शर्थीचे प्रयत्न

ते काही नाही,
मी पूर्ण इच्छाशक्तीनिशी
तुझ्याकडे दुर्लक्ष करणार आहे
.
मग भले माझे डोळे ओलावेना,
मी सैरभैर का होईना,
रात्री उशी ओली होईना,
अगदी अश्रूप्रपात का येईना
.
मात्र पूर्ण ताकदीनिशी
मी दुर्लक्ष करेन
.
तू मात्र अज्ञानात रहा
तुझ्या जगात,
तुझ्या मस्तीत,
तुझ्या वर्तुळात
अन तुझ्या नादात
.
मीही दुर्लक्ष करेन
ना दखल घेइन,
ना लक्ष देइन,
ना बोलीन,
ना पाहीन तुझ्याकडे
.
मग माझं जग अस्ताव्यस्त का होइना,
माझ्या जगात प्रलय का येइना,
ते अंधारात का बुडेना,
.

काय म्हणालास- इतक्या अट्टाहासानंतर मी काय साधेन?

समाधान!
तुझ्यापासून माझी व्याकुळता लपविण्याच,
माझी तडफड तुला कळू न देण्याचं
माझ्या उरल्यासुरल्या प्रतिष्ठेचा
तम्तू जपण्याचं
.

काय म्हणतोस - तसं साधून काय मिळेल?

.
खरच काय मिळेल
इतक्या अट्टाहासानंतर
जर तुला कळणारच नसतील,
माझे शर्थीचे प्रयत्न!

field_vote: 
4.2
Your rating: None Average: 4.2 (5 votes)

प्रतिक्रिया

छानच! संवादात्मक शैलीही खासच!

ऐसीवर स्वागत!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आणि ".." चा वापरही आवडला.
चांगला प्रयोग आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वा! आवडली.
ऐसीवर स्वागत!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त... खूप सुदंर...

कविता खूप आवडलीये... Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- सुमित

"दिसे जे कवीला,न दिसते रवीला...सांगूनी गेले कुणीसे शहाणे..."

़कविता आवडली! Smile
सहज आणि सोप्पे! (आजकाल दूरापास्त झाले आहे).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहज कळणारी, खूपच सुंदर आणि प्रेमाच्या नात्याची एक (भग्न) अवस्था अतिशय समर्पकपणे टिपणारी कविता.
----------------------------
नकारानंतर किंवा नातं संपल्यानंतर त्याचे काही अवशेष मनात बराच काळ राहतात. पण ताटातुटीनंतर लागलीच तर हे बंध खूपच सबल असतात. खासकरून हा बंध एकतर्फी असेल तर माणूस आपल्याच मनात प्रियकराची एक प्रतिकात्मक मूर्ती बनवून तिच्याशी धूसफूशीने वागतो. मग भावना ओसरल्या कि लक्षात येतं कि ज्याला रिअ‍ॅक्शनच नाही तो फोर्स कसचा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ज्याला रिअ‍ॅक्शनच नाही तो फोर्स कसचा?

वा!! किती सुंदर मांडलत अजो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नकारानंतर किंवा नातं संपल्यानंतर त्याचे काही अवशेष मनात बराच काळ राहतात. पण ताटातुटीनंतर लागलीच तर हे बंध खूपच सबल असतात. खासकरून हा बंध एकतर्फी असेल तर माणूस आपल्याच मनात प्रियकराची एक प्रतिकात्मक मूर्ती बनवून तिच्याशी धूसफूशीने वागतो. मग भावना ओसरल्या कि लक्षात येतं कि ज्याला रिअ‍ॅक्शनच नाही तो फोर्स कसचा?

टाळ्या!
--

अजो, बरेच दिवसात काही ललित लिहिलं नाहीस. लिहि ना काहितरी!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

लिहिन. अवश्य.
----------------
गुरगाव ट्रॅफिक पोलिस, एका धर्मांतराची कथा, डुबरगेंडा नंतर लै गॅप झाला. आता लिहितो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

वा वा! वाट पाहतोय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सुंदर, खूपच आवडली Smile
अगदी आपल्याच मनातलं लिहिलंय अशी …

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सोनाली.