चित्रपट विषयक नियम (व पोटनियम) - भाग दुसरा

काही चित्रपटविषयक नियम- भाग १ लिहायच्या वेळेस आम्हाला खरे म्हणजे आणखी नियम जाणवतील/सुचतील असे वाटले नव्हते (जरी आम्ही आणखी लिहू असे आश्वासन लेखाच्या शेवटी दिले असले तरी). नाहीतर मॉन्स्टर मूव्हीज च्या पहिल्या भागाच्या शेवटी ती मोठी मगर, डायनोसोर, अजगर वगैरे मारल्यावर जगातले सर्व मॉन्स्टर्स संपले असे गृहीत धरून सगळे लोक काहीतरी स्मार्ट डॉयलॉग्ज मारून तेथून निघून गेल्यावर मग तेथे पुन्हा एखादे अंडे फुटताना किंवा काहीतरी वळवळताना दिसते, तसे आम्ही पहिल्या नियमांच्या शेवटी काहीतरी सिम्बॉलिक ठेवले असते. निदान एखादी हलती स्माईली. पण असो.

हे वाचायच्या आधी पहिला भाग जरूर वाचा. प्रतिक्रियांमधे हे क्रमा़ंक तेरा पासून का चालू केले असे विचारलेत तर आपण पहिला भाग वाचला नाही हे चाणाक्ष लेखक नक्की ओळखतील.

तर हा घ्या नियमांचा नवीन ष्टॉकः

१३: पाच मिनीटांचा नियम.
खालील गोष्टीतील एक गोष्ट/थीम जर सिनेमात असेल तर दुसरी पाच मिनीटांत येतेच येते:

१३.१> कॉलेज तरूणांवरची कथा: (सुरू झाल्यावर ५ मिनीटांत) "इस साल के डान्स कंपिटिशन मे...." हा संवाद. शक्यतो आत फुल व वरती चौकटीचा हाफ शर्ट घातलेल्या व जन्मापासून "अच्छे दोस्त"च असलेल्या तरूणाला.
१३.२> हीरो ने कोणालातरी बहीण मानलेय किंवा त्याला एक बहीण आहे हे आपल्याला कळलेय - ते - रक्षाबंधन येण्याचा काळ
१३.३> हीरो किंवा साईडहीरो हा मुस्लिम आहे हे कळल्यावर - ते - तो नमाज अदा करतानाचा शॉट
१३.४> हीरो एका मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर आहे हे कळते - ते - "आज बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मीटिंग आहे" हा संवाद
१३.५> किंवा तो सेल्स मधे आहे हे कळल्यावर - तो एक डावीकडून उजवीकडे वर जाणार ग्राफ असलेला सेल्स प्रेझेंटेशन चा शॉट

१४.
काही विशिष्ट गोष्टी करणारे लोक त्या करताना दारे व्यवस्थित बंद करून करत नाहीत. पण पूर्ण उघडीही ठेवत नाहीत. किंचित किलकिले असते. त्याच दिवशी काहीतरी पराक्रम करून आलेला हीरो किंवा हीरॉइन दार उघडायचा प्रयत्न करते तर ते उघडेच असते. मग तो आत गेल्यावर अस्पष्ट आवाज येतात. पुढे जे होते त्यातून चित्रपटाची कथा तयार होते.
तसेच हे लोक खिडकीत असतील तर त्यांच्या सावल्या खिडकीतील काचेवर काय चालले आहे याची अचूक कल्पना बाहेरून येइल अशाच पडतात. खिडकी उघडी असेल तर बाहेरून कोठूनही क्लिअर दिसेल अशा ठिकाणीच हे चाललेले असते.

१५:
हीरॉईन किंवा कोणीही मुलगी झोपलेली आहे. अशा स्थितीत तेथे जागा असलेला तरूण जर अच्छा दोस्त असेल तर तो आपले पवित्र हेतू दर्शवण्याकरिता भर मुंबईत भर उन्हाळ्यात सुद्धा तिच्या अंगावर पांघरूण घालून तेथून जातो.

१६. नॅरो एस्केप रूल:
डायनोसॉर, मॉन्स्टर्स, भुते, पाण्याच्या लाटा, आगीचे लोळ यापासून पळणारे जर "मेन कलाकार" असतील तर ते नेहमी एक दोन इंचांच्या किंवा सेकंदांच्या फरकाने वाचतात. त्यापेक्षा जास्त किंवा कमी नाही. बंद खोल्यांची, लिफ्टची, दारे/शटर्स बंद होता होता त्यातून निसटतात. पूर असेल तर "पानी सरके उपर" होता होता एखादी व्हाल्व उघडते. आगीचे लोळ भुयारातून वर जाण्याआधी एक सेकंद हे लोक तेथून खाली पडतात व त्यांच्या सोयीसाठी खाली पाणीही असते.
तसेच हे सहकलाकार असतील तर ते आपण घाबरून किंवा फाजील आत्मविश्वासाने हसून ज्या दिशेला बघत आहोत त्याच्यापेक्षा वेगळ्या दिशेने हल्ला होउ शकतो याबाबत पूर्णपणे अनभिज्ञ असतात.

१७.
हीरो व हीरॉईन दोघेही पळालेले असतील व ते एरव्ही सुद्धा क्वचित घरी जेवणारे असतील तरीही ते पळून येउन लपलेल्या जागी मात्र त्यांना एकदम लाकडे तोडून आणून दगडांची चूल करून त्यावर स्वयंपाक करावा लागतो. त्यासाठी तवा वगैरे भांडीही अचानक उपलब्ध होतात. जवळच्या गावात सामान आणायला जाता येते पण एखाद्या हॉटेलातून थेट काहीतरी खायला आणायचा पर्याय नसतो.

१८.
घरातून असे पळालेले लोक एखाद्या पानाच्या टपरीवर, चहाच्या हॉटेल मधे किंवा दुकानात काहीतरी आणायला जातात. तेव्हा तेथे पेपर उघडून बसलेल्या एखाद्या माणसाच्या अगदी समोरच्या पानावर अर्ध्या पानाच्या साईजएवढा त्या पळालेल्या व्यक्तीचा फोटो हेडलाईन सकट आलेला असतो. पान सुद्धा पलटावे लागत नाही.

१९. खालील नावे असलेले लोक कधीही वाईट नसतातः
१. मास्टरजी
२. खान चाचा
३. मिसेस ब्रिगॅन्झा

२०.
जेव्हा दोन हीरोंचे एकाच हीरॉईन वर प्रेम असते ते तिघेही एकमेकांना ओळखत असले तरी तिचे नाव किंवा जरा क्लू लावता येइल अशी इतर काहीही माहिती एकमेकांना देत नाहीत. चित्रपटात असंख्य एकत्र शॉट्स असले तरी तेव्हा "अरे हीच ती" असेही सांगत नाहीत. पूर्ण चित्रपटात तिच्याशिवाय दुसरी कोणीही मुलगी नसली तरी दोघांनाही तीच ती असेल याचीही शंका येत नाही. मग पूर्ण चित्रपटभर सगळा गोंधळ झाल्यावर कधीतरी ते उघडकीस येते. मग ते जबरी दोस्त असल्याने ज्याला आधी कळते त्याला मरणे किंवा स्वतःला तिच्या नजरेत बदनाम करणे हे दोनच पर्याय असतात.

२१.
हिन्दीतील हीरो कोणत्याही आर्थिक स्तरावर असेल तरी त्याच्या देशा-परदेशातील गाड्या लक्झरी ब्रॅण्डच्याच असतात. त्या नेहमी थांबताना स्क्रीनवर तो लोगो मोठ्ठा दिसेल अशाच थांबतात. इतर देशांतील कडक ट्रॅफिक नियम- लेन पाळणे, सीट बेल्ट लावणे- केवळ या लोकांसाठी शिथील केलेले असतात.

तोच हीरो हॉलीवूडचा असेल तर त्याच्या कारचा ब्रॅण्ड हे एक 'स्टेटमेंट' असते तो हीरो कसा आहे त्याचे. Show him driving a Camry, a Taurus or an F150 and move on? चान्सच नाही. तो कारमधे बसल्यावर रेडिओवर जे गाणे लागते ते ही रॅण्डम नसते, त्याच्या खास आवडीचेच असते आणि त्या गाण्याचा संदर्भ पुढे कथेत येतोच येतो.

२२.
वन वे रस्त्यावरून उलट्या दिशेने गाडी घातली की स्टिअरिंग एकदा थोडेसे इकडे व एकदा तिकडे फिरवत रस्त्याच्या मधून चालवत सर्व येणार्‍या गाड्या चुकवत जाता येते.

२३.
क्लोज मॅच. हीरो बॅटिंग करतोय. शेवटच्या बॉलवर सहा हवे आहेत. अशा वेळेस दुसर्‍या टीमचा कॅप्टन सगळे फिल्डर्स इतके "आत" लावतो की बाउन्ड्रीच्या जवळ उडालेला कॅच घ्यायला त्यांना मागे मागे पळत जावे लागते.

२४. अॅडव्हेंचर चित्रपटात कोणीही पाण्यात पडून वाहून जाऊ लागले किंवा होडीत्/तराफ्यात बसून जाऊ लागले की लगेच धबधबा समोर येतो.

२५. जरा फॅशनेबल असलेली हीरॉईन जेव्हा हीरोच्या घरी पहिल्यांदा जाते तेव्हा भावी सासूबरोबर किचनमधे तिला नेहमी ऑम्लेटच बनवावे लागते व तिला ते येत नसते, एवढेच नव्हे तर "अंडी सुरक्षितरीत्या कशी हाताळावीत" याचेही तिला सामान्यज्ञान नसते.

२६. हीरोच्या जगण्यामरण्याचे नियम.
बॅकग्राउंडः हीरोला गोळी लागली आहे किंवा तो पाण्यात पडला किंवा "इन जनरल" गायब झाला आहे.
1 दंडात गोळी: नक्की वाचतो, एवढेच नाही तर त्यावर काही इलाजही करावा लागत नाही. फक्त एक रूमाल बांधून जणू मुंगी चावली आहे इतक्या सहजतेने फक्त तेथे हात धरून तो उरलेले संवाद म्हणतो.
2 डोक्यात किंवा छातीत गोळी: हिरॉईन जिवंत आहे का यावर ते ठरते.
2a हिरॉईन आधी मेलेली: मग हा ही मरतो. एरव्ही चिवट असला तरी शेवटी अगदी कोठेतरी "आ बैल" करून मरतो.
2b हिरॉईन अजून जिवंत्: मग बहुधा वाचतो आणि शेवटच्या शॉट मधे हॉस्पिटल मधे बँडेज च्या भेंडोळ्यात रोमँटिक संवाद म्हणतो.
2c तसेच याला मारून इतर कोणी कोणाबरोबर लग्न करावे हा प्रश्न सुटणार आहे: नक्कीच मरतो, डायरेक्ट गोळीने मेला नाही तर ज्याच्या लग्नाचा प्रश्न सुटणार आहे त्याला व्हिलन गोळी घालत असताना "नहीSSSS" म्हणून मधे कडमडतो.

3 सुरूवातीचे रोमँटिक गाणे झाल्यानंतर पुढे नदीत पडणे किंवा अपघात होणे पण पुढे काय झाले ते न दाखवणे: नक्कीच वाचतो आणि नंतर परत येतो
3a यात चित्रपट emotional, "this movie is about relationships" वगैरे असेल तर तो नदीत पडला किंवा अपघात झाला म्हणजे मेलाच असे गृहीत धरून नायिका दुसरे लग्न करते, आणि ते जरा सेटल होत आहेत म्हणेपर्यंत हा तेथे कडमडतो. तिच्या पार्टीत एक ग्लास हातात धरून तिच्या बेवफाईबद्दल तो वाचल्याचा आपल्याला पश्चात्ताप होईल एवढी एक बोअर गझल गातो, ते गाणे कशाबद्द्ल आहे हे उपस्थितांपैकी इतरांना तर सोडाच पण दुसर्‍या नवर्‍यालाही कळत नाही. मग दोन्हीपैकी कोणते लग्न जास्त पुढच्या स्टेज ला गेलेले आहे त्यावर हा की तो मरतो ते ठरते.

4 कोठेही गोळी, पण अजून व्हिलन जिवंत आहे, थोडा बदला बाकी आहे आणि तो घेणारे अजून कोणी शिल्लक नाही: नक्कीच वाचतो आणि बरा व्हायच्या आधीच सलाईनसकट हॉस्पिटल मधून धावत सुटतो आणि व्हिलन ला "त्यापेक्षा हा ठीक असताना याच्याशी मारामारी परवडली" असे वाटावे इतका बडवतो.

5a चित्रपटाच्या शेवटी मेला: पर्मनंट मरतो.
5b चित्रपटाच्या मधेच मेला अशी शंका: नक्कीच नंतर उगवतो.
5c चित्रपटाच्या मधेच मेला आणि जाळलेला किंवा पुरलेला दाखवला: नक्कीच डबल रोल असतो.
5d चित्रपटाच्या क्लायमॅक्स मधे काहीतरी चांगले काम करताना मेला: उर्वरित लोक शेवटच्या शॉट्ला त्याच्या पुतळ्याला वंदन वगैरे करतात.

field_vote: 
4.454545
Your rating: None Average: 4.5 (11 votes)

प्रतिक्रिया

भारी लीस्ट!!

आमच्याकडून काही सुचवण्या -

१. व्हिलनचे नाव मिलिंद कुलकर्णी/हेमंत देशपांडे/रमेश वर्मा वगैरे कधिच नसतात, ती नावे कायमच मोगॅम्बो, कांचा चिना, लॉयन, गब्बर, केसरिया विलायती, शाकाल अशीच असतात.

२. पुढची बोर्ड मिटींग कायम 'अगले महिनेकी १८ तारिख को होगी'

३. कुठलाही भुभाग,ऋतू असो, हीरो शक्यतो चामड्याचे जाकिट नक्किच घालतो.

४. झोपडीत रहात असला तरी हीरोची तब्येत, कपडे अगदीच उत्तम असतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फुटलो.
पाच ष्टार देउन मोकळा झालो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

फु आणि ट आणि लो!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पांघरूणाचा नियम पटला नाही. अहो, मुंबईतल्या भयंकर उकाड्यातही डासांपासून रक्षण म्हणून पांघरूण असतं हो! असे कसे तुम्ही एवढे इग्नरंट. आणि "नॅरो एस्केप रूल" भयंकर आहे, म्हणून अमान्य आहे. हिरो वाचला म्हणून हिरो ना ("उडाला तर कावळा, बुडाला तर बेडूक" या चालीवर वाचणे.)

तुम्ही फारच पूर्वग्रहदूषित नजरेतून चित्रपट पहाता असं लक्षात आलं आहे, त्यामुळे तुमच्या नियमांवर आम्ही बहिष्कार घालत आहोत. (अर्थात इथेही आम्ही व्हिलन ठरून तुमच्याच नियमांत उल्लेख नसलेली जनता (आठवा मॉबसीन्स) आमच्यावर चाल करून येईल याची आम्हांस खात्री आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अहो, मुंबईतल्या भयंकर उकाड्यातही डासांपासून रक्षण म्हणून पांघरूण असतं हो!

किंवा - "मर हया उकाड्यात" हा 'पवित्र' हेतु असो शकतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जबर्‍या.

नॅरो एस्केप नियमातला एक महत्त्वाचा भाग राहून गेला आहे. चित्रपट हॉलीवुडचा असेल तर एस्केप करण्यापूर्वी एका पात्राने बरोब्बर पाच वेळा 'Go Go Go Go Go' असे म्हणायचे असते. हे Go चार किंवा सहा असून चालत नाहीत.

(बहुदा मनमोहन देसाईंच्या) काही चित्रपटात पाहिलेला नियम. प्रजननक्षम वयात असलेल्या पुरुष आणि स्त्रीने कोणत्याही परिस्थितीत थंडीपावसाच्या ठिकाणी रात्र घालवू नये. हिरॉईन रात्री अचानक थंडीने मरणप्रायः अवस्थेत येते आणि हिरोला तिच्या अंगात उब निर्माण करण्यासाठी कुणी न ऐकलेला एक निर्वाणीचा मार्ग पत्करावा लागतो. (या मार्गाने तिचा जीव तात्पुरता वाचतो पण लवकरच तिला उलट्या वगैरे त्रास सुरू होतात)

२३-अ - हा बॉल अशा कौशल्याने मारलेला असतो की मागे मागे धावत गेलेल्या फील्डरचे पाय बाऊंडरीलाईनवर असताना त्याच्या उंचावलेल्या हातांच्या बोटांना निसटता स्पर्श करूनच तो बॉल बाऊंडरीपलिकडे पडला पाहिजे. बाऊंडरीची लांबी, फील्डरची उंची या सर्व बाबी लक्षात घेऊनच हिरो बॉलची ट्रॅजेक्टरी निश्चित करतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(या मार्गाने तिचा जीव तात्पुरता वाचतो पण लवकरच तिला उलट्या वगैरे त्रास सुरू होतात)

म्हणजे तिच्या जिवात जीव येतो.
आणि असे झाल्यावर तिचे त्याच हिरोशी लग्न होणे कदापि शक्य नसते त्यामुळे दुसर्‍याच कोणाशीतरी लग्न करून त्या जिवात येऊन बाहेर पडलेल्या जिवाला किंवा त्याच्या उगमाला लपवण्याचा खेळ पुढचे तीन तास चालू राहतो.
पहिला हिरो आणि दुसरा हिरो यांच्यात जास्त लोकप्रिय कोण यावर मग कोणी मरायचे ते ठरवले जाते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL
ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL
ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL
ROFL ROFL ROFL ROFL ROFL
ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL
ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL
ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL
ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL
ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL
ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL
ROFL ROFL ROFL ROFL ROFL
ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL
ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL
ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL
ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL
ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL
ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL
ROFL ROFL ROFL ROFL ROFL
ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL
ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL
ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख आणि प्रतिसाद दोन्ही आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

कहर...
धुव्वा...
कळस..
ठ्ठो.ठ्ठो.ठ्ठो...

सविस्तर प्रतिसादासाठी रुमाल टाकत आहे.

ठसकून हसवलेत.

संपूर्ण लेखच "क्वोट" करण्याचा मोह होतोय. तरीही शक्य तेवढी कमी वाक्यं घेतोय:

१४.
काही विशिष्ट गोष्टी करणारे लोक त्या करताना दारे व्यवस्थित बंद करून करत नाहीत.

अशा प्रसंगीची काही वाक्यं:

पुत्र : पापा आपकी रोनेकी एक्टिंग को तो दाद देनी पड़ेगी..
पिता : हाँ बेटा..यह सब मैंने ही किया..मैंनेही चमेली को राजा के पास भेजा.. मैनेही राजा के दूध में नशे की दवाई मिलाई..और वो फोटोग्राफ्स भी मैंने ही छुपकर ली थी..
पुत्र : वा पापा.. दो प्रेमियों के बीच शक और नफ़रत का जहर भरने का आप का आयडिया कमाल का है..
पिता : अब किरण राजा के मुँह पे थूकेगी भी नही..वो तुझे मिल जायेगी..और उसके साथ उसके बाप का पैसा भी.. इसे कहते है एक तीर में दो पंछी..उसके बाप के साथ मेरा पुराना हिसाब भी चुकता हो जायेगा..मैंने जब किरन की माँ का खून किया था तब उसीने मेरे खिलाफ गवाही दी थी..

मग एकदम.. दारामागून लपून ऐकणार्‍या व्यक्तीच्या हातून ग्लास खाली पडणे.. खळ्ळ आवाज..

किंवा कोणी टेपरेकोर्डर घेऊन उभं असेल तर पुरावा रेकॉर्ड झाला.. अर्थात त्या रेकॉर्डेड पुराव्याचा उपयोग नसतो.. कारण हे लोक्स ती कॅसेट चुपचाप खिशात टाकून पलायन करण्याऐवजी तिथ्थल्यातिथ्थेच व्हिलनच्या डेनमधेच त्याला टेप वर करुन दाखवतात आणि ललकारुन सांगतात की "राका.. " किंवा "ठकराल".. "तेरे दिन अब भरगये है. इस टेप में मैने सारी बाते रिकार्ड की है.. मैं इस टेप के जरिये समाज के सामने तुम्हारे शरीफ चेहरे का पर्दाफाश करुंगा. तुम्हे फासी के तख्ते तक पहुंचाके रहूंगा. मैं अभ्भी ये टेप लेके पुलीस के हवाले करने जा रहा हूं.."

आता इतकं बकल्यावर व्हिलन, त्याचा पुत्र आणि दारु पीत उभी असलेली ग्यांग कशाला जित्ता सोडेल याला किंवा हिला??

१५:
हीरॉईन किंवा कोणीही मुलगी झोपलेली आहे. अशा स्थितीत तेथे जागा असलेला तरूण जर अच्छा दोस्त असेल तर तो आपले पवित्र हेतू दर्शवण्याकरिता भर मुंबईत भर उन्हाळ्यात सुद्धा तिच्या अंगावर पांघरूण घालून तेथून जातो.

प्रसंगी स्वतःचा शर्ट किंवा तो प्रसिद्ध चामडी कोटही तिच्याभोवती लपेटतो..

१६. नॅरो एस्केप रूल:
डायनोसॉर, मॉन्स्टर्स, भुते, पाण्याच्या लाटा, आगीचे लोळ यापासून पळणारे जर "मेन कलाकार" असतील तर ते नेहमी एक दोन इंचांच्या किंवा सेकंदांच्या फरकाने वाचतात.

येस्स.. हिरो सर्व दुरितांना धुवून रक्ताळलेल्या तोंडाने "लास्ट"ला हिरॉईनकडे आर्द्र नजरेने बघत असतो आणि मागून धूसर फोकसमधे दांडके उगारुन व्हिलन लडखडत येत असतो.. तो पुरेसा जवळ आला की मगच हिरॉईन अचानक भयचकित होऊन किंचाळते आणि हिरो मागे वळून पाहीपर्यंत डोक्यात दांडू बसलेला असतोच.

१७.
हीरो व हीरॉईन दोघेही पळालेले असतील व ते एरव्ही सुद्धा क्वचित घरी जेवणारे असतील तरीही ते पळून येउन लपलेल्या जागी मात्र त्यांना एकदम लाकडे तोडून आणून दगडांची चूल करून त्यावर स्वयंपाक करावा लागतो.

यांच्या पळून येऊन राहायच्या जागा या खंडहर, कोणीतरी सोडलेले घर किंवा गोठातबेला अशा सुंदरसुंदर असतात. त्यांच्या बाजूने झरा नदी वगैरे वहात असते. आणि जालिम दुनियासे दूर म्हणजे खरोखर कोणाचे पाळीव कुत्रेही फिरकणार नाही इतक्या निर्जन जागी ते राहतात.

१९. खालील नावे असलेले लोक कधीही वाईट नसतातः

१. मास्टरजी

२. खान चाचा

३. मिसेस ब्रिगॅन्झा

याउप्पर मी हेही म्हणेन की हे तिघेही बहुधा शेवटाला मरतात.. हंगलटाईप बापुडवाणे...

२०.
जेव्हा दोन हीरोंचे एकाच हीरॉईन वर प्रेम असते ते तिघेही एकमेकांना ओळखत असले तरी तिचे नाव किंवा जरा क्लू लावता येइल अशी इतर काहीही माहिती एकमेकांना देत नाहीत.

..मात्र तिला वश करण्यासाठीच्या बकवास गुळगुळीत टिप्स मात्र एकमेकांना भरपूर देतात.. त्या टिप्स देतानाही ते त्या पोरीविषयी अधिक जाणून घेत नाहीत.

शिवाय आणि एक पाहिलं का? "तीच ही.. हीच ती.." हा शोध जेव्हा त्यांच्यापैकी एकाला लागतो तेव्हा तो नेहमी वन वे स्वरुपातच लागतो.. म्हणजे दोघांच्या नकळत त्यांचं बोलणं ऐकताना किंवा लिहिलेलं पत्र पाहताना, वॅलेटमधला फोटो पाहून वगैरे.. ही गोष्ट नेहमी एकालाच कळते आणि तो मित्रासाठी त्याग करायला मोकळा होतो. दोघांनाही समोरासमोर (तिघे एकत्र असताना) हा सूर्य हा जयद्रथ न्यायाने, "तेरी सपनाही मेरी लैला है" असा उलगडा कधीच होत नाही.

पोरीला कोण आवडतो किंवा एकजणतरी आवडतो का हे प्रश्न दुय्यम आहेत. दोस्ती हमेशा सबसे ऊपर होती है.. त्यामुळे दोघांमधे एकमेकांना हिरॉईन देऊन टाकण्याची स्पर्धा लागते.. जो जिंकतो तो शेवटाला मरतो, कारण दुसर्‍या हिरोसोबत हिरॉईन सचोटीने संसार करु लागल्यावर हा एक्स आशिक मजनू डोळ्यासमोर राहणं तापदायकच की.

२१.हिन्दीतील हीरो कोणत्याही आर्थिक स्तरावर असेल तरी त्याच्या देशा-परदेशातील गाड्या लक्झरी ब्रॅण्डच्याच असतात.

आणि घर??? हलाखीच्या परिस्थितीतसुद्धा त्यांचं मुंबईतलं घरही व्यवस्थित चौसोपी वाड्यासारखं असतं..इथे आम्ही एक वन बीएचके घ्यायला दहा वर्षं घासतोय.

२६. हीरोच्या जगण्यामरण्याचे नियम.

3a यात चित्रपट emotional, "this movie is about relationships" वगैरे असेल तर तो नदीत पडला किंवा अपघात झाला म्हणजे मेलाच असे गृहीत धरून नायिका दुसरे लग्न करते, आणि ते जरा सेटल होत आहेत म्हणेपर्यंत हा तेथे कडमडतो. तिच्या पार्टीत एक ग्लास हातात धरून तिच्या बेवफाईबद्दल तो वाचल्याचा आपल्याला पश्चात्ताप होईल एवढी एक बोअर गझल गातो, ते गाणे कशाबद्द्ल आहे हे उपस्थितांपैकी इतरांना तर सोडाच पण दुसर्‍या नवर्‍यालाही कळत नाही. मग दोन्हीपैकी कोणते लग्न जास्त पुढच्या स्टेज ला गेलेले आहे त्यावर हा की तो मरतो ते ठरते.

यात थोडंसं फाईन ट्यून करण्याचा प्रयत्न करतो.. हे बेवफाईचं गाणं गात असताना तो हिरो (पियानो वाजवत नसला तर) दारुचा ग्लास घेऊन थेट हिरॉईनच्या डोळ्यात नजर भिडवून गात असतो.. तीही खिन्न किंवा डबडबून त्याच्याकडे बघत असते.. दुसर्‍या कडव्यापर्यंत हा उध्वस्त हिरो "तू प्यार है किसी और का, तुझे चाहता कोई और है" म्हणत म्हणत एवढा निर्ढावतो की सरळ (त्याही मंद गाण्यावर) हिरॉईनीला झळंबून डान्स करु पाहणार्‍या त्या वाईट्ट मंगेतराजवळ तो जातो आणि हिरवीन+मंगेतर अशा जोडीभोवती पिंगा घालत गाऊ लागतो.. त्यातही मंगेतरच्या खांद्यावरुन दिसणार्‍या हिरॉईनच्या नजरेत नजर फिक्स..

आणि एवढ्यानंतरही तो मंगेतर मस्त नाचतच असतो.. अशा वेळी कोणीही मंगेतर अशा आपल्या भावी बायकोकडे असं बघून गात राहणार्‍या भणंग गायकाला सप्तरंगी हग्यामार देईल.

.......

भन्नाट आवडले आहे. फारएंडसाहेब.

-(फॅन) गवि

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL
खो खो खो हसतोय

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

जबराट निररिक्षणशक्ती आहे राव!.
ROFL ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हिरो गरीब अथवा श्रीमंत असला तरी केवळ न्याय्य कारणाने मारामारी केली असल्याने क्लब, बार, रेस्टॉराँ मधे केलेली तोडफोड त्याच्याकडून कधीच वसुल केली जात नाही. किमान दोन चार बाटल्या, चार पाच टेबले, दोन चार खुर्च्या, बार काउंटरवरील सर्व ग्लास फोडल्याशिवाय व्हिलनला धडा शिकवून होत नाही. तसाही 'मै तुझे देख लुंगा' म्हणत व्हिलनही हा धडा अजुन अपूर्ण आहे व परत एकदा माझा क्लास घे अशी आठवण करुन दिल्याशिवाय जात नाही. शिवाय अशी मारामारी झाल्यावर हिरोच्या जवळच्या वॄद्ध स्त्रीपात्राने एक गांधीगिरीचा अल्पसा डोस देणे एन्ड, ऑर प्रेयसीने मारामारीनंतर लगेच मोबदला म्हणून प्रयणगीत गाणे कंपलसरी.

हिरोला, हिरॉइन क्लब मधे घेउन आली व त्याने तिथे आयत्यावेळी उडत्या चालीचे गाणे म्हणणे अगदीच अनपेक्षीत नसले तरी क्लब मधील इतर डान्सर्स व त्याच्या डान्स स्टेप्स अगदी आपसूक जमून येणे हे त्याच्या पहीली ते ग्रॅज्युएट दरवर्षी गॅदरींग, पिकनिक व गणेशोत्सवात न चुकता नृत्यात भाग घेण्याच्या छंदाबरोबरच, ते आख्खे गाव फक्त सुबल सरकारने नृत्यदिग्दर्शन केलेले सिनेमे दूरदर्शनवर पहात वाढले असल्यामुळेच.

परदेशातील सर्व रस्ते हिरोला इत्यंभूत माहीत असतात, अचानक पाठलाग झाला तरी बरेच अंतर न हरवता मागावर जाउ शकतो. सिनेमात न दिसलेला, न बोलणारा व्हिलनचा आदमी मात्र हिरोला गुंगारा देउ शकतो पण पकडला गेल्यास एका थप्पडमधे त्याचे काम तमाम होउ शकते. किंबहुना आपण पकडले गेलो हेच त्याने इतके मनाला लावून घेतले असते की त्याच्या तोंडात तीळ भिजत नाही. हिरोने चुपचाप बता दे म्हणले की हिरोच्या मनातील सर्व माहीती मोजक्या शब्दात अगदी सुस्पष्टपणे देतो. अर्थात व्हिलन जर एखाद्या अतिशय संघटीत आंतरराष्ट्रीय टोळीचा असेल तर अश्या माणसाकडे सायनाईड कॅप्सुल सापडण्याचीही शक्यता असते.

जरी महत्वाच्या कामाला भेटीला बोलावले असले, बराच वेळ वाट पहात असला तरी एक माहीतगार इसम जो हिरोला अतिशय महत्वाची गोपनीय माहीती देणार आहे तो आडोश्याच्या ठिकाणी न जाता पाळतीवर असलेल्या व्हिलनच्या माणसांच्या पहील्याच गोळीने मरणार. व त्याच्या तोंडून काही शब्द येउ शकत नाहीत. एका गोळीत काम तमाम करणारे हे नेमबाज मात्र व्हिलनच्या अड्यावर हिरो धुलाई करायला येतो त्यावेळी बरोब्बर रजेवर गेले असतात व बदली अकुशल कामगार जे नेम चुकण्याच्या बोलीवरच कामावर घेतले असतात ते इमानेइतबारे काम करत असतात.

व्हिलनच्या मोठ्या अड्यावर "गणवेशधारी" द्वारपाल म्हणून काम करणारे, नेहमीच हिरो व साईड हिरोच्या उंची, मापाचे असतात. व ही बाब मात्र त्या गणवेशधारक द्वारपालांसाठी फायद्याची असते कारण त्यांना बरेचदा गणवेश काढून घेउन फक्त हातपाय बांधून, तोंडात बोळा कोंबून गुमान आडोश्याला बसवले जाते. उगाच ठार मारत बिरत नाहीत. पण जर एखाद्या उंचावरच्या ठिकाणी ड्युटी असेल जसे उंच इमारत, डोंगर कडा इ. ठिकाणी असेल तर मात्र खरे नाही कारण गोळी लागताच बंदूक हातातुन टाकून त्यांना उंचावरुन खाली पडून मरण निश्चीत.

अगदी उंच ठिकाणी गस्त घालणार्‍या रखवालदाराला दुर्बीणीतून अथवा नुस्ती नजर टाकूनही, हिरो जोवर त्याचे पाय खेचून आडवा पाडत नाही तोवर दिसत नाही.

असो अरे जरा त्या चिंतातूर जंतूला विचारा आम्ही सगळे बॉलीवूड , हॉलीवूडात अडकले असताना देश विदेशचे उत्तमोत्तम सिनेमे हा कधी, कुठे , कसा बघत होता? त्याच्या पिठाच्या गिरणीचा पत्ता मागा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खो खो खो..

पण जर एखाद्या उंचावरच्या ठिकाणी ड्युटी असेल जसे उंच इमारत, डोंगर कडा इ. ठिकाणी असेल तर मात्र खरे नाही कारण गोळी लागताच बंदूक हातातुन टाकून त्यांना उंचावरुन खाली पडून मरण निश्चीत.

अगदी अगदी.. गोळी भले समोरून लागली असेल तरी हे लोक्स गोळी लागल्यावर पुढच्या दिशेतच पडतात. आणि इमारतीवरुन खाली पडण्याच्या मार्गामधे एखादा लहानसा कठडा असला तर गोळी लागल्यावर चपळाईने हलकीशी जंप मारुन त्यावरुनही खालीच पडतात..

आणखी एक राहिलं होतं..

साक्षीदाराचा त्याच गावच्या कोर्टात जाण्याचा मार्ग निर्मनुष्य जंगलातूनच जातो. भले मुंबई हायकोर्ट का असेना..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डोक्यात गोळी लागल्यावर सुद्धा ४५ सेकंदाचा ऑस्कर अवार्ड वाला अभिनय.
(नाना पाटेकर-अग्निपरीक्षा)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

महाभारतात किंवा चित्रपटात लढाईचा प्रसंग चालु असताना तलवारीने वार केल्यावर.. ज्याच्यावर वार झालाय तो गोल फिरुन तोंडाचा होईल तेवढा आ वासत कॅमेर्‍यावर येऊन पडतो.. तो सिन आपल्याला ज्याम आवडतो. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आणि बाणांची टोकं नेहमीच एकमेकाला टक्कर देतात.
अर्जुनाने १ बाण सोडला की अर्धे अंतर कापेपर्यंत त्याचे २० होतात. त्याच वेळी कर्णानेही बरोब्बर तेवढ्याच मल्टिप्लिसिटीचा बाण सोडलेला असतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...

महाभारत रामायण सिरीयलस्च्या वेळेस मला एक बाळबोध प्रश्न पडायचा.
बाणाच्या ज्या टोकाकडून आग जोरात बाहेर येते; त्याच टोकाच्या दिशेने बाण पुढे कसा जाऊ शकतो?
न्यूटनचा तिसरा नियम पार कोलमडून पडतो इथे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाणाच्या ज्या टोकाकडून आग जोरात बाहेर येते; त्याच टोकाच्या दिशेने बाण पुढे कसा जाऊ शकतो?
न्यूटनचा तिसरा नियम पार कोलमडून पडतो इथे

बाळबोध म्हणून फारच वैज्ञानिक प्रश्न पडतो बुवा तुम्हाला. असंही तमाम मालिका-पिच्चरांमध्ये न्यूटनचा तिसराच काय सगळ्यांचेच सगळे नियम कोलमडून पडतात.

एकदा कोणत्या मालिकेत पाहिले होते आठवत नाही पण अश्याच पुराण काळच्या युद्धात कोणीतरी पाऊस पाडणारा बाण सोडतो आणि लढणारे सर्व सैनिक चक्क पावसात नाचायला लागतात!! हे बघून मी चाटच पडले होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...

हीरो बी ए पास होतो : काळ राजेंद्र कुमार राजेशखन्ना
हीरो सिव्हील इन्जीनीयर असतो : काल जितेंद्र
हीरॉईन काय शिकते ते कधीच कळत नाही.
हीरोच्या गरीब आईला फक्त कपडे शिवण्याचे मशीन चालवता येते.
त्यावेळेस घराला पट्ट्यांच्या जाळीची खिडकी असते.
हीरॉ हीरॉईन या प्रमाणे एक प्रसिद्ध जोडी त्याकाळच्या चित्रपटात असायचीच. त्यांची कामे ही ठरलेलीच असायची
"फरीदा जलाल" चित्रपटात असेल तर चित्रपटात बलात्कार आहे हे समजून घ्या. बहुतेकवेळा हा रणजीतकडूनच केला जायचा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एका सिनेमात मी निम्ननिर्दिष्ट वाक्य पाहिलं आणि ऐकलं होतं. ही शंभर टक्के खरी गोष्ट आहे विजुभाऊ..

एक म्हातारी आई आपल्या नुकत्याच उंडारुन परत घरी आलेल्या मुलाला सांगते की "चिठ्ठी / खत आया है, तुम बहोत बडे जज्ज बन गये हो..."

मला एक सांगा, माणसे बडे जज्ज, कलेक्टर किंवा तत्सम कोणी असे एकदम "होतात" का? आणि त्याला आधीच आतून बाहेरुन काही खबर नसते? पोरगा जज्ज झाल्याचं पोष्टाने आईला प्रथम कळावं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कॉलिंग भडकमकर मास्तर... मास्तर, तुम्ही कुठे आहात? तुमचा घरचा धागा आहे हा...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

हा हा हा हा हा हा !!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"अनन्त वाचाल बरलति बरल त्या कैसा दयाल पावे हरि"