानपणा पासूनच एकटे राहावे लागले . पण माझ आणि एकटे पणाच भन्नाट जुळून आल . एकटे पणा आणि त्यातून येणार स्वातंत्र्य मला जाम आवडल . नंतर नंतर तर मला आजू बाजूच्या गर्दीचा जाचच होऊ लागला . शाळेतून पटकन घरी पटकन कधी येतो अस मला व्हयाच . फ़क़्त गणित आणि विज्ञान मध्ये चांगले मार्क येणे म्हणजे हुशार अश्या भंपक कल्पना असणाऱ्या शाळेत असाही जीव घुसमट करायचा . नंतर शिक्षणासाठी बाहेर गावी आल्यावर मी होस्टेल मध्ये राहायला लागलो . पण एका रूम ची एवढी छोटी जागा ३ लोकांनी शेयर करायची हि कल्पना मला रानटी वाटली . म्हणजे तुम्ही कधीही काहीही करत असलात तर किमान चार डोळे , दोन खिडक्या आणि एक दरवाजा ते बघत असतो हे मला तरी inhuman वाटायचं . मुंबई मधल्या लोकल प्रवासासारख . होस्टेल मध्ये बरीच धमाल केली असली तरी मी माझी स्पेस कायम मिस करायचो . जेंव्हा मला पहिला जॉब मिळाला तेंव्हा मी लगेच flat भाड्याने घेतला . आणि तिथे एक टीवी . माझ्या पगाराचा निम्म्याहून जास्त हिस्सा भाड देण्यात जायचा पण प्रत्येकाला आपली स्पेस घेण्याची किंमत चुकवावी लागते .

आतापर्यंत माणुसघाणा म्हणून माझी बर्यापैकी बदनामी झाली होती . नातेवाईक 'तू आमच्याकडे येतच नाहीस ' म्हणून माझ्या नावाने ओरडायचे . पण सगळ्या नातेवाईक नि जमून काही धार्मिक विधी करायचे , एकमेकांची package विचारायची , कुणाची एकाची ठरवून क्रूर पणे खेचायची आणि इतर बर्याच निरर्थक गोष्टी फ़क़्त पिढ्यान पिढ्या चालू आहेत म्हणून करायच्या या गोष्टीं मध्ये मला रस नव्हता . म्हणजे मी एकटा असताना काही भव्य दिव्य करायचो अशातला भाग नाही पण मला माझी पुस्तक , माझा टीवी , आणि माझा परिपूर्ण एकटे पणा जास्त आवडायचा . आम्ही मित्र ट्रीप ला गेलो कि २ दिवस तरी घरापासून दूर राहायचो . तेंव्हा पण मित्रांसोबत धमाल करून झाली की मी एक तास तरी beach वर माझ एकटेपणा शोधण्यासाठी निघून जायचो .

लग्नानंतर माझ्या या मनमुराद एकटेपणावर गदा आली . तेंव्हा पण माझी बायको आणि मी बसलो असताना मध्येच laptop उचलून मधल्या खोलीत निघून जायचो . बायको च्या चेहऱ्यावरचे हिरमुसलेले भाव अजून पण कधी कधी मला guilt देतात . नंतर नंतर या एकटे पणा पायी मी माझ्या जवळच्या मित्राना अतिशय क्रूर पणे कटवायला लागलो . आणि माझी मला च या अतिरेकाची जाणीव झाली . आणि मी माझ्यात थोडे बदल केले . पण ते फ़क़्त जवळच्या लोकांसाठीच .

आपल्या समाजात एकटे राहण्याबद्दल आणि हक्काने स्वतःची स्पेस घेण्यार्या लोकांबद्दल काही जबरी गैरसमज आहेत . म्हणजे एखादा माणूस एकटा राहात असेल तर आजू बाजू च्या लोकाना ह्याच्या आयुष्यात काही तरी tragedy असेल असा समज होतो . म्हणजे एकट राहणे हे by choice असूच शकत नाही अस काही वाटत असेल काय ? स्वतःच्या स्पेस बद्दल भारतीय समाजा इतका उदासीन समाज दुसरा नसेल . आपल्या लोकाना कायम उत्सवप्रिय , गलबल्यात राहाण्याच brainwashing झाल असत कि काय असा प्रश्न पडतो . म्हणजे खूप लोक परिस्थितीमुळे (आर्थिक आणि सामाजिक ) स्वतःची स्पेस नाही घेऊ शकत हे मान्य पण ज्याना शक्य आहे ते पण आपली मुलभूत गरज पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतात का हा प्रश्न आहे . आपण एकटे झालो म्हणजे समाजाच्या सुरक्षा चक्राबाहेर आलो . आपण लोकाना भेटायला नाही गेलो तर आपल्याला प्रसंगात कुणी येणार नाही या भावनेने अनेक लोक आपली स्पेस नाकारून पुन्हा लोकांच्या घाण्यात इच्छा नसताना घुसतात (वैयक्तिक sample survey मधून काढलेला निष्कर्ष : त्यामुळे बरोबर असेलच याची खात्री नाही ) एकटे राहणे ज्या समाजाच्या चौकटीत बसत नाही तिथे आपण misfit आहोत हि भावना कधी कधी बळावते . सतत स्वतःची स्पेस नाकारण्याचे काही वैयक्तिक / सामाजिक परिणाम होऊ शकतात का ? आपल्या समाजात स्वतःची स्पेस घेणाऱ्या लोकांवर ठप्पे मारणे समाज थांबवेल का ?
समाज नावाच्या जनावराशी मुकाबला करणे मुळातच अवघड . झु मधल्या प्राण्यांसारखे compartment करून श्रेण्या देणाऱ्या समाजात तर ते अजूनच अवघड .

मुळात स्पेस ची प्रत्येकाची व्याख्या वेगळी असते . वयाच्या तिसाव्या वर्षी माझी स्वतःची एक व्याख्या आहे ( ३ वर्षापूर्वी ती drastically वेगळी होती ) माझी व्याख्या विचाराल तर एक आळशी दिवस . कुठेही जायचे नाही . कुणीही येणार नाही . फ्रीज मध्ये २ बियर आहेत . घरात कुणी हि नाही . अगदी बायको पण नाही . टीवी चालू आहे . नेट पण एकदम फास्ट चालू आहे . वेळ दाखवणाऱ्या सगळ्याच साधनांमध्ये काहीतरी बिघाड झाला आहे . आणि मनमुराद एकटेपणा प्यायचा आहे . कुणीही तुम्हाला जज करत नाहीये आणि तुम्हाला कोणी जज करत नाहीये . मस्त पैकी कुठला तरी nostalgia आहे सोबतीला . बस्स . अजून काय पाहिजे

field_vote: 
4.333335
Your rating: None Average: 4.3 (6 votes)

प्रतिक्रिया

एकटेपणा खूप आवडतो पण तो कसा तर गर्दीतला. म्हणजे बाहेर गर्दीचा मनसोक्त प्रवाह अनुभवताना स्वतःची कंपनी उपभोगणे. कॉफी पीत गर्दीला सुद्धा पीणे. लोक घाईत गडबडीत चालले आहेत, निसर्गातल्या रंगरुपाची लयलूट आहे अन तुम्ही निवांतपणे ते उपभोगत आहात. कुणाचा जाच नाही, पहारा नाही, नाक खुपसणे नाही. असा एकटेपणा खूप आवडतो अन अनेक स्त्री-पुरषांना असा लायब्ररीत, स्टारबक्समध्ये अनुभवतानादेखील पाहीले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कधीकाळी एकांताची थोडी आवड असल्याने माझे दोन पैसे - एकांत बहुदा नसतोच, सोबत वेगळी असते, समुद्रकिनार्‍यावर समुद्र असतो, भटकंतीमधे डोंगर-दर्‍या असतात, एकट्या वाटणार्‍या रुममधे टिव्ही, पुस्तके असतात, पण ह्या सोबतीशी संवाद एका मर्यादेपलिकडे जाण्यासाठी माणुस एकतर वेडा किंवा प्रतिभाशाली असावा लागतो असं माझं मत झालं, संवादाची गरज 'माझी' असल्याने माझं तसं मत असेल पण मग कुठलीही सोबत हवीच कशाला असा प्रश्न एकलकोंड्यांसाठी रहातोच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवड!
मला एकटेपणा नको असतांना पुरेसा मिळालाय. इन्टर्नशिपला असतांना तीन-चार महीने एका फ्लॅटवर पूर्णपणे एकटा होतो. दहा ते चार वगैरे लॅब मध्ये बसायचो आणि परत घरी निघायचो. तिथे पूर्ण एकटा. सुरुवातीला एकटेपणा एन्जॉय केला पण नंतर डोके हलले. एकटा असतांना ट्रायल अ‍ॅन्ड एरर पद्धतीने बर्‍याच पाकृ करून पाहील्या. दणकून शिनेमे पाहीले. पण लवकरच वैतागलो. आपल्या आयुष्यात काही फार फार आनंदाचे क्षण असतात त्या वेळेला एकटं असणं म्हणजे मला शिक्षा वाटते.
हॉस्टेलला माझी रुम सहा जणांमध्ये शेअरिंग असलेली बंकबेड वाली होती. दोन मराठी, एक कन्नडीगा, एक तमिळ आणि एक तेलुगुभाषिक अशी ती रुम होती. तेव्हा निवांत गाणं वगैरे ऐकायला मी हेडफोन लाऊन कॉरिडोरमध्ये फिरायचो. एकांतप्रेमी लोकांसाठी लायब्ररी होती, तिथे पण मी फारसा बसायचो नाही. खच्चून मोठ्ठा ग्रुप असला पाहीजे असं नसायचं, पण चार टाळकी लगेच जमा व्हायची. आणि आत्ता आठवतांना मला तेच सगळं आठवतं आहे.
आता पण असा निवांत रिकामेपणा पुरेसा मिळतो. पण एका लेव्हलच्या पलीकडे मिळाल्यास बर्‍याचदा ठरवलेल्या गोष्टी होत नाहीत. पुस्तकं/पिक्चर ईच्छाच रहात नाही. मी सरळ उठून मित्रांकडे जातो. जर कोणीच अ‍ॅव्हलेबल नसेल वरती अपर्णातैंनी म्हणल्यासारखं गर्दीत जातो. जवळपास माणसं असली की बरं वाटतं. नशीबाने मिनीटा मिनीटाला जज करणारं कोणी भेटलं नाही आणि जर करायला लागलं तर गेलास खड्ड्यात म्हणून आम्ही मो़कळे होतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी वर्मावर बोट ठेवणारा लेख.

अन्नाची जशी गरज असते तशीच लोकांचीही गरज असावी अशी कायम अपेक्षा ठेवली जाते. माणूसघाणा या शब्दातली तुच्छताच बरंच काही सांगून जाते. पण बऱ्याच लोकांचा स्वभाव पूर्णपणे उलटा असतो. अनेकांना लोक आसपास असल्याशिवाय चैन पडत नाही. एकटेपणा खायला उठतो. आणि या स्वभावाकडे दोष म्हणून न बघता गुण म्हणून बघितलं जातं.

म्हणजे तुम्ही कधीही काहीही करत असलात तर किमान चार डोळे , दोन खिडक्या आणि एक दरवाजा ते बघत असतो हे मला तरी inhuman वाटायचं

कितीही जवळची, प्रेमाची माणसं असली तरी ती सतत आसपास असणं मला आवडत नाही. एक अस्तित्व आसपास घुटमळत असणंही नकोसं वाटतं. जे काही मोकळेपणाचे तास-दिवस मिळतात ते अक्षरशः पिऊन घ्यावेसे वाटतात.

आपल्या समाजात एकटे राहण्याबद्दल आणि हक्काने स्वतःची स्पेस घेण्यार्या लोकांबद्दल काही जबरी गैरसमज आहेत .

मला वाटतं अशांचा परिस्थितीची तुलना नास्तिक किंवा समलैंगिकांच्या परिस्थितीशी करता यावी. ज्या समाजात देवावरचा विश्वास किंवा विषमलैंगिकता हीच नॉर्म असते, आणि त्याविरुद्ध वर्तन हे टॅबू असतं तिथे असे लोक 'कपाटात' राहताना दिसतात. त्यामुळेच असे गैरसमज पसरतात, आणि ते खोडून काढण्यासाठी कपाटाबाहेर कोणी येत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डिट्टो . सह्मत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम नज़र में ख़्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम

टीवी चालू आहे . नेट पण एकदम फास्ट चालू आहे . आणि मनमुराद एकटेपणा प्यायचा आहे

पहिल्या दोन वाक्यांनंतर तिसरे वाक्य म्हणजे विरोधाभास वाटले. एकटेपणा प्यायचा आहे पण तरी जगाशी संपर्क तोडायचा नाही असे का बरे होत असावे? जिवंत माणसांच्या, गर्दीच्या गलबल्याने ऊबून जावं तसं माध्यमांच्या गलबल्याने का नाही का? का तिथे आपण निनावी असल्याने कोणी फार जवळ येऊ शकत नाही किंवा आले तरी त्यांनी जज करण्याने फार फरक पडत नाही?

बाकी ते एक सोडा, पण माणसाला एकटेपणाचीही गरज असते याच्याशी सहमत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला भोवती भरपूर माणसं आवडतात.
मात्र तोंडीलावायला नी त्या माणसांच्या असण्याचं महत्त्व समजण्यापुरता एकांतही आवडतो.

आवडती गोष्ट करताना मात्र एकटं-दुकटं असणंच आवडतं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

लेख चांगला वाटला.
.
.
माझी केस वेगळी.
एकांत आवडत नाही, सहनही होत नाही.
ग्रुपमध्येही मिसळायचं कौशल्य नाही.
मग बळजबरीचा भकास एकांत.
हे खूपदा अनुभवलय.
अजूनही सुटका झालेली नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

प्रतिसाद आवडला Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख वाचून आपण अगदी समविचारी आहोत एवढंच म्हणेन Smile

युऐसात - मिनीआपोलीस मधल्या 'ईडन प्रेरी' इथल्या जागी क्लाइंट साईडला नेहमी जाणं व्हायचं, त्यातल्या त्यात २००८ मधे तीन महिन्यांसाठी गेलो असतांना तिथे माझ्याबरोबर ओळखीचं असं कोणीच नव्हतं. ना सोबत इतर भारतीय सहकारी, ना तिथे ऑलरेडी लाँग टर्म साठी ऑनसाईट असलेले सहकारी. ज्या हॉटेल मधे रहात होतो तेही भकास कारण मिनीआपोलीस चा कडक हिवाळा/हिमवर्षाव, त्यामुळे पर्यटक नाहीत (मुळात ईडन-प्रेरी ही सबकाऊंटीच खूप शांत आणि कमी वस्ती असलेली जागा - थोडक्यात नॉट मच हॅपनिंग) . तेव्हा कार चालवता येत नसल्याने - रेंट ने कारही घेता येत नव्हती, बर्फामुळे बाहेर पायी देखील फार किंवा नेहमीच फिरता येत नव्हतं आणि टॅक्सी करून कुठे फिरावे तर ते प्रकरणही फार महागात जायचे आणि पुन्हा बर्फामुळे बाहेरची बरीच पर्यटनस्थळं बंद. ऑफीसला जाण्यासाठी हॉटेलचीच कॅब होती आणि तेवढंच काय ते फिरणं किंवा हॉटेल बाहेर जाणं व्हायचं, म्हणून ऑफिस ते घर हाच दिनक्रम. हा असा ऐकटेपणा न मागता आला होता पण एक-दोन आठवड्यानंतर मला माझाच हेवा वाटायला लागला. किती तो स्वतःसाठी असलेला वेळ, जे हवं ते करता येण्यासारखं, सुसाट धावणारं इंटरनेट - मग हवं ते पहा - सोबतीला टिव्ही नी पुस्तकं होतीच. ह्याच काळात जिवाच्या जवळचा असलेला छंद 'पाककृती' मनसोक्त उपभोगला. मग अगदीच बोलावं वाटलं काही शेअर करावं वाटलच काही तर सोशल मिडिया होतंच - शिवाय तेव्हा तिथल्या वास्तव्यात माझ्याकडे मोबाईल नसल्याने इच्छा नसताना कॉल स्विकारण्याची झंझटही नव्हती. एक कर्तव्य म्हणून घरी आठवड्यातून एक-दोनदा कॉल करावा लागायचा (नशीब तेव्हा लग्न झालं नव्हतं - नाहीतर रोज करावा लागला असता). तेव्हा इथल्या बर्‍याच जणांना वाईट किंवा काळजी वाटत होती माझी की तिथे माझ्यासोबत कोणीच नाही आणि कसा रहात असेल हा पण मला तर आजही ते आयुष्यातले तीन महीने आठवले की पुन्हा माझाच हेवा वाटतो. असा वर्षातून एकदातरी ब्रेक मिळावा असं कायम वाटत Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान लिहीलय. मलाही एकटेपणा आवडतो.
पण कधीतरी शंका येते की आपण खरंच असे आहोत की बालपणीच्या काही अपरीहार्य परीस्थितीमुळे असे घडवले गेलो. मंजे nature की nurture.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला एकांत आवडतो पण मुळात घाबरट असल्याने मला लोक दूर पण मला हवे असल्यास लगेच पोहोचू शकेल अशा अंतरावर आवडतात.

काही महिन्यापुर्वी कंपनीच्या कामानिमित्त बाहेर जाणे झाले, आणि बरोबर कोणी दुसरी मुलगी नसल्याने अपार्ट्मेंट्वर एकटीच!

त्या ठिकाणी आधी तीन-चार वेळा जाऊन आल्याने साइट सिइंग मध्ये रस नव्हता मग विकेंडला अपार्ट्मेंटवर शांतता व आजूबाजूचा परिसर अनुभवत मस्त लोळणे,टिव्ही पाहणे, वाचणे, मूड आल्यास एकटीनेच विंडो शॉपिंग, मूड आला तर स्वयंपाक नाहीतर पार्सल वगैरे एकूण मला आवडणारे प्रकार केले.

तशी मी लेकीला तिच्या जन्मानंतर सोडून पहिल्यांदा गेले होते, इथून निघताना मला शंका होती की मी बदलले असेन, पुर्वीसारखे एकट्याने राहणे रुचेल की नाही - पण नाही, कॉलवर दिवसातून दोनदा तिची खुशाली कळली की अजिबात कोणाला मिस करणे वगैरे झाले नाही (नवरा तर तसाही लेक झाल्यापासून ऑप्शनल विषयच आहे Wink ).

फक्त इतकेच होते की दिवसभर एकटीने कितीही टवाळक्या केल्या तरी रात्री एकटीनेच अपार्ट्मेंटवर झोपायला जाम भिती वाटत असल्याने तिथे स्थाइक व्हायला म्हणून नुकत्याच गेलेल्या कंपनीमधल्याच दोन भारतीय मुलांच्या अपार्ट्मेंटवर रात्री झोपायला जायचे. भले ते लोक आत रूममध्ये झोपल्यावर मी नंतर किल्लीने दरवाजा उघडून आले असेन - आमच्यात काहीच संवाद झाला नसेन व मी लिव्हिंग मध्ये
सोफ्यावर झोपत असेन - पण तरी आसपास हाकेच्या अंतरावर ओळखीची माणसे आहेत - हे बरे वाटते.

घरी सुद्धा मी बाकी सगळी जनता एका खोलीत असेल व माझ्याक्डे फारसं काही बोलायला नसेल तर मी दुस-या खोलीत राहणे पसंत करते -पण निदान दुस-या खोलीत माणसे हवीत विशेष करून रात्री/अंधाराच्या वेळेला!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

"घरात कुणी हि नाही . अगदी बायको पण नाही . टीवी चालू आहे . नेट पण एकदम फास्ट चालू आहे "

छोटा गोंधळ झाला, नक्की एकटे राहायचे आहे की आजुबाजूला लोकं नको आहेत (फिजिकली)?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

@कान्चिल- आजु बाजु ला लोक नकोयेत : )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम नज़र में ख़्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम

ह्म्म! आवडला लेख.
एकटेपणा तसा दुर्मिळ आहे भारतातल्या शहरांत. अगदी कोणीच नसेल जवळपास तरीही ३-४ ओळखीचे आवाज नको म्हटलं तरी कानावर पडतातच..
गावी तसं नाही. लहानपणी एकदा असा मस्त एकटेपणा गावी अनुभवलाय- सोबतीला एक रेडिओ आणि अख्खा रिकामा दिवस. वेळ वगैरे शब्दांना काहीच अर्थ नव्हता मग. मे महिन्याचा चांगला रणरणता दिवसपण त्या एकटेपणामुळे तसा निवांत वाटला.
नंतर मग एकदा विद्यार्थी असताना १ पूर्ण महिना एकटेपण. सकाळ झोपून काढायची आणि दुपारी अडीच तीननंतर जाग आली की रात्री पुन्हा झोपेपर्यंत वाचन्/चित्रपट- शक्यतो हॉरर. जेवणखाण वगैरे जमेल तेव्हा.
आता आठवलं तर वाटतं दुसरंच कोणीतरी करत होतं हे उद्योग. अब कुछ नही हो पाएगा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इथे (परदेशात विशेषतः जिथे भारतीय औषधालाही नाहीत अशा आमच्या शहरात) बसस्टॉपवर आपली हिंदी गाणी मोठ्यांदी म्हणत बसची वाट पहाता येते. चुकेनात का शब्द, कोणला कळतय Biggrin
सकाळी सकाळी मूड छान असेल तर ठेक्यावर झुलताही येतं. मस्त मजा येते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाय चॉईस एकटं राहणं मस्तच कधी कधी आवडतं. एकूणच जगण्यातील निर्रथकता-वैफल्य त्यातुन आलेलं एकटेपण हा ज्याचात्याचा प्रश्न (मला भंपक वाटत असला तरीही काहींनसाठी तर अगदी थोर वगैरे Wink )!
.
.
पण एकटं राहवं अशी परिस्थिती कोसळल्यास मात्र अवघड होऊ शकतं. लहानपणी पालक गमावलेली मुलं, मोडलेली/अपघाती जोडीदार गमावलेली लग्ने जरा जवळूनच पाहीली आहेत त्यामुळे बेसिक इंग्टीग्ट नसला तरीही शेवटी मानव समाजशील प्राणी आहे यावर पक्का विश्वास झालेला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एकटेपणा हा थोड्याफार प्रमाणात प्रत्येकालाच हवा असतो, पण तो तुम्हाला आवडतो का, तुम्ही एकटे राहिल्यामुळे तुम्ही दु:खी तर होत नाही ना, पण उलट रिचार्ज होता का, यावरून ठरवता येईल की तुम्ही आत्मकेंद्रित (introvert) आहात की नाही. यासाठी तुम्ही Briggs Myers टेस्ट घेतली तर तुम्हाला कळून येईल की तुमची मानसिकता कशा प्रकारची आहे. मी स्वतः INTJ आहे, पण अर्थात यात उच्च-नीच असे काही नाही. फक्त आपण स्वतः कसे रिलॅक्स होऊ शकतो, ते स्वतःलाच कळते. साधरणतः आपल्या समाजात बडबड्या लोकांना अधिक समाजप्रिय, सोशल समजले जाते. इंट्रोवर्ट लोकांचा दृष्टिकोन समजण्यासाठी Quiet: The Power of Introverts in a World That Can't Stop Talkingहे पुस्तक वाचावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

MBTI (Myers Briggs Type Indicator)ला मानसशास्त्राच्या वर्तुळात फार उच्च स्थान नाहीये व्हॅलिडिटीच्या दृष्टीकोनातून. त्यावर अवलंबून राहुन स्वतःविषयी काही निर्णय घेऊ नका असे सुचवेन. आगाऊ सल्ल्याबद्दल क्षमस्व.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सध्या किरण नगरकराची "सात सक्कं त्रेचाळीस" वाचतोय त्यातील हा उतारांश या धाग्यासाठी समर्पक वाटला:

...त्या पारशी बाईच्या खोलीत दिवा अजून जळातोय. पंधरा वर्षे एकटी राहिलेली. रात्री दोन वाजता दिवा लाऊन काय करते? उरलेली पंधरा आणि अधिक वर्ष अशीच. लग्न नाही करणार ती. काटक्यांनी बनवलेली. साडीत बांधलेली. सोललेल्या कोंबडीसारखी. फक्त वर तुराच राहिलात. लिहित असेल. पुढच्या खेपेला भेटल तेव्हा वाचावं लागेलच. कुठल्याही घोळक्यामध्ये तिचा एकलकोंडेपणा तिला हुडकून काढतो. तिच्या इच्छेनुसार, निरुद्ध, नकळत तिला वाळीत टाकतो. आता त्याचं तिला व्यसन जडलंय. एकमेकांशिवाय त्या दोघांचं चालत नाही. इतकी वर्षे बेकार पडलेलं तिचं मिसळण्याचं इंद्रीय आता काम देईनासं झालंय. तिला एकांत चढतो. तंबाखू दाढांवर गिरवतात तसा ती त्याला स्वतःवर चोळते. मग तल्लफ आली की कविता करायला लागते. आपल्या अलिगढ मधल्या बालपणावर. लढाईच्या दिवसात पाहिलेल्या जय जवानला उद्देशून टापटिप कविता. एकदाच जाणवलेल्या कदाचित प्रेमावर लेखबियनिझमचं दडपण आहे असा भास करून घेते.... आखुड भावनांवर आखुड कविता. पिवळ्या फायलीत कलेक्टेड एडीशन. तिच्यासारख्याच रक्तहीन. किंचित बेचव. मोजूनमापून आयरनी. प्र्र्वी क्वचित आणि प्रयासानं. आजकाल दर पंधरवड्याला तिच्यातून एक कविता बाहेर पडते. स्वतःचा ओनरशिपचा प्लॅट आल्यावर तर हे वाढतच जाणार. दीड वर्षांनंतर. पैसे वाचवून पैसे भरते. आपलाच आपला. चोहिकडं. ड्रॉइंगरूम, बेडरूम, छोटंसम स्वयंपाकघर. आणि बाथरूम. एकटीच ती. कैफ उतरवायला कोणी नाही....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

रोचक वर्णन!!! ही कादंबरी मिळवायला लागते आता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तुम्ही विषय असा काही मांडलेला आहे की यावर ... कहांसे छेडू फसाना और कहा तमाम करूं - अस प्रश्न पडतो.

दिल चाहता है मधलं ते "सिध" चं किरदार आठवा. की जो चित्रं काढतो, (एकतर्फी का होईना पण) प्रेम करतो, मित्रांबरोबर पार्टीला (डिस्को मधे)/गोव्याला जातोच, गप्पाटप्पा करतोच, मौजमजा करतोच. पण तरीही व तेव्हाही काहीसा तनहा असतो. उसकी अपनी एक दुनिया होती है जिसमे वोह मश्गुल मसरूफ सा रहता है. पण दिग्दर्शकाने त्याला कधीही एकटा दाखवलेला नाहिये. म्हंजे चित्रकलेचा नाद असूनही तो चित्रपटात एकटा कुठेच दिसत नाही ... की बाबा बसलाय चित्रं काढत. मकरंद प्रिय हा मिलिंद स्टाईल मधुसेवनानंद घेत बसलेला नाही दिसत ... एकदाही. तो आपल्या टिचर चे चित्र काढतो खरे ... पण लगेच मित्रांना फोन करून बोलवून घेतो व त्यांना दाखवतो ... ते चित्र. त्याचे त्या आर्किटेक्ट वर एकतर्फी असते. तो कधी "बैठे रहे तसव्वुर-ए-जाना किये हुए" बसत असेल का ... हा प्रश्न पडतो.

हर एक महफिल मे होती है कई महफिले शरीख
गौर से देखोगे तो हर एक शख्स तनहा ही मिलेगा

मला व्यक्तिशः हे सुद्धा सांगता येणार नाही की मला एकांत जास्त आवडतो की महफिल. ते साथ असलेल्या व्यक्तीवरही अवलंबून नाही व्/वा मूड वर ही नाही. एकटा असलो की काय करतो हे ही सुनिश्चित सांगता येणे कठिण आहे. मी चांगल्यापैकी सोशल आहे पण एकांत काही नावडता नाही. एकांतात मस्त अनेक गोष्टी करता येतात की ज्या इतरांसोबत करता येत नाहीत. ज्युड लॉ ने उभे केलेले "द हॉलिडे" मधलं ग्रॅहम हे किरदार आठवा. तो संपादक असतो. कॅमेरू डायज बरोबर डिनर टेबलवरील चर्चेत ... त्यात तो म्हणतो ना ... की मी एकांतात असतो की मस्त रडतो. आय अ‍ॅम अ मेजर वीपर.

घर की तामिर चाहे जैसी हो
इसमे रोने की कुछ जगहा रखना

उस्फूर्तता मोकाट सोडणे हे एकांतात मस्त जमते. असं म्हणतात की स्वतःशी दहा पंधरा मिनिटे रोज बोललात (मनातल्या मनात नाही) तर तुम्हास त्याचा खूप फायदा होतो. एकांतात एक मस्त संधी उपलब्ध असते - स्वतःचीच कंपनी एंजॉय करायची. स्वतःलाच एखादी बाब ओव्हर-कन्व्हिन्स करायची. जे लोक तुमचं म्हणणं ऐकत नाहीत ते समोर आहेत असे इमॅजिन करून त्यांना लेक्चर झाडण्याची. मी अनेकदा स्वतःला च लेक्चर झाडतो... आरशासमोर उभा राहून. मस्त वाटतं. पण मला एकांतात करण्याच्या सगळ्यात जास्त आवडत्या दोन गोष्टी म्हंजे स्वतःची स्तुती करणे. एकांतात प्रत्यक्ष भगवंत माझा शिष्य असतो. व मी त्याला गब्बरगीता सांगत असतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शेवटची दोन वाक्यंत भारियेत Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

प्रतिसाद फारच आवडला. मी स्वतः दिल चाहता है पाहिला तेव्हा 'सिड' च्या पात्राशी खूप रिलेट करू शकलो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सिड चं पात्र सर्वाधिक सुंदर आहे. नेपच्युनिअन!!! टोटल नेपच्युनिअन!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

@गब्बर . exactly . दिल चाहता है मधला सिड यात perfect बसतो . डिम्पल च पात्र सिड च्या घरी त्याच्या paintings बघायला येते आणि त्यावरून त्याच्या स्वाभावाच पैलू त्याला सांगते जे सिड च्या सर्वात जवळच्या लोकाना पण माहित नसतात . बहुतेक सिड तेन्वाच तिच्या प्रेमात पडतो . माझा सर्वात आवडत्या प्रसंगापैकी एक . जिज्ञासु नि आवर्जून पाहावा असा

https://www.youtube.com/watch?v=oYuceCWzDyE

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम नज़र में ख़्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम

होय फार सुंदर प्रसंग आहे, मलाही आवडतो. सिड ही व्यक्तीरेखा इतकी मोहक आहे.
अन सर्व गाण्यात त्या त्या व्यक्तीरेखेचा भाव व्यवस्थित पकडला आहे. सिड च्या वाट्याचं गाणं फार अप्रतिम आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

@गब्बर . exactly . दिल चाहता है मधला सिड यात perfect बसतो . डिम्पल च पात्र सिड च्या घरी त्याच्या paintings बघायला येते आणि त्यावरून त्याच्या स्वाभावाच पैलू त्याला सांगते जे सिड च्या सर्वात जवळच्या लोकाना पण माहित नसतात . बहुतेक सिड तेन्वाच तिच्या प्रेमात पडतो . माझा सर्वात आवडत्या प्रसंगापैकी एक . जिज्ञासु नि आवर्जून पाहावा असा

https://www.youtube.com/watch?v=oYuceCWzDyE

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम नज़र में ख़्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम

वा गब्बर! नादच खुळा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

गब्बर किती उत्कट प्रतिसाद दिलायस रे!!! __/\__
तुझ्यासारखा तूच!!!
____

मला एकांतात करण्याच्या सगळ्यात जास्त आवडत्या दोन गोष्टी म्हंजे स्वतःची स्तुती करणे.

Smile वा!! किती सकारात्मक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

This comment has been moved here.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

गब्बर.. गब्बर.. भारी लिहिलं आहेस एकदम. आता तू येशील तेंव्हा तुला टकीलाचे बारा शॉट्स पाजून तुझी पप्पी घेणार मी.. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आदाब अर्ज है !!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अवांतरः

तुला टकीलाचे बारा शॉट्स पाजून

बारा भानगडी, बाराचा असे वेग्वेगळे वाक्प्रचार आठवून गेले, उगाच! Wink

- (बारा शॉट्स आणि पप्पीची काय भानगड असावी ह्या विचारात पडलेला) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय राव !!!

बारा गावचं ....

हा आठवला नाय वाटतं !!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0