बसमधले विचार

काही वर्षांपूर्वी "स्ट्रीमींग थॉट्स" कागदावर उतरविण्याचा, तेव्हा मला तरी अभिनव असलेला प्रयोग सन्जोपरावांनी केला होता. अतिशय आवडलेला. त्याच धर्तीवर, आज बसमध्ये जे काही विचार मनात आले ते उतरवून काढत आहे. काही अतिवैयक्तिक विचारांना कात्री लावून पण प्रांजळपणे मांडत आहे. अगदी भारताकरता "इंडिया" हा शब्द मनात येण्यापासून. अन अंगठीकरता "रिंग".
___
आला हा केसाचं टोपलं वाला काळा. कंगवाही केसातच अडकवतो. ह्म्म यांना निग्रो नाही म्हणायचं, तो गुन्हा आहे. नाही काय फ्युचर आहे इतकं टोपलं केस असलेल्या माणसाच? : ( का नाही? सत्यसाईबाबांचं नव्हतं टोपलं? त्यांनी घडवलच की त्यांचं फ्युचर. पण ते विभूती होते. होते का? असणारच आयुष्यभरचं ढोंग कसं शक्य आहे .
..
ही फुंकाडी, पण हिचे हात कसले नाजूक आहेत. एकच नाजूक रिंग घातलेय डाव्या हातात. इथे इतकी नाजूक रिंग पहायला मिळणं विरळच. बोटं लांबसडक आहेत वा!!नाहीतर आपण नखं खाऊन वाट लावलीये. खरच सुंदर आहेत बोटं.
..
खोकला का हा नीळं विंड्चीटरवाला परत? याला इबोला असावा की काय? ए बाबा मला भारतात जाऊन येऊ दे मग काय इबोला व्हायचाय तो होवो. खरच? रियली? मग होऊ देत? तसं नाही म्हणायचं मला ... एनीवे <इथे हा विचार एकदम झटकून टाकलाय>
..
ही रेडनेक रोज उजवीकडे बसते ती आज डावीकडे कशी? रेडनेक नाही हां बिचारी कष्टाळू वाटते. हिच्या जागेवर नवीनच कोणीतरी बसलय. असो.
..
रेल्वे लाइन आली. ए बघ बाबा गाडी येत नाही ना, उगाच टक्कर व्हायची. मला इंडियाला जाऊन येऊ द्या बाबांनो.
..
एकवीरा आई तू डोंगरावरी
नजर हाय तुझी कोल्यावरी
गाणं बेफाम रुंजी घालतय सकाळपासून. फुलाचा सुगंध दाटावा तसं हे गाणं दाटून राहीलय मनात. वा वा! या विचाराकरता तरी आज लेख पाडायला हवा.
..
एकवीरा आई तू डोंगरावरी
.
परवा रडणारी, मध्यमवयीन उतरली उतरली. गॉड ब्लेस हर. खरच गॉ-ड ब्ले-स ह-र.
..
झोप फार येतेय. ह्म्म कॉफी नाही झाली आज अजून. किम चा शॅक एव्हाना उघडला असेल. बरं झालं बुवा तिच्या मुलीला स्क्रीनींग मध्ये कॅन्सर सापडला नाही. असो..
....

<बसस्टॉप येतो>

field_vote: 
2.666665
Your rating: None Average: 2.7 (3 votes)

प्रतिक्रिया

आत्मपरीक्षण करता देवी-गॉड अन बाबा हे लोक २० मिनीटात तीनदा येऊन गेले आहेत. कर्क राशीचा कनवाळूपणा - रडणार्‍या स्त्रीबद्दल सहानुभूतीही उमटली आहे.
__________
प्रत्येकाने हा प्रयोग करुन वैयक्तीक नसलेले विचार या धाग्यावर किंवा अन्य धाग्यावर जरुर मांडावे असे आवाहन/विनंती करेन. खरच स्वतःच्या स्वभावाचं प्रतिबिंब उमटतय या प्रयोगात. मात्र प्रामाणिकपणा ठेवावा असे सुचवेन. म्हणजे उगाच शायनिंग मारायला काहीतरी व्यामिश्र किंवा हुच्च लिहू नये. पण त्याचबरोबर आपल्या बुद्धी/मती/स्वभावाशी सुसंगत उच्च विचार आले तर ते लिहायलाही लाजू नये.

परत तेच सांगते - प्रत्येकाने हा प्रयोग करुन वैयक्तीक नसलेले विचार या धाग्यावर किंवा अन्य धाग्यावर जरुर मांडा. वाचायला अन आपल्याला जाणून घ्यायला खूप आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असा consciously प्रयत्न केला नाहिये अजून . कल्पना आवडलीये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बस ऑफ थॉट्सची कल्पना आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

सोप्पी आणि मजेदार!
कसलं फटाफट उड्या मरतो आपण मनातल्या मनातं Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बापरे आमचा बसप्रवास पाऊण तासांचा असतो. इतक्या गोष्टींवर विचार करतो की नोटींगला ५० पानी वहीच घेऊन बसावी लागेल. (परतीच्या प्रवासात झोपत असल्याने काही विचार येतच असले तरी लक्षात रहात नाहीत फारसं)

त्यापैकी पहिल्या १० मिनिटांतील विचार लक्षात ठेवायचा प्रयत्न करेन सोमवारी/मंगळवारी.

कल्पना आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

बसमध्ये झोपू शकणार्‍यांबद्दल नितांत हेवा वाटतो मला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

आवडलं

आणि वाचून हे आठवलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

तो धागा थोर आहे. त्याची वेळोवेळी आठवण काढली गेली पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कल्पना आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा लेख वेड्यासारखा आवडणारा. जॉय ऑफ अँटिसिपेशन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमच्याच अनेक अवतारांपैकी आहे का?
खाली कर्क राशी बिशिचा उल्लेख आहे म्हणून विचारल. आयडिया भारी आहे.

आलेले विचार जसेच्या तसे मांडायचे कि सोवळेपणाच्या फिल्टर मधून आधी काढायचे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फिल्टरमधून मला तरी काढावे लागले नव्हते. काढायचे तर काढावे नाहीतर ठेवले तर जास्त मज्जा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0