त-ड-जो-ड अन पंपकीन स्पाईस लॅटे

खरं तर टिंकूच्या खवत लिहीलेला जर्म, इथे त्याचा विस्तार करते आहे -
______

पंपकीन स्पाइस लॅटे फक्त शिशीर /पानगळ ऋतूमध्ये स्टारबक्स तसेच अन्य कॉफी दुकानात मिळते. माझी ही सर्वात आवडती कॉफी. अन ती ही स्टारबक्स मधलीच वरती व्हिप्ड क्रीम घालून दिलेली. पण ती मिळते लहानशी $५ ला. दर वेळेस किंवा रोज घेणे शक्य नाही कारण गिल्टी वाटतं. आज मला कमी किंमतीत त्याच कॉफीचा सॅशेज असलेला पॅक मिळाला. अर्थात मी लगेच घेतला न ट्राय केला. फ्रेश कॉफीची सर नाही त्याला पण ठीक वाटला. म्हणजे फ्रेश कॉफी १० असेल तर हा ६ वाटला.I can settle for it rather than spending exorbitant amount on fresh coffee. त-ड-जो-ड!!!

खूपदा असच फ्रस्ट्रेशन (नैराश्य?) येतं, लोकांच्या न विशेषतः नात्यांच्या मागे धावताना आपल्याला परिपूर्ण प्रेम अन ओलावा मिळतो का? थोडयाफार प्रेमासाठी आपण असे फेकलेले, अटी घातलेले, नाइलाज अथवा कर्तव्यपूर्वक दिलेले प्रेम का स्वीकारतो? का लाचारपण फेकलेले चतकोर तुकडे गोळा करतो? २ गोड शब्दांसाठी , मनावर घातलेले दुखरे घाव विसरुन जातो? अन खरच विसरता तरी येतात का? मग जर ईश्वराखेरीज कोणालाच आपलं मन अन गरजेची व्याप्ती अन खोली कळणारच नसेल तर ही यातायात का?

कोणाला हे लहान मुलीने टाकलेल्या टँट्रम सारखे वाटायचीही शक्यता आहे पण खरच क्वचित मनात येतं - अस्तित्व हाच रोग आहे, अन मग मी कधी स्वीकारला हा रोग? कधी मी concious निर्णय घेतला या अस्तित्वाचा? आठवत तर नाही. का आहे मी इथे अन आहे ती इतकी अपूर्ण का? इतकं longing घेऊन का? अन फक्त मला नाही, माझी खात्री आहे प्रत्येकाला कधी ना कधी हा प्रश्न पडतो. आईने छातीशी धरलं की मूल शांत होतं तसा solace अन शांती कुठे मिळेल?- कवितेत? नात्यात? सेवेत? पैशात? कुटुंबात?

गुरु ग्रंथसाहिब वाचला की छान वाटतं - त्यात ईश्वराची मनापासून केलेली स्तुती सापडते. वर्णन सापडतं. पण थोड्या वेळानी ते एकसुरी होतं, किंवा अन्य कामे सामोरी येतात. मग परत ये रे माझ्या मागल्या. क्वचित वाटतं मानवी जन्माची एकमेव "dignity" हीच असावी की समोरच्याचे अस्तित्व सुसह्य करणे, समोरच्या व्यक्तीत ईश्वर पाहून त्या व्यक्तीची सेवा करणे.

सर्वांनाच असं वाटतं का .... ?

जशी रोज स्टारबक्स ची पंपकीन स्पाइस लॅटे घेण्याची माझी क्षमता नाही. माझ्याकडे तेवढी करन्सी नाही तशी ईश्वरप्राप्तीची काही क्षमता/करन्सी असते का? अन असल्यास ती कशी वाढवायची/मिळवायची?

field_vote: 
2.4
Your rating: None Average: 2.4 (5 votes)

प्रतिक्रिया

ष्टारबक्स सारख्या कंपन्या किती लुटताहेत याची कल्पना करवत नाही!! घरी पाहिजे तशी लाटे बनवता येते. अत्यंत कमी किंमतीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाटाआ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खरं आहे स्टारबक्स भयानक महाग आहे. मी तिथे फक्त $१:९५ ची बेचव साधी कॉफी घेते अन प्लश खुर्चीवर १ तास बसून, कविता वाचून येते कारण अन्य कुठे इतका वेळ निवांत बसता येत नाही.
घरी पंपकीन स्पाइस लॅटे कशी बनवतात? सिरप कुठे मिळेल?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पंपकीन स्पाईस कॉफी क्रीमर अनेक दुकानांमध्ये मिळते. तुमच्याइथे ग्रोसरीची कोणती दुकाने आहेत याची कल्पना नाही. क्रोगर, आल्डी वगैरेमध्ये मी हे क्रीमर पाहिले आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओह क्रीमर ....बघते मला क्युरिग कप्स मध्ये मिळाली नाही. आता क्रीमर शोधेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"जशी रोज स्टारबक्स ची पंपकीन स्पाइस लॅटे घेण्याची माझी क्षमता नाही"... तसेही रोज स्टारबक्स ची पंपकीन स्पाइस लॅटे पिणे आरोग्यासठी चांगले नाहीच...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

का बरं? साखरे विषयी म्हणताय का तुम्ही?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वरतून व्हीप् क्रीम म्हणजे कित्ती कॅलरीज... Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाहाहा ... म्हणून ती चैन आहे .... यु आर राईट (बुल्स आय) .... वरतून व्हिप्ड क्रीम रोज नाहीच Smile
__________
स्वरा तुमच्या प्रतिसादानी माझ्या विचारांना एक वेगळाच स्पिन (चालना) मिळाला ... चैनीला गरज मानलं की सगळी दुखणी सुरु होत असावीत काय?
अन देवाचे प्रेम हे अल्टिमेट चैनीतच मोडते. आपली गरज भागवायला अन्य मर्त्य लोक अन संगीत पुरतं. आयला .... आपने एकदमसे बुल्स आय कर डाला Wink
_________
विस्कॉन्सिन्ला किंवा मिन्येपोलिस ला आलात तर माझ्याकडून एक लॅटे तुम्हाला ड्यू आहे Smile मिलाओ हाथ!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

देवाचे प्रेम म्हणजे चैनच काय, ती मला गरजही वाटत नाही ग. तूला पडलेल्या सगळ्या प्रश्णांची रॅशनल उत्तरं मिळतात मला;

>> लोकांच्या न विशेषतः नात्यांच्या मागे धावताना आपल्याला परिपूर्ण प्रेम अन ओलावा मिळतो का? माझ्याबद्दलही कुणाला असचं वाटत असेल..

>>२ गोड शब्दांसाठी , मनावर घातलेले दुखरे घाव विसरुन जातो? , मी ही कधी कधी वाटेल ते बोलतेच..

>>अस्तित्व हाच रोग आहे, अन मग मी कधी स्वीकारला हा रोग?, हे वाचल कि लगेच मला बर्ड्स अँड बीज आठवतात..

>>क्वचित वाटतं मानवी जन्माची एकमेव "dignity" हीच असावी की समोरच्याचे अस्तित्व सुसह्य करणे, समोरच्या व्यक्तीत ईश्वर पाहून त्या व्यक्तीची सेवा करणे., कधी तरी समोरच्यालाही माझी सेवा करण्याचा मौका द्यावा ग!!

थोडक्यात काय तर "ईश्वर आहे का? हा प्रश्न पडला तर तो मिळवायची करंन्सी ई. चा प्रश्न पडेल ना... Wink

वत्सा, लॅटे ऑफर करुन तु मला प्रसन्न करुन टाकलयस..माग हवा तो वर माग...!!! तथास्तू..!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खरच मागू वर Smile .... जाऊ देत ठेव जपून कैकयीसारखी योग्य वेळ येताच मागेन Smile .... १००%
.... बादमे मत बोलना Wink
__________

कधी तरी समोरच्यालाही माझी सेवा करण्याचा मौका द्यावा ग!!

होय ते शिकायचय. या जन्मी नाही होणार ते. कन्या घरातले सगळे ग्रहं दुसरीकडे हलवावे लागतील. असो.
_____________

तूला पडलेल्या सगळ्या प्रश्णांची रॅशनल उत्तरं मिळतात मला;

Smile मस्त!!! आवडलीस.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाकी ईश्वरप्राप्तीची करंसी वाचुन मला पेड दर्शन आठवलं...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय आहे ते? पैसे देऊन ईश्वराचे दर्शन असावे.
______
मला ते नव्हतं म्हणायचं. मला हाफिझ म्हणतो तसं काहीसं म्हणायचं होतं -

The subject tonight is Love

And for tomorrow night as well,
As a matter of fact
I know of no better topic
For us to discuss
Until we all
Die!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण कॉफीत भोपळा घालायचाच कशाला म्हंटो मी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

चांगली लागते आदूबाळ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

च्यायला. कॉफीत भोपळा म्हणजे भो पळा!!!!!!

भोपळा नाय पण दुधीभोपळा बाकी सांबारात लय चविष्ट लागतो. आजच केलेल्या सांबारात चांगला लागलेला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हाहाहा Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

क्वचित वाटतं मानवी जन्माची एकमेव "dignity" हीच असावी की समोरच्याचे अस्तित्व सुसह्य करणे

समोरच्याचे अस्तित्त्व सहन करणे ह्याअर्थी सहमत आहे.

जशी रोज स्टारबक्स ची पंपकीन स्पाइस लॅटे घेण्याची माझी क्षमता नाही.

मुळात कॉफीची चव डेव्हलप करण्यावर आहे, तसे आम्हाला पुण्यातल्या रुपाली रेस्तरांची कॉफी जबर आवडते पण ती रोज प्यायला परवडत नाही(वेळ, पैसा इ.).

अवांतर - तुम्ही हळू हळू धार्मिक अजेंडा ह्या संस्थळावर मांडू पाहत आहात काय? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही हळू हळू धार्मिक अजेंडा ह्या संस्थळावर मांडू पाहत आहात काय?

हाहाहा .... वय वाढतय तसं हो Wink
_____
नाही नाही सहन करणे नाही. त्या व्यक्तीला प्रेम ,आदरादि डिग्नीटी देणे, अतिशय चांगले (अन मनापासून) वागविणे या अर्थाने.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मग जर ईश्वराखेरीज कोणालाच आपलं मन अन गरजेची व्याप्ती अन खोली कळणारच नसेल तर ही यातायात का?

हे भारी वाट्लं.
unconditional love म्हणताय का तुम्ही इकडे? तशी अपेक्षा असेल तर मग ईश्वर सोडून अजून कोणी मिळणं कठीण आहे.
प्राणी किंवा लहान मुलं ह्यांच्याकडून अशी अपेक्षा करता येऊ शकेल असं वाटतं Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

unconditional love म्हणताय का तुम्ही इकडे?

unconditional, Never ceasing, all consuming सर्वेसर्वा!!!!
जाऊ देत आत्ता शोधून "Tyranny of expectations" हा बुद्धीझम वरचा लेख वाचतेय. आत्ता मला काहीतरी हवय अन कळत नाहीये काय हवय ..... ही बोअरींग रिमोट मीटींग संपली जाऊन आइस क्रीम खाऊन येणारे Biggrin
ये दिन भी जायेगा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Tyranny of expectations

तेवढे शिकागो विद्यापीठात रॉबर्ट ल्युकास प्राध्यापक आहेत ... त्यांच्याकडून थियरी ऑफ रॅशनल एक्पेक्टेशन्स पण शिकून या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमच्याकडून शिकता येईल का ... सेकंड हॅन्ड Wink
ख-डू-स!!!
_______
बाय द वे आइस्क्रीम न खाता स्प्लिट पी सूप पीऊन आले. ते रॅशनल विचार केला म्हणूनच ना? Sad तरी असले टोमणे मिळतात मला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

थोडयाफार प्रेमासाठी आपण असे फेकलेले, अटी घातलेले, नाइलाज अथवा कर्तव्यपूर्वक दिलेले प्रेम का स्वीकारतो

हाच प्रश्न स्वतःला पण विचारता येतो. - अटी न घालता, कर्तव्य वा नाइलाज म्हणून नसलेले आणि अगदी सवय म्हणून सुद्धा नसलेले "निर्व्याज प्रेम आपण स्वतः कोणाला देऊ शकतो का?"

- १६-१७ या स्वप्निल वयात मी "हो" असे उत्तर दिले असते
- पण आज वयाच्या या टप्प्यावर मी कायम + निर्व्याज ची हमी देऊ शकत नाही हे तथ्य मला समजले आहे.

कायम + निर्व्याज = (ऑलमोस्ट) समर्पण/भक्ती -> मला नाही जमणार!

मग जे मी दुस-याला देऊ शकत नाही ते दुस-याला मागण्याचा मला काय अधिकार?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

छान मुद्दा आहे. खरच!
______
ऐक ना सवि - रीडर्स डायजेस्ट मध्ये एक मस्त कार्टून पाहीलं होतं - एक जिग्सॉ पझलचा तुकडा सायकिअ‍ॅट्रीस्ट्च्या सोफ्यावर झोपून विचारत असतो "have you ever felt like you are part of something bigger?"

इतकं आवडलेलं मला ते. Smile
______
आपण जेव्हा दुसर्‍याचा एक उद्धटपणा माफ करतो तेव्हा कुठेतरी दुसर्‍यानी आपल्या ४ वेळा उल्लंघिलेल्या सीमा माफ केलेल्या असतात हेही खरं आहे. खरं तर भावनेच्या भरात (फ्रस्ट्रेशन) लिहीला मी लेख पण ...... मी ही चुकतेच की अन मलाही माफ केलं जातच की!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मग जे मी दुस-याला देऊ शकत नाही ते दुस-याला मागण्याचा मला काय अधिकार?

म्हणूनच तर ट्रेड या संकल्पनेचा जन्म झाला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्टारबक्सात अजून गेले नाहीय. पण सीसीडी, बरीस्तात चारपाचदा गेलेय. स्वतः पैशे देणार असू तर फक्त कोल्ड कॉफी घेते बाकी कायबी परवडत नै. दुसरंकोणी पैशे देणार असेल तर त्यांनाच निवड करायला सांगते. तिथल्या गरम कॉफी अजीबात आवडल्या नाहीत. हे कॉफी+भोपळा तेपण गरम कसे लागेल शंका आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्टारबक्स व सिसिड्या, बरिस्त्यांची कृपया तुलना करू नये कारण ती भ्रष्ट भारतीय नक्कल आहे.(म्हणजे स्टारबक्स लय महान असे नाही, त्यापेक्षा बरी कॅाफी मी तुलनेने लहान ठिकाणी प्यायले आहे) भारतीय पब्लिक ला अपील व्हावं म्हणून टिव्ही वर ढणढण संगीत, दुसर्याच्या टेबल वरचे संभाषण ऐकू येइल इतकी कमी मधली जागा व त्यामुळे ते ऐकण्यात बर्याच वेळा रस घेणारी जनता ही "कॅफे" या कल्पनेपासूनच फारकत आहे. शिवाय जास्त किंमतीत मिळणारी सो सो चव हा तर वेगळाच मुद्दा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

११ वर्षांपूर्वी, मुंबईत असताना बरीस्तात गेलेले पण मला एक कॉफी अज्जिबात आवडली नाही. कदाचित फालतू कॉफी निवडली असेल मी. Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

क्वचित वाटतं मानवी जन्माची एकमेव "dignity" हीच असावी की समोरच्याचे अस्तित्व सुसह्य करणे, समोरच्या व्यक्तीत ईश्वर पाहून त्या व्यक्तीची सेवा करणे.

आँ?
if we are here to help others, what others are here for???
दहा बारा वर्षापेक्षा मोठे झालात की हे उमगेल.
.
.
तसा solace अन शांती कुठे मिळेल?- कवितेत? नात्यात? सेवेत? पैशात? कुटुंबात?

पुरेसं पोट भरलं असलं की असले प्रश्न पडतात. दर पायरीला भयानक कटकट डोक्याला असेल किंवा पोट भरायची चिंता असेल तर असे प्रश्न पडणार नाहित.
प्रश्न पडण्याच्या परिस्थितीपर्यंत पोचल्याबद्दल अभिनंदन.
.
.
खूपदा असच फ्रस्ट्रेशन (नैराश्य?) येतं, लोकांच्या न विशेषतः नात्यांच्या मागे धावताना आपल्याला परिपूर्ण प्रेम अन ओलावा मिळतो का?
मिळतो. अनपेक्षितपणे मिळतो आणि तो क्षण हातात धरुन ठेवता येत नाही.
काही कळेपर्यंत क्षण निघून जातो आणि मग घडलं ते स्वप्न की सत्य म्हणत बसावं लागतं.
.
.
बाकी मला आनंद देउ शकणार्‍या गोष्टींपैकी बहुतांश गोष्टी बर्‍याच परवडण्याजोग्या आहेत. त्यामुळे तितका त्रास होत नसावा.
दूध आणावं. साखर्-चॉकलेट्-बोर्नव्हिटा वगैरे काहिच न टाकता तापवून तसच पिउन टाकावं.
नुसतं चालत निघावं, भरपूर चालावं. अल्लाद अल्लाद किंचित घाम येइपर्यंत चालावं.
बर्‍यापैकी ताजंतवानं वाटतं.
आनंदासाठी चैनीइतके पैसे मिळायची वाट पहायची आवश्यकता नसावी.
मिळतील तेव्हा चैन करण्यात लाजू नये. मग स्कूबा डाय्व्हिंग करा, स्नोर्केलिंग करा किंवा पंधरा वीस हजार फुटांवरून विमानतून उडी मारुन पहा पॅराशूट घेउन.
ते नसेल तेव्हा साध्या चालण्यातून आनंद मिळवता येतो; निदान तो मिळवावा.
.
.
बाकीही बरच काही आहे. फुरसतीत टंकतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

पुरेसं पोट भरलं असलं की असले प्रश्न पडतात. दर पायरीला भयानक कटकट डोक्याला असेल किंवा पोट भरायची चिंता असेल तर असे प्रश्न पडणार नाहित.
प्रश्न पडण्याच्या परिस्थितीपर्यंत पोचल्याबद्दल अभिनंदन.

Smile

दोन दिवस वाट पहाण्यात गेले, दोन दु:खात गेले
हिशोब करतो आहे किती राहिले आहेत डोईवर उन्हाळे
शेकडो वेळा चंद्र आला. तारे फुलले, रात्र धुंद झाली
भाकरीचा चंद्र शोधण्यात जिँदगी बरबाद झाली.
नारयण सुर्वे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मनोबाशी सहमत.

--

क्वचित वाटतं मानवी जन्माची एकमेव "dignity" हीच असावी की समोरच्याचे अस्तित्व सुसह्य करणे, समोरच्या व्यक्तीत ईश्वर पाहून त्या व्यक्तीची सेवा करणे.

समोर आरसा असेल तर ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

समोरच्या व्यक्तीत ईश्वर पाहून त्या व्यक्तीची सेवा करणे.

त्या इडेस ऑफ मार्च पिक्चरात - Society should be above individual - असे एक प्रचंड "विनोदी" वाक्य आहे. त्याची आठवण झाली.

आपल्याला "घालीन लोटांगण वंदीन चरण" ची एवढी भूक का असते ??

Why are we so committed to preemptive surrender ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

people hate freedom.
people hate independence as causes them to be responsible for their own fate.
Unlimke popular myth/conception; People dont rebel against cruel regimes/rules;
people rebel when ruler is considered weak and not-enough-cruel.
It is the human mind to search for a powerful saviour and almighty;
and throw whole of the responsibility on him/her.
People just hate independence.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

दणकट प्रतिसाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तू अशी हिंट देतोयस का की कॅनाइन (लांडगा, कोल्हा, श्वान) आदि प्राण्यांप्रमाणे आपण एक लीडर (अल्फा-मेल/फिमेल) फॉलो करणारी जात आहोत?
तसं असलं तरी समोरच्या व्यक्तीची सेवा करण्याशी या प्रतिसादाचा संबंध नगण्यच आहे किंबहुना नाहीच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपल्याला "घालीन लोटांगण वंदीन चरण" ची एवढी भूक का असते ??

ह्याबद्दल ते लिहिलं होतं.
लोकांना स्वातंत्र्यामुळे येणारी जिम्मेदारी नको असते.
मग मी तुम्हाला स्वातंत्र्य/समृद्धी "देणार" आहे; म्हण्णार्‍याच्या गुलामीत जायची हे तयारी करतात.
काही हुकूमशाहांचा उदय हे त्याचं खास उदाहरण.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

ओके ओके गॉट इट.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आणि असेच लोक मग समाजाचे नियम तोडणार्‍यांना विकृत इ.इ. ठरवतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पण समोरच्या व्यक्तीत ईश्वर पहाणे म्हणजे समर्पण कुठे? किंवा घालीन लोटांगण कुठे?
____
कदाचित आपला इगो सुखावतो, आपल्याला इश्वराचा रोल प्ले करता येतो. - असंही किंवा असच असू शकतं.
_____
स्वरा म्हणाली -

कुणाला तरी आपली सेवा करण्याचा मौका द्यावा ग कधीतरी.

ते मला जमत नाही कारण परत इगो. अन्य व्यक्तीला आनंद देण्यात, सेवा देण्यात, सुखावण्यात इगो सॅटिस्फॅक्शन असतं. सुप्त अन सूक्ष्म अहंकार कुरवाळला जातो जो आपणच सेवा घेण्यातून मिळत नाही. चक्क कमीपणा वाटतो Sad
______________
दुर्गा सप्तशातीतही एक सुरेख श्लोक आहे.

रोगनशेषानपहंसि तुष्टा।
रुष्टा तु कामान् सकलानभीष्टान्।।
त्वामाश्रितानां न विपन्नराणां।
त्वमाश्रिता हृयश्रयतां प्रयान्ति।।

त्याचा अर्थ हा की हे देवी तू ज्यांच्यावर कृपादृष्टी /कटाक्ष टाकतेस ते लोक स्वतः विपन्न तर रहात नाहीच पण अन्य विपन्न लोकांना आश्रय देण्यास समर्थ बनतात. हा श्लोक नीट लक्षात आहे कारण तेच अन्य लोकांना आश्रय तेच देऊ शकतात जे स्वतः भक्कम आहेत, शिवाय काही डिश आऊट करण्याची पात्रता राखतात. परत ट्रिमेन्डस इगो सॅटिस्फॅक्शन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रतिसाद देणार्‍या सर्वांचे आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाऊ.. स्टारबक्स..!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होय गवि, पावलापावलावर आहेत इथे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख अतिशय आवडला!
नेव्हर एव्हर डिप्राईव्ह युअरसेल्फ ऑफ द पंपकिन स्पाईस लॅटे बिकॉज दॅट विल काऊंट अ‍ॅज पॉव्हर्टी.
यासाठी उपाय आहे आणि तो म्हणजे शरीराला कंटाळा येईपर्यंत रोज पंपकिन स्पाईस लॅटे पिणे. (बिलीव्ह मी ईट वर्क्स. सध्या मी फ्रॅग्रंट हॉटपॉटवर हा प्रयोग करत आहे. द ओन्ली थिंग आय कुड नॉट ट्राय धिस ऑन इज सेक्स अ‍ॅन्ड आय हेट बिईंग इंडियन फॉर दॅट)
आयुष्यातला १/३ वेळ तुम्ही त्या फालतू क्युबिकलमध्ये कशासाठी घालवता? अमुक एक गोष्ट आपल्याला परवडणार नाही अशी समजूत घालायला?
बाकी जिवंतपणाबद्दल म्हणाल तर तो एक शाप आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वा!!! क्या बात है!!! ननि मस्त प्रतिसाद दिलात. अनेक धन्यवाद आपले अन माझ्या भावना समजून घेतल्याबद्दलही.
_____________

द ओन्ली थिंग आय कुड नॉट ट्राय धिस ऑन इज सेक्स अ‍ॅन्ड आय हेट बिईंग इंडियन फॉर दॅट)

आताच्या पीढीची कल्पना नाही पण आपल्या इंडीयन पीढीबद्दल बोलायचं तर - इन एव्हरी आस्पेक्ट ऑफ रिलेशनशिप वी आर फकड अप! ब्लडी फकड अप.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाकी जिवंतपणाबद्दल म्हणाल तर तो एक शाप आहे.

हे वाक्य असं वाचल्यावर एकदम वेगळं वगैरे वाटलं.
जगणं हा शाप का आहे हे जाणून घेउ इच्छितो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

जगणं हा शाप का आहे हे जाणून घेउ इच्छितो.

बि केअरफूल व्हॉट यू विश फॉर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लवंग, सुंठ, दालचिनी असं घातलेला भोपळ्याचा पाय मला फार आवडतो. तो किंचित कोमट करूनच मी खाते. त्यात कॉफीची चव कशी लागेल असा विचार करते आहे. कदाचित ती चव तयार व्हावी लागेल.

बाहेर बनवलेला भोपळ्याचा पाय फार गोग्गोड लागतो. म्हणून मी घरीच बनवायला सुरूवात केली. साखर, मसाल्यांचं प्रमाण चवीनुसार बदलता आलं. रोज थोडं धावलं की त्यातल्या आटीव दूधाचीही फार भीती वाटत नाही.

प्रेमबिम सगळं ठीक आहे. एकत्र रहाबियाचं असेल तर पाककृती स्वतःच्या सोयीने बदलायची आणि त्या घरात बनवण्याची तयारी ठेवलेली बरी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मस्त!! घरी बनवतेस पंपकीन पाय? Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाय खाल्ला नाही. पण उकडलेला भोपळा + दूध + साखर हे गरम किंवा गार कसेही चांगले लागते.
हा लेख वाचल्यावर सीसीडी/बरीस्तात पिलेल्या गरम कॉफी आणि त्यात भोपळा अशी काहीतरी कल्पना मी केली :-D. त्यात परत स्पाइसेस घालणे मंजे अजूनच :O.
ही पाकृ www.thekitchn.com/how-to-make-pumpkin-spice-latte-even-better-than-starb...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला बा भोपळ्याची खीर आठवली. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

स्टारबक्स हा केवळ एक ब्रँड आहे, ज्याचा उदोउदो केवळ मार्केटिंगमुळे होतो असे माझे मत आहे. कंझ्युमर रिपोर्टने घेतलेल्या ब्लाइंड टेस्टनुसार वॉलमार्ट आणि स्टारबक्सच्या कॉफीत फारसा फरक नाही. शिवाय कॉफीत भोपळा स्पाईस म्हणा किंवा cinnamon (दालचिनी?) घालून कॉफीच्या मूळ चवीची वाट लागते असे माझे स्पष्ट मत आहे.

कॉफी कशी हवी, तर त्याचा अरोमा नाकाला हळूवार गुदगुल्या करणारा पाहिजे. त्याच्यासाठी दळलेली कॉफीच उत्तम. रुईया कॉलेजला जाताना रोज मोदी कॉफीच्या दुकानाशेजारून जाताना रोज जो अरोमा घ्यायचो, तो आठवला की अजूनही अंगावर शहारे येतात. ईराण्याच्या हॉटेलात किंवा माटुंग्याला दुर्गा परमेश्वरीसारख्या कुठल्याही साउथ इंडियन हॉटेलामध्ये जी कॉफी मिळते ना (स्टीलच्या त्रिकोणी भांड्यात कॉफी भरून वर वाटी ठेवायची आणि मग ती वाटी उलटी करून कॉफी आणून द्यायचे), तशी कॉफी प्यायली तर स्टारबक्ससारखी कुठली प्रिमियम कॉफीपण झक मारेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मद्राशांची फिल्टर कॉsssप्पे आमचीही लाडकी.
भारतातही लोक बरिस्ता किंवा सी सी डी मध्ये कॉफी भारी मिळते म्हणून जात नसावेत;
तर माहौल वगैरे भारीय, बराच वेळ गप्पा ठोकत बसता येतं, छान छान मुलींशी बोलायला चांगलं ठिकाण म्हणून जात असावेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

हा कंडिशनिंगचा परिणाम
भारतात मिळणारी चिकोरीयुक्त, भरपूर "पुष्ट" दुध घातलेल्या कॉफीची मजा आहेच, मात्र चिकोरीमुक्त, पातळ दुधाचा स्पर्श झालेल्या पाश्चात्य कॉफीचीही वेगळी मजाय.
दुध, कॉफी यांची वेगवेगळी काँबिनेशन्स आणि त्यांच्या चवींना तयार होणे हे एका मजेचे काम आहे

(विविध कॉफीप्रेमी) ऋ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आहाहा, काय आठवण काढलीत राव! बंगळूरची कॉफी...

तिथल्या तमिळ टपरीवाल्याकडल्या लुसलुशीत इडल्या, गनपावडर पेरलेले तलम डोसे, टॉमेटो-आल्याची चटणी आणि वरून ती कडसर धुंद कॉफी.

असो. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन