सूड

सुक्ष्म पण टोकदार
तिरस्कार करते मी तुझा
माझीच काळी बाजू उजेडात
आणल्याबद्दल
मला माझ्याच नजरेत
पाडल्याबद्दल
माझी स्वप्रतिमा
धुळीत मिळवल्याबद्दल
...
मला choice होताच म्हणा
वेळेत सावरण्याचा
मोहाचे दमन करण्याचा
अत्यल्पमती गहाण न टाकण्याचा
अन तरीही मी चुकले
चुकले-माकले, उतले-मातले,
चु-क-ले, मा-क-ले, उ-त-ले मा-त-ले..!!
....
अन तरीही ...
जर तुला ओरबाडलं,
रक्तबंबाळ केलं,
तर निदान मला समाधान मिळेल
सूड उगवण्याचं,
तुझा मोह उशीरा का होईना,
अल्पबळानिशी धुडकावण्याचं समाधान
..
माझी डागळलेली प्रतिमा उजळेल थोडीच?
कळतं आहे मला,
अन तरीही दुखावायचं आहे तुला.
खूप दुखवायचं आहे..
बोचकारायचं आहे
दंश करायचा आहे,
घाव घालायचा आहे.
I want to see you helpless & derive pleasure.

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (2 votes)

प्रतिक्रिया

स्वत:ची जबाबदारी टाळून फक्त दोषारोप अन विपरीत भक्तीची कविता आहे. गेट वेल सुन .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी ताजा-ताजा राग कवितेतून व्यक्त झालाय... आणि तो होण्यात तसं काही वावग नाही...
कलांतराने टोकदार राग "बोथट" होईलंच, यात शंका नाही (स्वानुभावातून बोलतोय Wink )...
वेळ हेच औषध... Smile

तरी, कविता आवडली आहे...
पण या संदर्भात पुढे नंतर थोडं positive approach ची कविता वाचायला अजून आवडेल...
लिहित रहा...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- सुमित

"दिसे जे कवीला,न दिसते रवीला...सांगूनी गेले कुणीसे शहाणे..."

आणि तो होण्यात तसं काही वावग नाही...

स्वतःला उगाचच व्हिक्टिम समजून, दोरीला साप समजून बडवणार्‍यांचा राग बोथट होइलच याची गॅरंटी वाटत नाही Wink
स्वतःचाही जर मोहात पाय घसरला असेल तर तो राग दुसर्‍या पार्टीवर काढणं गैर = वावगच आहे .
असो. माझं मत!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"प्राईड अँड प्रेज्युडिस"मधून :
(Mrs. Bennet) "...there was a gentleman ... so much in love with her... he wrote some verses on her, and very pretty they were.''

"And so ended his affection,'' said Elizabeth impatiently. "There has been many a one, I fancy, overcome in the same way. I wonder who first discovered the efficacy of poetry in driving away love!''

"I have been used to consider poetry as the food of love,'' said Darcy.

"Of a fine, stout, healthy love it may. Every thing nourishes what is strong already. But if it be only a slight, thin sort of inclination, I am convinced that one good sonnet will starve it entirely away.''

----

या कवितेच्या बाबतीत : कवितेचे यश ती मनस्वी आणि त्या पात्राकरिता खरी असण्यात आहे. (ते पात्र आपल्याला नावडते, ही बाबही महत्त्वाची, पण वेगळी.) या निकषावर ही कविता तुमच्या बाबतीत यशस्वी ठरली, असे मला वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कवितेतल्या तिचा राग/मनस्थिती (चूक बरोबर कशीही असली तरी) नेमकी व्यक्त झाली आहे Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आक्रस्ताळेपणा असा मूड आहे या कवितेचा अन आक्रस्ताळेपणा माझ्या तुटपुंज्या ज्ञानाच्या आधारे तेव्हा केला जातो जेव्हा बघे असतात, शिवाय आक्रस्ताळेपणा अ‍ॅफोर्डेबल असतो. टोटली कॅल्क्युलेटेड इमोशन आहे ती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शापित यक्षगान ... चांगलय

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||