परिकथेतील राजकुमार यांच्या संगणकावर मराठी कसेलिहावे या पुस्तकाच्या प्रकाशनाचा आणि त्यानंतरच्या मौजमजेचा वृत्तांत

आपले सदस्य परिकथेतील राजकुमार (परा) ऊर्फ प्रसाद ताम्हनकर यांच्या 'संगणकावर मराठी कसे लिहावे' या पुस्तकाचे प्रकाशन शनिवार १० डिसेंबर रोजी ठाणे येथे संपन्न झाले.

मनसेचे स्थानिक नगरसेवक सुधाकर चव्हाण यांनी 'महाराष्ट्र धर्म' हे प्रदर्शन आयोजित केले होते, त्यात पुस्तक प्रदर्शन, बोधनकरांच्या अर्कचित्रांचे प्रदर्शन स्टॉल होते.

कार्यक्रमाला कोणकोण येणार याची फोनाफोनी ३-४ दिवसांपासून चालू होती. कार्यक्रम सायंकाळी ७ वाजता ठरला होता पण तेव्हा गर्दी असेल म्हणून ६ वाजताच जमायचे ठरले होते. परंतु गाडीत पेट्रोल हवा भरून तेथे पोचेपर्यंत आणि पार्किंगला जागा सापडेपर्यंत (चारचाकी गाडी आहे असे सांगण्याचा क्षीण प्रयत्न Smile )मला साडेसहा वाजले. तेव्हा रामदासकाका, सर्वसाक्षी, विश्वनाथ मेहेंदळे, अमोल खरे, मस्त कलंदर, निखिल देशपांडे, मिसळलेला काव्यप्रेमी वगैरे आणि खुद्द लेखक आधीच पोचलेले होते. नंतर येणार्‍यांना तिथल्या गर्दीत हे सगळे कोठे आहेत हे शोधायला विमेंचा टीशर्ट फार उपयोगी पडला. Tongue

माझ्याच बरोबर विलासराव देखील पोचले. किसन शिंदे उशीरा येणार असे कळले.

आम्ही सगळे कार्यक्रम सुरू होण्याची वाट पहात होतो. तेवढ्यात मी विजयराज बोधनकरांनी काढलेली विविध लेखकांची अर्कचित्रे (मराठीत - कॅरिकेचर) पाहून आलो.
आयोजकांनी वेळ घालवण्यासाठी प्रेक्षकांना या प्रदर्शनाविषयी काय वाटते ते सांगायची विनंती केली. तेव्हा काही हौशी प्रेक्षक सुरू झाले. त्यांनी जवळजवळ अर्धा तास पकवले. तेवढ्यात इंडियन स्टॅण्डर्ड टाईमच्या बरेच आधी म्हणजे साडेसात वाजताच राज ठाकरे यांचे आगमन झाले.

त्यांनी प्रदर्शनाच्या प्रत्येक स्टॉलला भेट दिली. हे होत होत श्री राज ठाकरे मंचावर पोचले तोवर आणखी वेळ गेला. मग मंचावर नमस्कार चमत्कार सत्कार झाले.

शेवटी ज्याची उत्सुकतेने वाट पहात होतो तो क्षण आला. राज ठाकरे यांनी ग्रंथाचे वेष्टण काढून पुस्तक प्रकाशित केले.

पुस्तक जरी छोटेसे असले तरी त्यातल्या ज्ञानाच्या भाराने आणि लेखकाच्या तेजापुढे राजजी झुकलेले दिसतात.

तदनंतर राज ठाकरे यांनी जमलेल्या श्रोत्यांना मार्गदर्शन केले.

मात्र त्यांनी शाब्दिक आतषबाजी असलेले लांबलचक भाषण केले नाही. त्याचे कारण पुढच्या महिन्यात खूप भाषणे करायची आहेत असे सांगितले. मात्र रामदासकाकांच्या मते याचे खरे कारण बिपिन कार्यकर्ते, विजुभाउ आणि छोटा डॉन हे कार्यक्रमाला येऊ न शकल्यामुळे राजजींचा मूड गेला हे होते.

राजजींनी भाषण फार लवकर आटोपते घेतल्याने आता पुढे काय असा प्रश्न आमच्यापुढे उभा राहिला. मग सर्वांनी तिथल्या मेजवानी स्टॉलकडे मोर्चा वळवला. आणि बरीचशी भजी आणि चहा यांना या जगातून मुक्ती देऊन त्यांचा उद्धार करण्यात आला.

मध्यंतरीच्या काळात नीलकांत, किसन शिंदे वगैरे मंडळीही "वेळेवर" पोचली.

मग जेवायला कुठे जायचे याचे चिंतन सुरू झाले. हे चिंतन खेळीमेळीच्या वातावरणात झाले.

चर्चा करताना विलासराव, निखिल देशपांडे, श्री सावंत व मस्त कलंदर

त्यातली चर्चा ऐकून नीलकांत यांनी डोक्याला हात लावला.

चर्चा चालू होती तेवढ्यात सिद्धहस्त लेखकांचा एक फोटो घेण्यात आला. त्यात रामदास, सर्वसाक्षी आणि परीकथेतील राजकुमार

वयोवृद्धांनी आपले कोणकोणते अवयव दुखतात याची चर्चा केली. फोटोत मी (नितिन थत्ते), रामदास आणि सर्वसाक्षी.

मध्येच जालावरील कोणते वाङ्मय पुस्तकरूपात प्रसिद्ध करता येईल यावर प्रकाशक श्री कीर्तिकुमार शिंदे यांच्याशी चर्चा झाली.

जेवायला कुठे जायचे ही चर्चा खूपच लांबली. त्यामुळे शेवटी पोळीभाजीच मागवून तिथेच जेवायचे ठरले. "पोळीभाजीच" ठरल्यामुळे काहींची निराशा झाली.

पोळीभाजी येईपर्यंत इतका वेळ गेला की सर्वांना कडकडून भूक लागली. त्यामुळे सगळे जेवणावर तुटून पडले. सत्ते पे सत्ता मधील जेवणाच्या सीनची आठवण आली. मस्त कलंदर पदर खोचून (आपलं- ओढणी खोचून) वाढायला वगैरे लागल्या. पण त्याची काही गरजच नव्हती इतकी भूक सर्वांना लागली होती.

जेवणे झाल्यावर मंडळींनी निरोप घेतला.

प्रकाशनाच्या दिवशी पुस्तकाची तडाखेबंद विक्री झाली असे आमचे प्रतिनिधी कळवतात.

बाकीचे हजर सदस्य अधिक भर घालतीलच.

अतिअवांतर : पुस्तक प्रकाशित झाल्याबद्दल परीकथेतील राजकुमार यांचे पुन्हा एकदा अभिनंदन.

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

याच वृत्तांताच्या प्रतिक्षेत होतो. फटु घरी गेल्यावर बघण्यात येतील.
तेव्हा द्यायच्या प्रतिसादासाठी रुमाल टाकुन ठेवतो
--
फटू बघितले. परा अंमळ गुटगुटीत वाटतोय. अन त्याने मेकप अगदी राज ठाकर्‍यांसारखा केलाय असं वाटलं Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मराठी आंतरजालविश्वातील सुप्रसिद्ध लेखक श्री पराकुमार हे आमचे इंटरनेटावरचे लंगोटीमित्र! त्यांचे हे यश पाहताना आम्हाला एक मित्र म्हणून फार अभिमान वाटतो...

च्यायला, ह्या पर्‍याचं पुस्तक!! अन तेही राज ठाकरेच्या हस्ते प्रकाशन वगैरे! हे आंतरजालावर लिहित होतं तेव्हा आम्हीच शुद्धलेखनाच्या दुरुस्त्या सुचवत होतो. खा लेको, आता शिकरण खा...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

थत्तेसाहेब, तुमची काहीतरी गल्लत झालेली दिसतेय. हा फोटोंत दिसणारा, खरोखर पुस्तक लिहिणारा प्रसाद ताम्हणकर या व्यक्तीला तुम्ही काही कारणास्तव परिकथेतील राजकुमार समजून बसला आहात. हा फोटोतला गृहस्थ इतका सात्विक, सज्जन व सन्माननीय दिसतो की तो परा असणं शक्यच नाही असं आमचं प्रांजळ मत आहे. परा या आयडीने या ताम्हणकर व्यक्तीची आयडेंटीटी थेफ्ट केली असल्याची शक्यता तुम्ही विचारात घेतलेली दिसत नाही. संगणकावर मराठीत कसं लिहावं याऐवजी 'हॅकिंग करून अब्जावधी डॉलर्स कसे मिळवावेत' असं पुस्तक (तेही अर्धंच) लिहिलं असतं तर ते परा यांनी लिहिलं आहे यावर विश्वास बसला असता.

या सगळ्या घोटाळ्यामुळे तुम्ही वृत्तांत खुमासदार लिहिलेला असला तरी एका भयंकर मोठ्या फसवणुकीत अजाणतेपणे का होईना, पण सामील होत आहात बहुधा. कदाचित तुमचाच आयडी पराने हॅक केला की काय असा संशय यायला लागला आहे.

असो. हे जे कोण ताम्हणकर आहेत त्यांचं अभिनंदन. राज ठाकरेंकडून प्रकाशन होणं म्हणजे काही साधीसुधी गोष्ट नाही. तेव्हा अशा सन्माननीय व्यक्तींनी ऐसी अक्षरेवर देखील सदस्यत्व घेऊन वाचकांना वेळोवेळी मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करतो. ती त्यांच्यापर्यंत पोचवावी ही थत्तेंना विनंती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा फोटोतला गृहस्थ इतका सात्विक, सज्जन व सन्माननीय दिसतो की तो परा असणं शक्यच नाही असं आमचं प्रांजळ मत आहे. परा या आयडीने या ताम्हणकर व्यक्तीची आयडेंटीटी थेफ्ट केली असल्याची शक्यता तुम्ही विचारात घेतलेली दिसत नाही.

Smile
अगदी असेच मला "राजेश घासकडवी" या आयडीबद्दलही वाटते आहे. उत्क्रांतीवर उत्तम मालिका लिहिणारे, सांख्यिकीची तत्त्वे समजावून सांगणारे घासकडवी असला खोडसाळपणा करणं शक्य नाही. त्या अर्थी राजेश घासकडवी हा आयडी ही दुसराच कोणी वापरत असावा असे वाटू लागले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

फटू बघितले. परा अंमळ गुटगुटीत वाटतोय. अन त्याने मेकप अगदी राज ठाकर्‍यांसारखा केलाय असं वाटलं +++++++++++++++++++++++++++++++++११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११ Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

''मी तंबाखु खाणारच''

अरे वा, परा हँडसम दिसायला लागला. पराचा कोणी डुप्लिकेट वगैरे आहे का काय! नितिन, वृत्तांत खुसखुशीत आहे. तुझाही आयडी चोरीला गेल्यासारखं वाटलं. Wink

परा, राज ठाकर्‍यांना आमंत्रण दिलं का नाही टीचभर मराठी संकेतस्थळांवर येण्याचं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

परा यांचे अभिनंदन.

आता मुख्य...
परा अंमळ बाळसेदार / गुट्गुटीत झाले आहेत काय यावर जरी भाष्य करु शकत नसलो तरी आम्हांस मुलभूत प्रश्न असा पडला आहे की अवघड जागी मार लागल्यावर जमिनीवर बसतांना जी गत होते, अशी त्यांची गत का बरे झाली असावी? यावर धागा कर्त्याने उत्तर देणे अपेक्षीत आहे. Biggrin असो.
वयोवृद्धांना वाळीत कुणी व कां टाकले ? वयोवृद्धांमध्ये अवयव दुखण्यापेक्षा जास्ती जालीम आणि चविष्ट चर्चा होतात ( असे ऐकून आहोत :bigsmile: ... दिसले दिसले हो आम्हास तुमचे कळफलकावरचे हात, आम्हालाही वयोवृद्ध म्हणण्यासाठी टपलेले ;;) ), त्यांचा सदर धाग्यात कुठेही उल्लेख का नाही?

अवांतरः गुर्जी, आम्हीही डोळे पिटपिटतांना छानच दिसतो किनै?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रसाद ताम्हणकर (कदाचित प.रा.) हे राज साहेबांचे धाकटे बंधू वाटत आहेत असं एक निरिक्षण इथे हातासरशी नोंदवून ठेवतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-----------------------------------------------------------------------------------------------------
'प्रास'ची
१) सांगीतिक आवड
२) लेखन मुसाफिरी